March 30, 2009

work life balance

सुखी आणि समतोल आयुष्याचे रहस्य !
work life balance, career, hobbies, self help, family, being happy,forgive, positive life
१. शोधून काढा खरेच आयुष्यात सर्वात महत्त्वाचे काय आहे?

होय, सर्वात महत्त्वाचे हे आहे कि तुम्ही तुमच्या आयुष्यात सर्वात अग्रस्थानी काय असले पाहिजे ते जाणणे. बर्‍याच वेळा आज आपल्यासाठी ज्या गोष्टी प्रधान्य आहेत आपण त्यांनाच आयुष्य समजुन चालतो. खरे म्हणजे तुम्हाला आयुष्यात अग्रस्थानी काय हवय असे वाटते ते ठरवा, जे आज आहे ते नव्हे.
या साठी सर्वात सोपा उपाय म्हणजे ५ महत्त्वाच्या गोष्टींची (Priorities) यादी बनवा. घाई नको. स्वतःला दोन दिवसाचा वेळ द्या आणि विचार करुन ही यादी बनवा.
या यादीमध्ये काही टिपीकल उत्तरे असतील, ती अशी -
कुटुंब (Family)
मुले (Kids)
पालक (Parents)
करीअर (Careear)
आरोग्य (Health)
खेळ ( Sports)
छंद (Hobbies)
प्रवास (Travel)


२. अनावश्यक कामे/कृती टाळा - ( Drop Unnecessary Activities)
आता तुम्ही बनवलेल्या या यादीचा दीपस्तंभाप्रमाणे वापर करा. तुमच्या लक्षात येइल कि अनावश्यक कामांमध्येच जास्त वेळ दिला जातोय्.ज्या गोष्टी तुमच्या यादीत नाही आहेत अशा सर्व कामांसाठी वेळ दवडु नका. शक्य तिथे नाही म्हणा.
फक्त महत्त्वाच्या गोष्टींवरच लक्ष केन्द्रीत करा.

३. तुमच्या खाजगी वेळेचा योग्य वापर करा.

कधी कामाला जाण्यात तुम्ही टाळाटाळ करत नाही. डॉक्टर कडे जाणे , मुलांच्या शाळेत पॅरेंट मीटींगला जाणे टाळत नाहीत. तसेच तुमच्या खाजगी/वैयक्तीक वेळेबरोब्रर करा. खरेतर आपल्या ऑफीसच्या वेळेप्रमाणे वैयक्तीक आयुष्यात ठरावीक वेळ मिळत नाही. २४ तासांच्या दिवसातुन आपल्यासाठी वेळ कोरुन काढावा लागतो. म्हणुन या वेळेचा वापर काटेकोरपणे करा. या स्वतःला दिलेल्या वेळेत इतर कामांना लुडबुड करु देउ नका. आणि हो, तुमच्या या स्वतःसाठीच्या वेळेत सतत इमेल चेक करणे आणि मोबाइल जवळ बाळगणे सोडुन द्या.

जास्त तास ऑफिसम्ध्ये घालवल्याने जास्त काम होते ह एक गैरसमज आहे. कामासाठी ठरवलेलं आठ तासांचं गणित हे खुप काळजीपुर्वक आणि वैज्ञानीक पध्दतीने ठरवलेले आहे. आपला परफॉरमन्स कधीच किती वेळ काम केले यावर अवलंबुन नसतो.

४. कुटुंबीयांची आणि सहकार्‍यांची मदत घ्या.

आपले भागीदार, सहकारी, कुटुंबीय आणि मित्र परीवार या सर्वांची योग्य तेथे मदत घ्या. कधी ऑफीस मधील एखादे काम आणि त्याच वेळी एखादे पर्सनल काम असा पेच निर्माण झाल्यास कधी ऑफीस मधिल सहकारी तर कधी मित्र परिवार अथवा कुटंबातील एखादा सभासद आपले काम करुन देउ शकतो.

५. रीलॅक्स रहा, आनंदी रहा.

मनाला आनंद आणि शरीराला विश्रांती या समतोल व सुखी आयुष्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत.आणि या दोन्ही गोष्टी अगदी फ्री आहेत. आनंदी रहाण्यासाठी तुम्ही करोडपती असावयास हवे, अथवा तुमच्या कडे भरपुर फावला वेळ असला पाहीजे असे मुळीच नाही. मी एक मला पटलेला फॉर्म्युला सांगतो. तुम्हालाही तो पटेल असे नाही पण बघा प्रयत्न करुन. मला मात्र या फोर्म्युल्यामुळे ८०% रीझल्ट मिळालेला आहे.

आनंदी आयुष्यासाठी पुढील पाच गोष्टी अतिमहत्वाच्या आहेत -
१. कुटंब - आपल्या कुटुंबाला आनंदी ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील रहा. आई वडीलांबरोबर रोज थोडा वेळ बोलणे ( आठवून पहा कधी आपल्या आई बाबांबरोबर एखाद्या अवांतर विषयावर चर्चा केली आहे का?), छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांचे मत विचारणे, त्यांच्या आवडीची भाजी, पुस्तक, सीडी अशा गोष्टी अधुन मधुन घरी आणा.
मुलांबरोबर खेळा (मैदानात जाउन त्यांच्या मित्रांबरोबर तुम्ही देखिल खेळा, अधुन मधुन मुलांच्या मित्रांना घरी बोलवा आणि सर्व जण मिळुन घरीच मॅच पाहणे, एखादा चित्रपट पाहणे, कधी पाणीपुरीचा कार्यक्रम असे छोटेखानी प्रयोग करा.

२. व्यायाम - दिवसातुन किमान २०-३० मिनिटे व्यायाम केलाच पाहीजे.

३.छंद - प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद असतोच. फक्त आयुष्याच्या रहाटगाडग्यात आपण ते छंद जोपासणे विसरुन जातो. ते होउ देऊ नका. काहीही करुन आपला छंद जोपासणे सोडु नका. नवनिर्मीतीचा आनंद काही औरच असतो.

४.खंत बाळगु नका - जुन्या कोणत्याही गोष्टीची खंत/राग्/द्वेष बाळगु नका.कारण मनात साठवलेल्या या भावना मनावरचं ओझे वाढवत राह्तात. ते हलके करा. एखादी गोष्ट मिळाली नाही किंवा मनासारखी झाली नाही म्हणुन रडण्यापेक्षा जे मिळाले आहे त्याचा आनंद घ्या. सचिन तेंडुलकरने एवढे रेकॉर्ड्स केले परंतु आजही त्याचे त्रीशतक झाले नाही म्हणुन आपण हळहळ्तो हे कितपत बरोबर आहे. खरेतर सचिन स्वतः असा विचार करत नाही. आणि म्हणुनच तो ग्रेट सचिन आहे.

५. माफ करायला शिका - कोणी माफी मागो अथवा न मागो त्याला मनातुन माफ करायला शिका. माफ करणारा नेहमी मोठा असतो.आणि मोठाच राहतो. दुसर्‍यांच्या चुकांमुळे आपण रागावतो आणि त्रागा करुन घेतो. त्यापेक्षा माफ केल्यास आपल्यालाच समाधान मिळते आणि चुकीचे वागणारे १० पैकी किमान ८ जण तरी माफ केल्यावर सुधारतात. इतकेच नव्हे तर आपले मित्र बनतात.
मग करा तर सुरुवात. आपल्या आयुष्याची दोरी दुसर्‍या कोणाच्या हातात का द्यायची. करीअर आणि फॅमीली दोन्ही आघाड्यांवर बाजी मारा. समतोल आयुष्याच्या दिशेने पाऊल टाका.

Learn from your mistakes !

चुकांपासुन धडा घ्या आणि पुढे चला !
learn mistakes anger management life balance personality developement

"To err is human" अशी इंग्लिशमध्ये एक म्हण आहे याचा अर्थ "माणसाकडून चुका होतातच". ऑफिसमध्ये, घरी, मित्रांसोबत, समारंभात कधीतरी कुठेतरी आपण चुकत असतोच.आपल्याला आपली चुक कळते, त्यानंतर थोडी अपराधीपणाचे भावनाही मनात सलू लागते.


मनावर संयम हवा, जिव्हानियंत्रण असावे, राग आटोक्यात असावा इत्यादी बरेच सल्ले चुका होउ नये म्हणुन देण्यात येतात. पण तरी सुध्दा आपण चुकतोच. घाबरु नका, मी काही तुम्हाला असे उपदेशाचे डोस देणार नाही आहे. तर आज आपण बोलु यात चुक झाल्यानंतर (होय झाल्यानंतर , केल्यानंतर नव्हे!) ती चुक सुधारण्यासाठी कसे वागावे आणि होणारा मनस्ताप कस टाळता येइल याबद्दल.


चुक सुधारण्याची सुरुवात होते चुक झाली आहे हे मान्य करण्यापासून. तिर्‍हाइताच्या नजरेने आधी आपले वागणे तपासून पहा. चूक लक्षात येइलच (अर्थात असल्यास!)


-- आपल्या भावनांवर आणि मनावर नियंत्रण ठेवा. केलेल्या चुकीमुळे मन अस्थीर होउ देउ नका. एक मोठा श्वास घ्या आणि हळु हळु सोडा. मनाला थोडे ताजे करा.


-- चुक घडुन गेल्यानंतर लगेचच त्याचा विचार करु नका. अथवा प्रतीक्रिया देउ नका. थोडा वेळ घ्या (२-३ तास) आणि तोपर्यंत दुसर्‍या एखाद्या गोष्टीत लक्ष गुंतवा.


-- एकदा तुम्ही फ्रेश झालात की मग झालेल्या चुकीचा विचार करा. "4 Q" थीअरीचा वापर करा. म्हणजेच ( Why) असे का घडले?, (which) कशामुळे घडले?, (How) जे झाले ते कसे सावरता येइल? (who) झाल्या प्रकारामुळे कोण कोण दुखावले गेले आहेत? हे चार प्रश्न स्वतःला विचारुन त्यांची उत्तरे शोधा.


-- झाला प्रकार सावरण्यासाठी काही करता येइल का ते पहा. जर काही करता येण्याची अंधुकशी देखिल शक्यता असेल तर जरुर करा.


-- आणि अगदिच काही करण्यासारखे नसेल तर पुन्हा अशी चुक करणार नाही हे मनाशी पक्के ठरवा.
-- झाल्या चुकीचा परीणाम सध्या हाती असलेल्या कामांवर होउ देउ नका. त्यामुळे जास्त चुका होण्याचा संभव असतो.


-- पश्चाताप करुन काहीच हाती लागत नाही. आणि चिंता करुन झाले तर नुकसानच होते. म्हणुन हे दोन्ही टाळा.


-- Sorry म्हणा. होय हा सगळ्यात सोपा उपाय आहे. बर्‍याच लोकांना सॉरी (Sorry) म्हणणे कमीपणाचे वाटते. पण तसे काही नसते. आपली चुक असल्यास सॉरी म्हणण्यास काहीच हरकत नाही.


-- पण फक्त नावापुरता सॉरी म्हणुन उपयोग नाही. "Saying sorry will not help, you should feel sorry" मनापासुन खंत वाटली पाहीजे आणि मनापासुन माफी मागीतली पाहीजे.


-- कधीही आपल्या वागण्यामुळे एखादी व्यक्ती दुखावली असल्यास क्षणभर ती व्यक्ती महत्त्वाची आहे की ज्या गोष्टीशी संबंधीत चुक याचा विचार करा. उत्तर तुम्हाला आपोआप मिळेल.


-- शहाणा आणि मुर्ख माणसात अथवा यशस्वी आणि अपयशी माणसात एक फरक असतो. शाहाणा माणुस झालेल्या चुकांमधुन धडा घेतो आणि पुढे जातो. मुर्ख माणुस एकदा केलेल्या चुकांमधुन काहीच न शिकता त्याच चुका वारंवार करत राह्तो.

March 29, 2009

Planning to buy an Air Conditioner?

ए.सी विकत घेताय, मग हे लक्षात असुद्या.
air conditioner split window ac filter refrigerent power electrical appliances
ए.सी खरेदी करताना, पहील्यांदा ठरवा की कोणत्या प्रकारचा ए.सी. तुमच्या गरजांची पुर्णता करेल- स्प्लीट ए.सी. अथवा विंडो ए.सी.

- स्प्लीट एसी मधे दोन भाग असतात. एक भाग खोलीच्या आतमध्ये असतो आणि दुसरा बाहेरच्या बाजुस.
- विंडो एसी एकच असुन तो खिडकीवर अशा प्रकारे बसवावा लागतो की एसीचा अर्धा भाग खोलीच्या बाहेर जाइल.
- आणि कॅसेट एसी हा छतावरील भिंतीमध्ये (ceiling) लावता येतो.




एसीचे उचीत आकारमान हा एसी निवडण्यासाठी लक्षात घेन्याचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. मोठा एसी चांगला असेलच असे नाही. कारण आकाराने (capacity - कपॅसीटी) मोठा असलेला एसी सर्वत्र सारखे शितलीकरण (cooling - कूलींग) करण्यास असमर्थ ठरतो. अशा वेळेला जास्त वेळ चालणारा कमी कपॅसीटीचा एसी अधिक उपयुक्त ठरतो. तसेच हवेतील आर्द्रता कमी करण्यासाठी लहान एसी अधिक उपयुक्त ठरतो जे सतत चालु- बंद होणार्‍या मोठ्या एसीला शक्य नसते.

घरासाठी एसीचा आकार आणि कपॅसीटी ठरवताना ज्या भागाचे कूलींग करायचे आहे त्याचे मोजमाप घ्या. एक चौरस मीटर जागे साठी साधारण २० बीटीयु (British Thermal Unit) हा फॉर्म्युला लक्षात असुद्या. एसी घेताना लक्षात घेण्याचे आणखी काही मुद्दे म्हणजे खोलीची उंची, तुमच्या राहत्या भागातील हवामान, खिडकीचा आकार इत्यादी.

घरातील विजेची जोडणी एसीचा भार घेण्यास तयार आहे का याची पडताळणी घ्या. एसी साठी स्वतंत्र १५ अ‍ॅम्पीअरचा पॉइंट घेतलेला चांगला.

एसीचे फिल्टर्स (Filters) नेहमी साफ करावे लागतात. त्यामुळे ज्या एसीचे फिल्टर्स सहज काढता येतिल अशी एसी निवडावी.

जर एखाद्या मोठ्या पण चिंचोळ्या जागेसाठी एसी घ्यायचा असेल तर जास्त फॅन पॉवर असलेला एसी निवडावा.

उन्हाळयाच्या झळांपासून मुक्ती मिळवण्यासाठी एसी कसा विकत घ्यावा हे मी तुम्हाला सांगीतले आहे. पुढे एसी कसा वापरावा याबद्दल सांगेन. आधी एसी घेउन या तर !

March 27, 2009

beyond spellings - vozme.com

English, dictionary, pronounce, voice, english reading, english names, web application,hindi, grammer, spellings
या इंग्रजी भाषेचं वागणं ना मला कधीच नीट कळत नाही. स्पेलिंग एक आणि उच्चार वेगळाच. Colonel या स्पेलिंग मध्ये र (R) कुठेच आला नाही, पण उच्चार मात्र कर्नल असा करायचा. minute ची स्पेलिंग एकच पण कधी मिनिट म्हणायचे तर कधी मायन्युट ! आता कोणत्या शब्दाचा कसा वापर करायचा हे आम्हा पामरांना कसे कळणार बरे?

पण तुम्हाला सांगतो या इंटरनेटने एकाही प्रश्न सोडला नाही. आपल्या सगळ्या समस्यांची उत्तरे यांच्याकडे अगदी तयार असतात. आपल्या या इंग्लिश उच्चारांची समस्यादेखिल एका वेबसाइटने सोडवली आहे.
त्या साइट्चे नाव आहे- www.vozme.com . (तशी ही समस्या थोड्याफार प्रमाणात वर्डवेब wordweb ने पण सोडवली आहे.)

vozme.com चक्क आपल्याला इंग्लिश वाचुन दाखविते. फक्त vozme.com च्या मुखपृष्ठावर असलेल्या चौकटीत आपल्याला हवा असलेला मजकुर टाइप करा अथवा कॉपी/पेस्ट करा. त्या नंतर कोणत्या भाषेत वाचायचे आहे हे ठरवा (होय, इंग्रजी व्यतीरिक्त इतरही भाषांमध्ये इथे वाचन होते. आणि हिंदी देखिल यामध्यी समावीष्ट आहे.)

आणखी एक गोष्ट. इथे तुम्ही स्त्रीच्या आवाजात ऐकणार की पुरुषाच्या हे सुध्दा ठरवु शकता. (अर्थात तुम्ही काय ठरवणार ते मला आधीपासुन माहीत आहेच!). त्यानंतर एंटर चे बटण दाबा की झाले सुरु वाचन.

एवढे करुन ही साइट थांबत नाही तर त्या मजकुराचे वाचन तुम्ही MP3 फाइलच्या रुपात साठवुन (save) ठेवु शकता.

शब्दांचे उच्चार जाणुन घेण्यासाठी, इंग्लिश नावांचे खरे उच्चार जाणुन घेण्यासाठी, आणि अगदीच एखादा मोठा लेख वाचायचा कंटाळा आला असेल तर असा लेख ऐकण्यासाठी अशा विविध गोष्टीत vozme.com चा वापर करता येतो.

मग वापरा vozm.com आणी मला सांगा lieutenant चा उच्चार कसा करणार ते?

March 25, 2009

गाणी शोधा गुगल काकांच्या (Google) मदतीने ! ( find songs with help of Google uncle)

ज्याला गाणे आवडत नाही असा मनुष्य शोधुनही सापडणार नाही. आणि संगीत हा तर मराठी माणसाचा आत्माच आहे. संगीत नाटके, चित्रपट, लावणी , कॅसेट्स , सीडी या मार्गाने प्रवास करत करत आता गाणी चक्क ऑनलाइन म्हणजे इंटरनेटच्या मार्गाने आपल्यापर्यंत येउन पोचली आहेत. आणि जेव्हा एखादी गोष्ट इंटरनेट पर्यंत येउन पोचते तेव्हा गूगलचा उल्लेख होणारच. मित्रांनो आज मी तुम्हाला गूगलच्या मदतीने आपल्याला हवी ती गाणी कशी शोधावीत आणि एक छदामही न खर्चता कशी डाउनलोड करावीत हे सांगणार आहे.
गाणी डाउनलोड करण्यासाठी आधी आपल्या आवडत्या गूगलकाकांच्या वेबसाइटवर जा.
(
http://www.google.com/ या साइटला मि प्रेमाने गूगलकाका म्हणतो.) गूगलच्या शोधस्तंभावर (google search bar) खाली दिलेली ओळ टाइप करा.


“parent directory” mp3 OR wma गायकाचे/वाद्यवृंदाचे नाव -html -htm -download -links"

या ओळीमधे "गायकाचे/वाद्यवृंदाचे नाव" काढून त्या जागी तुम्हाला हव्या असलेल्या गायकाचे नाव टाइप करुन एंटर (Enter) करा आणि पहा गूगलकाका कसे आपल्या पेटारयातून गाणी शोधून काढतात ते. मला खात्री आहे कि माझी ही टिप तुम्हाला खुप खुप आवडेल. म्हणुनच माझी एक विनंती आहे की जर ही टिप उपयुक्त आहे असे आपणास वाटले तर मला salil@netbhet.com वर इ-मेल करुन नक्की कळवा. तर मग मित्रांनो गाण्यांच्या सूरमयी दुनियेत हरवून जा , तोपर्यंत मी नविन "नेटभेट' शोधुन आणतोच तुमच्यासाठी !



आजोबांच्या काकांचे नाव माहीत आहे का?


तुमच्यापैकी कोणाला तुमच्या आजोबांच्या काकांचे नाव माहीत आहे का? किंवा खापर पणजोबांच्या आइचे? माझी खात्री आहे की दहापैकी नऊ जणांना उत्तर ठाउक नसणार. तुम्ही म्हणाल कि आज मी हे काय बरळतोय आणि वंशावळी का बरे शोधुन काढतोय. सांगतो. असाच प्रश्न लंडंन मधील एका चौकडीला पडला आणि त्यांनी केवळ स्वत:पुरता तो न सोडवता, तुम्हा आम्हा सर्व पामरांसाठी सोडवलाय.
त्या उत्तराचे नाव आहे किंडो.कॉम http://www.kindo.com/ . नावावरून विचित्र वाटत असली तरी ही वेबसाइट वापरावयास अतिशय साधी आणि सोपी आहे. किंडो.कॉम हि वेबसाइट ओनलाइन फॅमिली ट्री बनवून देणारी एक वेबसाइट आहे. अगदी काही मिनिटांतच यात फॅमिली ट्री म्हणजे वंशावळ बनवता येते. तुमच्या घराण्याची वंशावळ बनवण्यासाठी आधी आई व बाबांची माहीती द्या आणि सुरुवात करा. पुढे पुर्ण फॅमिली ट्री तुम्ही स्वतःच बनवु शकता अथवा इतर नातेवाइकांना या वेबसाइटवर आमंत्रण देउ शकता. आणि हो यात तुम्हाला फोटो, वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस इत्यादी गोष्टी नमूद करण्याची सोय देखिल केलेली आहे. यात रक्त गट, डी एन ए, पत्ते, फोन नंबर इत्यादी महत्त्वाच्या बाबीही साठवुन ठेवता येतात. फ्लॅश या सोफ्टवेअरच्या सहाय्याने बनविलेली असल्या कारणाने या साईटवर फेरफटका मारणे हा एक सुखद अनुभव आहे. फॅमिली ट्री कितिही मोठा झाला तरी हरकत नाही. येथे असलेल्या झूम इन व झूम आऊट या पर्यायांचा वापर करुन पुर्ण वंशावळीतून सहजपणे वावरता येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही वंशावळ सर्व जगासाठी खुली न करता केवळ तुम्ही आणि तुमच्या कुटुंबीयांसाठीच खुली ठेवता येते. सध्याच्या जगात जिथे लोक एक्-मेकांपासून दुरावत चालले आहेत तिथे कुटुंबातील सर्वांनाच एकत्र बांधुन ठेवण्याचा हा छोटासा प्रयत्न नक्किच उल्लेखनीय आहे. आजोबांच्या काकांचे नाव माहीत आहे का?

March 24, 2009

सर्वोत्तम मोफत सॉफ्टवेअर - वर्डवेब

मराठी माणसाचे आणि इंग्रजीचे तसे पुर्वीपासून वाकडेच आहे. पण रडतखडत का होइना साहेबाच्या या भाषेशी आपण मैत्री केली खरी. आता फाड्फाड इंग्रजी बोलता येत नाही म्हणा पण तसे कामचलाऊ इंग्रजी आम्ही शिकलो. आणि आता इंग्रजी शिवाय ऑफीस मध्ये पानही हलत नाही, उठता बसता इंग्लिश बोलावच लागते आणि त्यातच आला इमेलचा त्रास. काय तर म्हणे written english म्हणजे लेखी भाषा . थोडी सुसभ्य इंग्लिश. इथे आधिच शब्दतुटवडा आणि त्यात ही नसती भानगड.


घाबरु नका! मी आपल्या आजच्या लेखातून या भानगडीतून मुक्तता करणारया एका मोफत सॉफ्टवेअरची ओळख करून देणार आहे. या सॉफ्टवेअरचे नाव आहे वर्डवेब (wordweb).



वर्डवेब हे एक छोटेखानी, हाताळण्यास सोयीस्कर पण अतिशय उपयुक्त सॉफ्टवेअर आहे. खरेतर वर्डवेब ही एक डिक्शनरी आहे. यात तुम्हाला शब्दांचे अर्थ, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्या शब्दाचा वाक्यात उपयोग हे सर्व एकाच वेळी एकाच ठिकाणी पहायला मिळते. ते देखिल तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर. वर्डवेब ची आणखी एक खुबी म्हणजे यास इंटरनेटची आवश्यकता नसते. एकदा का कंप्युटरवर इन्स्टॉल झाला की वर्डवेब ची अविरत सेवा सुरु.



वर्डवेबचा इंटरफेस म्हणजे चेहरामोहरा अगदी साधा आणि सोपा आहे. नविन ऊपयोगकर्त्यांनाही वर्डवेब वापरणे सोपे आहे. डिक्शनरीत एखादा शब्द शोधला की वर्डवेबच्या पटलाचे दोन भाग दिसतात. पहिल्या व वरच्या भागात शब्दाचा अर्थ, व्याख्या आणि वाक्यात उपयोग केलेला दिसतो. आणि दुसरया व खालच्या भागात समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, जवळचा शब्द (स्पेलींग), त्या शब्दाचा प्रकार, वर्ग, भाग आणि उपभाग असे इतर पर्यायही दिसतात.



त्याचप्रमाणे विविध भागातील इंग्लिश भाषेप्रमाणे वर्डवेब सेट करण्याची यात सोय आहे. म्हणजे अमेरिकन, ब्रिटेन, कॅनडा, एशिया इत्यादी देशांतील इंग्लिश प्रमाणे वर्डवेब चालवता येतो. अक्षरांचा आकार कमी जास्त करण्याची सोय, हलके व आक्षेपार्ह शब्द वगळण्याची सोयही वर्डवेबमध्ये पुरवलेली आहे. खरेतर वर्डवेबचा वापर आणि उपयुक्तता लक्षात घेता अगदी पैसे मोजुन विकत घेण्यासारखे हे सॉफ्टवेअर आहे आणि तरीही कमाल म्हणजे वर्डवेब चक्क मोफत उपलब्ध आहे.



माझ्यामते आजच्या घडीला इंटरनेटवर उपलब्ध असलेले हे सर्वोत्तम मोफत सॉफ्टवेअर आहे. तर असे हे सर्वतोपरी उपयुक्त सॉफ्टवेअर तुमच्या कंप्युटरवर असलेच पाहिजे. ते उपलब्ध आहे

http://www.wordweb.info/ या संकेतस्थळावर.


ही नेटभेट तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरु नका. पुढे इंग्लिश- मराठी डिक्शनरी बद्दल सांगेन, तोपर्यत वर्डवेबशी हातमिळवणी करुन घ्या !

March 23, 2009

"दिवे विझवा" (switch off lights) - World Wildlife Federation



वर्ल्ड वाइल्डलाइफ फेडरेशनने (World Wildlife Federation - विश्व वन्यजीव संगठना) "दिवे विझवा" (switch off lights) नावाची एक मोहीम हाती घेतली आहे. ग्लोबल वॉर्मींगचे पृथ्वीवर होणारया दुष्परीणामांची सामान्य जनतेस जाण व्हावी म्हणुनच ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. जगभरातील ८५ देशांमधल्या तब्बल ८०० शहरांमधील नागरीक २८ मार्च २००९ ला रात्री ८.३० ते ९.३० च्या दरम्यान विजेवर चालणारे सर्व दिवे आणि उपकरणे बंद ठेवणार आहेत.



याबाबत अधिक माहीती जाणून घेण्यासाठी

www.earthhour.in या वेब साइट्ला भेट द्या.


टिप - हि माहीती देणारी एक ई-मेल सर्वत्र पाठविण्यात येत आहे. कदाचीत तुम्हाला आधीपासूनच याची माहीती असेलही. मात्र तरीही मी हा पोस्ट लिहित आहे कारण हा लेख वाचून जर एका माणसाने देखिल एक तास दिवे बंद ठेवुन पर्यावरणरक्षणाच्या या कार्याला हातभार लावला तरी मि यात य पोस्ट्ला यश मिळाले असे समजेन.

माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या भाषणातील काही भाग - लीडरशीप



मी तुम्हाला माझाच एक अनुभव सांगतो. १९७३ साली मी भारताच्या सॅटेलाइट लाँच व्हेइकल (उपग्रह क्षेपक वाहन) या प्रकल्पाचा प्रोजेक्ट डायरेक्टर झालो होतो. यालाच SLV-3 असेही नाव होते.सन १९८० पर्यंत "रोहीणी" या उपग्रहाला अंतरिक्षात पोहोचविणे हे आमचे लक्ष होते. या प्रकल्पासाठी लागणारे सर्व भांडवल आणि मनुष्यबळ मला उपलब्ध करुन देण्यात आले होते. मात्र काही केल्या १९८० पर्यंत "रोहीणी" या उपग्रहाला अंतरिक्षात पोहोचविणे हे उद्दिष्ट पार करणे महत्त्वाचे होते. हजारो शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ या प्रोजेक्ट्वर अहोरात्र मेहनत करत होते.

सन १९७९ चा ऑगस्ट महिना , आम्हाला वाटले कि आता आम्ही तयार आहोत आणि आता रोहिणी प्रक्षेपणास तयार आहे .आम्ही कंट्रोल स्टेशन मध्ये रोहिणीच्या प्रक्षेपणाची तयारी केली. मात्र उपग्रहाच्या प्रक्षेपणाच्या केवळ चार मिनिट आधी संगणकाला काही बिघाड दिसुन आला आणि संगणकाने आपणहुन प्रक्षेपण रोखुन धरले. काही नियंत्रक बरोबर काम करत नाही आहेत हे संगणकावर दिसत होते. मी मझ्या टीमला याबाबत विचारले असता, त्यांनी काही कॅलक्युलेशन्स केले आणि मला सांगीतले कि घाबरण्याचे काही कारण नाही आहे. म्हणुन मी संगणकाच्या स्वयंचलित प्रणालीला टाळुन स्वतःच मॅनुअल मोडमध्ये रॉकेट प्रक्षेपीत(लाँच- launch) केले. सुरूवातीला सर्व काही ठिक झाले मात्र थोड्याच वेळात अंतरीक्षात झेप घेण्याऐवजी ते अवकाशयान बंगालच्या सागरात कोसळले. हा एक फार मोठा पराभव होता.

त्याच दिवशी इस्रो (ISRO - Indian Space Research Organization) चे चेयरमॅन प्रोफेसर सतिश धवन यांनी एक ईस्रोच्या आंध्र प्रदेशमधील श्रीहरीकोटा येथिल सॅटेलाइट लाँच सेंटर येथे पत्रकार परिषद बोलावली होती. रोहीणीच्या प्रक्षेपणाचा कार्यक्रम ७.०० वाजताचा होता आणि पत्रकार परिषद होती ७.४५ वाजता. प्रोफेसर सतिश धवन स्वतःच पत्रकारांना सामोरे गेले आणि त्यांनी या अपयषाची सर्व जबाबदारी स्वतः घेतली. त्यांनी पत्रकारांना सांगीतले कि संपूर्ण टीमने खुप मेहनत घेतली होती मात्र तरीही आणखी थोडी कसर बाकी राहीली. त्यांनी पुढ्च्या प्रयत्नात एका वर्षाच्या आतच पुन्हा यशस्वीरित्या हे काम पूर्ण होइल याची ग्वाही पत्रकारांना दिली. खरेतर त्यांनी माझ्या अपयशाची जबाबदारी स्वतः घेतली होती.

पुढ्च्याच वर्षी जुलै १९८० मध्ये आम्ही पुन्हा एकदा प्रयत्न केला.आणि या वेळेला आम्ही यशस्वी झालो. पुर्ण भारत देश आनंदोत्सव साजरा करत होता. पुन्हा पत्रकार परिषद भरली होती.यावेळेला मात्र प्रोफेसर धवन यांनी मला बाजुला बोलावुन पत्रकारांना सामोरे जाण्यास सांगीतले.

त्यादिवशी मि एक महत्त्वाचा धडा शिकलो. जेव्हा पराभव होतो तेव्हा खरा संघप्रमुख (leader) स्वतः त्याची जबाबदारी घेतो मात्र यशाचे श्रेय तो सर्वस्वी त्याच्या संघाला (team) देतो.

हा सर्वात महत्त्वाचा व्यव्स्थापनाचा धडा (Management lesson) मी कोणत्या पुस्तकातुन नव्हे तर माझ्या या अनुभवातून शिकलो आहे.


डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

माहीतीचा खजिना - इस्निप्स्.कॉम (esnips.com)



मित्रानो आज मी तुम्हाला मझ्या सर्वात प्रिय वेबसाइटची ओळख करुन देणार आहे . नाही, मी गुगल (Google), याहू (Yahoo) किंवा ऑर्कुट (Orkut) बद्दल काही सांगणार नाही आहे. आज मि बोलणार आहे "इस्निप्स्."कॉम (esnips.com) बद्दल.

आपण esnips.com बद्दल माहीती घेउयाच पण त्याआधी मी तुम्हाला सांगु इच्छितो कि esnips.com माझी सर्वात आवडती साइट का आहे ते. मला सांगा आपण इन्टरनेटचा वापर प्रामुख्याने कशाकरिता करतो? प्रत्येकाचे उत्तर वेगळे असेल कदाचीत पण सर्व साधारणपणे आपण इन्टरनेटचा वापर माहीती मिळवण्यासाठी करतो असे म्हणता येइल. अर्थात प्रत्येकास हवी असलेली माहीती वेगवेगळी असते. एखाद्या विषयावरील पुस्तक, लेख, गाणी, फोटोज, अर्थ असे या माहीतीचे वेगवेगळे प्रकार असतात. मित्रांनो esnips.com आपल्याला एकाच जागी हे सर्व तर पुरवितेच पण त्याहुन अधिक काही आपल्याला इथे बघायला मिळते. म्हणुनच तर esnips.com माझी फेवरेट साइट झाली आहे.


esnips.com कंटेंट शेअरींग वेब साइट (content sharing website) आहे.कंटेंट शेअरींग म्हणजे ही साइट वापरणारे लोक ( युजर्स-users) esnips.com वर मोफत खाते उगढुन त्यावर ५जीबी इतका डाटा साठवुन ठेवु शकतात. वर उल्लेख केल्याप्रमाणे हा डाटा गाणी, व्हीडीओ क्लिप्स, इलेक्ट्रोनिक पुस्तके, वर्ड फाइल्स अशा बरयाच विविध स्वरुपात असतो. हा डाटा इन्टरनेट वर उपलब्ध असल्याने तो कधिही आणि कुठेही पाहता येतो. समजा तुम्हाला एखादे गाणे तुमच्या मित्राकडे पाठवायचे आहे तेव्हा esnips.com चा वापर करुन तुम्ही ते गाणे अप्-लोड करु शकता, जे तुमचा मित्र त्याच वेब साइटवरुन डाऊनलोड करुन घेउ शकतो. आणि अशा प्रकारे तो डाटा जगातील कोण्त्याही व्यक्तीसाठी उपलब्ध होतो.हजारो युजर्स(7,383,814) नी अप्-लोड केलेल्या अशा कित्येक फाइल्समुळे आज esnips एक माहीतीचा खजिनाच बनली आहे. एखाद्या विषयाबद्दल ओढ आणि आवड असणारया आणि आपले ज्ञान जगाबरोबर वाट्ण्यास उत्सुक असणारया कित्येक लो़कांचे esnips हे हक्काचे ठिकाण झाले आहे.

२००६ साली सप्टेंबर महीन्यात esnips.com ची स्थापना झाली. याएल एलिश या इस्राइली महीलेने या साइट्ची सुरुवात केली आणि आज तीच या कंपनीची सीइओ CEO आहे. केवळ विविध प्रकारचे ज्ञान आणि माहीती एकमेकांबरोबर वाटता यावी य उद्देशाने बनवण्यात आलेल्या य साइट्ने गेल्या २ वर्षात बरयाच नविन सुविधा यात वाढवित नेल्या. चला य सुविधांची जरा ओळख करुन घेउया -

१. esnips वर तुम्ही एकाच ठिकाणी सर्व आवडीच्या गोष्टींचा आनंद घेउ शकता. तुमचे विचार, फोटो, फाईल्स, साहीत्य सगळे काही इंटरनेट्वर जेव्हा हवे तेव्हा उपलब्ध.

२. कोण्त्याही प्रकारच्या फाईल्स अगदी सहजपणे अप्-लोड करा (अगदी स्वतहच्या आवाजातील गाणी , मुलांच्या वार्षीक समारंभातील न्रुत्य , कागद्पत्रे, आवडत्या वेब साइट्स चे पत्ते अगदी काहीही.

३. तुमच्या सर्व फाइल्स व्यवस्थीत फोल्डर्स मध्ये लावुन ठेवा, प्रत्येक फोल्डर एका वेब पेज मध्ये रुपांतरीत होइल. उपलब्ध असलेल्या विविध डिसाइन्सपैकी एक निवडा आणि हो तुमचे फोल्डर्स कोणाकोणास पाहता येतिल हे देखिल तुम्हिच ठरवा.

४. पब्लिक फोल्डर , ग्रुप फोल्डर आणि पर्सनल ग्रुप फोल्डर या प्रकारांपैकी तुम्हाला हवा तो पर्याय निवडा आणि तुमचे फोल्डर्स कोण कोण पाहु शकतील यावर पुर्ण कंट्रोल ठेवा.

५. esnips.com वर असलेले मार्केटप्लेस marketplace या सुविधेचा वापर करुन तर तुम्ही आपले सामान (कलाकुसर, चित्रे, फोटोज, दागिने काहीही) विकुही शकता. जगाची बाजारपेठ तुमच्या साठी एका क्षणात खुली.

६. ५जीबी (5 GB) इतकी मेमरी आणि ती देखिल अगदी मोफत.

मग व्हा तयार, भेट द्या http://www.esnips.com/ ला आणि हरवुन जा एका नव्या दुनियेत.

आणि हो esnips तुम्हाला कशी वाटली ते कळवण्यास विसरु नका.
पुन्हा भेटू आणखी एखादी नविन नेटभेट घेउन !


March 22, 2009

नेटभेट मराठी नेट भेट

आज नेटभेट आपल्या हाती देताना आम्हास प्रचंड आनंद होत आहे। अशा प्रकारची माहितीचा साठा आसलेली आणि जगभरातील सर्व मराठी भाषिकांना ज्ञानमयी ठरणारी ही पहिलीच वेबसाइट आहे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

मित्रहो नावात सुचविल्याप्रमाणे हि वेबसाइट आमच्या वाचकांना नेट भेट घडवून आणण्यासाठी कटीबध्ध आहे. जे जे ज्ञान या इंटरनेट च्या महाजालावर विखुरलेले आहे त्याचे मंथन करून ते मराठी भाषेत उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे.

ज्याप्रमाणे सामान्य जनांना समजण्यास सोपी जावी म्हणुन ज्ञानदेवांनी सुबोध मराठीत गीतेचे विवचन केले त्याच प्रमाणे “नेट भेट” मध्ये सोप्या “मिंगलिश (मराठी + इंग्लिश) ” च वापर केला आहे. तरी वाचकांनी व्याकरण चुका पोटात घालून घ्याव्यात.या वेब साईट चा खरा हेतु हा केवळ ज्ञान दानाचा असून तो पूर्णत्वास नेणे हे आम्ही आद्य कर्तव्य मानतो. तरीही एखादा उचित मराठी शब्द अस्तित्वात असुनही आम्ही वापरला नसेल तर कृपया आपण तसे लक्षात आणून द्यावे. मात्रुभाषेच्या या अविरत पूजेत आपले सहभाग अत्यावश्यक आहे.

आपली कृपाभिलाशी,

टीम “नेट भेट”



CO.CC:Free Domain

March 20, 2009

टेक्नॉलोजीची कमाल !


काही दिवसांपुर्वीच बराक ओबामा (Barack Obama) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणुन निवडून आले. मानवी इतिहासातील हा सुवर्णदीन कायम स्मरणात रहावा याची एका नविन तंत्रज्ञानाने पुरेपूर काळजी घेतली आहे.
या तंत्रज्ञानाचे नाव आहे "गिगापॅन" . आमेरिकेच्या कार्नेगी मेलोन युनिवर्सिटी (Karnegi melon university) आणि कॅनॉन (Canon) या कंपनीने मिळुन बनविलेला कॅनॉन जी१० (Canon G10) हा कॅमेरा.
ओबामांच्या शपथविधी समारंभात वापरण्यात आलेल्या या कॅमेरयाने २२० फोटो घेण्यात आले. हे फोटो जोडुन मग त्यांचे एका पुर्ण फोटोत रुपांतर करण्यात आले. ही कसरत करण्यास तब्बल सात तास लागले आणि अंतिम फोटोची साइझ झाली २ जीबी (GB).
सध्या हा फोटो गिगापॅनच्या (Gigapan.org) वेब साईटवर उपलब्ध आहे.
तो पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
यामध्ये असलेला झूम इन व दिशादर्शक बाण वापरुन तुम्ही अक्षरक्षः समारंभात हजर असलेल्या प्रत्येक व्यक्तिला अगदी जवळून पाहु शकता.
आणि तुमच्याकडे बराच फावला वेळ असेल (आहे का?) तर मग कित्येक तास तुम्ही या फोटोचा आनंद घेऊ शकता.
यालाच तर म्हणतात टेक्नॉलोजीची कमाल !

Get Netbhet, straight in your inbox !

Friends, subscribe yourself for a daily dose of 'Netbhet' in your inbox by simply inserting your e mail id in the space available below.

Happy Reading!!!!!



Enter your email address:



Delivered by FeedBurner




डिजिटल कॅमेरा कसा निवडावा ?

हल्ली कॅमेरा ही काही नाविन्याची गोष्ट राहीलेली नाही. डिजिटल कॅमेरा या तंत्रज्ञानाने केलेली क्रांन्तीही आताशा नविन राहीलेली नाही. मोबाइल असो अथवा कंप्युटर कॅमेरा कुठेच लपलेला नाही. पुर्वी फक्त काही खास समारंभासाठी वापरला जाणारा कॅमेरा आता सदासर्वदा हातातच असतो. या सर्व तांत्रिक प्रगतीमुळे सहजिकच सर्वच इलेक्ट्रॉनिक कंपन्यांनी डिजिटल कॅमेरयाकडे आपला मोर्चा फिरविला आणि त्यामुळेच ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत.

आणि जिथे एवढे पर्याय उपलब्ध झाले तिथे थोडा संभ्रम निर्माण होणारच, म्हणुनच मी आज तुम्हाला आणि तुमच्या खिशालाही परवडेल असा डिजिटल कॅमेरा कसा निवडावा याबद्दल माहीती देणार आहे -

१. कॅमेरा निवडताना त्याची मेगा पिक्सेल रेटिंग लक्षात घ्या - साध्या भाषेत सांगायचे तर पिक्सेल्स म्हणजे छायाचित्रामधील सुक्ष्मातिसूक्ष्म बिन्दू . जेवढे हे बिन्दू जास्त तेवढे चांगले व स्पष्ट चित्र. म्हणुनच जेवढे जास्त मेगा पिक्सेल्स असलेला कॅमेरा तेवढे उत्तम छायाचित्र आणि तेवढाच उत्तम कॅमेरा. जर तुम्ही प्रोफेशनल फोटोग्राफर बनणार असाल तर जास्त मेगा पिक्सेल्स असणारा कॅमेरा घ्या.

२. कॅमेरयाचा आकार ही दुसरी महत्त्वाची बाब. तुमचा वापर जसा असेल त्यानुसार कॅमेरयाची निवड करा. हल्लीचे युग हे लहान आणि कॉम्पॅक्ट (Compact) वस्तुंचे आहे. कॅमेरा वापरण्यास आणि हाताळण्यास सोयिस्कर असेल याची काळजी घ्या. प्रवासामध्ये कॅमेरा नेण्यास सोपा असेल याकडे लक्ष द्या.

३. डिजिटल कॅमेरयांची मेमरी हा त्यांचा सर्वात मोठा गुण आहे. पाहिजे तितके फोटो साठवुन ठेवता येतिल असे महाकाय मेमरी कार्डस आजकल बाजारात उपलब्ध आहेत. कॅमेरयासोबत मोफत मिळणारया कार्डस मध्ये त्यांचा प्रकार (SD/MMC/microSD) आणि आकार (साइझ - MB/GB इत्यादी) या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. बरयाच वेळा विक्रेते मुळ कॅमेरयाची किंमत कमी करण्यापेक्षा ग्राहकांना जास्ती मेमरी असलेले कार्ड्स देतात.

४. डिजिटल कॅमेरयाची बॅटरी हा आण़खीन एक महत्त्वाचा भाग. बॅटरीचे जीवनमान, चार्जींगसाठी लागणारा वेळ, चार्जींग करण्याची पध्द्त आणि चार्ज झाल्यावर बॅटरी किती वेळ टिकेल या गोष्टीं तपासुन घ्या , इतर कॅमेरयांशी तुलना करुन पहा.

५. डिजिटल कॅमेरा हा कंप्युटरला , टी.व्हीला तसेच प्रोजेक्टर्सला देखिल जोडता येतो. तुम्ही निवडलेल्या कॅमेरयामध्ये या सुविधा आहेत का हे तपासुन घ्या.

४. कॅमेरयाची किंमत आणि तुमचे बजेट यांची नीट सांगड घाला, काही अतिशय चांगल्या प्रतिचे आणि विविध सोयीसुविधा असण्यारया कॅमेरयांची किंमत ५००००- १००००० च्या घरात जाते. मात्र बेसिक सुविधा असणारे आणि घरघुती वापरांसाठी वापरण्यास योग्य अशा काही डिजिटल कॅमेरयांची किंमत ५००० ते २०००० पर्यंत असते. आपले बजेट आणि कॅमेरयात मिळणारया सुविधा यांचा योग्य मिलाफ होणे आवश्यक आहे. एखाद्या चांगल्या ब्रँडसाठी थोडे अधिक पैसे मोजावे लागल्यास मागे पुढे पाहु नका मात्र केवळ ब्रँड न पाहता लेन्स्, आकार, किंमत आणि विक्रिपश्चात सेवा कशी आहे याकडे अधिक लक्ष द्या.

कॅमेरा निवडताना या गोष्टींवर लक्ष द्या आणि मग व्हा तयार क्लिक करायला.
( पुढे चांगल्या प्रकारे फोटो कसे काढावेत यावर माहीती देइन, पण त्याआधी कॅमेरा विकत घेउन स्वतःच प्रयत्न करून काही शिकुन पहा की !)

Contact us

The easiest way to contact me is via email. You can reach me at salil [at] netbhet [dot] com. (salil@netbhet.com).
I will try my level best to revert to all your queries. Please cooperate if you don't hear from me due to time constraints.
Feel free to write for any inquires, questions, comments, ideas & feedback.

Thanks!

Salil Chaudhary.

Everything About Netbhet


Netbhet


The main purpose of this site is to provide readers with computer tutorials, technology news, software reviews, personal computing tips, life tips, simple hacks for making daily battle of life an easy event rather a bit enjoyable one..

I started blogging in March 2009 just to make a note of cool web sites and free software applications that I found on Internet. I enjoy blogging because it not only is a source of information for the people, but also broadens my knowledge and understanding about the Internet. My ultimate aim is to provide greatest and largest knowledge resource for our readers.
नेटभेटचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे वाचकांना दररोजच्या जीवनातील अडचणी दुर करण्यासाठी आणि एकुणच जीवन सुकर करण्यासाठी मदत करणे हा आहे.
मी मार्च २००९ पासुन हा ब्लॉग लिहित आहे. मला ब्लॉगलिखाण खरच आवडतंय कारण याद्वारे मी मराठी वाचकांना काही प्रमाणात मदत करु शकत आहे आणि त्याचबरोबर माझ्या ज्ञानातही भर पडत आहे. या ब्लॉगचे अंतीम ध्येय हे मराठीमधील सर्वात मोठा आणि उपयुक्त असा माहीतीचा स्त्रोत बनणे हेच आहे.
Can I email you questions?

Of course yes!!! Feel free to write on any topic. I will be more than happy to write back to you as soon as possible.
होय, तुम्ही मला इ-मेल द्वारे तुमचे प्रश्न विचारु शकता. मी सर्वतोपरी तुमच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करेन.
Is there any other way to connect with you?

You can connect with me on all of the following services:
तुम्ही खाली दीलेल्या साइट्सद्वारे देखील माझ्या संपर्कात राहु शकता.
FriendFeed
Twitter
Facebook
Orkut

Can I write articles for Netbhet?

Yes you can. The process is very simple, just click on the 'Contact Me' link in the top navigation bar and I will revert with few instructions on the content as well as the process to get started. Person with flair for writing original and useful content will definitely get an opportunity to write here.
होय, तुम्ही देखील नेटभेट करीता लिखाण करु शकता. इंग्लीश किंवा मराठी या दोन्हींपैकी कोणत्याही भाषेमध्ये तुम्ही लेख देउ शकता. मला salil@netbhet.com वर इमेल करा आणि मी तुम्हाला याबाबत अधीक माहीती पुरवेन.
How do I advertise on Netbhet?

Currently we flash content using a combination of Google Adsense and Infolinks for advertising. We will be happy to advertise your content on Netbhet. For further clarifications please approach us by clicking on 'Contact Me' link in the top navigation bar.
नेटभेटचे मुख्य वाचक हे मराठी भाषीक आहेत आणि असणार आहेत. तुम्हाला नेटभेटद्वारे अधीकाधीक मराठी लोकांपर्यंत पोहोचायचे असल्यास नेटभेट वर जाहीरात देणे उचीत ठरेल. अधीक माहीती साठी मला संपर्क करा.
Subscribe to Netbhet
Please stay in touch with the latest tips and tricks from Netbhet by subscribing to our RSS feed.
इमेल द्वारे अथवा RSS feed द्वारे नेटभेट वरील सर्व लेखांचे आपोआप अपडेट्स तुम्हाला मिळवता येतील.
Feedback to Netbhet
We always want to improve our services and your feedback is really important for us. Please write to us for your feedback salil@netbhet.com
salil@netbhet.com वर तुमच्या प्रतीक्रीया व सुचना पाठविण्यास विसरु नका. नेटभेटमध्ये सतत सुधारणा करण्यासाठी तुमचा प्रतीसाद अत्यावश्यक आहे.
Enjoy Netbheting !!!!!
धन्यवाद. नेटभेटचा ही प्रयत्न तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा !

बिल गेट्स यांचा शालेय विद्यार्थ्याना सल्ला



मित्रहो, मायक्रोसॉफ्ट कंपनीचा मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणुन प्रसिध्द असलेले बिल गेट्स आपणाला माहीत असतीलच! आपल्या मायक्रोसॉफ्ट या तंत्रज्ञानाने सर्व जगावर राज्य करणारे बील गेट्स यांनी फार थोड्याच अवधीत हे यश संपादन केले आहे. थोड्क्यात काय तर बील गेट्स हे एक अत्यंत यशस्वी व्यक्तिमत्व आहे. तर अशा या यशस्वी व्यक्तीच्या यशामागील रहस्य आज आपण जाणुन घेउया आणि ते देखिल त्यांच्याच तोंडुन.

बील गेट्स यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात काही अशा गोष्टी (१० नियम) सांगीतल्या ज्या कोणत्याही शाळेत शिकविल्या जात नाहीत. या भाषणात बील साहेबांनी आपल्या रुढ शिक्षण पद्धतीवर चांगलेच आसुड ओढलेत, सतत आदर्शवादाचा पुरस्कार करणारी आपली शिक्षण पद्धती मुलांना वास्तवापासुन दूर नेते आणि त्यामुळेच आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगात अशा काही पिढ्या मागे सरत चालल्यात असे बील गेट्स यांचे मत आहे.

नियम १ - आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करुन घ्या.

नियम २ - जग कधीच तुमच्या स्वाभीमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा.

नियम ३ - कॉलेजमधुन बाहेर पड्ल्या पडल्या पाच आ़कडी पगाराची अपेक्षा करु नका. एका रात्रीत कोणी वाइस प्रेसिडंट होत नाही, त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात .

नियम ४ - आज कदाचीत तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भितीदायक वाटत असतील, कारण अजुन बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचाय.

णियम ५ - तुम्ही केलेली चुक ही सर्वस्वी तुमची चुक आहे आणि तुमचा पराजय ह सर्वस्वी तुमचा पराजय आहे. कोणाला दोष देउ नका, झालेल्या चुकिपासुन धडा घ्या आणि पुढे चालत रहा.

नियम ६ - तुमचे पालक तुम्ही जन्माला यायच्या आधी एवढे कंटाळ्वाणे आणि अरसिक नव्हते जेवढे तुम्हाला ते आता वाटतात. तुमचेच संगोपन करण्याठी त्यांनी जे अमाप कष्ट घेतलेत त्यामुळेच आज त्यांचा स्वभाव असा झाला आहे.

नियम ७ - उत्तेजनार्थ पारितोषीक हा प्रकार फक्त शाळेतच पहायला मिळ्तो. काही शाळांमध्ये तर अगदी पास होइपर्यंत परीक्षा देता येते. बाहेरच्या जगातील पध्द्त मात्र वेगळीच असते. खरया जगात हरणारयाला कोणिही दुसरी संधी देण्यास तयार नसतो.

नियम ८ - आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते, त्यामध्ये मे महीन्याची सुट्टी नसते. स्वतःचा शोध घ्यायला, नविन काही शिकायला कोणि तुम्हाला वेळ नाही देत. तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो.

नियम ९ - टीव्ही वरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्ही वरची सीरियल नसते. खरया आयुष्यात आराम नसतो , असते ते फक्त काम आणि काम.

नियम १० - सतत अभ्यास करणारया आणि अपार मेहनत करणारया तुमच्या मित्रांना चिडवू नका. एक दिवस असा येइल की तुम्हाला त्यांच्याच हाताखाली काम करावे लागेल .

March 18, 2009

How's a USB Flash Drive Made? Trip to the Kingston Production Plant





Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

March 13, 2009

संगणकाचे आरोग्य कसे सांभाळाल?

संगणक आता माणसाच्या आयुष्यात केवळ एक मशिन रहिलेला नसुन आता तो एक मित्र किंबहुना कुटुंबातील एक सदस्य झालेला आहे. प्रत्येक काम हल्ली संगणकावर अवलंबुन असते. म्हणुनच संगणकाची काळजी घेणे आणि त्याची देखभाल करणे अत्यावश्यक झाले आहे -
आणि मित्रहो संगणकाची देखभाल करणे तितकेसे कठीण काम नाही. तुम्हाला तुमच्या प्रिय संगणकाची देखभाल करण्यासाठी उपयोगी पडणारया या काही टिप्स -

१. नविन प्रोग्राम्स डाउनलोड करताना विचार करा. बरयाच वेळा कम्प्युटर मध्ये होणरया बिघाडांचे मुख्य कारण काही चुकिच्या सॉफ़्ट्वेर्स चे इन्टरनेट वरुन डाउनलोड अथवा एखद्या चुकिच्या सीडी वरुन केलेले इन्स्टॉलेशन हे असते. बरयाच सॉफ़्ट्वेर्सच्या इन्स्टॉलेशनमुळे पीसी (कम्प्युटर) स्लो हॊउन जातो, तसेच व्हायरसचा धोका देखिल संभवतो. म्हणुनच सॉफ़्ट्वेर इन्स्टॉल करण्याआधी खात्री करुन घ्या की ते वापरण्यास योग्य आणि सुरक्षीत आहे.

२. एक सक्षम ऍन्टी व्हायरस प्रोग्राम आणि फ़ायरवॉल सॉफ़्टवेअर या अतिशय गरजेच्या बाबी तुमच्या पीसी वर असणे आवश्यक आहे. आणि नुसते इन्स्टॉल करुन भागणार नाही तर ते नेहमी अद्ययावत राखणे (update)तितकेच गरजेचे आहे. हे दोन्ही सॉफ़्टवेअर्स संगणकासाठी संरक्षक भींतीचे काम करतात.

३. ऑपरेटिंग सिस्टमला नेहमी अद्ययावत ठेवा. बहुतेक पीसी मायक्रोसॉफ़्ट विन्डोज या ऑपरेटिंग सिस्टम वर चालतात. मायक्रोसॉफ़्ट कंपनी नेहमीच आपल्या उत्पदनांमध्ये सुधारणा करत असते आणि या सुधारणा अपडेट्स च्या स्वरुपात उपलब्ध करुन दिल्या जातात. त्याच प्रमाणे लिनक्स आणि मॅक या ऑपरेटिंग सिस्टम देखिल सतत अपडेट्स उपलब्ध करुन देत असतात.

४. ज्याची गरज नाही अशा सर्व सॉफ़्ट्वेअर्स, गेम्स, डाटा डिलीट करा. दर महीन्यातुन किमान एकदा तुमच्या कंप्युटरचा नीट आढावा घ्या आणि खरोखरीच गरज नाही अशा फ़ाईल्स डीलिट करुन टाका. कम्प्युटर च्या कन्ट्रोल पॅनल मध्ये असलेला ऍड/रीमूव्ह प्रोग्राम्स हा ऑप्शन वापरुन तुम्हाला नको असलेले प्रोग्राम्स डिलिट करता येतिल.

५. हार्ड ड्राइव्ह डीफ़्रॅगमेंट करत रहा. जेव्हा एखादी फ़ाईल सेव्ह केली जाते तेव्हा ती एका नियोजीत क्रमाने सेव्ह न होता उपलब्ध असलेल्या पहिल्या मेमरीच्या जागेवर सेव्ह केली जाते. त्यामुळे सेव्ह केला जाणारा सर्व डाटा विखुरलेला असतो. म्हणुनच अधुन मधुन हार्ड डीस्कला डीफ़्रॅग करणे गरजेचे असते. डीफ़्रॅगमेंटेशन म्हणजे मध्ये राहिलेल्या मोकळ्या मेमरीच्या जागा एकत्रित करणे. कम्प्युटर जलद गतीने चालावा म्हणुन डीफ़्रॅगमेंटेशन गरजेचे असते.


६.कीतीही म्हंटले तरी कम्प्युटर हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे आणि त्यामुळे ते कधी तरी खराब होणारच. म्हणुन आधीच सर्व आवश्यक आणि महत्वाचा डाटा सेव्ह करुन ठेवणे गरजेचे असते.यालाच बॅकप घेणे असेही म्हणतात. महत्वाचा डाटा सीडी किंवा अतिरिक्त हार्ड ड्राइव्ह वर सेव्ह करुन ठेवा जेणेकरुन कम्प्युटर मध्ये बिघाड झाल्यास जास्त नुकसान होणार नाही.

७. कंप्युटरवर धुळ साचली असल्यास ती नियमीत साफ़ करावी. कंप्युटरची जागा हवेशीर असेल याची काळजी घ्यावी.कंप्युटरवर कोणतेही सामान ठेऊ नका , त्यास अडगळिची जागा बनवु नका.

या सर्व गोष्टींची काळजी घ्या आणि निश्चींतपणे कंप्युटींगचा आनंद घ्या.

:-)

March 12, 2009

नविन लोकांना भेटताना टेंशन घेउ नका !

तुम्हाला नविन माणसात गेल्यावर कधी गडबडल्यासारखे होते? तुम्हाला अपरिचीतांबरोबर संवाद साधणे कठीण जाते? आनोळखी व्यक्तीबरोबर कधी लिफ़्ट्मध्ये एकटे असताना घाबरायला होते?
खरच एखाद्या नविन ग्रुप मध्ये एकदम जॉइन होणे कठीण असते। म्हणुनच मी आज काही अशा टिप्स देणार आहे ज्या नविन नविन ग्रुप मध्ये जॉइन होताना तुमची अस्वस्थता कमी करण्यास मदत करतील.

एखाद्या नविन ग्रुप मध्ये जॉइन होताना प्रसन्न चेहारयाने जा आणि स्नेहभावाने वागा. लोकांना चांगल्या आणि मनमोकळ्या व्यक्तींबरोबर बोलायला आवडते. पहिल्यांदा कोणाशी ओळख झाली असल्यास त्याचे नाव लक्षात ठेवणे आणि हस्तांदोलन करणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा, पहिल्या भेटीत पडलेली छाप ही अंतिम असते.

ग्रुप मध्ये चालु असलेल्या चर्चेत उस्फ़ुर्त सहभाग घ्या. स्वतःहुन प्रश्न विचारा आणि इतर व्यक्तींना जाणुन घ्यायचा प्रयत्न करा. सक्रिय सहभाग आवश्यक असतोच.

पहिल्याच भेटीत कोणाशी मैत्री करण्यास जाऊ नका, त्यांची कंपनी एन्जॉय करा. मैत्री आपोआप डॆव्हलप होत जाते त्यासाठी स्वतः हुन काही प्रयत्न करु नका, संयम ठेवा.

मदतीचा हात पुढे करा. अशा काही वेळा नक्किच येतिल जेव्हा ग्रुप मधिल एखाद्या मेंबरला काही मदतीची गरज भासेल, तेव्हा तत्परतेने तयार रहा. लक्षात ठेवा मित्र मिळवण्यासाठी आधी मित्र व्हावे लागते. त्यासाठी आधी निस्वार्थ भावनेने प्रयत्न कराने लागतात.

प्रत्येक माणसाची एक भावनिक गरज असते, ती गरज ओळखुन त्याप्रमाणे वागा. यालाच इंग्रजी मध्ये वेवलेंथ मॅचींग असेही म्हणतात.
आपली मते कोणावरही लादू नका. आणि एखद्या ग्रुप चे विचार तुम्हाला न पटणारे असतील तर तुम्हास इतरही ग्रुप्सचा मार्ग मोकळा आहेच की.

हसत खेळत रहा, सर्वांशी प्रेमाने व आपुलकीने वागा , त्यातच सर्व सुखांचे रहस्य दडलेले आहे.

March 10, 2009

वॉरन बफे यांचा मोलाचा सल्ला



आपण सारेच जाणतो कि या नविन वर्षाची सुरुवात फ़ारशी उत्साहवर्धक नाही आहे आणी एकंदर सर्वत्र निराशेचाच अंमल दिसतो आहे.आर्थिक मंदी मुळे कुटुंब, कंपन्या, आणि पुर्ण देशच एका विवंचनेत गुंतला आहे. प्रत्येकालाच ही मंदीची लाट कधी ओसरतेय असे झाले आहे।

सर्वसामान्य माणुस यासाठी अर्थ तज्ञांकडे आशेने पाहत आहेत. पण मित्रहो हे जाणुन घ्या कि य सर्व आर्थिक गुंत्यास हे अर्थ तज्ञच कारणीभूत आहेत।

दरवर्षी मी काही धोरणे अवलंबतो, जी पुढे वर्षभर सर्व उलाढालीत माझ्यासाठी दिप स्तंभाचे काम करतात.आणि स्वतहच शिकून घेतलेल्या या धड्यांमुळे दरवर्षी माझे फ़क्त वयच वाढत नाही तर शहाणपणाही तेवढाच वाढतो।

या वर्षी मी तुम्हा सर्वांना पुराणकाळापासून चालत आलेल्या (पण विस्म्रुतीत गेलेल्या)अशाच काही शहाण पणाच्या गोष्टी सांगणार आहे -


  • अपार कष्ट करा : मेहनत कधिच वाया जात नाही, पण काम न करता केलेली बाप्ष्फळ बडबड माण्साला लयास नेल्या खेरिज राहत नाही.

  • आळस झटकुन टाका : वाळुवर झोपुन राहणारा खेकडा कोणत्याही लाटेबरोबर समुद्रात वाहुन जातो.

  • ऊत्पन्न(मिळकत) : कधिही केवळ एका उत्पन्नाच्या साधनावर अवलंबून राहु नका. एका मर्गाने येणाऱ्या १०० रुपयांपेक्षा १०० मर्गांनी येणारा १-१ रुपया नेहमीच चांगला.

  • खर्च - आवश्यकते पेक्षा जास्त खरेदी केली तर लवकरच आवश्यक असणारया गोष्टी विकाव्याची वेळ येईल.

  • बचत - खर्च करुन उरलेले उत्पन्नाची बचत करण्यापेक्षा, आधी बचत करुन नंतर उरलेले पैसे खर्च करा.

  • कर्ज - कर्ज घेणारा हा कर्ज देणरयाचा गुलाम हॊउन जातो.


  • जमाखर्च - जमाखर्च मांडणे आणि त्याचा अभ्यास करणे अतिशय मह्त्वाचे आहे. जर बूटच फ़ाटला असेल तर पावसाळ्यात छ्त्रीचा काय उपयोग ?

  • हिशोब तपासणे - लहान लहान खर्चांचा ताळेबंद ठेवा, एक छोट्याशा भोकामुळे पुर्ण जहाज बुडू शकते.

  • आर्थिक धोका - बरयाच इन्वेस्ट्मेन्ट्स भरपुर फ़ायदा देणरया आणी आकर्षक असतात मात्र त्यात तेवढाच धोका लपलेला असतो. त्यामुळे अशा इन्वेस्ट्मेन्ट्सचा जरा काळजीपुर्वक विचार करुन करा. जर नदीची खोली पहायची असेल तर दोन्ही पाय पाण्यात टाकुन कसे चालेल?
  • गुंतवणुक - सर्व अंडी एकाच पारड्यात टाकुन कसे चालेल बरे?

मला खात्री आहे की जे या सर्व सुचनांचे आधीपासून पालन करत आहेत, त्य सर्वांची आर्थिक परिस्थिती उत्तम असेल. आणी मी हे देखिल खात्रीपुर्वक सांगु शकतो, कि जे या सर्व सुचनांचे पालन करायचे ठरवतिल तेही लवकरच आर्थिक सुखाचा आनंद घेतिल. चला आपण सर्वजण हुशार हॊउया आणि एक सुखी, समाधनी आणी शांत जीवन जगुया।



वॉरन बफे

बायोडाटा मध्ये हमखास आढळणारया काही चुका


बरयाच वेळा आपल्या भावी मालकाला प्रभावित करण्यासाठी आणी आपण केलेल्या कामाची पुर्णपणे माहिती त्यास व्हावी म्हणुन बायोडाटा मध्ये नेहमी आपण शिक्षण, अनुभव, ओळख इत्यादी गोष्टींवर भर देतो. पण त्याच वेळी काही सोप्या पण महत्वाच्या गोष्टिंवर सोयीस्कर रित्या दुर्लक्ष केले जाते. आणी याच छोट्या छोट्या गोष्टी पुढे जाउन चुकांमध्ये परिवर्तीत होतात आणी मग एखादी हातात आलेली संधी हकते .

बायोडाटा मध्ये आढळणारया काही सामान्य चुका -

१. स्पेलींग आणी व्याकरणाच्या चुका

२. विरामचिन्हांच्या चुका

३. काही विशीष्ट फ़ॉन्ट्सचा वापर, खुप साऱ्या फ़ॉन्ट्सच्या स्टाइल्सचा वापर, खुप लहान किंवा खुप साऱ्या फ़ॉन्ट्स साइझेसचा वापर

४. खुप कमी किंवा खुप जास्त सोडलेली समासाची जागा

५. चुकीचा पत्ता किंवा चुकीची सम्पर्क माहिती

६. वय , उंची, वजन, लिंग, वैवाहिक स्थिती यांच्या नोंदीमध्ये केलेल्या चुका

७. वाढवुन चढवुन दाखविलेली किंवा चुकिची अथवा खोटी माहीती

८. संक्षीप्त शब्द किंवा क्लीष्ट व्यावसायीक शब्दांचा वापर

९. आधिचा जॉब सोडण्याची दिलेली कारणे

१०. पगाराबद्दलच्या अपेक्षान्चा उल्लेख

११. गतकाळातील चुका आणी आरोग्याबद्दलच्या तक्रारी

१२. पानाच्या दोन्ही बाजुंना छापलेला बायोडाटा

१३. जुन्या तारखेचा बायोडाटा पाठविणे

१४. रंगीत अथवा चमकदार कागदाचा वापर

बायोडाटा तयार करताना वरील सर्व गोष्टिंचा नीट काळजीपुर्वक विचार करा आणी आपल्या उत्तम करीअरची पायाभरणी करा

"जय हो"

य़शस्वी भव !

कंप्यूटरला बनवा सुपर फास्ट !

तुमच्या कंप्यूटरचा स्पीड देखिल ट्रैफिक मध्ये एकमेकाला रेटत जाणार्‍या गाड़ी सारखा झाला आहे का? उतरून पुढे जाऊ शकत नाही म्हणुन तसाच बसून रहायचे . त्यापासून मुक्ति मिळवण्याचे काही उपाय इथे तुमच्या माहिती साठी देत आहे - १) नको असलेले सॉफ्टवेर्सना (softwares) द्या सुट्टी - सर्वच नविन कंप्यूटर हल्ली बर्याच सॉफ्टवेर्स सहित येतात आणि बऱ्याचदा हे बिन कामाचे ठरतात. माझा तुम्हाला हाच सल्ला आहे की बरेचसे एंटी वायरस (anti-virus) , फोटो एडिटर्स (photo editors) , CD रायटिंग सॉफ्टवेर्स तसेच बऱ्याच यूटीलिटी (utility प्रोग्राम) , जे बिन कामाचे असतात ते डिलीट करून टाका. आणि त्या ऐवजी वापरा काही आकाराने लहान पण उत्तम सॉफ्टवेर्स जे कमी मेमोरी वापरतात जसे की पिकासा picasa.com , नेरो सी रायटर आणि फोटो व्येवर (Nero CD writer and photo viewer) . 2. केवळ एकच इंटरनेट ब्रोवसर (Internet Browser) वापरा - दहा पैकी सहा जणांकडे eका पक्ष अधिक वेब ब्राऊसर

फाईल एक्सटेंशन वरून फाईलचा प्रकार कसा ओळ्खाल ?

मित्रहो आजकाल अनेक प्रकारचे (softwares and programs ) सॉफ्टवेर्स आणि प्रोग्राम्स बाजारात आले आहेत. आणी विन्डोज़ प्रोग्राम सर्व वाचकाना सोयीस्कर जावे म्हणुन या सर्व प्रोग्राम फाईल्सना एक ओळख देण्यात आली आहे. कोणत्याही फाईल च्या नावापुढे ___.avi, ___.mp3, __.xls असे लिहिलेले असते ना , तीच असते फाईल ची ओळख. यालाच फाईल एक्सटेंशन (extention) असेही म्हणतात . तर आज आपण या सर्व फाईल एक्सटेंशन ची ओळख करून घेणार आहोत.
फाईल एक्सटेंशन हे फाइल चा प्रकार ओळखण्यासाठी वापरले जाते. फाईल च्या नावानंतर पुढे एक टिम्ब आणी तीन अक्षरं असे मिळून फाईल एक्सटेंशन तयार होते. तुमच्या संगणकावर हमखास दिसणारी काही एक्सटेंशन आता आपण पाहुया

  • _.au - हे एक्सटेंशन एका साउंड फाईल चे निर्देशक आहे. बरयाच साउंड प्लेयिंग प्रोग्राम्स वर या फाईल चालतात . साउंड प्लेयिंग प्रोग्राम्स म्हणजे अशे प्रोग्राम्स ज्यावर गाणी अथवा चित्रपट पाहता येतात.
  • .avi - हे एक्सटेंशन एका विडियो फाईल चे निर्देशक आहे. माइक्रोसॉफ्ट मीडिया प्लेयर (microsoft media player) वर या फाईल्स चालतात.
  • .bmp - माइक्रोसॉफ्टच्याच विन्डोज़ पेंट (Windows Paint) प्रोग्राम मध्ये तयार होणारया सर्व चित्रासाठी या एक्स टेंशन चा वापर केला जातो. यालाच बिटमैप (BITMAP) असेही म्हंटले जाते.
  • .dll - हे एक्स टेंशन असणार्‍या फाईल जरी नेहमी कम्पुटर वापरताना गरजेच्या नसल्या तरी महत्वाच्या असतात. Dynamic link library असे याचे पूर्ण नाव आहे. यामध्ये कंप्यूटर च्या कामासाठी लागणार्‍या काही कॉमन common फाईल्स ठेवलेल्या असतात. कधी चुकुनही .dll एक्सटेंशन असणार्‍या फाईल डिलीट delete करू नका.
  • .exe - हे एक्सटेंशन executable एक्सीक्युटेबल फाईलचे निर्देशक आहे. एक्सीक्युटेबल फाईल म्हणजे असे प्रोग्राम जे कम्पुटर वर चालवल्यावर इन्स्टॉल होतात आणी मग काम चालू करतात. या फाईल्स अतिशय सावधानतेने हाताळाव्या लागतात कारण बरेच वायरस (virus) प्रोग्राम्स .exe या प्रकारात मोडतात.
  • .gif - या एक्सटेंशन चा वापर देखिल एक प्रकारची image चित्र फाईल दाखवण्यासाठी होतो. याचे पूर्ण नाव Graphic interchange format ग्राफिक इंटरचेंज फॉर्मेट असे आहे. या फाईल्स .bmp फाईल्स पेक्षा आकाराने लहान असतात आणी त्यामुळेच इंटर नेट वर वापरल्या जाणार्या बरयाच इमेज फाईल्स .gif या एक्सटेंशन च्या असतात .
  • .jpg / .JPEG - हे देखिल एका चित्र (image इमेज ) फाईल चे एक्सटेंशन आहे. याचे पूर्ण नाव " Joint Photographers Experts Group.” (जौइंट फोटो ग्राफर्स एक्सपर्ट्स ग्रुप ) असे असून .jpg/ . jpeg या फाईल्स .bmp आणि .gif या दोन्ही प्रकारानपेक्षा खुप लहान असतो अणि म्हनुनच इन्टरनेट वर याचा जास्त वापर होतो.
  • .mp3 - हे एक्सटेंशन तुमच्या अधिक परिचयाचे असेलच. म्युझिक फाईल्स (गाणी, आवाज) चा पुर्वीचा आकार (size)कमी करून म्युझिक च्या मूळ प्रतिमध्ये (quality) बदल न करता साठविण्यासाठी .mp3 एक्सटेंशन चा वापर केला जातो..mp3 नाव "Moving Picture Experts Group-1 Audio Layer 3" याचा शोर्टफॉर्म आहे.
  • .scr - आपल्या संगणकावर असलेल्या स्क्रीन सेवर screen saver फाईल्स दर्शविण्यासाठी या एक्सटेंशन चा वापर करतात.
  • .ttf - True Type Font याचा शोर्टफॉर्म असलेले हे एक्स टेंशन वापरले जाते विविध प्रकारच्या फोंट्स (fonts) फाईलसाठी . Fonts म्हणजे संगणका मध्ये वापरल्या जाणार्‍या विविध अक्षररचना.
  • .txt - विन्डोज़ मधील नोटपॅड या ऍप्लिकेशन मध्ये बनलेल्या सर्व फाईल्सना .txt हे एक्सटेंशन असते. नोटपॅड हे माइक्रोसॉफ्ट वर्ड चे एक सोपे रूप आहे. मुख्यतः सॉफ्टवेर प्रोग्रामर्स या फाईल्सचा वापर करतात.
  • .wav - विन्डोज़ मीडिया प्लेयर किंवा विन्डोज़ साउंड रेकोर्डर या आप्लिकेशन्स मध्ये वापरल्या जाणार्‍या म्युझिक फाईल्स साथी हे एक्सटेंशन वापरले जाते. परन्तु .mp3 पेक्षा .wav या फाईल्स अधिक जड़ असतात.
  • .zip - विन्डोज़ आर्चीव विनझिप ( Windows archieve WINZIP) प्रोग्राम चे हे एक्सटेंशन आहे. बर्याच फाईल्स एकत्र पाठविण्यासाठी त्यांची साईझ कमी करून .zip फाईल्स चा वापर केला जातो.

March 01, 2009

Privacy Policy

Privacy Policy: [i] Google, as a third party vendor, uses cookies to serve ads on your site. [ii] Google's use of the DART cookie enables it to serve ads to your users based on their visit to your sites and other sites on the Internet. [iii] Users may opt out of the use of the DART cookie by visiting the Google ad and content network privacy policy.

Related Posts with Thumbnails