April 29, 2009
Dont try to hide from me, I have lullar.com !
Clocky - an innovative product
परवा नेट वर मुक्त संचार चालु असताना एक लेख वाचायला मिळाला. हा लेख होता एका घडयाळासंबंधी. होय एका गजराच्या घड्याळासंबंधी. अहो हे काही साधे सुधे घड्याळ नाही. हे घड्याळ म्हणजे सृजनशक्तीचा (innovation) एक उत्तम नमुना आहे.
या घड्याळाचे नाव आहे क्लॉकी (Clocky).
रोज सकाळी उठण्यासाठी आपण गजर लावतो. आणि गजर वाजला की मस्तपैकी तो बंद करुन पुन्हा झोपी जातो. आपल्या सगळ्यांचंच असे होते. यावर उपाय म्हणुन क्लॉकीचा जन्म झालाय. क्लॉकी नुसता गजर वाजवुन थांबत नाही तर आपण झोपेतून उठणारच याची पुरेपुर काळजी घेतो.
क्लॉकीचा गजर वाजवल्यानंतर एकदा त्याला तात्पुरता बंद करता येतो. आणि काही वेळाने तो पुन्हा वाजु लागतो. तशी ही सुविधा सर्वच गजराच्या घड्याळांमध्ये असते. यालाच snooze time असे म्हणतात.
पण क्लॉकी काय करते माहीत आहे का?
दुसर्यांदा म्हणजे snooze time नंतर क्लॉकी चक्क पळायला लागतो. होय क्लॉकीला रबराची दोन चाके आहेत. एका सरळ रेषेत न पळता तो आडवा तिडवा कसाही पळतो. आणि पळता पळता त्याचे छोटेखानी स्पीकर्स गजर करतच राह्तात. म्हणजे उठल्याउठल्या पहील्यांदा लपाछपी किंवा पकडापकडी खेळावी लागते.
आहे की नाही क्लॉकी स्पेशल?
क्लॉकी दिसायला अगदी लहान बाळासारखा आहे. त्याची दोन बटणे दोन डोळ्यांसारखी दिसतात. आणि क्लॉकी लहान बाळासारखा अवखळ आहे. तो ३ फुटांवरुन उडी मारु शकतो, लाकुड, कार्पेट, गादी कशावरही चालतो आणि मुख्य म्हणजे अक्षर्क्षः लपाछुपी खेळत असतो.
असा आहे क्लॉकी - एक साधा पण उपयोगी आविष्कार.
क्लॉकीबद्दल अधीक जाणुन घ्या - क्लॉकी
तुम्हाला माहीत आहे मी काय करतो ते लवकर उठण्यासाठी? अलार्म लावुन घड्याळ अशा ठिकाणी ठेवतो की मला ते जागेवरुन ऊठुनच बंद करावे लागेल. उदाहरणार्थ
हँगरला अडकवलेल्या पँटच्या खिशात किंवा बॅगमध्ये.
सोपा आणि साधा उपाय.
hellopdf.com - PDF to word converter for free
You will find hundreds of free utilities for converting word to PDF but there are very few softwares available for “PDF to DOC” coversion. Hellopdf is one of them.
This program can extract text, images, shapes from PDF file to Word Doc file and preserve the layout. It can convert all the pages, or any pages range of the PDF file.
And it is a standalone program - you can convert PDF to Word Doc without Adobe Acrobat Reader or Microsoft Word installed!
- Convert PDF to Word and preserve the original layout of your PDF in an editable Word Document.
- Extract text labels, graphics, shapes from PDF file into Word Doc file.
- Convert all the pages, or partial pages of PDF file to Word file.
- Support Adobe PDF 1.0 - 1.6 formats.
- Can automatically open the output Doc file when the conversion is done.
- Several PDF to Word conversion options are available for a better result.
- Convert in a high speed.
- Easy to use software.
- Totally for Free!
No more image attachments - A new feature from Gmail
My last post was about jetbytes.com. A time saving technique for sending attachments in email. Now I am going a step further. A new technique to save receiver’s time on downloading attached photographs/images.
Use this new feature from Gmail called “inserting images”.
Now you need not attach images in email and separate them from the original message.
How to activate this?
1. Login to your Gmail account.
2. Click on Settings (Tab on the right hand top corner)
3. Select “Labs”
4. Turn on “Inserting images” feature.
5. Make sure that you are in “rich formatting mode”
How to embed image in email?
Option I -
1.Click on the image icon as shown in picture.
2.Browse to the location of the image file and upload it.
1.If the image is somewhere on the web, simply provide it’s URL.
Done. Now you have added an image in your email content.
Note-
Receiver’s of the mail have to click "Disable images below" or "Always display images from ..." to see images you embed.
April 28, 2009
Fastest and easiest way to send files over internet - jetbytes.com
एक गोष्ट मला खुप दिवसापासुन सतावत होती. ती म्हणजे इंटरनेटवर एखादी फाईल पाठवण्याची. अगदी साधी वर्ड फाईल असुदे किंवा फोटो काही पाठवायचे झाले की माझ्या कपाळावर आठया आल्याच म्हणुन समजा.
पण शेवटी माझा हा प्रश्न सोडवणारा एक उपाय मला सापडलाच ! त्याचे नाव आहे "जेटबाईट्स" (Jetbytes.com)

जेव्हा पण आपल्याला एखादी फाईल इंटरनेटवर कोठे पाठवायची असते तेव्हा पहीला उपाय आठवतो ते इ-मेलचा. पण ई-मेल वर अटॅचमेंट पाठवायची म्हणजे काही सोपे काम नाही. पहील्यांदा फाईल अपलोड करा, मग ती स्कॅन होईपर्यंत वाट पहा आणि मग पाठवा. आणि फाईलचा आकार आणि त्यामुळे ई-मेल पोचावयास लागणारा वेळ हे नेहमीचे प्रॉब्लेम्स तर असतातच.
दुसरा मार्ग म्हणजे, विविध फाईल शेअरींग साईट्स वर आधी फाईल अपलोड करा. आणि मग त्यांनी दीलेली लिंक पाठवा. फाईलच्या आकारामुळे येणारे प्रॉब्लेम जरी सुटले असले तरी या प्रकाराचे काही तोटे आहेतच. एकतर अशा साईट्सवर रजीस्ट्रेशन करावे लागते आणि फाइल अपलोड होण्यासाठी प्रचंड वेळ लागतो.
पण मित्रहो, जेटबाईट्सने हे सर्व प्रॉब्लेम्स मुळापासुन नष्ट केले आहेत.
जेटबाईट्स कसे काम करते?
1. http://www.jetbytes.com/ या साईटवर जा.
2. मग तेथुन जी फाईल पाठवायची आहे तिथे जा. (Browse to the location of file in your computer)
3. Jetbytes लगेचच एक वेबलिंक बनवेल. (फक्त 1-2 सेकंदातच !)
4. ही वेबलिंक कॉपी करा आणि तुम्हाला जिथे पाठवायची असेल तेथे ई-मेल्ल करा.
5. ई-मेल मिळाल्यानंतर या लिंकवर क्लिक केल्यास त्या फाईलचे आपोआप डाउनलोड सुरु होइल.जेटबाईट्स मला का आवडले ?
1. जेटबाईट्स पुर्णपणे मोफत आहे.
2. अधीक जलद आहे.
3. कोणत्याही रजीस्ट्रेशनची गरज नाही4. वापरावयास खुप सोपे आहे.
मोफत वस्तुंकडुन यापेक्षा अधीक काय पाहीजे?
टीप -
1. जेटबाईटने बनविलेली लिंक ही तात्पुरत्या स्वरुपाची असुन एकदा क्लिक केल्यावर ती नष्ट होते. त्यामुळे एकापेक्षा अधीक व्यक्तींना एकच लिंक पाठवणे शक्य नाही.
2. तुम्ही स्वतः त्या लिंकला क्लिक करु नका.
Fastest and easiest way to send files over internet - jetbytes.com
Finally I found an application for my long pending problem. Problem of sharing my files quickly.
I found an amazing web app known as jetbytes.com.
What more one can ask for free.
April 27, 2009
आपल्या ब्लॉग वाचकांना जाणुन घ्या - गुगल काकांच्या मदतीने !
नेट्भेटला भेट देणारे बरेच जण marathiblogs.net या साइटवरुन नेट्भेटकडे येतात. आणि नेटभेट कडे marathiblogs.net वरुन येणार्या बर्याच पाहुण्यांचा स्वतःचा ब्लॉग असतो हे माझ्या निदर्शनास आले आहे. नेटभेटला भेट देणारे पाहुणे कोण-कोण आहेत, ते कोणत्या देशातुन आणि कोणकोणत्या शहरात आहेत. नेटभेटाच्या वाचकांना कोणता मजकुर आवडतो, कोणत्या लेखांवर वाचक किती वेळ घालवतात असा सर्व वृत्तांत मला मिळतो ते गुगल अनॅलेटीक्स या अतीशय उत्तम सॉफ्टवेअरमुळे.
माझ्या इतर ब्लॉगधारक मित्रांना हमखास उपयोगी पडेल असे Google analytics कसे वापरावे याबद्दल ही माहीती.
गुगल अनॅलेटीक्स चा कोड मिळवा - Get your our Google Analytics Code
1. Login to Google Analytics at http://google.com/analytics/ with your gmail id.
१. तुमचा जीमेल आयडी वापरुन गुगल अनॅलेटीक्सच्या http://google.com/analytics/ च्या साइटवर लॉगीन करा.
2. Click on "Add Website Profile".
२. "Add Website Profile" असे लिहिलेले असेल , तिथे क्लिक करा.
3. Select Add a Profile for a New Domain.
३. "Add a Profile for a New Domain" हा पर्याय निवडा.
4. Enter the URL of your site or blog.
४. येथे तुमच्या नविन वेब साइटचे/ ब्लॉगचे नाव द्या.
5. Select your country and time zone. Click Finish.
५. तुम्ही रहात असलेल्या देशाचे नाव आणि वेळ निवडा. आणि "Finish" (समाप्त) वर क्लिक करा.
6. Analytics provides you with a HTML code block which you can add to your site's pages. Select the code block and then copy it.
६. अनॅलेटीक्स तुम्हाला एक कोड पुरवेल. हा कोड तुम्हाला तुमच्या वेब साईट किंवा ब्लॉग वर लावायचा आहे. तो सीलेक्ट करुन मग कॉपी करुन घ्या. कोड वैगरे पाहुन घाबरुन जाउ नका. हे काम अगदी सोपे आहे. एखादा शाळकरी मुलगा देखिल करेल इतके सोपे.
Add the Google Analytics Code Block to Your Blogger Blog वेब साईट किंवा ब्लॉग वर गुगल अनॅलीटीक्सचा कोड कसा लावावा?
1. Login to http://www.blogger.com/.
१. http://www.blogger.com/ वर लॉग्-इन करा.
2. Click on Layout or Template.
२. Layout अथवा Template वर क्लिक करा.
3. Click on Edit HTML. HTML code displays. Don't worry. Just scroll to the bottom. Look for the end of the template. It'll look like:
३. Edit HTML वर क्लिक करा. HTML कोड दिसेल. घाबरु नका. HTML कोडच्या सगळ्यात खाली जा. template च्या शेवटाला पहा. तिथे काहीसे असे लिहिलेले दिसेल -

4.Put your cursor right before that tag.
४. या जागेवर क्लिक करा.
5. Paste the Google Analytics Code
५. मगाशी कॉपी केलेला Google Analytics Code इथे चिकटवा. (Paste करा)
6. Click Save Changes.
६. केलेले बदल सुरक्षीत करा.
You have now added the Google Analytics Code Block to Your Blogger Blog. आता तुम्ही गुगल अनॅलेटीक्सचा कोड तुमच्या ब्लॉग वर चिकटवलेला आहे.

Easy and free, word to pdf tool at your homepage.
तसे पाहीले तर या कामासाठी अक्षरक्षः हजारो सॉफ्टवेअर्स इंटरनेटच्या महाजालावर उपलब्ध आहेत. पण हे सर्व मोफत सोफ्टवेअर्स डाउनलोड करुन घ्यावे लागतात आणि डाउनलोड केल्यानंतरही काही दिवसच मोफत चालतात. (३० दिवसांची ट्रायल) आणि नंतर विकत घ्यावे लागतात.
आज मी तुम्हाला असे एक वेब अप्लिकेशन सांगणार आहे जे तुमचे हे काम कोणत्याही डाउनलोड शिवाय मोफत करुन देइल. आणि अगदी तुम्हाला पाहीजे तेव्हा आणि पाहीजे तितक्या वेळा.
मुख्य म्हणजे या साठी तुम्हाला Google चे होमपेज (iGoogle) सोडुन कोठेही जावे लागणार नाही. कारण http://www.pdf24.org/ या वेब साईटवर उपलब्ध असलेल्या या वेब अप्लिकेशनचे विजेट्स (widgets) बनवता येतात.
कसे सुरु कराल?
- आधी iGoogle ला होमपेज करुन घ्या.
- नंतर इंटरनेट एक्स्प्लोरअरच्या अॅड्रेस बार मध्ये खालील URL चिकटवा (कॉपी आणि पेस्ट) किंवा खालील URL ला क्लिक केलेत तरी पुरे.
- वर्ड टु पीडीएफ रुपांतरण सुरु.
आणखी काही फायदे !
- यात पीडीएफ रुपांतर करुन पाहीजे तिकडे इ-मेल देखील करता येते.
- एखादे वेब पेज किंवा पुर्ण वर्ड डॉक्युमेंट रुपांतरीत करुन पाठवीता येते.
- पुर्णपणे मोफत आणि अगदी घरच्या घरी (म्हणजेच होम पेजवर हो!)
Protect your files and folders with password
Get the encryption software -
2. Install it on your computer.
Protect your files and folders with password -
1. Right click on the folder or file you want to protect
2. select Kruptos 2
3. Encrypt file/folder
4. Set the password
ऑफीसमध्ये ऑर्कुट उघडण्याचे सोपे उपाय !
बरेच लोक इंटरनेट फक्त ऑफीसमध्येच वापरतात. (घरी कंप्युटर नसतो, असला तर इंटरनेट घेतलेला नसतो, इंटरनेट असलाच तर तो डाउन असतो आणि या तीनही गोष्टी सुदैवाने असल्याच तर लोड शेडींग असतंच ! वा रे भारतीय आय. टी. ) असो सांगायचा मुद्दा हा की बरेच जणांचा इंटरनेटशी संबंध फक्त ऑफीसमध्येच येतो. आणि बर्याच वेळा ऑफीसेसमध्ये काही अप्रतीम साईटस (ज्यांच्यामुळे इंटरनेट एक छान अनुभव बनला आहे) अशा साइटस ब्लॉक केलेल्या असतात. म्हणुनच ऑर्कुटच्या जगाशी बरेच लोक अजुनही दुर आहेत.
(प्रस्तावना संपली एकदाची !)
मित्रहो आज मी तुम्हाला ऑफीसमध्येच ऑर्कुट ही वेब साईट कशी पहायची त्याचे काही सोपे उपाय सांगणार आहे. अशा ब्लॉक केलेल्या साईट्स पाहण्यासाठी खरेतर खुप उपाय आहेत. पण ते सगळे थोडेशे किचकट आहेत. आणि बरेचशे बेकायदेशीर मार्ग आहेत. म्हणुन मी तुम्हाला अगदीच सोपे आणि निरुपद्रवी मार्ग सांगणार आहे.
पहीला उपाय -
बर्याच ठीकाणी http://www.orkut.com/ हे संकेतस्थळ बंद केलेले असते, त्याऐवजी http://www.orkut.co.in/ हे ऑर्कुटचे भारतीय रुप वापरुन पहा.
दुसरा उपाय -
http://www.power.com/ अथवा http://www.powerscrap.com/ चा वापर करा. या संकेतस्थळाचा वापर करुन तुम्हाला ऑर्कुटमध्ये लॉग्-इन (Login) करता येइल.
हे दोनही अतीशय साधे उपाय आहेत. सगळयाच ठीकाणी काम करतील असे नाही. पण तुम्हाला वर उल्लेखीलेल्या काही हमखास (जालीम) उपायांची माहीती हवी असेल तर मला कळवा. सोबत तुमचा इ-मेल आयडी देण्यास विसरु नका. कारण ते उपाय netbhet.com वर येणार नाहीत , तुम्हाला मेल मात्र जरुर करेन.
April 23, 2009
Dont have time to comment? Atleast say thanks !
Good tool for bloggers. Many of our readers always wants to comment on the post. But as soon as system asks name , email-id and the boring ruthless Captcha's they drop the idea of commenting. Now here is a tool which lets your users say a simple thanks if they dont have enough time to comment on. Its a handy tool for both bloggers and readers. How it works? - Use simple thanksbutton on your blog - Whenever a reader wants to say thanks , he/she can click on the button.
April 22, 2009
Google Timeline - Illustration of an amazing journey !
I was just surfing some info larry page and Sergey Brin (Great Googlers) and I came across this amazing journey reprsented in an interactive way.
This is a complete but short story of Google's growth. Starting right from the day when Larry and Sergey met for the first time.
(Larry Page and Sergey Brin meet at Stanford. (Larry, 22, a U Michigan grad, is considering the school; Sergey, 21, is assigned to show him around.) According to some accounts, they disagree about most everything during this first meeting.)
Homepage through the years (Original prototype - 11 November 1998)Sun Sep 27 20:26:46 PDT 1998
Equipment Consulting: Penguin Computing
Collaborating Groups in the Computer Science Department at Stanford University: The Digital Libraries Project, The Project on People Computers and Design, The Database Group, The Stanford InfoLab, The MIDAS Data Mining Group, and The Theory Division
50 bestseller books for the year 2008
Friends,
I just happened to see a list of 50 bestseller books for the year 2008 on my favourite site esnips.comFrankally speaking I haven't read a single book from the list.
you can check it here
let me know if you have read any of these books and your views on this.also for our readers, you can name a book which you think should be added to the list.
The only condition is "you gotta read it first ! lol
Opinion is the cheapest commodity on earth - Napoleon Hill
The General and the Boy
Once, there was a General who wanted to cross a river.
He was unsure of the depth of the river, and whether his horse could make it across the river. He looked around for help and saw a little boy nearby. He asked the boy for advice.
The boy looked at the size of the General’s horse and paused for a moment. He thenconfidently told the General that it is safe for the General and his horse to cross the river.
The General proceeded to cross the river on his horse. As he approached the middle of the river, he suddenly realized that the river was, in fact, very deep, and he almost drowned.
After he recovered from his shock he shouted at the boy and threatened to punish him. The boy was stunned and innocently replied, “But General, I see my ducks crossing the river everyday without any problem, and my ducks have shorter legs than your horse”.
Success Mantra -
If you need advice, get it from people who know what they are talking about.
Napoleon Hill says that, “Opinion is the cheapest commodity on earth”.
Anonymous (Taken from a forwarded mail)
April 21, 2009
Nothing can stop you from chatting - Meebo.com !
पण चॅटींगमुळे खुप वेळ वाया जातो (असे आपल्या बॉसला वाटते!) आणि
ऑफीसमध्ये काहीजण (तुम्ही नाही हो , तुमचे सर्व सहकारी !) बॉसबद्दल आणि ऑफीसमधील सुंदर मुलींबद्दल चॅटवर बोलत अगदी ८ तास घालवतात. आणि म्हणुनच बर्याच ऑफीसमध्ये Yahoo messenger, Gtalk आणि MSN messenger असे प्रसीद्ध मेसेंजर्स ब्लॉक केले आहेत.मित्रांनो घाबरु नका. आता कोणीही तुम्हाला चॅटींग करण्यापासून रोखु शकणार नाही अगदी ऑफीसमध्ये सुध्दा ! हे सर्व शक्य झालय Meebo.com मीबो.कॉम मुळे.
मीबो हे एक मोफत ऑनलाइन अप्लिकेशन आहे जे वेगवेगळ्या मेसेंजर क्लायेंट्सवर एकत्रच चॅट करण्याची सुविधा देते.
मीबो संगणकावरुनच नव्हे तर मोबाइलद्वारे देखील वापरता येउ शकते.
एकाच वेळी Yahoo messenger, Gtalk आणि MSN messenger वापरता येते
तुमच्या सर्व मेसेजींगचा डाटा आपोआप सेव्ह केला जातो.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मीबो वापरण्यासाठी कोणतेही रजीस्ट्रेशन अथवा डाउनलोड करण्याची आवश्यकता नसते.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही साइट मराठी भाषेमध्ये देखील वापरता येइल्.(चित्रात पहा)
Good to see a good face of IPL !

IPL चे दुसरे सत्र आता चांगलेच रंगात आले आहे. मात्र या खेपेस IPL ने फक्त मनोरंजनच न करता इतरही काही चांगल्या गोष्टी केल्या आहेत. IPL ने चक्क सामाजीक कार्यात वाटा उचलला आहे. ही निश्चीतच एक चांगली बाब आहे.
प्रत्येक सामन्याची १००० तिकीटे काही गरजवंत शाळांना देण्यात येणार आहेत. या शाळा तिकीटांची विक्री करुन जो पैसा कमावतील तो पैसा त्या शाळांच्या शैक्षणीक गरजा पुर्ण करण्यासाठी वापरु शकतील. आणि जे कोणी या शाळांकडून तिकीटे खरेदी करतील त्यांना प्रत्येक तिकीटामागे दोन तिकीटे मोफत देण्यात येतिल.
HEAT (हीट) असे नाव असलेल्या या समाजीक कार्याच्या प्रकल्पासाठी DLF IPL ने ८० करोड रँड् (Rand - दक्षीण अफ्रीकेचे चलन) इतके अनुदान दीले आहे. कोणत्याही क्रीडा संघटनेने चालवीलेला हा दक्षीण अफ्रीकेमधील हा सर्वात मोठा सामाजीक प्रकल्प आहे.जिथे जिथे IPL चे सामने होणार आहेत तेथील जवळच्या तीस (३०) शाळांना या प्रकल्पाद्वारे १००००० रँड इतका नीधी शिष्यवृत्तीसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. केप टाउन येथील अलेक्झांडर सिंटन स्कूल या शाळेला मागील आठवड्यात १००००० रँड देण्यात आले.
HEAT प्रोग्रामचा दुसरा भाग म्हणजे वैयक्तीक शिक्षणार्थींसाठी असलेले १५००० रँडचे बक्षीस. सामना बघायला आलेल्या कोणत्याही पाच विद्यार्थ्यांना निवडण्यात येइल. त्यांचे चेहरे मैदानावरील स्क्रीनवर दाखवण्यात येतील आणि त्यांना शिक्षणासाठी १५००० रँड दीले जातील.
IPL चा हा चांगला चेहरा पाहुन खरंच खुप बरं वाटले. पण त्याचवेळेस एक विचार मनात येउन गेला की या सुविधा भारतातील विद्यार्थ्यांना मिळाल्या असत्या तर!
असो, कुठे का असेना गरजवंताना मदत मिळते आहे आणि ते ही भारताकडुन. हे ही नसे थोडके.
Good to see a good face of IPL !
Cheapest commodity on earth - Opinion !
एकदा एका माणसाला त्यच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले.
मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, " निश्चींतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करु शकेल".
मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला.
कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, "पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत."
उगाच कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का ते जाणुन घ्या.
नेपोलीयन हिलने म्हंटले होते की, "सल्ला ही जगातील सर्वात स्वस्त वस्तु आहे".
Anonymous - अनामीक (Taken from a forwarded mail)
Google Phone Search for India - It's free
Google Phone Search -
Voice Search for Hyderabad, Delhi, Mumbai (New)! and Bangalore (New) !India
Google Phone Search is a new pilot service making local business information, movie times and real time flight status accessible from any phone.
Google Phone Search gives you the power of Google Search while you are on the go. This service is completely free of charge, bringing you the information you need, right when you need it the most. It can be reached from any phone number - landline or mobile.
Dial from any phone
1-800-41-999-999 (toll free)
Once you find the information you're looking for, you can:
- Get the information sent to you for free via SMS
- Have the information read to you
To give you the information you need quickly and efficiently, Google is using a combination of advanced speech recognition technology and local experts - ensuring that you always find the best answers to your questions in the fastest way possible.
Note:
Google Phone Search is still in its pilot stage and is available to users in Hyderabad, Delhi, Mumbai and Bangalore, India only.
It may not be available at all times and may not work for all users.
Google is fine-tuning the service to serve you better.
It is currently only available in English, Hindi and Telugu.
Nothing can stop you from chatting - Meebo.com !
Friends, Don't worry. Now nothing can stop us from chatting (even during office hours!) , thanks to meebo.com.
- Meebo is a free online application that offers instant messaging service through multiple instant messaging platforms.
- It can be accessed anywhere either from a public computer or on a mobile phone.
- Users can connect to Yahoo Messenger, Google Talk, and MSN Messenger.All in one.
- Meebo automatically saves your message history (No need to remember your lies during chatting)
- Meebo doesn’t require registration.
- But a registered user can access by single sign-on for all IM accounts, save chat logs, store conversations and add icons and skins.
Visit http://www.meebo.com/ and let us know your feedback on the application.
April 20, 2009
Creative China !
बिल गेट्स एकदा म्हणाला होता की चिनी हे जगातील सर्वात हुशार लोक आहेत. आणि आता मी देखील तेच म्हणतो आहे. (बघा, माझे आणि बिल गेट्सचे विचार किती जुळतात ते!)
खाली दिलेल्या चित्राकडे एकदा नजर टाका म्हणजे मी असे का म्हणतोय याचा तुम्हाला अंदाज येईल.

तुमच्यापैकी किती जणांना NOKLA (नोकला) माहीत आहे (चुकुन नोकिया असे वाचु नका!)? नोकला ही नोकियाच्या सर्व फोन डीजाइन्सची अगदी तंतोतंत कॉपी करणारी एक चीनमधील एक कंपनी आहे. तर अशा या कंपनीने नुकताच सादर केलेला हा नविन नोकिफोन (Nokiphone 3000). हा मोबाइल म्हणजे नोकिया कंपनीचा N95 आणि अॅप्पल कंपनीचा iPhone (आय- फोन) यांचा सुंदर मिलाफ आहे.
Nokiphone N3000i चे हे काही फीचर्स.
- 32 inch screen - 32 इंच स्क्रीन
- Blue-tooth - ब्ल्यु टुथ
- Wi-fi - वाय फाय
- Dual Sim (Thats my favourite feature) - दोन सीम कर्ड ठेवण्याची सोय यात आहे.
- It has a dual slider like Nokia N95 - Nokia N95 प्रमाणेच यात दोन्ही बाजुने स्लायडर ची सुविधा पुरवण्यात आली आहे.
हा लेख लिहिण्यामागे एकमेव कारण म्हणजे जरी कॉपी असली तरी योग्य वेळी योग्य ठिकाणी आपले प्रॉडक्ट बाजारात कसे आणायचे ही नक्कीच शिकण्यासारखी गोष्ट आहे.
Creative China !
Bill gates once said that chinese are the most intelligent people in the world. And even I am saying so ( me and bill gates think alike !)
Look at this beauty called "Nokiphone". (Nok-i-phone). Got it?
- 32 inch screen
- Blue-tooth
- Wi-fi
- Dual Sim (Thats my favourite feature)
- It has a dual slider like Nokia N95
I am posting this gadget today becuase I want to admire the way chinese bring their products in market. (fastest "concept to launch" cycle)
April 18, 2009
Reserve bank of India has released a new coin of 10 rupees.
Indian currency is growing stronger now! but in some other sense. A 10 rupee paper note will now come in a form of strong metal (and that too two different metals !)
Reserve bank of India has released a new coin of 10 rupees.
The beauty of this coin is an use of bimetal. Use of two different metals is to help the blind and old people to convincingly recognise the currency.
One side of the coin (heads) has the lion capitol with numeral 10 and an year of manufacture mentioned on it. On the other side (tails), two parellal lines crossing each other with a dot in each quarter of the circle and denomination written in Hindi and English.
It has been designed by National Institute of Design, Ahmedabad .
Metals used are Nickel-Bronze and Ferrous Steel (inner portion).
The coin weighs around 8 grams and the diameter of this coin is around 28 mm.
April 13, 2009
निसर्गाकडून आपण काय शिकू शकतो?
निसर्गाकडून आपण काय शिकू शकतो?
निसर्ग आपल्याला बरेच काही शिकवत असतो. पण आपणच त्याकडे दुर्लक्ष करतो. जरा डोळे उघडे ठेवुन निसर्गाच्या अविष्कारांकडे पहा, बरेच काही शिकायला मिळेल.
त्यापैकीच हे एक उदाहरण.
जगातील सर्वोत्कृष्ट पॅकींगचा नमुना - केळे (Banana)
उघडण्यास सर्वात सोपे, पण तेव्हाच जेव्हा पुर्ण पिकलेले असते.
आवरण काढुन ठेवण्याची गरज नाही. फक्त साल थोडेसे सोलुन खाता येते.
जसजसे केळे पिकु लागते तसतसे त्याची साल आपला रंग बदलते. त्यामुळे केळे केव्हा खाण्यास उपयुक्त आहे हे आपल्याला पॅकींग पाहुनच कळते.
प्रत्येक केळ्याची क्वॉलीटी त्याच्या पॅकींगवरुन ओळखता येते.
केळे खाण्यास योग्य आहे की नाही हे पॅकींग वरुनच कळते. ज्याप्रमाणे औषधांवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते अगदी तशीच सोय केळ्याच्या सालामध्ये करून ठेवलेली आहे.
केळ्यांचा घड हाताळण्यासाठी अगदी सोपा असतो. म्हणजे अगदी अर्धा डझन, एक डझन असे वेगवेगळे पॅक सहजरीत्या बनवता येतात.
दिसायला नाजुक असले तरी केळयाची पुर्णपणे काळजी त्याच्या सालीमुळे घेतली जाते.
बघा कीतीतरी फायदे आहेत या पॅकींगचे. तुम्ही पण बघा आजुबाजुला आणि काढा शोधुन असे काही ज्ञानवर्धक सापडतंय का?
Posted in entrepreneurship by Steve Sammartino on April 6, 2009
April 12, 2009
Track your blog stats with simply amazing google analytics
Get your our Google Analytics Code 1. Login to Google Analytics at http://google.com/analytics/ with your gmail id. 2. Click on "Add Website Profile". 3. Select Add a Profile for a New Domain. 4. Enter the URL of your site or blog. 5. Select your country and time zone. Click Finish. 6. Analytics provides you with a HTML code block which you can add to your site's pages. Select the code block and then copy it. Add the Google Analytics Code Block to Your Blogger Blog 1. Login to http://www.blogger.com/. 2. Click on Layout or Template. 3. Click on Edit HTML. HTML code displays. Don't worry. Just scroll to the bottom. Look for the end of the template. It'll look like:
6. Click Save Changes.
You have now added the Google Analytics Code Block to Your Blogger Blog.
Gmail labs - My favourite features
No one think like Google. I bet no one can.
We are using emails for years now. And we thought email clients we are using are simply awesome (?).
Now just have a look here at new Gmail lab features. And then you will exclaim " Oh , I always wanted that feature"
Friends that's beauty of Gmail.
1. Forgotten Attachment Detector -
Many of us have experienced the embarrassment of having sent a message without attaching the file we said we were going to attach. Turn on the Forgotten Attachment Detector in Labs, and you'll get an alert if you mention attaching a file but forget to do so..
2. Email addict -
Fir those who spend hours writing and replying emails.Take a break.
Now instead of your MOM , Gmail will remind you to do so.
Gmail can help you get some down-time by forcing a break. Acknowledge your addiction by enabling ‘Email Addict’ in Labs. You can specify how often your screen will freeze up and tell you to get up and take five.
3. Undo send (This one is awesome!)
Oops, hit "Send" too soon? Stop messages from being sent for a few seconds after hitting the send button.
Immediately after pressing the send button we say Oops! Now dont worry.
Enable this feature in gmail > settings > Labs and your mail shall wait for you to stop it for 5 seconds after you asked it to Go.
Hats of to those who are brains behind these simple ideas.Now this is making life easy in true sense.
April 11, 2009
A promise is a promise - Ratan Tata
Excerpts from Ratan Tata's speech at the Nano unveiling ceremony
Ladies and Gentleman, thank you for being with us on this memorable occasion.
There are no celebrities at this function nor any dance routines. The center of attraction for this morning's event is the new Tata car which we are unveiling.We're going to take you on a small journey. A journey that symbolizes the human spirit of change, the will to question the unquestionable, the drive to stretch the envelope.
Ladies and gentleman, I invite you to join me in this journey of innovation and evolution. The quest to lead and the quest to conquer. It is this quest that led to the first manned flight by the Wright brothers.
Today, thousands of aircrafts travel the skies carrying millions of passengers across the globe in safety and comfort. The same quest for leadership and conquering new frontiers led to landing man on the moon, an unheard of and unbelievable achievement at that time.Innovation and evolution led to the creation of a bicycle which the rider pedaled to move faster than walking. Later, innovation motorized the bicycle to create the motorcycle and the scooter, providing motorized transport for up to two persons.
The ENIAC computer in 1945, considered among the highest powered at that time filled an entire room. Today, the power of that huge machine is exceeded in the personal computer that sits on our desks or in fact, that we carry as laptops in our briefcases.There are solutions for most problems.
The barriers and roadblocks that we face are usually of our own making and these can only be demolished by having the determination to find a solution, even contrary to the conventional wisdom that prevails around us, by breaking tradition.
Today's story started some years ago when I observed families riding on two wheelers, the father driving a scooter, his young kid standing in front of him, his wife sitting behind him holding a baby and I asked myself whether one could conceive of a safe, affordable, all weather form of transport for such a family. A vehicle that could be affordable and low cost enough to be within everyone's reach, a people's car, built to meet all safety standards, designed to meet or exceed emission norms and be low in pollution and high in fuel efficiency.
This then was the dream we set ourselves to achieve. Many said this dream could not be achieved. Some scuffed at what we would produce, perhaps a vehicle comprising two scooters attached together or perhaps an unsafe rudimentary vehicle, a poor excuse for a car. Let me assure you and also assure our critics that the car we have designed and we will be presenting to you today will indeed meet all the current safety requirements of a modern day car.Of late, when it became known that we will in fact be making such a car, the attention has moved to questioning the pollution it would create.
Let me again assure those who have concern for the environment that the car we present to you today will meet all current legislated emission criteria and will have a lower pollution level than even a two wheeler being manufactured in India today.Concerns are also now being expressed about the congestion that could be caused by the existence of our small car in large numbers. I believe this needs to be put in the right perspective.
There is no doubt that India is woefully behind its neighbours in infrastructure. The government is endeavoring to address this situation with its new road policy. Looking ahead, five years from today, were we to produce and sell 5,00,000 small cars every year, we would then, at the end of five years constitute approximately 2.5% of all passenger vehicles in the country. This could hardly be considered the nightmare of congestion that is being raised today about our new small car.Despite what the critics said, despite what our antagonistic did, we pursued our vision to give India an affordable people's car that had not been produced anywhere in the world.
In fact, a car that most people said could not be manufactured for that kind of price. But we never took our eyes of our goal. Today we will present what a young group of engineers and designers gave their all, for about four years to achieve.Anyway I have said enough ladies and gentlemen, now I give you the new car from Tata Motors, the people's car that everyone has been waiting for.Ladies and gentlemen, thank you again for being with us.
We are very pleased to present these cars to you today. They are not concept cars. They are not prototypes. They are the production cars that will roll out of the Singur plant later this year. And these will come in several variants. You have today on the stage one basic car or standard car and two deluxe cars which will have air conditioning also. Yes there will be air conditioning.This is been referred to as one man's dream and indeed it was.
But it took a tremendous amount of team work to convert this or translate this into reality. And I think it would be but fair and fitting to recognize and acknowledge the achievement of young group engineers who undertook the challenge for four years and great sacrifice to themselves and produced this car. I'd like to acknowledge Girish Wagh who headed the team. Girish, would you come up here? And some of his team members who are here with him.
There are close to five hundred people in the team and obviously not all of them can be here, so on behalf of all of us we would like to acknowledge, on behalf of the company what the team has been able to do. All five hundred of them.
I would also like to ask Ravi Kant (Managing Director, Tata Motors Ltd.), Prakash Telang (Executive Director (Commercial Vehicles), Tata Motors Ltd.) and Rajiv Dube (President (Passenger Cars), Tata Motors Ltd.) to join me up here at this time.
Let me say something about the car. The cars you see, as you can, are four door, they will seat four to five persons, they are powered by a 33 horse power, 624 cc engine. In size, externally it is approximately 8% smaller, bumper to bumper, than the Maruti 800. But internally it is 21% larger in passenger space. Fuel economy in terms of mileage, it'll be around 20 kilometers per liter or approximately 50 miles a gallon.As I said earlier, much has been said about emission and much has been said about congestion and safety.
Let me address the emission and the safety issues. In emissions as I mention, the car has, in fact passed the full frontal crash test that is required in this country (India). But it is also been designed to pass the offset and the side crash which is required internationally. So that the car can, in fact, be sold internationally.In terms of pollution, it today confirms to Bharat III and in fact today with this engine will indeed meet Euro IV which is not yet required in this country (India).We decided we'd call it Nano because it connotes high technology and small size. So we stayed with the name.
Finally all of you have been conjecturing about the price. And since we commenced this exercise four years ago, we are all aware that there has been a very steep increase in input prices of steel, tires and various and sundry other inputs. Bearing all this in mind, I would like to announce today that the standard car will in fact have a dealer price of One Lakh Only (100,000 INR), VAT and transport being extra.
Now having said that, I just want to say that that is because a promise is a promise and that's what we would like to leave you with.
Mr Ratan Tata’s address on Graduation Day of ISB on April 8, 2006
Mr Ratan Tata’s address on Graduation Day April 8, 2006
Dean Rao, Rajat Gupta, Members of the Board, Ladies and Gentlemen, Members of the Graduating Class.
To stand before you after an overwhelming introduction makes me feel rather humble. Before I go on, I thought I would tell you a short story which depicts perhaps what some people other than Dean Rao might see what I do.
The story is of a man who goes into a shop to buy a parrot. He picks out a parrot and asks the shopkeeper how much it is. The shopkeeper says, “5000$.”The man says, “Oh! That’s terribly expensive.
What does this parrot do?”The shopkeeper says, “Oh, he types in English with his beak.”The man says, “That’s far too expensive. What about that parrot?”The shopkeeper says, “Oh! That one is 10,000$ because he is proficient in 3 or 4 languages and he understands SAP.”The man says, “Well, I really don’t want that, what about the last one there?”
The shopkeeper says, “Oh! That is 30,000$.”The man says, “What does he do?” The shopkeeper says, “I really don’t know, but everybody calls him Chairman.”And that I think is what some of the people in my organization would probably feel.
It’s a great pleasure to be here with you today and to be a part of what to all of you in the graduating class must be a great moment.
A great moment, because not only does it mark the termination of a curriculum that is well recognized and amongst the best in the country, but you also head into the business world in India at a time when India has certainly come into its own, and is very rewardingly been seen by the world around as a country on the move, and that you all have an opportunity to play a role in the future of this country’s development. In many ways I can only stand here and express my sadness for not being your age at a time like this because truly it is an exhilarating moment in time.
Most of you would and should look at the coming years as years of great fulfillment and great participation in what stands in the future of this country. The responsibilities that you will have will also be very great. Many of you are going to be leaders of this country in the years to come. and in that role you will not only have to excel, which I am sure you will in your careers, but you will have to demonstrate leadership to the people around you, the people who you serve and the communities in which you operate.I would hope that most of you will in fact strive for leadership in a principled manner with values, because that would be the foundation that this country needs to have if it is to take its place in the world. I would hope that each of you would lead by example and that each of you would live by the principles that you espouse…That you will have a sense of vision, because one of the things that this country has had has been an inability to look into the future, our business leaders have sometimes been followers rather than leaders.
For this you would need determination and a sense of belief in what you are intending to do and I believe on many, many occasions you would have doubts as to what you are pursuing would be the right thing. But if you do believe in what you are trying to do and you pursue it and stay with it in a determined manner, I am quite sure that you will succeed.
All of you have a special role, I think, to succeed- it is your way of proving that the investment you have made or your parents have made in your education is the most valuable investment that you would have made in your life.I would hope that as people who might take an elite position, would be considered amongst the elite in the country, you will always display humility in the manner in which you deal with your fellowmen, both in your company and in the country and you will continue to have passion in the areas in which you will work. While all of you have a great satisfaction in the kinds of salary placements and the value that has been attached to you which is quite justified, I believe that each of us have another responsibility and that responsibility is to play our individual roles, small as it may be, to lift the quality of life of the 6 or 700 million people in the rural areas.
I hope that what you do, in some way or form, will directly or indirectly touch the lives of those people because that also will lead to the future development of this country.Most of you I imagine will be deeply engrossed in your careers and I hope that each of you will have a tremendously exhilarating and rewarding life in the business community, but it is not business alone, I would feel that a class like yours would go into the world in India or elsewhere. That you would leave your mark not only amongst your colleagues in industry, but for future generations who would look back on you and look to you at the contribution you have made that lives on after you.I would like to wish you all the very best and great success in the life that will follow shortly.
Thank you very much.
April 09, 2009
घाणेरड्या राजकारणावर काही सोपे पण रामबाण उपाय !
मला राजकारणात अजिबात रस नाही. मला धड लोकसभा आणि विधानसभा किंवा आमदार आणि खासदार यांच्यातील फरकही कळत नाही. मी कोणत्याही पक्षाशी संबधीत नाही अथवा मी कोणत्या पक्षाचा पुरस्कारही करत नाही. मी फक्त एवढेच जाणतो की मी भारतीय आहे आणि भारत देशासाठी जे काही करता येइल ते करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करतो.
तसे म्हंटले तर मला कधी सिस्टमबद्दल , राजकारणाबद्दल रागही नव्हता. आणि एखाद्या सर्व सामान्य नागरीकाप्रमाणे आला दिवस गोड मानण्यात मी धन्य होत होतो.
पण एक दिवस असा उजाडला की मी खडबडुन जागा झालो. मला कळुन चुकले की आपण आपले भविष्य , करीअर, सुख, समाज सारे काही चुकीच्या हातांत देउन बसलो आहे. मित्रांनो तो दिवस होता २६ नोव्हेंबर २००८. मुंबईवरील अतीरेकी हल्ल्याचा काळा दिवस. त्यावेळी आपल्या नेत्यांचा पोरकटपणा आणि असंबंध बडबड ऐकुन तळपायाची आग मस्तकात गेली (आठवा आबा पाटील आणि नारायण राणेंची वक्तव्ये !).
प्रसिद्ध लेखक आणि वक्ते शिव खेरा यांचे एक वाक्य आहे, "If you are not part of the solution, then you are part of the problem". त्याच धर्तीवर मी काही उत्तरे शोधू लागलो कारण मला प्रश्न किंवा समस्येचा भाग बनायचे नव्हते. कॉर्पोरेट जगात नियमीत वावर असल्यामुळे काही गोष्टी मनाशी घट्ट बसलेल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे "There is always a simple solution for every difficult problem". म्हणजेच सर्व कठीण प्रश्नांना नेहमी एक तरी सोपे उत्तर असतेच. आणि मित्रांनो आपल्या राजकारण्यांचा हा सावळा गोंधळ दूर करण्यासाठी मला काही सोपे उपाय सुचले देखील.
मी आधीच म्हंटल्याप्रमाणे मला राजकारण कळत नाही. पण मला सारासार विचार (Common sense) कळतो. मला सूचलेले काही उपाय मी लिहितोय. तुम्हीच ठरवा चुक आहेत की बरोबर आणि तुम्हीच ठरवा ते अमलात आणले पाहीजेत की कचर्याच्या पेटीत टाकले पाहीजेत ते.
-- सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मला वाटला तो म्हणजे आपल्या राजकारण्यांचे शिक्षण. आपल्या गॄहमंत्र्यांना साधे हिंदी धड बोलता येत नाही (इंग्लीश तर दूरची बाब). पोलिसांनी आणि सैन्याने आधीच सागरी मार्गाने येणार्या धोक्याची कल्पना दीली होती पण त्याचे गांभीर्य एका अशिक्षीत किंवा अर्धशिक्षीत मंत्र्यांना कसे कळणार.
सगळ्यात मोठा विरोधाभास म्हणजे ज्या खात्यांचे हे मंत्री बनतात त्या सर्व खात्यांमध्ये अगदी शिपायाची नोकरी करणार्यादेखील परीक्षा, इंटरव्यु देउन पास व्हावे लागते. म्हणजे सर्वेसर्वा असणारे मंत्री सोडुन बाकी खालच्या सगळ्या जागांसाठी भरण्यासाठी मात्र पात्रतेच्या कडक अटी आणि नियम. वा रे लोकशाही !
या प्रश्नाला माझे पहीले उत्तर म्हणजे सर्व मंत्रीपदासाठी किमान MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) परीक्षा पास होणे ही कीमान पात्रतेची अट असावी. जर सर्व खात्यांसाठी नसली तरी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि अर्थमंत्री या महत्त्वाच्या खात्यांसाठी तरी हा नियम गरजेचा असावा.
ग्रूहमंत्र्याच्या जागेसाठी पोलिस किंवा सैन्य दलातील किमान पाच वर्षांचा अनुभव आवश्यक असावा.
दरवर्षी लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झालेल्या मंत्र्यांच्या जागा वाढवत न्याव्यात.
-- एकदा निवडुन आल्यानंतर मग मोठ्या खात्यांसाठी या नेत्यांमध्ये चढाओढ सुरु होते. आणि यातुनच घाणेरड्या राजकारणाची सुरुवात होते. यावरचा उपाय म्हणजे प्रत्येक पक्षाने आपला उमेदवार निवडुन आल्यावर आणि आपल्या पक्षाचे राज्य आल्यावर कोणते मंत्रीपद कोणाला देणार हे निवडणुकीच्या आधीच जाहीर करावे.
यामुळे दुहेरी फायदा होइल. पहीला म्हणजे सत्तेचं राजकारण होणार नाही. आणि दुसरा फायदा म्हणजे प्रत्येक मतदाराला पुर्व कल्पना असेल की तो कोणाला आणि कशासाठी मत देत आहे.
-- जरा यंदाच्या लोकसभा निवडणुकांकडे लक्ष देउन पहा. किती नविन चेहरे आणि तरुण चेहरे दिसताहेत ते? अगदी बोटावर मोजण्याइतकेच आहेत आणि ती देखील अगदी वारसाहक्काप्रमाणे चालत आलेल्या गादीवर बसायला आतुर झालेली राजकारण्यांची मुले. आणि या राजपुत्रांची काय पात्रता आहे की ते सरळ मंत्रीपदापर्यंत पोहोचावेत?
यावर उपाय असा - निवडणुकीस उभ्या राहू इच्छीणार्या प्रत्येक उमेदवारास किमान पाच वर्षे आधी नोंदणी करणे बंधनकारक करावे (जशी आपण रोजगार केंद्रात करतो ना, अगदी तशीच). नोंदणी करताना त्याचे/तीचे वय १८ वर्षे पुर्ण असावे. त्याचप्रमाणे नोंदणी केल्यानंतर दरवर्षी केलेल्या समाजकार्याचा तपशील जाहीर करणे त्या उमेदवारावर बंधनकारक असावे.
यामुळे केवळ तेच लोक पुढे येतील ज्यांना समाजकार्याची खरी तळमळ असेल. उगाच कोणीही यावे आणि राज्य करावे असे व्हायला नको.
-- कॉर्पोरेट जगतामध्ये "Review" ला खुप महत्त्व आहे. त्याचप्रमाणे दर तीन महीन्यांनी प्रत्येक मंत्र्याने आपल्या कामाचा तपशील द्यावा. वर्तमानपत्रामध्ये छापावा आणि टी.व्ही. वरील एखाद्या वाहीनीवर जाहीर करावा. जनतेपुढे जेव्हा दर तीन महीन्यांनी जाब द्यावा लागेल तेव्हा कामे आपोआप होतील. निवड्णुकांआधी दिलेल्या अश्वासनांचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरेल.
यामुळे जनतेलाही काय चाललय ते कळेल आणि राज्यकारभारात पारदर्शकता येइल.
-- आणखी एक सगळ्यात सोपा पण तीतकाच प्रभावी उपाय. प्रत्येक पक्षाने जिंकुन आल्यावर कोण पंतप्रधान, मुख्यमंत्री होणार हे निवडणुकीच्या आधीच जाहीर करावे. तसेच आता इलेक्ट्रॉनीक वोटींग मशीन आल्यामुळे प्रत्येकास आपापल्या विभागातील उमेदवारा सोबतच पंतप्रधानास/मुख्यमंत्र्यास देखील वोट करावयास द्यावे. म्हणजे देशातील व राज्यातील जनता थेट आपला नेता निवडु शकते. आणि सर्व पक्षांचा सावळा गोंधळ आपोआप टाळता येइल.
स्वतः पंतप्रधानास/मुख्यमंत्र्यास निवडुन दिल्यामुळे जनतेची जास्त इन्व्हॉल्वमेंट राहील. आणि लोक जास्त जागरुकपणे मतदान करतील.
यापैकी किती उपाय राबवता येतिल व कसे याबद्दल मला काहीच माहीत नाहे. पण हे राबवले पाहीजेत हे मात्र नक्की.
या लेखाबद्दलचा तुमचा प्रतीसाद मला जरूर कळवा. आणि तुमच्याकडेही असे काही उपाय असतील तर इथे या फोरमवर लिहा. जोपर्यंत आपण स्वतः सक्रीय सहभाग घेणार नाही तोपर्यंत काहीच होनार नाही.
आणि हो, मतदान जरुर करा. पण अशिक्षीत आणि भ्रष्ट नेत्यांना अजिबात मत देउ नका. सर्व पक्षांना हा संदेश जाउद्यात की जनतेला उच्चशिक्षीत आणि जबाबदार नेत्यांची गरज आहे.
जय हिंद !
Salil Chaudhary
Google India Elections Center !
This time Google has launched the Google India Elections Center for the upcoming General election (April 16 and end May 13). Google India has partnered with Hindustan Times to help voters to prepare for worlds largest democratic event.
The online election center will offer information to the voters about their constituency and the candidates.
The Google India elections center is available at -
google.co.in/loksabha2009 in English and Hindi.
hindustantimes.com/loksabha2009 in English
livehindustan.com/loksabha2009 in Hindi.
These amazing websites helps voters to confirm their voter registration status, find their polling location and view their constituency on a google map. It doesn't stop there but also provides valuable information in the form of "Developement data" of all constituencies. It talks about the key parameters like total population, crime rates, crime against women, infant mortality rate, percentage of people below poverty line etc.
One can also search for their voter registration and polling booth details..
These sites provide election-related news, blogs, videos, quotations . Voters can also learn about the background of their Member of Parliament and this year’s candidate.
This is in true sense called as voter empowerment.
So please JAAGO RE !
Vote for our own India.
Take charge of your own destiny, or someone else will ! - Jack Welch.
April 08, 2009
Interview with Warren Buffet
वॉरन बफे या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने नुकताच ३१ बिलीयन डॉलर्स सामाजीक कार्यासाठी दान केले. त्यांच्या सी.एन्.बी.सी. (CNBC) या वाहीनीवर झालेल्या मुलाखतीतील, त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वपुर्ण मुद्द्यांवर प्रकाश टाकणारा हा भाग खास तुमच्यासाठी, ते देखिल मराठीत -
१.त्यांनी वयाच्या अवघ्या अकराव्या (११) वर्षी शेअर बाजारात गुंतवणुक करण्यास सुरुवात केली. आणि तरी देखिल आपण खुप उशीरा सुरुवात केली याची त्यांना खंत आहे.
२. वृत्तपत्रे विकुन मिळवलेल्या कमाईतून त्यांनी एक छोटीशी शेत जमीन विकत घेतली. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी.
३. ते आजही मिड टाउन येथील त्यांच्या जुन्या ३ बेडरूमच्या घरात राहतात, जे त्यांनी ५० वर्षांपुर्वी त्यांच्या लग्नाच्या आधी घेतले होते. वॉरन बफे यांच्या मते त्यांना मोठ्या घराची गरज नाही. आजही त्यांच्या घराला कुंपणाची भिंत नाही.
४. वॉरन बफे त्यांची कार स्वतःच चालवतात. त्यांना ड्रायव्हर अथवा सुरक्षा रक्षकांची गरज नाही.
५. वॉरन बफे जगातील सर्वात मोठ्या विमान कंपनीचे मालक आहेत. पण ते कधीही स्वतंत्र विमानाने प्रवास करत नाहीत.
६. त्यांची कंपनी बर्कशायर हाथवेच्या (Berkshire Hathaway) मालकीच्या ६३ कंपन्या आहेत. या सर्व कंपन्यांच्या CEO's (कार्यकारी अधिकारी) ना ते फक्त वर्षाला एक पत्र लिहितात. सर्व CEO's ना त्यांनी दोन नियम सांगीतले आहेत. पहिला नियम, कधीही आपल्या गुंतवणुकदारांचे पैसे बुडणार नाहीत याची काळजी घ्या. दुसरा नियम, कधीही पहिला नियम विसरु नका.
७. त्यांना इतर उच्च वर्गीयांबरोबर वेळ व्यतीत करणे आवडत नाही. घरी आल्यावर स्वतःसाठी काही पॉपकॉर्न बनवुन चित्रपट बघणे हा त्यांचा आवडता छंद आहे.
८. बिल गेट्स या जगातील दुसर्या श्रीमंत माणसाची त्यांच्याशी पाच वर्षांपुर्वी भेट झाली. बिल गेट्सला तेव्हा वाटले की वॉरन बफेंबरोबर बोलण्या सारखे काहीच नाही त्यामुळे त्यांनी मीटींग साठी केवळ अर्ध्या तासाचा वेळ दिला. मात्र प्रत्यक्षात ही भेट दहा तास चालली. आणि त्या भेटी नंतर बिल गेटस हे वॉरन बफे यांचे भक्तच झाले.
९. वॉरन बफे आजही मोबाइल फोन वापरत नाहीत.तरुणांसाठी वॉरन यांचा सल्ला - "क्रेडीट कार्ड पासुन दुर रहा. खरी गुंतवणुक स्वतःमध्ये करा."
-- पैशाने माणसाला घडवले नसुन माणसाने पैसा बनवला आहे.
-- जितकी साधे जीवनमान राखता येइल तितके साधे रहा.
-- ऐकावे जनाचे करावे मनाचे.
-- ब्रॅंड पाहुन खरेदी करु नका. आपल्याला जे आवडते तेच खरेदी करा.
-- अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करु नका. तेवढेच विकत घ्या ज्याची गरज आहे.









