September 25, 2009

"बीअर्"ची छत्री !

[ MARATHI ].......

"नेटभेट"वर क्रीएटीव्हीटीबद्दल लिहिताना माझ्या मनात नेहमी संमीश्र भावना असतात. मी वाचकांना खुप अफलातुन क्रीएटीव्ह गोष्ट दाखवतोय याचा आनंद मनात दाटलेला असतो आणि त्याच वेळी "अरे, ही कल्पना मला का नाही सुचली ? या विचाराने स्वतःवरच राग येतो.

आजचा लेख लिहिताना देखील अशीच स्थीती आहे. खरंतर दुसर्‍याच एका विषयावर आज लिहिणार होतो पण आजच आलेल्या एका ई-मेल मध्ये मला हा विषय सापडला आणि लगेचंच त्यावर लिहायला सुरुवात केली.

आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या प्रॉडक्टचं नाव आहे "पॅरासोल" (Parasole). पॅरासोल म्हणजे छत्री. होय हे कमालीचे प्रॉडक्ट एक छत्री आहे. पण ही साधी सुधी छत्री नाही तर "बीअर्"ची छत्री आहे. परदेशांत (जिथे बीअर पाण्यासारखी पिली जाते!) बीचवर किंवा स्वीमींगपुल मध्ये मजेत पडुन राहुन बीअरचा आनंद घेणे हा रवीवारची सुट्टी घालवण्याचा नित्यनेमच असतो. अशा ग्राहकांना लक्षात घेउनच ही बीअरची छत्री बनवीली गेली आहे.

रबराच्या चकतीसारख्या बीअरच्या या छत्रीचे मुख्य दोन फायदे आहेत -

१. ही रबरी चकती बीअरवर बसवल्यावर छत्रीप्रमाणे काम करते आणि सुर्याच्या उनापासुन संरक्षण देत बीअरला जास्तीत जास्त थंड ठेवते.

२. या छत्रीबरोबर बीअर पाण्यात ठेवली तर ती तरंगत राहते. त्यामुळे दोनही मोकळे ठेवुन आरामात बीअरचा आनंद घेता येतो.



साल्वा क्वीअल्स पॅलान्का आणि व्हीक्टर सालरॉट (salva quiles palanca and victor salort) या स्पेअनच्या डीझाइनर्सनी पॅरासोल हे प्रॉडक्ट एका बीअर कंपनीसाठी डीझाइन केले आहे.

आपल्या आजुबाजुला असणार्‍या साध्या साध्या गोष्टींकडे/प्रश्नांकडे जरा डोळसपणे पाहीले तर असे कित्येक क्रीएटीव्ह उपाय आपल्याला सापडतील. गरज आहे ते फक्त शोधण्याची !

स्त्रोत (Source) - Designboom





Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

September 24, 2009

Use Google Fast Flip to Satisfy Your Need for News

[ ENGLISH ].......


Google Fast Flip is a web application that lets users discover and share news articles.

It combines qualities of print and the Web, with the ability to "flip" through pages online as quickly as flipping through a magazine. It also enables users to follow friends and topics, discover new content and create their own custom magazines around searches.



Google capture images of the articles on their partners' websites and then display them in an easy-to-read way. The stories are grouped by categories, such as Entertainment, Business, Opinion, Politics and Most Viewed.

Readers can flip through stories quickly by simply pressing the left- and right-arrow keys until they find one that catches their interest. Clicking on the story takes them directly to the publisher's website

Google also takes the cues from us - such as the stories we read, recommend and e-mail - to present sections, news sources and specific authors tailored specifically to our interests.

To enable personalization of the articles you see, you must sign in to your Google Account.

http://fastflip.googlelabs.com/






Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

100 Greatest Hits Of Youtube In 4 Minutes

[ MARATHI ].......


इंटरनेटवर टाइमपास करणार्‍याचं फेव्हरेट ठीकाण म्हणजे युट्युब्.कॉम. युट्युबवर इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हीडीओज आहेत की पाहण्यासाठी वेळ अपुरा पडेल पण मन भरणार नाही. मात्र दुर्दैवाने सर्वांनाच इतका वेळ असतो असे नाही. अशा माझ्या सर्व बिझी मित्रांसाठी मी युट्युबवरील एक खास व्हीडीओ शोधुन काढलाय.

१२ सप्टेंबरला म्हणजे फक्त १२ दिवसांपुर्वी अपलोड केलेला हा केवळ चार मिनिटांचा व्हीडीओ जगभरात आतापर्यंत 416,174 वेळा पाहण्यात आला आहे. या व्हीडीओमध्ये युट्युबवर आतापर्यंत सर्वाधीक पाहील्या गेलेल्या १०० व्हीडीओजची क्षणचित्रे आहेत.


टीव्हीवर (बहुदा) AXN या चॅनेलवर "Most funniest videos" असा एक कार्यक्रम दाखवला जातो. युट्युबवरील हा व्हीडीओ पाहताना त्या कार्यक्रमाची आठवण होते.

कोलांटी उडी मारुन पँट घालणारा बहाद्दर, अगदी जमीनीलगत माणसांच्या गर्दीमध्ये विमानाचे लँडींग आणि मोठ्या रबरी फुग्यावर उडी मारुन परत सरळ उभा राहणारा कसरतपटू हे या व्हीडीओमधील माझे आवडते क्षण आहेत.

आणखी एक, स्पीकर्स चालु ठेवायला विसरु नका. हा व्हीडीओ चालु असताना वाजणारं गाणं पण छान आहे.

नेटभेटच्या सर्व वाचकांसाठी हा कॉमेडी व्हीडीओ येथे देत आहे. त्याचा आस्वाद नक्की घ्या. आणि तुमचे आवडते क्षण कोणते आहेत ते सांगायला विसरु नका.






Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

September 23, 2009

Preview shortened URLs with Prevurl.com

[ MARATHI ].......

जर तुम्ही ट्वीटर, याहु ग्रुप्स किंवा गुगल ग्रुप्सचे सभासद असाल तर शॉर्टनड युआरएल (Shortened URL) हा प्रकार तुम्हाला नक्कीच माहीत असेल. मोठ्या वेबलिंक शेअर करताना होणारा त्रास वाचवण्यासाठी शॉर्टन्ड म्हणजेच छोट्या युआरएल फायद्याच्या ठरतात. उदाहरणार्थ http://tinyurl.com/2tx किंवा http://bit.ly/2NWAyr त्या लक्षात ठेवणे देखील फारसे कठीण नसते. ट्वीटरने तर सर्व ट्वीट्स १४० अक्षरात मावण्यासाठी छोट्या युआरएल्सचा फार चांगला वापर केला आहे.

मात्र अशा फायदेशीर असणार्‍या छोट्या युआरएल कधी कधी अतीशय धोकादायक ठरु शकतात. शॉर्टन्ड युआरएल मुळे लिंकचे मुळ स्थान कळत नाही आणि त्यावर क्लिक केल्याशिवाय आपण कुठे क्लिक केले (पुढे काय मांडुन ठेवले आहे ते !) ते देखील कळत नाही.

याहु किंवा गुगल ग्रुप्स मधुन नेहमी येणार्‍या इमेल्स मध्ये बर्‍याचदा शॉर्टन्ड लिंक्सचा वापर केलेला असतो. लिंकवर क्लिक केल्यावर एखादे भलतेच (!) पान उघडते, अशा वेळेस कोणी समोर असेल तर शरमेनं मेल्यासारखंच होतं.

साध्या वाटणार्‍या या लिंक्स कधी कधी व्हायरसने भरलेल्या साइट्सवर घेउन जातात आणि काही कळायच्या आतच व्हायरसने तुमच्या संगणकाचा ताबा घेतलेला असतो.

या सर्व त्रासदायक गोष्टींपासुन तुमचे संरक्षण करु शकेल अशा एका वेबसाईट बद्दल मी आज माहीती देणार आहे. या वेबसाईटचे नाव आहे prevurl.com. Prevurl म्हणजे प्रीव्ह्यु-युआरएल. प्रेव्हयुआरएल वापरुन कोणत्याही शॉर्टन्ड युआरएलचे मुळ रुप काय आहे ते पाहता येते एवढेच नव्हे तर युआरएल वर क्लिक न करता त्या पानाचा प्रीव्ह्यु पाहता येतो.


ही अतीशय सोपी वेबसाईट पुर्णतः मोफत आहे.

यापुढे कोणत्याही संशयास्पद वेबलिंकला क्लिक करण्याधी prevurl.com वर जाउन खात्री करुन घ्या आणि मग निश्चींतपणे इंटरनेट सर्फींगचा आनंद घ्या.





Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

September 22, 2009

The Shoe Laundry

[ MARATHI ].......


मागील आठवड्यात आपण प्रकाश मुंध्रा या युवकाने सुरु केलेल्या पुजा साहीत्याच्या अनोख्या व्यवसायाविषयी माहीती घेतली. अशाच एका जगावेगळ्या कल्पनेवर आधारीत एक आगळावेगळा बिझनेस मुंबईच्या एका तरुणाने सुरु केला. त्या तरुणाचे नाव आहे संदीप गजाकस. संदीपची ही अतीशय प्रेरणादायी कथा खास नेटभेटच्या वाचकांसाठी.

काय आहे संदीपचा आगळावेगळा बिझनेस? संदीप गजाकस या तरुणाचा व्यवसाय आहे अगदी साधा आणि सोपा, लाँड्रीचा ! होय संदीपने चालु केली आहे एक लाँड्री, पण साधीसुधी कपडयांची लाँड्री नव्हे तर SHOE LAUNDRY म्हणजेच बुटांची लाँड्री. काय, चमकलात ना ऐकुन?

अगदी चाकोरीबाहेरचा असला तरी संदीपचा हा व्यवसाय अगदी साधा आणि सोपा आहे. कोणाचे शुज धुऊन आणि साफ करुन एखादा फायदेशीर व्यवसाय उभा करता येइल याची कोणालाच कल्पना नव्हती. मात्र तरीही स्वत:च्या सेवींग्जमधुन काही पैसे जमा करुन संदीपने भारतातील पहीली शु लाँड्री सुरु केली.

मुंबईच्या मिठीबाई कॉलेजात शिकत असताना संदीपला प्रथम शु लाँड्रीची कल्पना आली. संदीपच्या कॉलेजमधील श्रीमंत घरातील मुले त्यांच्या बुटांविषयी अतीशय बेफीकीर होती. एकदा वापरुन झाल्यानंतर जरा खराब झालेले बुट ते फेकुन देत असत. तेव्हा संदेपने एका मित्राबरोबर लावलेल्या पैजेमधुन या कल्पनेचा उदय झाला. संदीपने केवळ पैजेखातर त्याच्या मित्राचे बुट अगदी नव्यासारखे चांगले करुन आणले. इतके चांगले की त्याच्या मित्राला ते त्याचेच शूज आहेत यावरच विश्वास बसला नाही. तेव्हाच संदीपला शू लाँड्रीची कल्पना आली.

मात्र पुढे कॉलेज संपल्यावर संदीपने चारचौघांसारखा नोकरीचा मार्ग पत्करला. फॅशन कोरीओग्राफर, इव्हेंट मॅनेजर, क्लब लेव्हल फुटबॉल प्लेयर आणि कॉल सेंटर असे अनेक जॉब्ज त्याने केले. कॉल सेंटर मध्ये जॉब करताना संदीपने ग्राहकांबरोबर बोलण्याचा चांगला अनुभव मीळवला. त्यानंतर अचानक संदीपला त्याच्या जुन्या कल्पनेची आठवण झाली आणि त्याने शु लाँड्री सुरु करण्याचा निश्चय केला. मात्र त्याच्या या बिझनेस आयडीयाबद्दल वडीलांना समजावणे काही त्याला शक्य झाले नाही.

कुणाच्याही पाठींब्याशिवाय संदीपने त्याचा व्यवसाय सुरु केला. त्याच्या बेडरुममध्येच त्याने वर्कशॉप थाटले. मित्रांच्या मदतीने छोटेसे मार्केटींग कँपेन केले. सुरुवातीला संदीपने स्वतःच मार्केटींग, क्लिनींग, डीलीव्हरी आणि बिलिंग या सर्व बाजु हाताळल्या. संदीप त्याच्या ग्राहकांना सांगत असे की आज डीलीव्हरी बॉय दुसर्‍या ठीकाणी गेला आहे त्यामुळे मी स्वतःच डीलीव्हरी घ्यायसाठी आलोय. संदीप म्हणतो खरेतर मला स्वतःला डीलीव्हरी करणे आवडते कारण आपले शुज अगदी नवे झालेले पाहुन ग्राहकांच्या चेहर्‍यावर खुलणारा आनंद पाहणे मला आवडते.

मुंबई मध्ये बुटांना खुप धुळ आणि खराब वातावरणाचा सामना करावा लागतो. त्यामुळे शु लाँड्रीची आवश्यकता आहेच. बुटांच्या एका जोडीच्या क्लीनींगचे संदीप १२० रुपये घेतो. यामध्ये ग्राहकाच्या घरुन बुट नेणे, त्यांची डागडुजी, साफसफाई, सुकवणे आणि परत ग्राहकांच्या घरी पोचवणे या सर्वांचा समावेश आहे. ऑफीसची जागा परवडत नाही म्हणुन संदीपने ग्राहकांच्या घरी पिक अप व डीलीव्हरी करण्यास सुरुवात केली.

शॉपर्स स्टॉपमधील एका कस्टमरने त्यांना संदीपच्या शु लाँड्रीबद्दल सांगीतल्यानंतर शॉपर्स स्टॉपने त्याला त्यांनी विकलेल्या बुटांची आफ्टर सेल्स सर्वीस म्हणजेच विक्री पश्चात सेवा पुरवण्याचे कंत्राट दीले. त्यानंतर संदीपने कधीच मागे वळून पाहीले नाही. आज अ‍ॅडीडास, रीबॉक, नायके अशा सर्व मोठ्या ब्रँड्सची मुंबईतील विक्री पश्चात सेवा संदीप सांभाळतो.

संदीपने सुरुवात केल्यानंतर या व्यवसायात आठ नविन स्पर्धक आले मात्र त्यांचा टीकाव लागु शकला नाही. या कमी मार्जीन बिझनेसमध्ये त्यांचा टीकाव लागणे कठीण होते. मात्र संदीपने खुप कौशल्याने त्याचा व्यवसाय वाढवत नेला. दररोज साधारण ५०-६० बुटांचे जोड संदीपकडे क्लीनींगसाठी येतात. आणि त्यांची क्लीनींग, दुरुस्ती व डीलीव्हरी करण्यासाठी संदीपकडे नऊ कामगार आहेत.

संदीपने त्याच्या डीलीव्हरी बॉयला एकाच गोष्टीकडे लक्ष द्यायला सांगीतले आहे, ते म्हणजे अगदी नविन दीसणारे बुट पाहुन ग्राहकाच्या चेहर्‍यावर खुलणारे आश्चर्यमिश्रीत हास्य !

Contact him at sandeep@ shoelaundry.com

Image source





Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

September 21, 2009

Find similar sites easily with Similarsites.com

[ MARATHI ].......

ईंटरनेट म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर आहे. तुम्ही फक्त विषय निवडा, त्या विषयाबद्दल माहीती देणार्‍या कित्येक वेबसाईट्स इंटरनेटवर अस्तीत्वात असतील. गरज आहे ते फक्त शोधण्याची.

ईंटरनेटवर शोधण्याची वेळ आली की गुगल काकांना पर्याय नाही. मात्र गुगलवर सर्च केल्यानंतर प्रत्येक वेळेस आलेले सर्व रीझल्ट्स त्या विषयावर आधरीत असतीलच असे नाही. फार फार तर पहिले २-३ रीझल्ट्स आपल्या शोधविषयाशी संबंधीत असतात. अशा वेळेस गुगल सर्च मधुन मिळालेल्या सर्वात योग्य साईटसारख्या साइट्स शोधाव्यात.

यालाच असोसीएटीव्ह ब्राउजिंग (associative browsing) असे म्हणतात. असोसिएटीव्ह ब्राउजिंगची सेवा देणार्‍या अनेक उत्तम वेबसाईट्स ईंटरनेट जगतात उपलब्ध आहेत. आज यापैकीच एका वेबसाईट्ची आपण माहीती करुन घेउ.

Similarsites.com

या साईटच्या नावावरुन आपण ओळखले असेलच की दीलेल्या वेबसाईटशी संबंधीत किंवा त्या वेबसाईटसारख्याच इतर वेबसाईट्स similarsites.com वर शोधता येतात.

उदाहरणार्थ जर तुम्ही युट्युब वरील व्हीडीओज पाहुन कंटाळला असाल (याची शक्यता खुपच कमी आहे!) तर similarsites.com वर जाउन युट्युब.कॉम सर्च करा. या विषयाशी संबंधीत युट्युब सारख्या १९ वेबसाईट्सची एक छान यादीच तुमच्यासमोर तयार होइल.

similarsites च्या अल्गोरीदम मधील काही दोषामुळे आलेले सर्वच रीझल्ट्स बरोबर असतातच असे नव्हे. मात्र साधरण ८०-९०% रीझल्ट्स हे दीलेल्या साईटसारखेच असतात. एवढेच नव्हे तर similarsites.com चे मॉझीला फायरफॉक्स ब्राउजरचे अ‍ॅड-ऑन देखील डाउनलोड करता येते. हे अ‍ॅड-ऑन ईंस्टॉल केल्यानंतर फायरफॉक्स ब्राउजरमध्ये एक बटण दाखवते. या बटणावर क्लिक करुन आपण पाहत असलेल्या वेबसाइटसारख्या इतर साइट्सची यादी पाहता येते.

http://www.netbhet.com/ असे similarsites.com वर सर्च केल्यानंतर मात्र नेटभेट्सारखी एकही वेबसाईट मिळाली नाही. म्हणजेच नेटभेटसारखी एकही साइट अस्तीत्वात नाही असे म्हणण्यास हरकत नाही :-)

similarsites.com चे अनेक फायदे आहेत. जर एखादी छान वेबसाईट तुम्हाला मिळाली परंतु ती साईट वापरण्यासाठी पैसे (PAID SITE) द्यावे लागत असतील तर लगेच similarsites वर जाउन त्या वेबसाईटसारख्या इतर साईट शोधाव्यात. कदाचीत तुम्ही पाहत असलेल्या विषयावर उपलब्ध असलेली मोफत वेबसाईट तुम्हाला मिळेल.

किंवा तुमचा ईंटरनेट बिझनेस असेल तर similarsites वर जाउन आपल्या वेबसाईटसारख्या साईट्सचा शोध घ्यावा. यावरुन तुम्हाला तुमच्या स्पर्धकांच्या साइट्सची माहीती मिळेल.

मग आजच भेट द्या similarsites.com ला आणि गुगलला थोडे बाजुला ठेऊन असोसीएटीव्ह ब्राउजिंगच्या (associative browsing) विश्वात प्रवेश करा.


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.


नेटभेटची वाचकांसाठी पुस्तक भेट !

नेटभेटचे सभासद व्हा (मोफत) आणि जिंका दोन मराठी पुस्तके - "प्रकाशवाटा" आणि "ईडली ऑर्कीड आणि मी"


नेटभेट सुरु करुन आता जवळपास सहा महीने उलटले आहेत. गेल्या सहा महिन्यात आम्ही सुमारे २१५ लेख नेटभेटवर लिहिले आणि १३० हुन अधिक कमेंट्स या ब्लॉगला मिळाल्या. मराठी जनतेला आपल्या भाषेत संगणकाची, इंटरनेटची आणि इतर उपयुक्त गोष्टींची माहीती व्हावी या उद्देशाने नेटभेट च्या लिखाणाला आम्ही सुरुवात केली.

वाचकांचा प्रतीसादामुळेच आम्हाला रोज नवनविन आणि उपयुक्त माहीती नेटभेटवर देण्याची स्फुर्ती मिळते. वाचकांच्या प्रेमामुळेच केवळ सहा महीन्यांच्या कालावधीत "नेटभेट"ला भेट देणार्‍या वाचकांची संख्या एक लाखाहुन अधिक झाली. दररोज सुमारे ५०० वाचक जगभरातुन नेटभेटचे वाचन करतात आणि त्यापैकी ५०% वाचक हे नेटभेटवर पुन्हा पुन्हा येणारे असतात.

आतापर्यंत १५८ मराठी वाचकांनी नेटभेटचे ईमेल सभासदत्व घेतले आहे. म्हणजेच नेटभेटवर प्रकाशित झालेला प्रत्येक लेख हा त्वरीत १५८ वाचकांपर्यंत ईमेल द्वारे पोहोचवला जातो. नियमीत वाचकांमुळेच आम्ही नेटभेट ब्लॉगद्वारे आतापर्यंत २० डॉलर्स (१००० रुपये) इतकी कमाई जाहीरातींद्वारा मिळवलेली आहे.

जाहीरातींद्वारे मिळालेली ही छोटीशी रक्कम मराठीच्या सेवेसाठी अर्पण करण्याचे आम्ही योजीले आहे.

वाचकांच्या प्रेमाचं रीटर्न गीफ्ट म्हणुन आम्ही नेटभेटच्या सभासदांना एक भेट देण्याचे ठरवीले आहे. २१ ऑक्टोबर २००९ म्हणजे बरोबर एक महीन्यानंतर नेटभेटच्या सर्व सभासदांमधुन दोन भाग्यवान विजेते निवडण्यात येणार आहेत.

पहील्या क्रमांकास श्रीयुत प्रकाश आमटे आणि सौ. मंदाकिनी आमटे यांचे "प्रकाशवाटा" हे पुस्तक व

दुसर्‍या क्रमांकास श्री विठ्ठल कामत यांचे "ईडली ऑर्कीड आणि मी" हे पुस्तक

नेटेभेटतर्फे भेट म्हणुन देण्यात येणार आहे.

मग वाचकहो, जर तुम्ही नेटभेटचे (मोफत) सभासदत्व अद्याप घेतले नसेल तर लगेचच येथे क्लिक करुन सभासदत्व घ्या किंवा खालील रकान्यात आपला ई-मेल पत्ता द्या आणि संभाव्य बक्षीसपात्र सभासदांच्या यादीत सामील व्हा.


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

September 20, 2009

Snake with foot found in China !

[ MARATHI ].......

चार्ल्स डार्वीन यांच्या मानवी उत्क्रांतीच्या सिद्धांताला दुजोरा देणारी एक घटना नुकताच चिन येथे घडली. सर्व प्राण्यांमध्ये आसपासच्या वातावरणाशी जुळवुन घेण्यासाठी आपोआप अनुकुलन होत जाते या सिद्धांताची प्रचिती घडवुन आणणारा एक सर्प नुकताच चिन येथे पाहण्यात आला.

या सर्पाला चक्क एक पाय होता. डुआन क्विआंझु (Duan Qiongxiu) नामक एका ६६ वर्षीय महीलेने या सापाला प्रथम तीच्या घरतील एका भिंतीवर सरपटताना पाहीले. मात्र दुर्दैवाने तीने त्याला मारुन टाकले.

चीनच्या वेस्ट नॉर्मल युनिवर्सीटी मधील लाइफ सायन्स विभागात सध्या या सर्पावर अधिक अभ्यास केला जात आहे.(Life Sciences Department at China's West Normal University )

पुर्वी सापांना पाय असायचे (ड्रॅगन) तेच जुने अंग अनुकुलनाच्या प्रक्रीयेत पुन्हा धारण करता येतात असे शास्त्रज्ञांचे मत आहे. चीन मध्ये सापडलेला साप ही सापांच्या अनुकुलनाची सुरुवात आहे असे देखील काही शास्त्रज्ञांचे मत आहे.

स्त्रोत - Telegraph




Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Gmail Tips - How to use "Labels" in Gmail ?

[ MARATHI ].......

जीमेल व्यतीरीक्त इतर सर्व वेब्-मेल सर्वीसेस आणि मायक्रोसॉफ्टच्या आउटलुक एक्स्प्रेस तसेच मायक्रोसॉफ्ट आउटलुक या इ-मेल मॅनेजमेंट सॉफ्टवेअर्स मध्ये "ई-मेल फोल्डर्स" बनवीण्याची सुविधा आहे.

ई-मेल फोल्डर्स म्हणजे एखाद्या विषयाशी किंवा व्यक्तीशी संबंधीत ई-मेल्सचे वगवेगळे फोल्डर्स बनवता येतात. उदाहरणार्थ जर "अ" व्यक्तीकडुन आलेल्या सर्व ई-मेल्स एकाच वेळी एकाच ठीकाणी पहायच्या असतील तर "अ" नावाचा एक फोल्डर बनवुन "अ" ने पाठवीलेल्या सर्व ई-मेल्स त्यामध्ये साठवता येतात. (Drag and drop) तसेच "अ" कडुन येणार्‍या सर्व ई-मेल्स आपोआप "अ" फोल्डरमध्ये पाठवील्या जातील अशी सोयही करता येते.

जीमेल मध्ये मात्र ही सुविधा नाही. पण जीमेलने फोल्डर्सच्या ऐवजी एक "लेबल्स" ची अधिक उपयुक्त सुविधा दीलेली आहे. आज आपण पाहुया जीमेलमध्ये लेबल्सची ही सुविधा कशी वापरावी ते.

जीमेलने अतीशय विचारपुर्वक लेबल्सची सोय पुरवीलेली आहे. असे करताना जीमेल डेव्हलपर्सनी फोल्डर्स वापरण्यातील उणीवांचा चांगला अभ्यास केला आणि त्यावर उत्तर म्हणुन लेबल्सचा पर्याय उपलब्ध करुन दीला.

फोल्डर्स वापरण्यातील मुख्य अडचणी -

एकदा ई-मेल एखाद्या फोल्डर मध्ये टाकली की मग ती ई-मेल Inbox मध्ये पुन्हा दीसत नाही. बर्‍याच दिवसांनी जेव्हा ई-मेल सोधावी लागते तेव्हा यामुळे खुप त्रास होतो.

एका ई-मेलला एका फोल्डर मध्येच टाकता येते. जर ई-मेल दोन किंवा अधिक फोल्डर्समध्ये टाकणे शक्य होत नाही.

जीमेल ने या अडचणींवर मात करण्यासाठी लेबल्सचा पर्याय शोधला. यामध्ये वरील दोनही अडचणींवर मात करता येते. ईमेलला फक्त लेबल लावण्यात येते मात्र ई-मेल Inbox मध्येच राहते तसेच एका ई-मेलला एकापेक्षा अधिक लेबल्स लावता येतात.

आता आपण पाहुया लेबल्स कसे वापरावे ते.

१. ज्या ईमेलसाठी लेबल बनवायचे आहे त्या ई-मेल समोरील चौकोनात क्लिक करा.

२. आता वर दीलेल्या मेनुमध्ये Label > Create New वर क्लिक करा.

३. लेबलला जे नाव द्यायचे आहे ते लिहा. आणि OK वर क्लिक करा.

आता तुम्ही ई-मेलला लेबल दीले आहे. Subject line म्हणजेच ईमेलच्या विषयासमोर हीरव्या रंगात लेबलचे नाव दीसेल. आणि डाव्या बाजुला लेबलचे नाव दीसेल. येथे क्लिक केल्यास ते लेबल असलेले सर्व ई-मेल मेसेज दीसतील.

लेबल्सची सुविधा वापरण्यात काही अडचणी येत असतील तर मला कळवा तसेच GMAIL ची ही टिप कशी वाटली ते सांगायला विसरु नका.





Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Google holiday logos

[ MARATHI ].......

गुगलच्या वेगवेगळ्या लोगोज बद्दल आपण नेटभेटवर बरीच चर्चा केली आहे. बालकलाकारांनी बनवलेले गुगल लोगोज आणि भारतीय विद्यार्थ्यांसाठी गुगलने आयोजीत केलेली गुगल डुडल ही लोगो डीझाइन करण्याची स्पर्धा या दोन लेखांनंतर आज आणखी एक छोटासा लेख गुगलच्या लोगोज बद्दल!

प्रत्येक दिवसाला काहीतरी विशेष महत्त्व असते. मदर्स डे, फादर्स डे, वॅलेंटाइन डे असे अनेक दिनविशेष आपण वेगवेगळ्या प्रकारे साजरे करतो. असे दिवस साजरे करण्याची गुगलकाकांची पद्धत काहीशी वेगळी आहे. गुगल अशा प्रत्येक दीवशी एक वेगळा लोगो डीझाइन करत असते.

गुगलच्या होमपेजवर प्रत्येक दिनविशेषानुसार लोगो डीझाइन केलेला आपण सर्वांनी पाहिला असेलच. गुगलम्ध्ये या सर्व लोगोजना हॉलीडे लोगो असे म्हणतात. १९९९ सालापासुन ते २००९ पर्यंत गुगलने प्रकाशित केलेले सर्व लोगोज तुम्ही येथे क्लिक करुन पाहु शकता. त्यापैकीच काही लोगो येथे देत आहे.

तसेच जगभरच्या गुगलच्या चाहत्यांनीही (माझ्यासारख्या !) गुगलसाठी अनेक लोगोज बनविले आहेत. गुगलनेही आपल्या चाहत्यांची ही भेट त्यांच्या ऑफीशिअल वेबसाईटवर अपलोड केली आहे. ती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

गुगलचा नववा वाढदिवस

टेलीफोनचा शोध लावणार्‍या ग्राहम बेल यांचा वाढदिवस
मानवाच्या उत्क्रांतीचा शोध लावणार्‍या चार्ल्स डार्वीन यांचा वाढदिवस
वॅलेंटाइन डे
वसुंधरा दिन (Earth Day)

पितृ दिन (Fathers day)
मातृ दिन (Mothers day)
नववर्ष दिवस २००९

नववर्ष दिवस २००7
चिन येथे नुकताच पार पडलेल्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी गुगलने तयार केलेले हे काही खास लोगो





Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Related Posts with Thumbnails