October 29, 2009

Awkward Family photos - Enjoy !


जुने फोटोग्राफ्स पाहणे हा माझा सर्वात आवडता छंद आहे. काही वर्षापुर्वी आपण, आपला परीवार, मित्रमंडळी कसे दीसायचो, कसे वागायचो, तेव्हाची फॅशन, कपडे, हेअरस्टाईल हे सारं सारं पाहण्यात एक वेगळीच मजा असते. काही फोटो तर इतके गमतीशीर असतात की पाहताना हसुन हसुन पोट दुखायला लागते.

लहानपणी अगदी एकमेकांसारखे कपडे घालुन फोटो काढायला, मिरवायला किती आवडायचं. पण आता तेच फोटो पाहुन "अरे! आपण असे होतो!" असा विचार मनात येतो. अशाच काहीशा "मजेशीर" फॅमीली फोटोंचं एक कलेक्शन इंटरनेटवर पाहण्यात आलं. एका छोटेखानी ब्लॉगवर जुने चित्र्-विचित्र फॅमीली फोटोज जमवले आहेत. या साईटचं नावही एकदम गमतीशीर आहे, Awkward family photos.

हे पहा, त्यातलेच काही "नमुने" !





Visit - http://awkwardfamilyphotos.com/




Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

अभिषेक आणि ऐश्वर्याचे मुल (असे दीसेल !)

काय? लेखाचं नाव वाचुन उत्सुकता चाळवली ना? नाही! नाही! मी काही "ब्रेकींग न्युज" वैगरे नाही देत आहे. मी आपला नेहमी प्रमाणेच एका मजेशीर वेबसाईटची माहीती देत आहे. :-)

याआधी आपण आपल्या फोटोजना वगवेगळे ईफेक्ट्स देणार्‍या फोटोफुनीया या एका मजेशीर वेबसाईटची माहीती घेतली होती. त्याच सारखी आणखी एक वेबसाईट म्हणजे मॉर्फथिंग (Morph Thing).

नावात लिहिल्याप्रमाणे ही वेबसाइट २ किंवा अधिक चेहर्‍यांची मॉर्फींग करुन एक तीसराच चेहरा बनवते. मॉर्फथिंग मध्ये स्वतःचा चेहरा एखाद्या सेलीब्रेटीच्या चेहर्‍यात मिसळुन तीसराच चेहरा बनवता येतो किंवा दोन सेलीब्रेटीजच्या चेहर्‍यांपासुन एक तीसरा चेहरा बनवता येतो.

एवढेच नव्हे तर तुम्ही बनवीलेला मॉर्फ्ड चेहरा वेबपेजवर, ब्लॉगवर किंवा फोरमवर दाखवण्याची सोयही येथे आहे. त्यासाठी नविन बनवलेल्या चेहरर्‍याचा embed code आणि URL दीली जाते.

मॉर्फथिंगला फार सीरीयसली घेउ नका. ही साईट म्हणजे केवळ एक गंमत आहे. फोटो अपलोड करा आणि काही क्लिक्समध्येच बघा कशी जादु होते ते !

मॉर्फथींगवर मी केलेल्या या काही करामती पहा :-)

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांचे मुल (मुलगा कि मुलगी ? ते तुम्हीच ठरवा !)

हीटलर आणि अल्बर्ट आईनस्टाईन यांची मॉर्फींग

हॉलीवुडचे सीनेस्टार स्कार्लेट जॉन्सन आणि ब्रॅड पीट यांचे मुल.

Visit - http://www.morphthing.com/















Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

October 28, 2009

Download Videos from Any Video Websites for FREE !

Youtubesnips च्या सहाय्याने युट्युब वरुन व्हीडीओ डाउनलोड कसे करायचे ते मी आपल्याला मागे एका लेखामध्ये सांगीतले होतेच. ईंटरनेट जगतामधील युट्युब ही सर्वात मोठी व्हीडीओ बेस्ड साईट असली तरी त्या व्यतीरीक्त इतरही अनेक उपयुक्त आणि चांगल्या व्हीडीओ वेबसाईट्स उपलब्ध आहेत. आजच्या या लेखामध्ये आपण अशा एका वेबसाईट बद्दल माहीती करुन घेणार आहोत ज्या साइटच्या मदतीने फक्त युट्युबच नव्हे तर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या कोणत्याही वेबसाईटवरुन व्हीडीओ डाउनलोड करता येतात. आणि ते देखील पुर्णपणे "चकटफु" (मोफत)

Youtube, facebook, metacafe, megavideo अशा एकाहुन एका सरस वेबसाईट वरुन मोफत व्हीडीओ डाउनलोड करुन देणार्‍या या वेबसाईटचे नाव आहे "क्लिपनॅबर clipnabber".

clipnabber कसे वापरावे?


  1. जो व्हीडीओ डाउनलोड करायचा आहे त्याची URL कॉपी करुन क्लिपनॅबरच्या होमपेजवर (बाण क्रमांक 1) चिकटवा.

  2. आणि Nab Video या बटणावर क्लिक करा. .

  3. काही क्षणातच तुम्ही दीलेल्या व्हीडीओची डाउनलोड लिंक प्रकट होइल.

  4. या लिंकवर (बाण क्रमांक २) राईट क्लिक करुन "Download linked file as" किंवा "Save link as" वर क्लिक करा.

  5. आता व्हीडीओचे डाउनलोड सुरु होइल.

Clipnabber ला भेट द्या - http://www.clipnabber.com/
क्लिपनॅबर अवश्य वापरुन पहा आणि कसे वाटले ते कळवण्यास विसरु नका.


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

October 26, 2009

Gmail Search Tips (search operators) - Part 2

[ MARATHI ]......

काल आपण जीमेल सर्चसाठी उपयुक्त असे काही सर्च ऑपरेटर्स पाहीले. आज या लेखाच्या दुसर्‍या भागात आपण आणखी काही सर्च ऑपरेटर्सची ओळख करुन घेउया.

ऑपरेटर - "filename:"

व्याख्या - ईमेल मधील अ‍ॅटॅचमेंट्चे नाव किंवा फाईल प्रकाराच्या आधारे ई-मेल शोधण्यासाठी filename: या ऑपरेटरचा वापर केला जातो.

उदाहरण १ - filename:salil.xls

स्पष्टीकरण - "salil.xls" या नावाची अटॅचमेंट फाइल असलेल्या ई-मेल्स शोधा.

उदाहरण २ - label:netbhet filename:pdf

स्पष्टीकरण - netbhet लेबल असलेल्या ई-मेल्स मधील PDF प्रकारची अटॅचमेंट फाइल असलेल्या ई-मेल्स शोधा.


ऑपरेटर - After: , before:

व्याख्या - दीलेल्या तारखेनंतर किंवा आधी आलेल्या ई-मेल्स शोधण्यासाठी After: , before: या ऑपरेटर्सचा वापर करतात (तारीख yyyy/mm/dd या फॉर्मॅटमध्ये असणे आवश्यक)उदाहरण - after:2008/04/15 before:2008/04/21

स्पष्टीकरण - 15 April 2008 ते 21 April 2008 या॑ दरम्यान आलेल्या ई-मेल्स शोधा.


ऑपरेटर - " " (quotes)

व्याख्या - एक विशीष्ट शब्द्समुह किंवा वाक्याशी तंतोतंत्त जुळणारा मजकुर असलेल्या इमेल्सचा शोध करण्याकरीता " " या ऑपरेटरचा वापर करतात.

उदाहरण १ - "Hi, welcome to netbhet"

स्पष्टीकरण - "Hi, welcome to netbhet" असे वाक्य असलेल्या सर्व ई-मेल्स शोधा


ऑपरेटर - in:inbox , in:trash , in:spam

व्याख्या - Inbox, Trash, आणि Spam या फोल्डरमधील ई-मेल्स शोधण्यासाठी in: या ऑपरेटरचा वापर करता येतो.

उदाहरण - in:trash from:salil

स्पष्टीकरण - सलिल कडून आलेल्या आणि Trash फोल्डरमध्ये असलेल्या ईमेल्स शोधा.


या ऑपरेटर्सचा वापर करुन अडगळीत पडलेल्या कोणत्याही जुन्या ई-मेलला शोधुन काढणे सोपे होइल. थँक यु गुगल अंकल !






Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

October 25, 2009

Gmail Search Tips (search operators) - Part 1

[ MARATHI ]......


जीमेलने नुकताच भारतीय ई-मेल सर्वीसेसमध्ये पहीला क्रमांक पटकावला हे मी मागील एका लेखामध्ये लिहीले होते. जीमेल आता इतकी अंगवळणी पडली आहे की दुसरी कोणतीही ई-मेल सर्वीस वापरावीशीच वाटत नाही. जीमेल मध्ये मिळणार्‍या अनेक सुविधा, भरपुर स्पेस, ई-मेल मध्येच चॅटींग करण्याची सुविधा अनेक गोष्टींमुळे जीमेल सर्वांचेच आवडते झाले आहे. साहजीकच आपले बरेचसे ईपत्र-व्यवहार (Email communications) जीमेलशिवाय पुर्ण होतच नाहीत. भरपुर ई-मेल्सने भरलेल्या आपल्या जीमेल अकाउंट मध्ये हवी असलेली नेमकीच इ-मेल कशी शोधावी याबद्दल आज आपण माहीती करुन घेउ.

गुगल काकांनी जीमेल मध्ये सर्च करण्यासाठी काही सर्च ऑपरेटर्स देउ केले आहेत. या सर्च ऑपरेटर्सच्या सहाय्याने जीमेल अकाउंट मधील कोणतीही ईमेल अगदी सहजगत्या शोधता येते.

ऑपरेटर - " from:"

व्याख्या - इमेल पाठवणार्‍या व्यक्तीच्या नावावरुन सर्च करायचे असल्यास from: हा ऑपरेटर वापरावा.

उदाहरण - from:salil

स्पष्टीकरण - सलिल कडुन आलेले सर्व मेसेज शोधा


ऑपरेटर - " to:"

व्याख्या - इमेल ज्या व्यक्तीला पाठवीलेली आहे त्या व्यक्तीच्या नावावरुन सर्च करायचे असल्यास to: हा ऑपरेटर वापरावा

उदाहरण - to:salil

स्पष्टीकरण - सलिलला पाठवीलेले सर्व मेसेज शोधा


ऑपरेटर -"subject:"

व्याख्या - इमेलच्या विषयामधील एखाद्या शब्दावरुन ईमेलचा शोध घ्यायचा असल्यास subject: हा ऑपरेटर वापरावा.

उदाहरण - subject:netbhet

स्पष्टीकरण - ज्या इमेलच्या विषयामध्ये "नेटभेट" हा शब्द आला आहे अशा इमेल्स शोधा


ऑपरेटर -"has:attachment"

व्याख्या - ज्या ईमेल्ससोबत अटॅचमेंट्स असतील अशा फाईल अशा फाईल्स शोधण्यासाठी has:attachment या ऑपरेटरचा वापर करता येतो.

उदाहरण - from:salil has:attachment

स्पष्टीकरण - सलिल कडून आलेल्या आणि फाइल्स अ‍ॅटॅचड असलेल्या ईमेल्स शोधा.


या ऑपरेटर्सचा वापर करुन अडगळीत पडलेल्या कोणत्याही जुन्या ई-मेलला शोधुन काढणे सोपे होइल. थँक यु गुगल अंकल !







Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

October 21, 2009

मराठी इ-मासिक "नेटभेट" प्रकाशित झाले !


NetBhet eMagzine - First ever eMagzine in Marathi !

मराठीतील स्र्वोत्कृष्ट ब्लॉगर्सचे सर्वोत्तम लेख आम्ही नेटभेट ई-मासिका द्वारे आपल्यापर्यंत आणले आहे. इमेलद्वारे हे मासिक जगभरातील मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. तुम्हाला ईमेल द्वारे हे पुस्तक मिळाले नसल्यास कृपया आम्हाला salil@netbhet.com वर आपला इमेल आयडी पाठवा.

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

"पुस्तक भेट" योजनेच्या भाग्यवान विजेत्यांचे अभिनंदन !

नेटभेटने वाचकांसाठी सुरु केलेल्या "पुस्तक भेट" योजनेला भरभरुन प्रतीसाद दील्याबद्दल वाचकांचे मनःपुर्वक आभार !

पुस्तक भेट योजना जाहीर केल्यापासुन गेल्या एका महीन्यात एकुण २८७ वाचकांनी नेटभेट चे सभासदत्व स्वीकारले. आता नेटभेट परीवाराचे एकुण ४४५ सभासद झाले आहेत.

त्यापैकी दोन भाग्यवान विजेते आम्ही लॉटरी पद्धतीने निवडले आहेत.

नेटभेटच्या या दोन भाग्यवान विजेत्यांचे इमेल पत्ते आहेत -


apmayekar@gmail.com - प्रकाशवाटा


jyoti0303@ymail.com - इडली, ऑर्कीड आणि मी

नोव्हेंबर महीन्यासाठी (आणि जमल्यास पुढे प्रत्येक महीन्यात !) नेटभेटच्या सर्व सभासदांकरीता आम्ही पुन्हा एकदा पुस्तकभेट योजना राबवत आहोत.

मात्र नोव्हेंबर महीन्यासाठी या योजनेत दोन छोटेसे बदल करत आहोत.


  • पुस्तकभेट योजने मध्ये कोणते पुस्तक हवे आहे हे सभासदांनी ठरवायचे आहे. बक्षीस मिळाल्यास सभासदांना कोणते पुस्तक हवे आहे हे त्यांनीच ठरवायचे आहे. त्यासाठी या लेखाच्या कमेंट्स मध्ये आपल्या इ-मेल पत्त्यासह पुस्तकाचे नाव सुचवावे.


      • पुस्तक मराठी भाषेतीलच असावे.

      • पुस्तक गेल्या दोन वर्षात प्रकाशीत/पुनर्प्रकाशीत झालेले असावे.

      • पुस्तकाची किंमत रुपये ५०० पेक्षा अधिक नसावी. :-)

  • या वेळेस दोन नव्हे तर एकुण पाच विजेते निवडण्यात येतील.


२१ नोव्हेंबर रोजी लकी ड्रॉ द्वारे विजेत्यांचे इमेल आयडी जाहीर करण्यात येतील. सर्व विजेत्यांना इमेलद्वारे कळवण्यात येइल.

फक्त आणि फक्त आमच्या मराठीप्रेमापोटी चालु केलेल्या या योजनेला आपण दीलेल्या प्रतीसादाबद्दल आम्ही शतशः आभारी आहोत.

मग वाचकहो, जर तुम्ही नेटभेटचे (मोफत) सभासदत्व अद्याप घेतले नसेल तर लगेचच येथे क्लिक करुन सभासदत्व घ्या किंवा खालील रकान्यात आपला ई-मेल पत्ता द्या आणि संभाव्य बक्षीसपात्र सभासदांच्या यादीत सामील व्हा.

नेटभेट टीमतर्फे विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन !

सलिल चौधरी व प्रणव जोशी.



Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

October 16, 2009

शुभ दीपावली !

शुभ दीपावली


नेटभेटच्या सर्व वाचकांना, शुभचिंतकांना आणि मराठी मातीवर मनापासुन प्रेम करणार्‍या प्रत्येक मावळ्याला दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा !

धन्यवाद,

सलिल चौधरी व प्रणव जोशी

October 13, 2009

Largest email service in India - Gmail !

[ MARATHI ].......

गेल्या महीन्यात लिहिलेल्या "गुगल दी ग्रेट" या लेखात आपण पाहीले होते की भारतामध्ये फक्त ई-मेलचं क्षेत्र वगळता सर्च, सोशल नेटवर्कींग , ब्लॉगींग, मॅप्स, आणि मल्टीमेडीया या क्षेत्रात गुगल अग्रभागी आहे. आणि तेव्हा लवकरच गुगल ई-मेल क्षेत्रातही याहुला मागे टाकेल असे मी म्हंटले होते. आणि झालेही अगदी तसेच. या महीन्यात गुगलने भारतातील सर्वात मोठी ई-मेल सेवा बनण्याचा पराक्रम केला आणि प्रतीस्पर्धी याहुला मागे टाकले.

वीझीसेन्स (ViziSense) या ऑनलाइन सर्वेक्षण करणार्‍या कंपनीने नुकताच गुगलची ईमेल सेवा म्हणजे जीमेल ही भारतातील सर्वात मोठी ईमेल पुरवीणारी सेवा असल्याचे जाहीर केले. भारतातील १८ दशलक्ष इतके जीमेल युसर्स मिळवणार्‍या गुगलने या क्षेत्रात जुना खेळाडु असलेल्या याहु मेल सर्वीसला मागे टाकले. याहुकडे १६.८ दशलक्ष इतके इमेल युजर्स आहेत. तर रेडीफमेल ६.२५ दशलक्ष ई-मेल युजर्ससह तीसर्‍या क्रमांकावर आहे.

जीमेलचे युजर्स सरासरी ३ % दराने वाढत आहेत तर याहुचे युजर्स सरासरी ८ % दराने कमी होत आहेत. याच आपल्या जुन्या वापरकर्त्यांना पुन्हा आकर्षीत करण्यासाठी याहुने "It's You !" हे नविन मार्केटींग कँपेन चालु केले आहे. यामध्ये त्यांनी टीव्ही आणि वर्तमानपत्रांतील जाहीरातींचा वापर केला आहे.


याहु, रेडीफमेल आणि मायक्रोसॉफ्टचे विंडोज लाइव्ह मेल या ईमेल सेवांना आता निश्चीतच काही भक्कम पावले उचलावी लागतील अन्यथा जीमेल लवकरच या सर्वांना पुर्णपणे झाकोळुन टाकेल यात शंकाच नाही.


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

October 08, 2009

ऑफलाइन भारतासाठी ऑनलाईन सेवा - Question Box!

[ ENGLISH/ MARATHI ].......


इंटरनेटवर जगातील सर्व ज्ञान लपले आहे यात शंका नाही. काहीही माहीती हवी असली तरी इंटरनेटवर ती मिळतेच. परंतु आज काही मोजकी शहरे सोडता भारतातील किती शहरांमध्ये/ गावांमध्ये इंटरनेट पोहोचलय? या अगाध ज्ञानापासुन भारतातील बहुतांशी जनता वंचीत राहीली आहे. यालाच "डीजीटल डीव्हाइड" असे म्हंटले जाते. जात्-पात, स्त्री-पुरुष, गरीब्-श्रीमंत या भेदभावांपासुन सतत लढणार्‍या आपल्या देशांत इंटरनेट किंवा संगणक वापरु शकणारे आणि न वापरणारे यांतील दरी खुप मोठी आहे्ई वाढती दरी म्हणजेच डीजीटल डीव्हाइड.

कधीच ऑनलाइन न येउ शकलेल्या लोकांसाठी (खरंतर "ऑनलाईन" हा शब्द पण त्यांना माहीत नसेल !) USA मधील Open Mind या समाजसेवी संस्थेने एक अभिनव उपक्रम सुरु केला आहे आणि तो देखील महाराष्ट्रात. या उपक्रमाचे नाव आहे "Question box - प्रश्नोत्तरंग"



इंटरनेटचं महाज्ञान सदैव ऑफलाइन असलेल्या एका मोठ्या वर्गापर्यंत पोहोचवण्याचं काम Question box करणार आहे. Question box म्हणजे सौरउर्जेवर चालणारा एक टेलीफोन आहे. या टेलीफोनवर कोणतेही आकडे नसुन फक्त एक हीरव्या रंगाचे बटण आहे. हे बटण दाबताच वापरकर्ता दुसर्‍या टोकाला एका ऑपरेटरशी संपर्क साधु शकतो. हा ऑपरेटर सतत ऑनलाईन असतो त्याचप्रमाणे ऑपरेटरकडे स्थायी माहीती असलेला एक डाटाबेस देखील असेल. Question box च्या माध्यमातुन वापरकर्ते कोणत्याही विषयाबद्दलचे त्यांचे प्रश्न विचारु शकतील आणि पलीकडील ऑपरेटर्स इंटरनेटवरुन उत्तरे शोधुन स्थानिक भाषेंमध्ये समजावुन सांगतील.

नागरीक महत्त्वाचे प्रश्न, सुचना, बातम्या विचारु शकतात, शेतकर्‍यांना बाजारभाव, हवामान यांचा अंदाज घेता येउ शकतो विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणीक अडचणी सोडवता येउ शकतात. या Question box ची उपयुक्तता खरंच वाखाणण्याजोगी आहे.

ही सुविधा पुर्णपणे मोफत असणार आहे. ही मोफत सुविधा गरीब आणि ग्रामीण जनतेला अतीशय महत्त्वाच्या माहीतीशी जोडु शकेल. माहीतीच्या युगाची खरी ताकद खर्‍या भारताला उमगु लागेल आणि खर्‍या अर्थाने भारत महासत्ता बनु शकेल.

अधिक माहीतीसाठी भेट द्या - http://www.questionbox.org/



Question Box is Open Mind’s initiative to bring information to people the way they want to receive it. All Question Box projects are tailored to match the needs of the locations they operate in.

Question Box's backend software logs all call data and indexes operators previous queries and answers, allowing it to get smarter over time. It uses a specialized local databases or 'off-line internet' solution allowing it to work in any situation, whether it's on or offline, powered or using backup generators. The database is customized with information relevant to the location we happen to be working in at the time. Although, some answers are universal this makes sense, as most of the questions asked have to be understood in the context of their locale (ex. "What is the price of grain?" could be asked in Pune or in Kampala. Each require different answers.)

Question Box uses call boxes to connect people on the street to live Internet information service. Here, the Question Box is a simple telephone intercom which requires no literacy or computer skills. Users place a free call by pushing the green button. They connect to an Operator sitting in front of a computer with internet acess. Users ask the operator questions in their local language. The operator goes online and finds their answers, translating English results back into the local language. The physical Question Box units have gone through several design cycles. They now can run completely off the grid, using mobile phone and solar technologies.

For more information visit - http://www.questionbox.org/



Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

October 06, 2009

Google Project 10^100

[ MARATHI ].......


गेल्या महीन्यात २६ तारखेला म्हणजेच २६ सप्टेंबर २००९ रोजी गुगलचा ११ वा वाढदीवस होता. (वेळेअभावी नेटभेटवर याबद्दल लिहिता आले नाहे, क्षमस्व !) एवढ्या कमी वेळात जगातील सर्वात प्रभावशाली ब्रँड म्हणुन गुगलने नाव कमवीले आहे. इंटरनेटच्या माध्यमाद्वारे जगातील एकुण सर्व ज्ञान सर्वांनाच उपलब्ध करुन देणार्‍या गुगलने पृथ्वीतलावरील प्रत्येक मानवाला प्रभावीत केले आहे याबद्दल शंका नाही.

गेल्यावर्षी म्हणजे १० व्या वाढदीवसाला गुगलने एक अभिनव योजना जाहीर केली होती. या योजनेचे नाव होते प्रोजेक्ट Project 10^100 . या प्रोजेक्ट अंतर्गत गुगलने जगातील जास्तीत जास्त माणसांचे जीवनमान सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा आयडीआज मागवील्या होत्या. या आयडीयाज पैकी सर्वोत्कृष्ट ५ आयडीयाज निवडुन त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी गुगल १० मिलियन डॉलर्स इतका निधी (10^100 ) उपलब्ध करुन देणार आहे.


या आयडीयाज लहान असो वा मोठ्या, तंत्रज्ञानावर आधारीत असो वा अगदी साध्या स्वरुपाच्या असोत, गुगलची एकच अट होती की जास्तीत जास्त गरजुंना प्रभावीत करणारी कल्पनाच निवडल्या जातील. कल्पना सुचविण्यासाठी गुगलने काही मुख्य प्रकार दीले होते -

  • Community: How can we help connect people, build communities and protect unique cultures?

  • Opportunity: How can we help people better provide for themselves and their families?

  • Energy: How can we help move the world toward safe, clean, inexpensive energy?

  • Environment: How can we help promote a cleaner and more sustainable global ecosystem?

  • Health: How can we help individuals lead longer, healthier lives?

  • Education: How can we help more people get more access to better education?

  • Shelter: How can we help ensure that everyone has a safe place to live?

  • Everything else: Sometimes the best ideas don't fit into any category at all.


नुकताच गुगलने यापैकी १६ सर्वश्रेष्ठ कल्पना निवडुन वाचकांच्या मतांसाठी उपलब्ध केल्या आहेत. वाचकांची मते आणि गुगलच्या एक्सपर्ट्सचे एक पॅनल मिळुन यांपैकी ५ सर्वश्रेष्ठ कल्पना निवडणार आहेत. आणि पुढे गुगल या ५ कल्पना प्रत्यक्षात आणणार आहे.

या सर्व कल्पना आपण http://www.project10tothe100.com/vote.html येथे पाहु शकता तसेच तुम्हाला आवडलेल्या कल्पनेला आपले मतही देउ शकता.

गुगलने निवडलेल्या १६ सर्वश्रेष्ठ कल्पनांचे थोडक्यात विवरण -

१. Help social entrepreneurs drive change - (सोशल आंत्रेप्रेन्युअरशिप) समाजोपयोगी उद्योजगतेला चालना देणे. -

गावागावातील लहान उद्योजकांना ना नफा ना तोटा तत्त्वावर भांडवल उपलब्ध करुन देउन त्यांना एकुणच समाजास उपयोग होइल अशा उद्योगधंद्यांसाठी प्रेरीत करणे.

२. Make government more transparent - शासनव्यवहारात जास्तीत पारदर्शकता आणणे -

शासननिधीचा वापर कसा केला जातो याबद्दलची माहीती , वेगवेगळ्या कायदे व नियमांचे सवीस्तर व सोप्या भाषेत विवरण नागरीकांना उपलब्ध करुन देणे. निवडणुकीस उभ्या राहीलेल्या उमेदवारांनी केलेले काम आणि त्यांच्याबद्दलची माहीती मतदारांना उपलब्ध करुन देणे इत्यादी.

३. Provide quality education to African students - अफ्रीकेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देणे.

४. Create real-time natural crisis tracking system - भुकंप, त्सुनामी, वादळ, ज्वालामुखी, पुर अशा सर्व नैसर्गीक संकंटांची अगाउ सुचना देणारी यंत्रणा जगभर उभारणे. तसेच आपत्तीग्रस्त भागांमध्ये टेहाळणी आणि शोधकार्यासाठी मानवरहीत विमाने पुरवीणे.

५. Work toward socially conscious tax policies - इंकम टॅक्सऐवजी वॅट आकारणे, जनतेने समाजकार्यासाठी वापरलेल्या निधीसाठी टॅक्समध्ये सुट देणे.

६. Build better banking tools for everyone - मोबाइल बँकींगचा विस्तार, गावोगावी ईलेक्ट्रॉनीक बँकींगची सुविधा पुरवीणे आणि वर्ल्ड बँकेसारख्या एकाच बँकेच्या अधीपत्याखाली जगातील सर्व बँक्स आणुन समान बँकींग नियम व कायदे लागु करणे.

७. Collect and organize the world's urban data - एक अशी वेबसाईट बनवीणे ज्यामध्ये जगभरातील सर्व नागरीक आपापल्या भागांतील घडामोडी, तक्रारी, सुचना नोंदवु शकतात. त्याचप्रमाणे प्रमुख शहरांमध्ये चालु असलेल्या सर्व विकासकामांचा आढावा घेणे आणि तो या वेबसाईटवर उपलब्ध करुन देणे. काही मोक्याच्या जागांवर कॅमेरे लावुन शहरांची/नगरांची होणारी प्रगती फोटोंद्वारे नोंदवणे.

८. Encourage positive media depictions of engineers and scientists - विज्ञान व तंत्रज्ञान विषयांमधील सर्व ज्ञान एका मोठ्या ऑनलाईन लायब्ररीद्वारे एकत्र आणणे आणि मोफत सर्वांसाठी उपलब्ध करुन देणे.

९. Promote health monitoring and data analysis - ब्रेसलेटप्रमाणे हातावर बसणारे एक यंत्र जे व्यक्तीचे तापमान, रक्तदाब आणि हृदयाचे ठोके मोजेल आणि हा सर्व डेटा आपोआप नेमुन दीलेल्या व्यक्तीकडे (डॉक्टर किंवा कुटुंबीय) पोहोचवेल, असे यंत्र बनवीणे व सर्वत्र उपलब्ध करुन देणे.

१०. Enhance science and engineering education - रोबोटीक्स विषयाला चालना देणे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संगणक, रोबोटीक्स लॅब्ज, ईंटरनेट उपलब्ध करुन देणे. गणित व विज्ञान या विषयांशी संबंधीत इलेक्ट्रॉनीक खेळ (गेम्स) बनवीणे.

११. Create real-world issue reporting system - जगातील कोणत्याही भागातील नागरीकांच्या सर्व तक्रारी वेळेवर संबंधीतांपर्यंत पोहोचवल्या जाव्यात यासाठी यंत्रणा उभारणे.

१२. Create genocide monitoring and alert system - तंत्रज्ञानाचा वापर करुन दहशतवाद/आतंकवादास खीळ घालणे. मोबाइल कॅमेरे, जीपीआरएस यांचा वापर करुन आतंकवादपीडीत नागरीकांना मदत करणे.

१३. Build real-time, user-reported news service - रीअल टाइम न्युज म्हणजेच जगात कोठेही कधीही घडलेली बातमी त्वरीत इंटरनेटच्या सहाय्याने जगभर पोहोचवणे. यासाठी घटनास्थळी हजर असणार्‍या व्यक्तींच्या मदतीने लगेचच बातमी सर्वत्र पोहोचवण्याचे तंत्रज्ञान विकसीत केले जाइल.

१४. Drive innovation in public transport - इलेक्ट्रीक रेलवे सीस्टम सर्वत्र उपलब्ध करुन देणे, सायकल चालवण्यासाठी सर्वांना प्रवृत्त करणे, मीथेनॉल फ्युएल सेल्स किंवा हायड्रोजन वर चालणार्‍या इलेक्ट्रीकल सायकल्स बनविणे

१५. Make educational content available online for free - प्रत्येक शाळेय पुस्तक आणि माहीती इंटरनेटवर मोफत उपलब्ध करुन देणे, जगभरातील सर्वोत्कृष्ठ शाळांचे लेक्चर्स ऑनलाईन उपलब्ध करुन देणे.

१६. Create more efficient landmine removal programs - जगभरात ७० देशांमध्ये अद्याप ११० दशलक्ष जिवंत सुरुंग दडलेली आहेत. (हे वाचुन आश्चर्याचा धक्का बसला) आणि या सुरुंगांमुळे होणारी जीवीतहानी दरवर्षी सुमारे ५००० च्या घरात जाते. असे लपलेले सुरुंग शोधुन ते निकामी करण्यासाठी रोबोटीक माइन डीटेक्टर बनविणे.

गुगल यापैकी ५ सर्वश्रेष्ठ कल्पना निवडुन त्यावर काम करणार आहे. थोडक्यात गुगलकाका जगाचा उद्धार करायला तयार झाले आहेत. वरील सर्व कल्पना मुद्दाम मराठीत येथे लिहिल्या कारण आपण सर्वांनीच यांपैकी सर्वोत्कृष्ठ कल्पना निवडण्यासाठी आपले मत नोंदवावे अशी माझी इच्छा आहे. स्वतःची तुंबडी भरणार्‍या स्वार्थी नेत्यांना मतदान करण्यापेक्षा किंवा (खोट्या) रीअ‍ॅलीटी शोमधल्या सेलीब्रेटीजना मत देण्यापेक्षा गुगलने आरंभलेल्या या प्रकल्पात मत नोंदवणे केव्हाही चांगलेच !

भेट द्या - http://www.project10tothe100.com/index.html



Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

October 04, 2009

"How to videos" directory - Wonderhowto.com

[ ENGLISH/ MARATHI ].......

असं म्हणतात, एक चित्र किंवा फोटो हजार शब्दांपेक्षा जास्त बोलकं असतं. भाषा/शब्द या मानवनिर्मीत गोष्टींपेक्षा देवाने मानवाला (आणि इतर सर्व प्राण्यांना) दीलेली दृष्टी आणि श्रवणकला निश्चीतच श्रेष्ठ आहेत. म्हणुनच टीव्हीवर ऐकलेलं गाणं हे दहावेळा वाचलेल्या कवीतेपेक्षा जास्त चांगलं लक्षात राहते.

इंटरनेटवरही एखाद्या विषयाची माहीती मिळवताना इतरत्र वाचण्यापेक्षा त्या विषयाशी संबंधीत व्हीडीओ युट्युबवर पहायला आपल्याला जास्त आवडतं. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेउन एक वेब साईट बनविण्यात आली आहे. या साईटचे नाव आहे wonderhowto.com (वंडरहाउटु.कॉम)



हाऊटु व्हीडीओज म्हणजे विविध गोष्टी, कामे कशी करावीत याचे स्पष्टीकरण देणारे छोटेखानी व्हीडीओज. वंडरहाऊटु.कॉम मध्ये अशा प्रकारचे ९०००० हुन अधिक हाऊटु व्हीडीओज समाविष्ट आहेत. ही वेबसाईट म्हणजे अशा अनेक उपयुक्त व्हीडीओजची डीरेक्टरी किंवा सर्च इंजिन आहे. इंटरनेटवरच्या १९०० वेबसाइट्सवरील उपयुक्त व्हीडीओज वंडरहाउटु.कॉम मध्ये पहायला मिळतात.

इथे सर्व व्हीडीओज ३५ वेगवेगळ्या विषयांनुसार मांडलेले आहेत. एवढेच नव्हे तर ४२४ उपविषयांमध्ये त्यांची विभागणी करण्यात आलेली आहे. युट्युबप्रमाणेच या वेबसाईटवर व्हीडीओज सर्च करता येतात.

वंडरहाउटु.कॉम कम्युनीटी साईट आहे, म्हणजेच या साईटला भेट देणारे वाचक (इथे खरेतर प्रेक्षक म्हंटले पाहिजे !) विविध विषयांवर माहीती देणारे व्हीडीओज अपलोड करु शकतात.

आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही साईट पुर्णपणे मोफत आहे.

या चालत्याबोलत्या गुरुला अवश्य भेट द्या - http://www.wonderhowto.com/ आणि साईट कशी वाटली ते सांगायला विसरु नका !




WonderHowTo.com is a community-fueled, search engine and directory for Free How-To Video. With an index of more than 225,000 videos (October 2008), we provide the largest, most contemporary, and most diverse resource in this increasingly vibrant space.

As of launch, WonderHowTo provides content from more than 1900 specialized sites spanning 35 vertical categories and 424 sub-categories.

WonderHowTo provides an impressive directory of How-To Videos. It’s comprehensive, easy to use, and lets you have access to a bevy of videos without having to shop around.

Visit - http://www.wonderhowto.com/



Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

October 02, 2009

How to calculate age in excel?

[ MARATHI ].......


मित्रहो, आज आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये "Age Calculation" म्हणजेच वय मोजण्यासाठी उपयुक्त ठरणारे फंक्शन पाहणार आहोत. या फंक्शनचे नाव आहे डेटेडईफ (DATEDIF). एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख माहीत असल्यास आजच्या दीवशी किंवा दीलेल्या कोणत्याही दिवसापर्यंत त्या व्यक्तीचे वय मोजण्यासाठी DATEDIF फंक्शन वापरतात.

DATEDIF फंक्शन कसे वापरावे?

खालील उदाहरणावरुन आपण "DATEDIF" हे फंक्शन समजावुन घेऊया. D2 या सेलमध्ये २५ जुलै १९८२ ही एका व्यक्तीची जन्मतारीख लिहिलेली आहे. या तारखेमध्ये आणि आजच्या तारखेमध्ये असलेला फरक म्हणजे त्या व्यक्तीचे वय.

या दोन तारखांमध्ये एकुण किती वर्षे, महीने आणि दिवस उलटले आहेत ते आपण "DATEDIF" फंक्शनच्या सहाय्याने पाहुया.


त्याचप्रमाणे २७ वर्षे २ महीने ६ दिवस असे एका सेल मध्ये देखील लिहिता येते.
त्त्यासाठी खालील फॉर्म्युला वापरावा.


एक्सेल मधील हा फॉर्म्युला वापरुन कोणत्याही दोन तारखांमधील एकुण वर्षे, एकुण महीने किंवा एकुण दीवस देखील मोजता येतात. वर दीलेले फॉर्मले लक्षपुर्वक पाहील्यास ym किंवा md असे लिहिलेले आढळेल. याऐवजी फक्त "Y" किंवा "D" असे लिहिल्यास एकुण महीने आणि एकुण दीवस मोजता येतील.


बापरे , याचा अर्थ मी आतापर्यंत ४००६० दिवस वाया घालवले म्हणायचे ! तरीदेखील अजुन काहीच "Achievement" नाही :-(


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Related Posts with Thumbnails