List of Best Marathi Websites - Netbhet web directory


मराठी ब्लॉगकट्टयाच्या माध्यमातुन आम्ही १२०० मराठी ब्लॉग्जची माहिती एकत्र केली व त्यानंतर इंटरनेटवर विखुरलेल्या मराठी ई-पुस्तकांचे एकत्रीकरण आम्ही नेटभेट ई-पुस्तके या साईटमध्ये केले. एकुणच इंटरनेटवर मराठी भाषेत निर्माण होणारे साहित्य नेटभेटच्या वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न असतो.
यामागचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. ई-मराठीच्या या चळवळीत जास्तीत जास्त मराठी बांधवांचा समावेश व्हावा, मराठी मध्ये विविध विषयांवरील सकस लेखन वाढावे यासाठी जास्तीत जास्त लोकांनी ब्लॉग्ज लिहावेत किंवा संकेतस्थळे चालवावीत, इंटरनेटवर मराठीचे अस्तीत्व प्रकर्षाने जाणवेल इतका ऑनलाईन मराठी वाचक व लेखकांचा टक्का वाढावा आणि जे बांधव यापुर्वीच या कामात गुंतले आहेत त्यांना जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचविणे या उद्देशाने आमचे प्रयत्न चालु असतात. याच उद्देशांतर्गत आम्ही वाचकांसाठी इंटरनेटवर मराठीचे प्रयत्नपुर्वक प्रतिनिधीत्व करणार्‍या संकेतस्थळांची यादी घेऊन आलो आहोत. याला आपण एक छोटेखानी वेब डीरेक्टरीच म्हणुयात. सध्याजरी या यादीतील संकेतस्थळांची संख्या १२२ इतकीच असली तरी मला खात्री आहे की येत्या काही वर्षांत ही यादी हजारो माहितीपुर्ण मराठी संकेतस्थळांनी सजलेली असेल.

नेटभेट वेब डीरेक्टरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

कोणत्याही संकेतस्थळाचा या यादीत समावेश करण्यापुर्वी एकच निकष लावण्यात आला आहे तो म्हणजे "मराठी भाषा". मराठीशी संबंधीत विषयांवरील इंग्रजी संकेतस्थळांचा समावेश यामध्ये टाळण्यात आला असून फक्त आणि फक्त मराठी भाषेमध्ये लिहिल्या गेलेल्या संकेतस्थळांनाच या यादीत जागा देण्यात आलेली आहे. या यादीत काही मराठी संकेतस्थळांचे नाव देण्याचे राहिले असल्यास कृपया आमच्या निदर्शनास आणुन द्यावे अशी वाचकांना आणि संकेतस्थळाच्या संचालकांना नम्र विनंती. सध्या ही यादी अगदी प्राथमिक स्वरुपात उपलब्ध असून लवकरच विषयवार मांडणी करुन ही यादी पुनर्प्रकाशित करण्याचा आमचा मानस आहे. नेटभेटची ही वेब डिरेक्टरी अधिक प्रगल्भ आणि उपयुक्त होण्यास मदत व्हावी यासाठी वाचकांच्या प्रतीक्रीया आणि अभिप्रायांची आम्हांस अत्यंत गरज आहे. ही वेब यादी आपल्याला नक्की आवडेल याची आम्हांला खात्री आहे.


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Comments are closed.


Related Posts Plugin for WordPress, Blogger...