February 26, 2010

"मराठी भाषा दिवस" स्पर्धा (२७ फेब्रुवारी २०१०)














"लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी"


मित्रांनो, आपल्या अद्वीतीय प्रतीभाशक्तीने मराठी साहित्याला एका वेगळ्याच उंचीवर नेणार्‍या कविश्रेष्ठ श्री. वि. वा. शिरवाडकर म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिन. असा प्रतीभाशाली कवी महाराष्ट्राला, मराठी भाषेला लाभला म्हणुनच आजचा दिवस म्हणजे २७ फेब्रुवारी "जागतीक मराठी भाषा दिवस" म्हणुन साजरा केला जातो.

मराठीचा उत्कर्ष या एकमेव ध्येयाने पछाडलेल्या अनेक मराठी बांधवांनी यंदा "मराठी दिवस" आपापल्या परीने साजरा करायचे ठरवले आहे. "आपली भाषा आणि आपल्या भाषेतुन ज्ञानप्रसार" हे उद्दीष्ट समोर ठेवुन कार्यरत असणार्‍या नेटभेट.कॉम आणि नचिकेत प्रकाशन (नागपूर) यांनी मिळुन नेटभेटच्या वाचकांसोबत "मराठी भाषा दिवस" साजरा करण्याचे योजीले आहे.

जास्तीत जास्त मराठी वाचले, बोलले गेले पाहिजे आणि त्याचसाठी जास्तीत जास्त मराठी लिहिले गेले पाहिजे असे आमचे ठाम मत आहे. इंग्रजाळलेल्या समाजात वावरताना मराठी मुलांमध्ये असणारा न्युनगंड दूर व्हावा आणि त्यांनी आत्मविश्वासाने जगाला सामोरे जावे यासाठी आम्ही आमच्या परीने जास्तीत जास्त ज्ञान प्रसार मराठीतुन करत असतो.

हेच उद्दीष्ट समोर ठेवुन आम्ही मराठी वाचकांसाठी आणि मराठी ब्लॉगर्ससाठी एक स्पर्धा आयोजीत करत आहोत.

वाचकांसाठीची स्पर्धा -

"मला भावलेले मराठी व्यक्तीमत्व" असे या स्पर्धेचे नाव आहे. यामध्ये वाचकांनी "मला भावलेले मराठी व्यक्तीमत्व" या विषयावर लेख लिहुन आम्हाला पाठवायचे आहेत. या लेखांचे परीक्षण नचिकेत प्रकाशनाचे श्री. अनिल सांबरे करतील. विजेत्यांना पारितोषिके देखील नचिकेत प्रकाशनातर्फेच वितरीत केली जातील. 

स्पर्धेची रुपरेखा :

  • 'मला भावलेले मराठी व्यक्तिमत्व' या विषयात तुम्ही कुठल्याही मराठी व्यक्तिबद्द्ल लेख लिहू शकता. अगदी लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर सारख्या ख्यातनाम व्यक्तिंपासुन तुमच्या परिचयात असलेल्या मात्र प्रसिद्ध नसलेल्या एखाद्या व्यक्तिपर्यंत कोणाविषयीही लेख लिहु शकता.
  • लेख जास्तीत जास्त १००० शब्दांपर्यंत मर्यादीत असावा.
  • लेख स्विकारण्याची अंतीम मुदत १५ मार्च २०१० असेल. यानंतर मिळालेले लेख स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • 'मला भावलेले मराठी व्यक्तिमत्व' या विषयाबाहेरील लेख अपात्र ठरतील.
  • लेख मराठी भाषेतच असावा. ईतर भाषेतील लेख अपात्र ठरतील.
  • तुम्ही लिहिलेले लेख १५ मार्च पर्यंत  admin@netbhet.com वर मेल करू शकता. या ईमेलचे शिर्षक ( 'Subject Line')  'मला भावलेले मराठी व्यक्तिमत्व'  असे असावे. लेख १५ मार्चपर्यंत खालील पत्त्यावरही पाठवू शकता. पत्ता आहे:  
प्रणव जोशी, ४९४, विनित अपार्टमेंट,  साई सेक्शन,अंबरनाथ (पूर्व) - ४२१५०१.
  • विजेत्यांना बक्षिसे घरपोच मिळण्यासाठी आपली पुर्ण माहिती (पत्ता, दुरध्वनी क्रमांक ई.) लेखासोबत कळवावे.
  • विजेत्यांना मिळणार्‍या बक्षिसांचे स्वरूप : 
प्रथम क्रमांक -  नचिकेत प्रकाशन तर्फे ३ पुस्तकांचा संच ( नेत्रुत्वासाठी प्रभावी व्यक्तिमत्व , स्वप्न संकेत , चाणक्य सुत्रे )                             
द्वितीय क्रमांक -  नचिकेत प्रकाशन तर्फे २ पुस्तकांचा संच ( नेत्रुत्वासाठी प्रभावी व्यक्तिमत्व , चाणक्य सुत्रे
तृतीय क्रमांक -  नचिकेत प्रकाशन तर्फे १ पुस्तक ( नेत्रुत्वासाठी प्रभावी व्यक्तिमत्व )
  • प्रथम तीन विजेत्यांचे लेख नेटभेटवर प्रकाशित केले जातील.
  • लेखाची मांडणी, निवडलेले व्यक्तीमत्व, शुद्ध भाषा आणि व्याकरण, लेखाद्वारे साधला गेलेला एकुण परीणाम या निकषांवर लेखाचे परीक्षण करण्यात येईल.

ब्लॉगर्ससाठीची स्पर्धा -
  • मराठी ब्लॉगर्स आधीपासुनच सकस मराठी लेखांद्वारे मायमराठीची सेवा करत आहेतच. त्यामुळे ब्लॉगर्ससाठी वेगळी कोणतीही स्पर्धा न घेता मराठी ब्लॉगकट्ट्यावरीलसभासदांपैकी दोन भाग्यवान विजेत्यांना पारीतोषिक देण्यात येणार आहे.
  • मराठी ब्लॉगकट्याचे सभासदत्व घेण्यासाठी येथे क्लिक करुन आपल्या ब्लॉगची  माहिती आम्हांस द्या.



    • प्रथम पारितोषिक - निवडलेल्या भाग्यवान मराठी ब्लॉगला नेटभेट तर्फे स्वतःचे डोमेन नेम (domain name ) आणि स्वतःच्या डोमेनवरील ईमेल पत्ता मिळवुन देण्यात येईल. यासाठी ब्लॉगचे डोमेन नेम ब्लॉगरने स्वतः निवडायचे आहे.     ( निवडलेले डोमेन नेम याआधी कोणीही विकत घेतलेले नसावे  किंवा पुनर्विक्रीस (Resale) उपलब्ध नसावे. सदर डोमेन नेम फक्त पहिल्या वर्षासाठी नेटभेटतर्फे देण्यात येईल.)
    • द्वीतीय पारितोषिक -  मराठी सुलेखन असलेला टी-शर्ट (अर्थात तुमच्या मापातला  !)
ही स्पर्धा केवळ संगणकावर मराठी लिहिता येणार्‍यांसाठीच आहे असे नव्हे. मराठी लिहिता येणारी प्रत्येक व्यक्ती (आबालवृद्ध)  यामध्ये सहभाग घेऊ शकतात.

आपल्या कर्तुत्वाच्या बळावर यशाला गवसणी घालणार्‍या, इतरांना प्रेरणादायी ठरणार्‍या अनेक व्यक्ती आपण पाहत असतो. नकळतच आपण त्यांना आपले प्रेरणास्थान बनवतो आणि इतरांना त्यांची उदाहरणे देतो. काही व्यक्तींचा जीवनपथ आपल्याला मार्गदर्शक ठरत असतो तर काहींनी संकटकाळी मदत करुन आपल्याला कृतकृत्य केलेले असते. अशा आपल्या मनाच्या कोपर्‍यात बसलेल्या सर्व व्यक्तीमत्वांबद्दलचे विचार जगासमोर मांडण्यासाठी "मराठी दिवसाच्या" या स्पर्धेचा वाचक पुरेपुर फायदा घेतील याची आम्हांला खात्री आहे.

जय महाराष्ट्र !!!

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

February 25, 2010

Indiatrace.com - एकाच ठिकाणी भारतातील सगळी माहीती शोधा .

आपल्याला एकाच ठिकाणी भारतातील सगळी माहीती देणारी site मिळाली तर? म्हणजे अगदी मोबाईल नंबर पासून ते गाड्यांच्या नंबरापर्यंत, STD Code, IP Address पासून ते एखाद्या व्यक्तिच्या नावापर्यंत सगळीच इत्तंभूत माहीती !!!

काय म्हणता शक्य नाही ! मग http://www.indiatrace.com/index.php या वेबसाईटला भेट द्या. या वेबसाईटवर तुम्हाला खूप काही माहीती मिळेल कृपा करून याचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी घ्या.
http://www.indiatrace.com/index.php या संकेतस्थळावर तुम्हाला खाली दिलेल्या प्रमाणे खूप पर्याय दिसतील.



चला आता आपण या Site ची वैशिष्ट्ये क्रमा क्रमाने बघुया.
आधी आपण मोबाईल नंबर कसा शोधायचा ते बघुया. वरील विविध पर्यायांपैकी तुम्ही Other Traces > Trace Mobile Number हा पर्याय निवडा. आता तुम्हाला हवा असलेला १० नंबरी मोबाईल नंबर टाका आणि Submit या 
बटणावर क्लिक करा.



Submit या बटणावर क्लिक केल्यावर केल्यावर तुम्हाला तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरचा सर्व्हिस प्रोव्हाईडर ( Operator information), ठिकाण (Location) अगदी भारतीय नकाशासह आणि तो मोबाईल नंबर CDMA आहे की GSM हे देखिल कळेल.



आता आपण गाड्यांचे नंबर कसे शोधता येतील ते बघुया. यासाठी तुम्ही Other Traces > Trace Vehicle Number हा पर्याय निवडा आणि रिकामी रकान्यांमध्ये तुम्हाला हवा असलेला वाहन क्रमांक टाका आणि Submit या बटणावर क्लिक करा.





आता तुम्हाला हवे असलेले वाहन कुठल्या राज्यातील कुठल्या मुख्य ठिकाणी अधिकृत नोंदणी झालेले आहे याचा पत्ता लागेल.



अशाच पद्धतीने आपण पिन कोड शोधुया. त्यासाठी Other Traces > Trace Pin Code हा पर्याय निवडून तुम्हाला हवा असलेला पिन नंबर त्यात टाका आणि Submit या बटणावर क्लिक करा.




आता तुम्हाला ४००००१ या पिन कोड अंतर्गत येणार्‍या सगळ्या ठिकाणांची यादी मिळेल.



आपण अशाच प्रकारे STD/ Area Code शोधुया. यासाठी Other Traces > Trace STD/ Area Code हा पर्याय निवडा आणि रिकामी रकान्यांमध्ये तुम्हाला हवा असलेला STD/ Area Code टाका आणि Submit या बटणावर क्लिक करा.




तुम्ही दिलेल्या STD/ Area Code असलेल्या ठिकाणांची यादी दिसेल.




अशाच प्रकारे IP Address देखील शोधता यईल. यासाठी तुम्ही Other Traces > Trace IP Address हा पर्याय निवडा आणि रिकामी रकान्यांमध्ये तुम्हाला हवा असलेला IP Address टाका आणि Lookup या बटणावर क्लिक करा.



आता तुम्ही दिलेल्या IP Address ची सगळी माहिती दिसेल.



अशाच प्रकारे तुम्हाला हव्या असलेल्या व्यक्तिंचा शोध देखील तुम्हाला घेता येईल. यासाठी तुम्ही Other Traces > Trace People हा पर्याय निवडा आणि रिकामी रकान्यांमध्ये तुम्हाला हव्या असलेल्या व्यक्तिचे नाव टाका आणि Search या बटणावर क्लिक करा.



मला माहित नव्हते माझा रॅकॉर्ड इकडे असेल म्हणून कदाचित तुम्हालादेखील सुखद धक्का बसेल. मला माझ्याबद्दल जितकी माहीती नेटवर आहे तेवढी दिसली (कदाचित ती तुम्ही दिलेल्या पर्यायाला दिसेलच असे नाही).



आता आपण Reverse DNS ही काय भानगड आहे आणि ती कशी Trace करता येईल ते बघुया. नेटवर्क काँप्युटर वरील DNS ( Domain Name System) चा वापर एखाद्या IP Address चे Domain चे नाव जाणून घेण्यासाठी होतो. आता नक्की हा DNS असतो कुठे ते बघुया. यासाठी Start > My Network Places हा पर्याय निवडा. आता तुम्हाला My Network Places ची विंडो दिसेल. त्यातून डाव्या हाताला View Network Connections हा पर्याय निवडा.



आता तुम्हाला तुमचे Local Area connection नावाचा आयकॉन दिसेल (अर्थात Lan). त्यावर Right क्लिक करुन तुम्ही Properties हा पर्याय निवडा.




आता तुमच्या समोर Interenet Properties ची विंडो दिसेल त्यातून Internet Protocal हा पर्याय निवडा आणि Properties या बटणावर क्लिक करा.



आता तुम्हाला Internet Protocol (TCP/IP) Properties ची नविन विंडो दिसेल्. त्यात तुम्हाला शेवटी दिसेल Preferred DNS Server आणि Alternate DNS Server असे दोन पर्याय दिसतील हेच आपल्याला हवे असलेले DNS चे नंबर आहेत.



आता आपल्या मुळ साईटवर आपण येऊया आणि Other Traces > Reverse DNS हा पर्याय आपण निवडूया आणि वरील नंबरांपैकी एक नंबर टाकून Lookup या बटणावर क्लिक करुया.



Lookup या बटणावर क्लिक केले की तुम्ही दिलेला DNS उलटा दिसेल आणि त्याची माहीती पण दिसेल.



 समजा जर तुम्हाला एखाद्या site चा IP Address हवा असेल किंवा एखाद्या Site च्या IP Address वरुन त्या Site चे नाव शोधून काढायचे असेल तर तोही पर्याय उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला Other Traces > Nameserver Lookup हा पर्याय निवडावा लागेल. आता तुम्हाला हव्या असलेल्या site चे नाव टाका आणि Lookup या बटणावर क्लिक करा.



तुम्हाला Netbhet.com चे सगळे IP Address दिसतील.



आता अशाच प्रकारे Domain WHOIS Trace निवडून तुम्ही एखाद्या Site कोणाच्या नावाने रजिस्टर आहे, तसेच ती अस्तित्वात आहे की नाही आणि इतर सर्व माहीती बघू शकता. यासाठी तुम्हाला Other Traces > Domain WHOIS Trace हा पर्याय निवडून तुम्हाला माहीती हव्या असलेल्या Website चे नाव टाकावे लागेल आणि Lookup या बटणावर क्लिक करावे लागेल.



Lookup या बटणावर क्लिक केले की तुम्हाला तुम्ही दिलेल्या site ची संपूर्ण कुंडली (माहीती) मिळेल.



आता याच पर्यायांपैकी एक असलेल्या TraceBox चा वापर करुन तुम्ही एखादी माहीती शोधू शकता (अगदी कुठलीही माहीती मोबाईल नंबर पासून ते IP Address पर्यंत) थोडक्यात म्हणजे हे एक Search Engine च आहे म्हणा ना !
यासाठी तुम्हाला Other Traces > Tracebox हा पर्याय निवडावा लागेल त्यात तुम्हाला हवी असलेली माहिती टाका आता मला फक्त नेटभेट बद्दल माहीती हवी आहे म्हणून मी "Netbhet" असे लिहिले आणि Search या बटणावर क्लिक केले म्हणजे मला फक्त नेटभेट या शब्दाविषयी माहिती मिळेल.


Search या बटणावर क्लिक केल्यावर मला नेटभेटची सगळी माहीती दिसली.



आता सगळ्यात शेवटच्या प्रकारचि माहीती म्हणजे आपल्याला जे Third Party messages येतात की नाही म्हणजे Marketing साठीचे वगैरे ज्यांचे नंबर तर दिसत नाहीत पण शक्यतो ते TM-Free, IA-Chat, TM-ICICIBNK  अशा प्रकारच्या नावावरुन आलेले असतात. हे Message कुठून आले याचाही थांगपत्ता आपल्याला लागू शकेल. या साठी आपल्याला Indiatrace.com या site वरील मध्यभागी असलेल्या   Now Trace Bulk SMS SENDER Location/Provider या पर्यायावर क्लिक करा.



आता तुम्हाला आलेल्या Message च्या sender ची माहिती रिकाम्या जागेत टाका आणि Submit या बटणावर क्लिक करा.



तुम्हाला आत तुम्ही टाकलेल्या Sender च्या नावाच्या Mobile Service Provider चे नाव आणि ठिकाण तसेच तो नंबर CDMA aahe की GSM हे सुद्धा कळेल हो पण नंबर मात्र नाही कळणार याची कृपया नोंद घ्या !!!






मला वाटतं ही एक परिपूर्ण अशी वेबसाईट आहे मात्र याचा दुरुपयोग होणार नाही याची खबरदारी घ्या !!!
काही सुचना किंवा प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर जरूर कळवा !!!

प्रथमेश शिरसाट prathmesh.shirsat@gmail.com
 



Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

चेतन भगतने सिंबॉयसिस कॉलेजमध्ये केलेले भाषण (मराठीत)

आपल्या विशीष्ट शैलीने लिहिणारा आणि तरुणांना भावणारा सध्याचा भारतातील सर्वात तरुण लेखक म्हणजे "चेतन भगत".
सिंबॉयसिस कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसमोर त्यांच्या कॉलेजमधील पहील्या दिवशी चेतन भगतने केलेले भाषण खुप प्रसिद्ध आहे. विद्यार्थ्यांना आनंदी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठीचा चेतनने सांगीतलेला मुलमंत्र केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर सर्वांनाच उपयुक्त आहे. म्हणुनच खास नेटभेटच्या वाचकांसाठी मी या भाषणाचा मुक्त अनुवाद केला आहे. भाषणाची मुळ इंग्रजी प्रत येथे वाचता येईल.



सुप्रभात. या मंचावर बोलावुन आपण मला काही बोलण्याची संधी दीलीत त्याबद्दल धन्यवाद.
हा दिवस तुमचा आहे. तुम्ही, जे काहीतरी बनण्याच्या उद्देशाने आपल्या घरातील आरामाचे जीवन सोडुन आला आहात त्यांचा हा दिवस आहे.


मला खात्री आहे की तुम्ही की खुप उत्साहित आहात. माणसाच्या आयुष्यात काही आनंददायी दिवस असे असतात जे कधीच विसरता येत नाही. कॉलेजमधील पहिला दिवस हा अशाच काही दिवसांपैकी एक. आज पहिल्या दिवशी कॉलेजला येण्यासाठी तयार होत होतात तेव्हा तुमच्या पोटात भीतीचा गोळा आला असेल. नविन कॉलेज कसे असेल, येथील प्रोफेसर्स कसे असतील, आपले नविन वर्गमित्र कोण आहेत या सगळ्या विचारांनी तुम्ही उत्कंठीत झाला असाल.
ही उत्कंठा म्हणजेच तुमच्यातील स्पार्क (चमक) आहे, असा स्पार्क ज्याच्यामुळे आज इथे इतके चैतन्यपुर्ण वातावरण आहे. आज मी तुम्हाला हा तुमच्यातील स्पार्क तसाच चमकत ठेवण्याविषयी सांगणार आहे. किंवा दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर अगदी नेहमी नाही पण जास्तीत जास्त वेळ आनंदी कसे रहायचे याबद्दल सांगणार आहे.
या आपल्या सर्वांमध्ये असलेल्या स्पार्कची सुरुवात कोठुन होते? मला वाटते आपण सर्वजण जन्मतःच हा स्पार्क आपल्यामध्ये घेउन आलेलो असतो.


माझ्या ३ वर्षांच्या जुळ्या मुलांमध्ये असे लाखो स्पार्क्स मला दीसतात. स्पायडरमॅनचं लहानसं खेळणं पाहुन ते आनंदाने उडया मारतात. वार्‍याची झुळुक अंगावर झेलायला त्यांना मजा वाटते.  झोपताना वडीलांकडुन गोष्ट ऐकण्यासाठी ते आतुर असतात. त्यांचा वाढदिवसाची तयारी कित्येक महीने आधीपासुनच सुरु करतात.
जेव्हा मी तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांकडे पाहतो तेव्हा मला तुमच्यातही हा स्पार्क अजुन शिल्लक राहीला आहे याची जाणीव होते. पण जेव्हा वृद्ध माणसांकडे पाहतो तेव्हा मात्र मला त्यांच्यात स्पार्क दीसत नाही. म्हणजे वयोमानाबरोबर आपल्यातली ही चमक नाहीशी होत जाते. ज्यांनी आपल्या आयुष्यात ही चमक नाहीशी झाली आहे ते थकलेले, हरलेले , जीवनाला कंटाळलेले वाटतात. जब वुई मेट या चित्रपटातील करीना कपुरचा पहिल्या भागातील आणि दुसर्‍या भागातील वागण्यातला फरक आठवा. स्पार्क हरवला तर असे वागणे होउन जाते. तर आपल्यातील ही चमक टीकवायची कशी?

अपल्यातील ही चमक, चैतन्याची तुलना दीव्याबरोबर करा. दीवा सतत तेवत ठेवायचा असेल तर दोन गोष्टी कराव्या लागतात. पहिले म्हणजे वातीला सतत तेल पुरवावे लागते आणि दुसरे म्हणजे वार्‍यापासुन ज्योतीचे संरक्षण करावे लागते. जसं वातीसाठी जे काम तेल करतं तेच काम आपल्यासाठी आपण ठरवीलेली उद्दीष्टे , ध्येये करत असतात. प्रगती करणे, सतत पुढे जात राहणं हा मानवी स्वभावाचा एक भाग आहे. आपल्या आवडीच्या क्षेत्रात नैपुण्य मिळवणे, सतत सुधारणा करत राहणे हेच खरे यश आहे. यश मिळवणे म्हणजे अमुक एवढा पगार मिळवणे, एखादी कार किंवा घर असणे हे नव्हे.



आपल्यापैकी बहुतांशी लोक मध्यमवर्गीय कुटुंबामधुन आलेले आहेत. आपल्यासाठी घर, गाडी, बंगला या गोष्टी मिळवीणे हीच यशाची व्याख्या असणे सहाजिक आहे आणि तसे ते बरोबर देखिल आहे. जिथे आपल्या दैनंदीन गरजा भागवताना प्रत्येक वेळेला पैशाचा विचार करावा लागतो अशा वातावरणात वाढल्यानंतर आर्थीक सुबत्ता मिळवणे ही खुप मोठी कामगीरी आहे. पण ही एक उपलब्धी असली तरी जीवनाचे अंतीम ध्येय मात्र पैसा कमवणे हे नाही आहे. जर असे असते तर श्री.अंबानी ऑफीसला गेलेच नसते. शाहरुख खानने नवनवे चित्रपट करण्यापेक्षा घरी बसुन आराम करणे पसंत केले असते. स्टीव जॉब्ज ने नविन आय-फोन लाँच करण्यासाठी मेहनत घेतली नसती कारण पिक्सार ही त्याची कंपनी काही बिलीयन डॉलर्सना विकुन त्याने यापुर्वीच बराच पैसा कमावला आहे.

मग तरीसुद्धा या व्यक्ती इतकी मेहनत का करतात. रोज नव्या जोमाने ऑफीसला येण्याची उमेद त्यांच्यामध्ये येथे कोठुन? ते ही मेहनत करतात कारण त्यात त्यांना आनंद मिळतो, स्फुर्ती मिळते, प्रेरणा मिळते. आतापर्यंत केलेल्या कामापेक्षा अधिक चांगले काम करण्ञाची त्यांची इच्छाशक्ती त्यांच्याकडुन हे सर्व करुन घेते. आपण जितका अभ्यास जास्त करु तितके चांगले मार्क्स मिळतील. जर इतरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला मुलाखतीसाठी याचा फायदा होइल. जर प्रॅक्टीस नियमीतपणे केलीत तर तुमचे क्रीकेट सुधारेल. जरी तुम्ही तेंडुलकर बनला नाहीत तरी तुमच्या क्रीकेटचा दर्जा उंचावलेला असेल. पुढची पायरी गाठण्यासाठी, सुधारणा करण्यासाठी मेहनत घेणे हे आवश्यक आहे.


निसर्गाने प्रत्येक माणसाला एका वेगळ्या रसायनाने बनवीले आहे. प्रत्येकात काही दोष आणि काही गुण निसर्गानेच दीलेले आहेत. ही गोष्ट आपण सर्वांनी स्वीकारायला हवी आणि निसर्गाने दीलेल्या देणगीचा सर्वोत्तम वापर केला पाहीजे. तुमच्यासमोर असलेली ध्येये आणि उद्दीष्टे या कामांत तुमची मदत करतील. परंतु मित्रांनो ध्येय फक्त शैक्षणीक किंवा करीअरशी संबंधीत असले पाहीजे असे नव्हे. एक संतुलीत आणि यशस्वी आयुष्य जगता येईल अशी ध्येये ठरवा. मी यशस्वी या शब्दाआधी संतुलीत हा शब्द वापरला हे लक्षात घ्या. संतुलीत म्हणजे चांगले स्वास्थ, नातेसंबंध, कुटुंब आणि मानसीक शांती या सर्वांचा समावेश असलेले जीवन.

ज्या दिवशी प्रमोशन झाले त्याच दिवशी ब्रेक-अप झाला असेल तर त्या प्रमोशनचा काय फायदा. जर पाठ-कंबर दुखीचा त्रास असेल तर गाडी चालवण्याचा आनंद कसा घेता येईल. मनात निरनिराळ्या चिंतांचे तांडव चालु असेल तर कितीही शॉपींग केली तरी ती एंजॉय कशी करता येईल.

"आयुष्य म्हणजे एक कठीण शर्यत आहे. जर  धावला नाहीत तर मागे पडाल" असे तुम्ही बर्‍याच लोकांकडून यापुर्वी ऐकले असेल. पण मला विचाराल तर आयुष्य म्हणजे एक शर्यत जरुर आहे पण धावण्याची नव्हे. आयुष्य म्हणजे आपण लहानपणी बालवाडीत खेळायचो तशी "चमचागोटी"ची चमच्यामध्ये गोटी ठेवुन धावायची शर्यत आहे. जर धावताना चमचामधील गोटी पडली तर पहिला क्रमांक येउनही काय फायदा?

आयुष्य म्हणजे अशीच चमचागोटीची शर्यत आहे जिथे स्वास्थ्य आणि कुटुंब चमचातल्या गोटीप्रमाणे आहेत. जर कुटुंबीयांसोबत सुसंवाद नसेल , मनःशांती नसेल तर ही शर्यत जिंकण्यासाठी केलेला आटापीटा व्यर्थ आहे. आणि इतकी मेहनत करुन ही शर्यत जिंकली तरी युमच्यातला जिवंतपणा, उत्साह टीकवुन ठेवणारा स्पार्क मात्र हळुहळु नष्ट होत जाईल.


आपल्यातला स्पार्क जिवंत ठेवण्यासाठी आणखी एक गोष्ट करा -आयुष्याकडे खुप गंभीरतेने पाहु नका. आम्हाला योगासने शिकवणारे एक गुरुजी आम्हाला शिकवताना खुप हसवत असत. एकदा एका विद्यार्थ्याने त्यांना विचारले की शिकताना इतके हास्यविनोद केल्याने योगासनांच्या शिक्षणावर परीणाम होणार नाही का? यावर गुरुजी उत्तरले , सिरीयस होउ नका, सिन्सीअर व्हा ( don't be serious, be sincere)
त्यानंतर पुढे माझ्या आयुष्यातील प्रत्येक कामात मी गुरुजींचे हे बोल तंतोतंत पाळले. माझे लिखाण असो, नोकरी असो, कुटूंब आणि नातेसंबंध असोत कींवा इतर कोणतीही उद्दीष्टे असोत मी कटाक्षाने हा गुरुमंत्र पाळला.


माझ्या लिखाणाबद्दल मला दररोज हजारो अभिप्राय मिळत असतात. काही स्तुतीपर असतात, काही प्रखर टीका करणारी वक्तव्ये असतात. जर हे सर्व मी खुप गंभीरतेने घेउ लागलो तर मी कधीच लिहु शकणार नाही. मी जगुच शकणार नाही असे म्हंटले तर ती अतीशयोक्ती ठरु नये. म्हणूनच म्हणतो आयुष्यच क्षणभंगुर तात्पुरते आहे तर ते जास्त सिरिअसली घेण्यात काहीच अर्थ नाही. आपण सगळे एका प्री-पेड , लिमिटेड व्हॅलीडीटी असलेल्या सिमकार्ड सारखे आहोत. जर आपण भाग्यवान असलो तर आणखी ५० वर्षे जास्त जगु. ५० वर्षे जास्त म्हणजे फक्त २५०० आठवडे. मग खरंच आपण एवढे बिझी होण्याची आवश्यकता आहे का? काही लेक्चर्स बंक केले, इंटरव्ह्यु मध्ये काही गडबड केली, थोडी मजामस्करी केली, प्रेमात पडलो तर यात काहीच वावगं नाही. आपण माणसं आहोत , प्रोग्राम  केलेल्या मशिन्स नाही आहोत.


मी तुम्हाला तीन गोष्टी सांगीतल्या - संयुक्तीक ध्येये, समतोल आणि आयुष्य फार गंभीरतेने न घेणे. या तीनही गोष्टी जीवनाच्या दीव्यातील वातीसाठी तेलाचे काम करतात. पण या वातीचे चार वेगवेगळ्या वादळांपासुन देखील संरक्षण करावे लागते. अपेक्षाभंग, वैफल्य, असमान वागणुक, आणि वेगळेपणाची भावना.


तुमच्या अथक प्रयत्नाना अपेक्षेप्रमाणे यश आले नाही, जर योजीलेल्या गोष्टींच्या विपरीत घटना घडत राहील्या किंवा सतत अपयशाशी सामना होत राहीला तर निराशा तुम्हाला ग्रासु लागेल. अपयशाशी सामना करणे ही अतीशय कठीण गोष्ट आहे मात्र जे अपयशाला तेवढ्याच ताकदीने सामोरे जातात तेच पुढे खंबीर बनतात. अपयशाचे दु:ख करत बसण्यापेक्षा "यापासुन मी काय शिकलो?" हा प्रश्न स्वतःला विचारणे आवश्यक आहे.
बर्‍याचदा असे होइल की तुम्ही अत्यंत दु:खी व्हाल. तुम्हाला सगळं सगळं सोडुन द्यावेसे वाटेल. मला देखील असेच वाटले होते जेव्हा नऊ प्रकाशकांनी माझे पहिले पुस्तक प्रकाशीत करण्यास नकार दीला होता. आय.आय्.टी चे काही विद्यार्थी कमी गुण मिळाले म्हणुन आत्महत्या करतात. किती मुर्खपणाचे आहे हे. मित्रांनो पराभव इतका जिव्हारी लागु शकतो. पण हेच जीवन आहे. जर सर्वच आव्हाने सहजकत्या पेलता आली तर त्याला आव्हान म्हणायचंच कशाला.  लक्षात  ठेवा - जर तुम्ही पराभुत झाला असाल तर याचाच अर्थ तुम्ही आटोकाट प्रयत्न केले आहेत आणि तुमच्या सामर्थ्यानुसार सर्व ते करुन पाहिले आहे. आणि हेच तर आयुष्यात सर्वात महत्त्वाचे आहे.


पुस्तक लिहुन झाल्यावर मी बॉलीवुड साठी लिखाण करायचे असे ठरवले होते. पुस्तकाला मिळालेल्या यशामुळे मला बॉलीवुडमध्ये सहजगत्या काम मिळाले असे लोकांना वाटले होते. मात्र प्रत्यक्षात माझ्या पहिल्या चित्रपटाला प्रदर्शीत होण्यासाठी पाच वर्षाचा कालावधी जावा लागला. निराशा आपल्या मनातला उत्साह पार नाहीसा करुन टाकते. सुरुवातीला काम करण्याचा जो जोम असतो त्याची जागा नकारात्मक भावना घेउ लागते आणि हळुहळु आपल्या स्वभावातला कडवटपणा वाढत जातो. या नैराश्याचा सामना कसा कराल?

खरेतर एक चित्रपट बनवायला खुप मोठा कालावधी लागतो, मात्र पाहण्यासाठी फक्त तीन तासच. मुळातच चित्रपटाचा शेवट पाहण्यापेक्षा चित्रपट पाहण्याची एकुण तीन तासांची प्रोसेस प्रेक्षकांना जास्त आनंद देते. मी देखिल याच तत्वाचा उपयोग केला. चित्रापटासाठी उशिर होत होता मात्र मी माझ्या तीसर्‍या पुस्तकाची सुरुवात केली होती. मित्रांना भेटणं, प्रवास, जेवायला बाहेर जाणं अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी स्वतःला गुंतवुन ठेवलेलं.  लक्षात ठेवा कोणतीच गोष्ट खुप खुप सीरीयसली घ्यायची नसते. जर तुम्ही कधी एखाद्या बाबतीत निराश झालात तर याचा अर्थ तुम्ही खुप सीरीयसली त्याचा विचार करत होतात. 


असमान वागणुक -
असमान वागणुक हाताळणे सगळ्यात कठीण असते परंतु दुर्दैवाने आपल्या देशात असंच चालंतं. बरेच लोक आपल्या मोठ्या लोकांबरोबर असलेल्या ओळखींचा , श्रीमंत वडीलांच्या नावाचा फायदा घेउन, सुंदर चेहर्‍याचा  फायदा घेउन बॉलीवुड मधेच नव्हे तर जवळपास सर्वच ठीकाणी आपले काम साधत असतात. या सगळ्यांना मागे सारुन पुढे जायचं म्हणजे नशीब बलवत्तर असायला हवं. आधीच भारतासारख्या देशात संधी मिळणे कठीण असते. संधी मिळालीच तर नशीबातल्या ग्रहतार्‍यांचा योग जुळुन यावा लागतो. गुणवत्ता आणि मेहनतीचं फळ लवकर मिळतंच असं नाही. त्यासाठी कधीकधी बराच काळ जावा लागतो. मात्र मित्रांनो हे लक्षात असुद्या की काही तुमच्या पेक्षा जास्त भाग्यवान असु शकतात. खरंतर तुम्हाला कॉलेज शिक्षण मिळतंय आणि बर्‍यापैकी इंग्लीश बोलता येतं म्हणजे तुम्ही भारतातल्या काही खुप भाग्यवान मुलांपैकी एक आहात. (बर्‍याच मुलांना तर शाळा  पाहताही येत नाही)    


आपल्याला जे काही मिळालं आहे त्याबद्दल ईश्वराचे आभार माना आणि जे आपल्याला मिळालं नाही ते स्वीकारायची हिंमत मिळवा. इतर लेखक कधी कल्पनाही करु शकत नाहीत इतकं प्रेम मला वाचकांकडुन मिळालंय. परंतु मला साहित्य क्षेत्राकडुन फारशी प्रशंसा मिळत नाही. मी ऐश्वर्या राय सारखा दीसत नाही पण मला दोन मुलं आहेत जी माझ्या मते ऐश्वर्या राय पेक्षा खुप सुंदर आहेत. आयुष्यात काही कमी जास्त होत असतं. अशा असमानतेच्या अनुभवांनी खचुन जावु नका.  

सर्वात शेवटी वेगळेपणाची भावना ही एक अशी गोष्ट आहे जी तुमच्यातील स्पार्क मिटवु शकते. जसजसे तुम्ही मोठे होत जाल तुम्हाला जाणवेल की तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात. तुम्ही जेव्हा लहान होतात तेव्हा इतर मुलांप्रमाणेच तुम्हाला आईसक्रीम आणि सुपरमॅन आवडत असेल. मात्र काही वर्षांनंतर तुम्हाला हे जाणवलं असेल की तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात. तुमच्या भावना, विचार, आवडीनिवडी इतरांपेक्षा अगदी तुमच्या जवळच्या माणसांपेक्षा वेगळ्या आहेत. यातुनच पुढे इतरांबरोबर मतांतरे होण्यास सुरुवात होते. तुमची ध्येये व उद्दीष्टे इतरांपेक्षा वेगळी असतात. आणि मग या वादात कधीकधी आपली काही ध्येये मागे पडु लागतात. कॉलेजमधील बास्केटबॉल कॅप्टन्स नी त्यांना दुसरे मुल होईपर्यंत बास्केटबॉलला रामराम ठोकलेला असेल. त्यांनी त्यांना आवडणारी त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट सोडलेली असते. त्यांनी हे त्यांच्या प्रीय कुटुंबीयांसाठीच केलेलं असतं. मात्र हे करताना त्यांनी स्वतःचा स्पार्क मात्र गमावलेला असतो. मित्रांनो कधी चुकुनही अशी तडजोड करु नका. इतरांवर प्रेम करण्याआधी स्वतःवर प्रेम करा. 

मित्रांनो, मी तुम्हाला आयुष्यातल्या या चार वादळांबद्दल सांगीतलंय - अपेक्षाभंग, वैफल्य, असमान वागणुक, आणि वेगळेपणाची भावना. ही वादळे टाळता येत नाहीत. दरवर्षी येणार्‍या पावसाप्रमाणेच ही वादळे सतत तुमच्या आयुष्यात येत राहतील. तुम्हाला फक्त तुमच्यातील स्पार्क जपण्यासाठी रेनकोट तयार ठेवावा लागेल.


मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या आयुष्यातील सर्वात अद्भुत काळामध्ये स्वागत करतो आहे. जर कोणी मला माझ्या आयुष्यातील काही वर्षे परत देत असेल तर मी नक्कीच माझ्या कॉलेजचे दिवस निवडेन. मला आशा आहे की आणखी १० वर्षांनंतर देखील तुमच्या डोळ्यांत तीच चमक दीसेल जशी आज दीसते अहे. तुमच्यातील स्पार्क फक्त कॉलेज जीवनातच नव्हे तर आयुष्यातील पुढे येणार्‍या २५०० आठवड्यांतही असाच असेल. केवळ तुमच्यातच नव्हे तर भारतवर्षातील प्रत्येकजण आपल्यातील ही चमक जिवंत ठेवेल. आणि मग तुम्ही कधी परदेशात गेलात तर अभिमानाने सांगु शकता, " मी लाखो चमकणार्‍या तार्‍यांच्या देशातुन आलो आहे".




Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Speech by Chetan Bhagat delivered at Symbiosis, Pune

Transcript of the speech by Chetan Bhagat delivered at Symbiosis Pune 
Good Morning everyone and thank you for giving me this chance to speak to you. This day is about you. You, who have come to this college, leaving the comfort of your homes (or in some cases discomfort), to become something in your life.


I am sure you are excited. There are few days in human life when one is truly elated. The first day in college is one of them. When you were getting ready today, you felt a tingling in your stomach. What would the auditorium be like, what would the teachers be like, who are my new classmates - there is so much to be curious about. 
I call this excitement, the spark within you that makes you feel truly alive today. Today I am going to talk about keeping the spark shining. Or to put it another way, how to be happy most, if not all the time.
Where do these sparks start? I think we are born with them. My 3-year old twin boys have a million sparks. A little Spiderman toy can make them jump on the bed. They get thrills from creaky swings in the park. A
story from daddy gets them excited. They do a daily countdown for birthday party â€" several months in advance â€" just for the day they will cut their own birthday cake.


I see students like you, and I still see some sparks. But when I see older people, the spark is difficult to find. That means as we age, the spark fades.People whose spark has faded too much are dull, dejected, aimless and bitter. Remember Kareena in the first half of Jab We Met vs the second half? That is what happens when the spark is lost. So how to save the spark?
Imagine the spark to be a lamp's flame. The first aspect is nurturing - to give your spark the fuel, continuously. The second is to guard against storms.


To nurture, always have goals. It is human nature to strive, improve and achieve full potential. In fact, that is success. It is what is possible for you. It isn't any external measure - a certain cost to company pay package, a particular car or house.
Most of us are from middle class families. To us, having material landmarks is success and rightly so. When you have grown up where money constraints force everyday choices, financial freedom is a big achievement. But it isn't the purpose of life. If that was the case, Mr. Ambani would not show up for work. Shah Rukh Khan would stay at home and not dance anymore. Steve Jobs won't be working hard to make a better iPhone, as he sold Pixar for billions of dollars already.


Why do they do it? What makes them come to work everyday?
 They do it because it makes them happy.They do it because it makes them feel alive. Just getting better from current levels feels good. If  you study hard, you can improve your rank. If you make an effort to
interact with people, you will do better in interviews. If you practice, your cricket will get better. You may also know that you cannot become Tendulkar, yet. But you can get to the next level.
Striving for that next level is important.


Nature designed with a random set of genes and circumstances in which we were born. To be happy, we have to accept it and make the most of nature's design. Are you? Goals will help you do that. I must add, don't just have career or academic goals. Set goals to give you a balanced, successful life. I use the word balanced before successful. Balanced means ensuring your
health, relationships, mental peace are all in good order.


There is no point of getting a promotion on the day of your breakup. There is
no fun in driving a car if your back hurts. Shopping is not enjoyable
if your mind is full of tensions.


You must have read some quotes - Life is a tough race, it is a marathon or whatever. No, from what I have seen so far, life is one of those races in nursery school, where you have to run  with a marble in a spoon kept in your mouth. If the marble falls, there is no point coming first.


Same with life, where health and relationships are the marble. Your striving is only worth it if there is harmony in your life. Else, you may achieve the success, but this spark, this feeling of being excited and alive, will start to die.


One last thing about nurturing the spark - don't take life seriously. One of my yoga teachers used to make students laugh during classes. One student asked him if these jokes would take away something from the
yoga practice. The teacher said - don't be serious, be sincere. This quote has defined my work ever since. Whether its my writing, my job, my relationships or any of my goals.


I get thousands of opinions on my writing everyday. There is heaps of praise, there is intense criticism. If I take it all seriously, how will I write? Or rather, how will I live? Life is not to be taken seriously, as we are really temporary here. We are like a pre-paid card with limited validity. If we are lucky, we may last another 50 years. And 50 years is just 2,500 weekends. Do we really need to get so worked up? It's ok, bunk a few
classes, goof up a few interviews, fall in love. We are people, not programmed devices.


I've told you three things - reasonable goals, balance and not taking it too seriously that will nurture the spark. However, there are four storms in life that will threaten to completely put out the flame. These must be guarded against. These are disappointment, frustration, unfairness and loneliness of purpose.


Disappointment 
will come when your effort does not give you the expected return. If  things don't go as planned or if you face failure. Failure is extremely difficult to handle, but those that do come out stronger. What did this failure teach me? is the question you will need to ask. You will feel miserable. You will want to quit, like I wanted to when nine publishers rejected my first book. Some IITians kill themselves over low grades â€" how silly is that? But that is how much failure can hurt you. But it's life. If challenges could always be overcome, they would cease to be a challenge. And remember - if you are failing at something, that means you are at your limit or potential. And that's where you want to be.


Disappointment's cousin is frustration, the second storm. 
Have you ever been  frustrated? It happens when things are stuck. This is especially relevant in India. From traffic jams to getting that job you deserve, sometimes things take so long that you don't know if you chose the right goal.


After books, I set the goal of writing for Bollywood, as I thought they needed writers. I am called extremely lucky, but it took me five years to get close to a release. Frustration saps excitement, and turns your initial energy into something negative, making you a bitter person. How did I deal with it?


A realistic assessment of the time involved in movies take a long time to make even though they are watched quickly, seeking a certain enjoyment in the process rather than the end result in at least I was learning how to write scripts, having a side plan " I had my third book to write and even something as simple as pleasurable distractions in your life - friends, food, travel can help you overcome it. Remember, nothing is to be taken seriously. Frustration is a sign somewhere, you took it too seriously.


Unfairness
This is hardest to deal with, but unfortunately that is how our country works. People with connections, rich dads, beautiful faces, pedigree find it easier to make it in not just in Bollywood, but everywhere. And sometimes it is just plain luck. There are so few opportunities in India, so many stars need to be aligned for you to make it happen. Merit and hard work is not always linked to achievement in the short term, but the long term correlation is high, and ultimately things do work out. But realize, there will be some people
luckier than you. In fact, to have an opportunity to go to college and understand this speech in English means you are pretty damm lucky by Indian standards.


 Let's be grateful for what we have and get the strength to accept what we don't. I have so much love from my readers that other writers cannot even imagine it. However, I don't get literary praise. It's ok. I don't look like Aishwarya Rai, but I have two boys who I think are more beautiful than her. It's ok. Don't let unfairness kill your spark. 


Finally, the last point that can kill your spark is isolation


As you grow older you will realize you are unique. When you are little, all kids want Ice cream and Spiderman. As you grow older to college, you still are a lot like your friends. But ten years later and you realize you are unique.What you want, what you believe in, what makes you feel, may be different from even the people closest to you. This can create conflict as your goals may not match with others. . And you may drop some of them. Basketball captains in college invariably stop playing basketball by the time they have their second child. They give up something that meant so much to them. They do it for their family. But in doing that, the spark dies. Never, ever make that compromise. Love yourself first,
and then others.


There you go. I've told you the four thunderstorms - disappointment, frustration, unfairness and isolation.
You cannot avoid them, as like the monsoon they will come into your life at regular intervals. You just need to keep the raincoat handy to not let the spark die.


I  welcome you again to the most wonderful years of your life. If someone gave me the choice to go back in time, I will surely choose college. But I also hope that ten years later as well, your eyes will shine the same way as they do today. That you will Keep the Spark alive, not only through college, but through the next 2,500 weekends. And I hope not just you, but my whole country will keep that spark alive, as we really need it now more than any moment in history. And there is something cool about saying - I come from the land of a billion sparks.



Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

February 24, 2010

CFL Lightbulbs explained in Plain English

Mouth Art - Pencil Drawings by Doug Landis


दुर्दम्य ईच्छाशक्ती आणि प्रचंड जिद्द हे दोन गुण अंगी असतील तर माणसाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. कीतीही कठीण प्रसंग आणि विपरीत परीस्थीती ओढवीली तरी देखील या दोन गुणांच्या सहाय्याने त्यावर मात करुन अंतीमतः यशस्वी होता येते हे आपल्या कर्तुत्वाने सिद्ध करणार्‍या एका व्यक्ती बद्द्ल आज मी वाचकांना माहिती देणार आहे.

डाउग लँडीस असे नाव असलेली ही व्यक्ती एक चित्रकार आहे. डाउग रेखाचित्रे काढतो म्हणजे Pencil sketching  करतो. मात्र पेन्सील हातात न धरता डाउग तोंडाने चित्रे काढतो.

लहानपणी शाळेमध्ये कुस्ती खेळत असताना आलेला अर्धांगवायुच्या झटक्यामुळे डाउगचे मानेपासुन खालचे पुर्ण शरीर लुळे झाले आहे. त्यामुळे त्याला ईतर सामान्य माणसांप्रमाणे हात, बोटे, पाय वापरता येत नाहीत. या अपघातानंतर डाउगला टीव्ही पाहण्याखेरीज काहीच शक्य नव्हते. सतत टीव्ही पाहण्याच्या त्याच्या सवयीमुळे चिंतीत झालेल्या डाउगच्या भावाने त्याला पेन्सील तोंडात धरुन चित्रे काढण्यास सांगीतले.

यापुर्वी कधीच चित्रे काढलेली नसल्याने आणि मुळातच चित्रकलेची आवड नसल्याने डाउगला सुरुवातीला खुप अडचणी आल्या. मात्र अतीशय प्रयत्नपुर्वक सतत केलेल्या सरावामुळे डाउगला हळुहळु चित्रकला जमत गेली. एवढ्यावरच डाउग थांबला नाही तर त्याने स्वतःची अशी एक शैली निर्माण केली.
चित्रकलेमध्ये प्रगती करणार्‍या डाउगने सोबतीने आपले शिक्षणही पुर्ण केले. त्याने ग्राफीक आर्टस मध्ये B.A. आणि मोशन ग्राफिक्समध्ये M.F.A (Masters in Fine Arts) ही पदवी मिळवीली आहे.

"नाहीश्या होणार्‍या प्राण्यांच्या जाती" या विषयावर काढलेली त्याची चित्रे  विशेष गाजली. या चित्रांमध्ये डाउगने प्राण्यांच्या शरीराचा काही भाग विरळ होताना दाखवीला आहे. यामुळे या प्राण्यांच्या प्रजातींना लोप होण्याचा धोका आहे हा विचार प्रभावीपणे पाहणार्‍यांच्या मनावर नोंदला जातो.

Mouth Art - Pencil Drawings by Doug Landis



डाउग लँडीसबद्दल अधिक माहीती मिळवीण्यासाठी आणि त्याची चित्रे पाहण्यासाठी त्याच्या www.mouthart.com या वेबसाईटला भेट द्या.

मित्रांनो, डाउग लँडीस सारखीच इतर अनेक उदाहरणे देता येतील. त्यापैकी काही जगप्रसीद्ध व्यक्ती असतील तर काही तुमच्याच आजुबाजुला वावरणार्‍या मंडळींपैकी असतील. देवाने सर्वांनाच काही न काही अडचणी, आव्हाने दीलेली असतात. या अडचणी मुळातच आपली जडणघडण होण्यासाठी, अनुभवाच्या मुशीत तावुनसुलाखुन बाहेर पडण्यासाठी दीलेल्या असतात. म्हणुनच समोर आलेल्या अडचणींचा जितका फायदा घेता येईल तितका घ्या. आपल्यापेक्षाही कठीण परीस्थीतीत जगणार्‍या आणि तरीही हसत जगणार्‍या आसपासच्या अनेक लोकांना  शोधा, त्यांना आपले गुरु बनवा आणि त्यांच्याप्रमाणेच जगण्याचा प्रयत्न करा.

जाता जाता मला मिळालेल्या एका SMS मधील ही एक ओळ सांगतो,

"मला माझ्या मनासारखे बुट मिळाले नाहीत म्हणुन मी भर रस्त्यात रडत होतो. तेव्हा मला एक मुलगा दीसला ज्याला मुळात पायच नव्हते आणि तरीही तो हसत होता".

February 23, 2010

ईमेलचा IP address आणि त्यावरुन ईमेल पाठवीणार्‍या व्यक्तीच्या मुळस्थानाची माहिती मिळवा.


ईमेलचा IP address आणि त्यावरुन ईमेल पाठवीणार्‍या व्यक्तीच्या मुळस्थानाची माहिती कशी मिळवावी याबद्द्ल एका वाचकाने माझ्याकडे विचारणा केली होती. नेटभेटच्या इतर वाचकांच्या माहितीसाठी मी येथे एका लेखाच्या स्वरुपात याचे उत्तर देत आहे.

१. Gmail मध्ये आलेल्या ईमेलला ओपन करुन डाव्या बाजुला असलेल्या पर्यांयापैकी Show original हा पर्याय निवडा आणि आलेल्या स्क्रीप्ट मध्ये
 Recevied : from हा मजकुर सर्च करा.


२. खाली चित्रात दाखविल्याप्रमाणे एक IP Address दीसेल. हा IP Address ज्या संगणकावरुन ईमेल पाठविला गेला त्या संगणकाचा असतो.



३. http://www.ip2location.com/free.asp या साईटवर जाउन सदर  IP Address बद्दल अधिक माहिती मिळवता येते.


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Create Music from any website with codeorgan.


मित्रांनो आज एक अनोखी वेबसाईट पाहण्यात आली. या वेबसाईटचे नाव आहे Codeorgan. नाव जरा विचित्र आहे पण या नावाची फोड करुन पाहिले तर या साईटची कमाल लक्षात येईल. Code म्हणजे (HTML CODE) आणि Organ म्हणजे वाद्य.
लक्षात आलं का? ही वेबसाईट चक्क HTML Code पासुन संगीत तयार करते. कोडऑर्गनच्या मुख्य पानावर जाउन तेथे कोणत्याही वेबपेजची URL द्या आणि Play this website या बतणावर क्लिक करा. दीलेल्या वेबपेज पासुन संगीत तयार करण्यास काही सेकंद लागतील आणि त्यानंतर संगीत वाजु लागेल. (स्पीकर्स चालु ठेवायला विसरु नका.)


Codeorgan कसे काम करते ?

कोणत्याही वेबपेजमधील कोड (Html code) चा अ‍ॅनेलीसीस करुन त्यापासुन संगीत तयार केले जाते. यासाठी एक अतीशय गुंतागुंतीचे अल्गोरीदम असलेल्या सॉफ्टवेअरचा वापर केला जातो.

सर्वात आधी कोडऑर्गन HTML कोड स्कॅन करुन संगीत तालिके मधे (A to G) नसलेली अक्षरे काढुन टाकते. त्यानंतर उरलेल्या अक्षरांच्या मांडणीचा अभ्यास करुन त्या मांडणीच्या जवळपास जाणारी "नोट" शोधली जाते. एकुण अक्षरांच्या संख्येनुसार कोणता सिंथेसायझर वापरायचा ते देखील ही वेबसाईट ठरवते. संगीततालिकेतील अक्षरे आणि इतर अक्षरांच्या प्रमाणाअनुसार कोणता "ड्रम" वापरायचा ते ठरवीले जाते.
आणि या तीनही गोष्टींच्या सहाय्याने संगीताची एक धुन तयार केली जाते. ही असते तुम्ही दीलेल्या वेबसाईटची (किंवा ब्लॉगची) धुन.

संगीत आणि इंटरनेटचा असा सुंदर मिलाफ आणखी कोठे पहायला मिळेल?  आताच Codeorgan ला भेट द्या आणि आपल्या आवडत्या वेबसाईट्सच्या संगीताचा आनंद घ्या.


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

February 22, 2010

कंप्युटर चलाओ, मच्छर भगाओ


डास आणि घरमाश्यांचा त्रास नाही असे बहुदा एकही घर सापडणार नाही. मुंबईमध्ये तरी असे घर सापडणे कठीणच. डास मारण्यासाठी मिळणारी औषधे विकत घावी लागतात आणि ती देखील विषारी असतात. (त्यामुळे आजारापेक्षा ईलाजच महाग पडतो :-))
डास आणि घरमाश्यांवर एक सोपा आणि मोफत इलाज मी आज वाचकांना सांगणार आहे. मित्रांनो मी काही तुम्हाला एखादे केमीकल किंवा झाडपाल्याचे औषध सुचविणार नाही तर एका अशा सॉफ्टवेअरची माहिती देणार आहे जे चक्क डासांना पळवुन लावते. काय ! झालात ना अचंबीत !
डासांना दुर पळविण्यासाठी SEA Anti-Mosquitoes XP v2.0 आणि KP Anti-mosquitoes V1.0 अशी दोन सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत आणि मुख्य म्हणजे दोनही सॉफ्टवेअर्स मोफत उपलब्ध आहेत.
SEA Anti-Mosquitoes XP v2.0 

KP Anti-mosquitoes V1.0
आता पाहुया या सॉफ्टवेअर्सचे काम कसे चालते ते.
हे सॉफ्टवेअर एकदा चालु केले की १६००० Hz (हर्ट्झ) ते २०००० Hz  इतक्या वारंवारतेचा (Audio frequency) आवाज उत्पन्न करतात.  मानवी कर्णेंद्रीयांना जरी हा आवाज ऐकु येत नसला तरी डास, घरमाश्या, कीटक आणि अन्य प्राण्यांना हा आवाज ऐकु येतो. हा जास्त frequency चा आवाज डासांना सहन होत नाही आणि ते आवाजाच्या स्त्रोतापासुन  दुर जातात.
फक्त हे सॉफ्टवेअर व स्पीकर्स सुरु करा आणि निश्चींतपणे झोपी जा.
येथे क्लिक करुन ही दोनही सॉफ्टवेअर्स डाउनलोड करा.
(टीप - मी स्वतः ही दोनही सॉफ्टवेअर्स तपासुन पाहिली नाही आहेत याची कृपया नोंद घ्या.)


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Related Posts with Thumbnails