अंध भिकारी दिसला,बाबांनी त्याच्या वाडग्यात चांदीची नाणी टाकली. त्यांची इतरांना मदत करण्याची समाजसेवक वृत्ती या प्रसंगातूनच दिसून येते. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेऊन वर्धा येथे एक चांगले उत्पन्न मिळवून देणारा वकिली व्यवसाय सुरु केला होता. आपल्या कुटुंबातील अपार संपत्ती आणि राहत्या चंद्रपूर तालुक्यातील ग्रासलेली गरीबी पाहून त्यांना धक्का बसला. हे न बघवल्याने त्यांनी आपल्या संपूर्ण मालमत्तेवर पाणी सोडले आणि सफाई कामगार तसेच मैला वाहून नेणारे कामगार इत्यादिंसोबत काम करण्यास सुरुवात केली. एकदा बाबांनी कोसळत्या पावसात थंडीने कुडकुडणारा एक कुष्ठरोगी पाहिला , त्याचे शरीर बाबांच्याने बघवले नाही ते त्याला तडक आपल्या घरी घेऊन आले आणि तेव्हापासून त्यांचे कुष्ठरोगावरील संशोधन सुरु झाले.. त्याकाळी कुष्ठरोग म्हणजे मागील जन्मीच्या पापाची बाधा अशी समजूत होती.
त्यांच्या पत्नी म्हणजेच पुर्वाश्रमीच्या साधनाताई गुळेशास्त्री यांना बाबांनी एका लग्न समारंभात वयस्कर नौकराच्या मदतीला लग्न समारंभ सोडून धावून जाताना पाहिले आणि बाबांनी साधनाताईंची हिच मदत करण्याची वृत्ती भावली. तो प्रसंग पाहिल्यावर त्यांना असे वाटले की हीचीच आपण आपली पत्नी म्हणून निवड करावी. म्हणून त्यांनी साधनाताईंच्या आईवडिलांकडे त्यांना मागणी घातली आणि त्यांच्या घरच्यांनीही लग्नाला चटकन होकार दिला व अशा रितीने त्यांचे १९४६ साली लग्न झाले.
त्यांनी आनंदवनात देखील अनेक छोट्या संस्था प्रस्थापित केल्या. तेथील कुष्ठरोग्यांना विविध व्यवसाय सुरु करुन दिले.कुष्ठरोग्यांच्या करमणुकीसाठी त्यांनी अनेक वाद्यवृंद, संगीताचे कार्यक्रम देखील राबविले आणि ते आजही त्याच उत्साहाने आणि त्याच जोमाने राबविले जातात.बाबांना कला क्षेत्रात निपुण असलेल्यांसाठी आनंदवनातच कलेचे दालन उघडे करून दिले. अशा हस्तकौशल मंडळींसाठी त्यांनी विविध प्रकारच्या कार्यशाळा भरवल्या.त्यामुळे शिल्पकाम, चित्रकला यांसारख्या कलांमध्ये रसिकता असलेल्यांना त्यांच्या कलेला वाव तर निर्माण झालाच शिवाय स्वंयंरोजगाराचे साधन ही उपलब्ध झाले. बाबा म्हणायचे, "सुख जर वाटलं नाही तर ते संपून जातं" म्हणून त्यांनी नेहमी सुख वाटलं पण दुख कधीच वाटलं नाही. सगळ्यांच्या सुखासाठी झटले बाबा, पण आपल्या सुखाची तमा बाळगली नाही.
बाबांनी २ 'भारत जोडो' चळवळींची स्थापना केली.पहिली भारत जोडो चळवळ म्हणजे १९८५ सालची काश्मीर ते कन्याकुमारी आणि दुसरी १९८८ सालची आसाम ते गुजरात. या दोन्ही चळवळी स्थापन करण्यामागे शांतता आणि पर्यावरणविषयक जागरुकता ही मुख्य उद्दीष्टे होती. तसेच त्यांनी नर्मदा बचाव आंदोलन, सरदार सरोवर आंदोलन आणि वन्य जीवन संरक्षण यांसारख्या इतर काही चळवळींमध्येही सक्रियरित्या भाग घेतला. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मिळालेल्या असंख्य पुरस्कारांच्या विक्रीतून आलेले जवळपास १५०० लाखाहूनही आधिक रक्कम आनंदवन या त्यांच्या संस्थेलाच देण्यात आली. बाबांनी स्वतःसाठी काहीच केले नाही जे काही केले ते समाजासाठी केले. आपल्या गर्भश्रीमंतीला लाथाडून समाजासाठी अहोरात्र झटणारा असा एखादा माणूस आपल्याला कदाचितच बघायला मिळेल.समाजसेवे साठीच बाबा झटले आणि अखेरच्या श्वासापर्यंत समाजसेवाच करत राहीले. त्यांच्या कर्तबगारीची आणि कार्याची दखल फक्त भारतातीलच नव्हे तर इतर देशांतील बर्याच समाजसेवक संस्थांनी आणि बड्या मंडळींनी घेतली.
रॅमन मॅगसेसे पुरस्कार- डेमियन डट्टन पुरस्कार, अमेरिका - १९८३ .कुष्ठरोग्यांप्रीत्यर्थ कार्यासाठी दिला जाणारा अत्युच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार .
- संयुक्त राष्ट्रे यांचा मानवी हक्क पुरस्कार १९९८
- आंतरराष्ट्रीय जिराफे पुरस्कार, अमेरिका १९८९
- टेंपल्टन् बहुमान,अमेरिका (मानवतावादी कार्यासाठी) १९९०
- पर्यावरण विषयक कामासाठी संयुक्त राष्ट्रे यांचा रोल ऑफ ऑनर १९९१
- पर्यावरणासंबंधीचा ग्लोबल ५०० पुरस्कार १९९१
- राईट लाईव्हलीहूड अवार्ड, स्वीडन - १९९१. (पर्यायी नोबल पुरस्कार) (नर्मदा बचाव आंदोलनासाठी, मेधा पाटकर यांच्या सोबत संयुक्तपणे).
- पद्मश्री १९७१
- पद्मविभूषण १९८६
- अपंग कल्याण पुरस्कार १९८६
- महाराष्ट्र सरकारचा सावित्री बाई फुलॆ पुरस्कार १९९८
- गांधी शांतता पुरस्कार १९९९
- सामाजिक सुधारणांसाठीचा डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार १९९९
- महाराष्ट्र भूषण पुरस्कार २००४ (महाराष्ट्र सरकार चा सर्वोच्च सन्मान) १-मे-२००५ रोजी त्यांना आनंदवन येथे देण्यात आला.
- मध्य प्रदेश सरकारचा इंदिरा गांधी पुरस्कार १९८५
- पहिला जी. डी. बिर्ला पुरस्कार १९८६
- महाराष्ट्र सरकारचा दलित मित्र पुरस्कार १९७४
- राष्ट्रीय भूषण पुरस्कार १९७८
- जमनालाल बजाज पुरस्कार १९७९
- एन डी दिवान पुरस्कार १९८०
- राजा राम मोहनराय पुरस्कार १९८७
- भरतवास पुरस्कार २००८
- जी डी बिर्ला अंतरराष्ट्रीय पुरस्कार १९८८
- महाराष्ट्र सरकारचा आदिवासी सेवक पुरस्कार १९९१
- कुमार गंधर्व पुरस्कार १९९८
- जस्टिस् कॆ एस हॆग्डॆ पुरस्कार, कर्नाटक १९९८
- गौरव डि.लिट् - नागपूर विद्यापीठ १९८०
- गौरव डि.लिट् - पूणे विद्यापीठ, १९८५-८६
- देशिकोत्तम (गौरव डॉक्टरेट) १९८८ -विश्वभारती,शांतीनिकेतन, पश्चिम बंगाल
- 'ज्वाला आणि फुले' - कवितासंग्रह
- 'उज्ज्वल उद्यासाठी' (काव्य)
- 'माती जागवील त्याला मत'
- "माणुस माझं नाव" या बाबांनी लिहिलेल्या आणि आनंदवनातील मुलांनी गायलेल्या कवितेचा व्हिडीओ
सदर लेख नेटभेट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या "मराठी भाषा दिवस" या स्पर्धेसाठी श्री. प्रथमेश सुरेश शिरसाट, डोंबिवली यांनी पाठविला आहे.










