May 31, 2010

MS-Office (Microsoft Xp) वापरताना Unicode fonts सुस्पष्टपणे दिसत नाहीत ?

मायक्रोसोफ्ट ऑफीसमध्ये युनिकोड फाँट्स मधील मराठी दिसत नाही म्हणून बरेच जणांनी मला शंका विचारली होती. त्यांचे म्हणणे होते की ते ग म भ न, क्विलपॅड किंवा बरह वर  लिहीलेले त्यांनी जेव्हा कॉपी  मायक्रोसोफ्ट वर्डमध्ये किंवा ओपनऑफिसमध्ये पेस्ट केले तर चौकोन चौकोन दिसतात कारण त्या फॉण्ट्स Unicode म्हणजेच UTF8 किंवा Open type या प्रकारातल्या असतात. मग मी सुद्धा माझ्या संगणकावर हे आजमावून पाहिले आणि मलासुद्धा तसाच अनुभव आला. कदाचित तुम्हालाही तो आला असेल. काहीसे खाली दाखवल्याप्रमाणेच चित्र तुम्ही कधीतरी नक्कीच पाहिले असेल.

 या समस्येवर तोडगा अतिशय साधा, सरळ आणि सोपा आहे. आधी आपण फाँट या प्रकाराबद्दल थोडी तांत्रिक माहिती घेऊया. मुख्यत्वे फॉण्ट्स या ३ प्रकारात मोडतात.
एक म्हणजे Open Type,  True Tupe आणि तिसरी All res. Open type या प्रकारतल्या फॉण्ट्स तुम्हाला जगातल्या कोणत्याही संगणकावर गेलात तरी तशाच दिसतील ( कारण प्रत्येक Operating system मध्ये त्या मुळतः म्हणजेच by default installed असतात) आणि म्हणूनच आपल्याला Arial, Times of Roman, Monotype या आणि यांसारख्या अनेक फॉण्ट्स मायक्रोसोफ्ट ऑफीसमध्ये दिसतात. खरं तर त्या फॉण्ट्स या आपल्या Operating system च्याच असतात( by default). या ऊलट Shivaji, Kruti, Simplified arabic या आणि यांसारख्या इतर काही फॉण्ट्स दिसतील त्या आपल्याला बाहेरून Download करुन Install कराव्या लागतात आणि महत्त्वाची बाब म्हणजे सम्जा तुम्ही जर एखादी फाईल Shivaji फॉण्ट वापरून तुमच्या काँप्युटरवर बनवली आणि दुसर्‍या एखाद्या काँप्युटरवर (ज्यात shivaji फॉण्ट नाही अशा कॉप्युटरवर) उघडली तर काही चिन्ह दिसतील तुम्हाला.
आता या फॉण्टस असतात कूठे ते बघुया. Start ----------> Control Panel (कंट्रोल पेनेलला आल्यावर तुम्हाला Switch to classic view हा डाव्या बाजूला उपलब्ध असलेला पर्याय निवडावा लागेल) ----------> Fonts नावाचे फोल्डर उघडा त्यात तुम्हाला फॉण्ट्स दिसतील.

यातील O चिन्ह असलेल्या फाईल्स या Open type fonts आहेत (लिहिताना जरी तुम्हाला तिकडे True type असे दिसले तरी त्या open type च्याच फॉण्ट्स आहेत, तुम्ही जर त्या फाईल उघडून बघीतल्या तर तुम्हाला Open type असे स्पष्ट लिहीलेले दिसेल), T  चिन्ह असलेल्या फाईल्स या True type fonts आहेत आणि उरलेल्या A चिन्ह असलेल्या फाईल्स या All Res या आहेत.
असो तर हे झाले फॉण्टपुराण. आता आपण आपल्या मुळ मुद्द्यावर येऊया. Open type फॉण्ट या सर्व Operating system मध्ये मूळतःच installed असतात पण दुखा:ची गोष्ट अशी की आशिया खंडातील तसेच इंडोनेशियातील भाषा  XP या ऑपरेटींग सिस्टम by defualt इंस्टॉल करत नाही. त्या आपल्याला customize करून Install कराव्या लागतात . आपण या आशिया खंडातील तसेच इंडोनेशियातील भाषा  कशा install करायच्या ते क्रमाक्रमाने  बघुया.
सर्वांत आधी तुम्हाला Start या बटणावर क्लिक करुन Control Panel मध्ये जावे लागेल.

त्या नंतर Control Panel ची विंडो उघडेल तुमच्यासमोर.

त्यातून तुम्हाला Date, Time, Language, and Regional Options हा पर्याय निवडा, तुम्ही पुन्हा नवीन विंडोमध्ये याल







Regional and Language options हा पर्याय निवडा. तुमच्या समोर एक विंडो उघडेल. त्यातून Languages या टॅबवर क्लिक करा. नंतर खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे आधी पहिल्या चेकबॉक्समध्ये टीक करा , लगेचच तुम्हाला दुसरी एक छोटी विंडो दिसेल तिकडे OK या बटणावर क्लिक करा.
 अशाच प्रकारे तुम्हाला दुसर्‍या चेकबॉक्समध्ये सुद्धा बरोबरची खूण करायची आहे बरं का ! मग पुन्हा वर जशी एक विंडो उघडली तशीच दुसरी विंडो उघडेल तिकडे सुद्धा OK या बटणावर क्लिक करा आणि नंतर मुख्य विंडोतील Apply या बटणावर क्लिक करा.
 तुमच्या समोर आता एक नविन छोटी विंडो उघडेल त्यात तुम्हाला सांगितले जाईल की तुमच्या संगणकावर इंस्टॉल्ड असलेल्या XP ची CD टाका म्हणून (आता तुम्ही XP चि नक्की कोणती आवृत्ती Install केली आहे त्याच आवृत्तीची CD तुम्हाला CD ROM मध्ये टाकावी लागेल) तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेली XP ची CD संगणकाच्या CD ROM मध्ये टाका आणि OK या बटणावर क्लिक करा.
OK या बटणावर क्लिक केल्यावर, तुम्हाला विविध प्रकारच्या फाईल्स CD तून संगणकामध्ये कॉपी होताना स्पष्टपणे दिसतील. 




आपोआपच सगळ्या फाईल्स कॉपी होतील आणि संगणक Restart करायला सांगणारी एक छोटी नविन खिडकी दिसेल तुम्हाला, मग तुम्ही तुमचा  PC Restart करा.
आणि आता बिनधास्त होऊन गमभन, बरह किंवा क्विलपॅड वर लिहा आणि तो मजकूर वर्ड काय कुठल्याही Offiec Suite मध्ये कॉपी केलात तरी तो तुम्हाला अगदी ठसठशीत दिसेल. 




तुम्ही या मराठी युनिकोड फॉण्ट्सने तयार केलेली कुठलिही Office suite मधील फाईल जर दुसर्‍या कोणत्याही संगणकावर उघडायला जाल तर त्या संगणकावार आधी अशा प्रकारे मराठी फॉण्ट्स install आहेत की नाही हे पडताळून पहा बरं का....

फॉण्ट डिस्प्लेयींगचा प्रोब्लेम कसा सोडवावा या बाबतची माहिती देणारा हा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कळवा, तसेच आपल्या प्रतिक्रिया, सुचना, इत्यादी देखील आमच्यापर्यंत पोहोचू द्या मंडळी....




Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

May 30, 2010

"सोशल मेडीया" - एका क्रांतीची सुरुवात


  • जगातील ५०% पेक्षा अधिक लोकांचे सरासरी वय तीस वर्षांहुन कमी आहे आणि त्यापैकी ९६% लोकांनी एकातरी सोशल नेटवर्कवर नोंदणी केली आहे.
  • युनायटेड स्टेट्स मध्ये दर आठवड्याच्या ऑनलाईन ट्रॅफीकचा अभ्यास केल्यावर असे लक्शात येते की गुगल वापरणार्‍यांपेक्षा फेसबुक वापरणार्‍या नेटीझन्सची संख्या जास्त आहे.
  • पुर्वी इंटरनेटचा सर्वाधिक वापर सेक्सविषयक वेबसाईट्स (Porn) पाहण्यासाठी केला जात असे मात्र सोशल नेटवर्कींगने त्यावरही मात केली आहे.
  • iphone साठी बनविलेल्या अप्लिकेशन्सची संख्या केवळ नऊ महिन्यांच्या कालावधितच १ अब्ज इतकी झाली आहे.
  • गेल्या वर्षी फेसबुक वापरणार्‍यांच्या संख्येत २०० दशलक्ष वापरकर्त्यांची भर पडली. फेसबुक हा जर एक देश असता आणि फेसबुक वापरकर्ते हे त्या देशाचे नागरीक आहेत असे गृहीत धरले तर फेसबुक हा जगातील तिसरा सर्वात मोठा देश झाला असता. म्हणजे फक्त भारत आणि चीन पेक्षा मागे आणि युनायटेड स्टेट्सच्याही पुढे.
  • जगभरातील ८०% कंपन्या भरतीसाठी (Recruitment) सोशल मिडियाचा वापर करतात आणि त्यापैकी ९५% कंपन्या यासाठी linkedIn या सर्वात मोठ्या प्रोफेशनल सोशल नेटवर्कचा वापर करतात.
  • मोबाईल द्वारे इंटरनेट वापरापैकी (Mobile internet traffic) ५०% वापर फेसबुक अपडेट्स करण्यासाठी केला जातो. लोक कधीही व कोठुनही फेसबुक अपडेट्स करतात. जर ग्राहकाला एखाद्या उत्पादनाचा किंवा सर्वीसचा वाईट अनुभव आला तर लगेचच फेसबुक किंवा ट्वीटरवर सांगितला जातो. विचार करा कंपन्यांसाठी किती मोठे नुकसान किंवा धोका आहे.
  • email  वापरणे हा प्रकार आता जुनाट मानला जाउ लागला आहे. नव्या पिढीला twitter, Buzz, google wave, BBM हे प्रकार जवळचे वाटतात.
  • गुगलच्या पाठोपाठ सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन कोणते आहे माहित आहे का? ऐकुन कदाचित आश्चर्य वाटेल तुम्हाला ! युट्युब हे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्च इंजिन आहे. तुम्ही हा लेख वाचत आहात तोपर्यंत युट्युबवर १०० तासांहुन अधिक कालावधीचे व्हीडीओज अपलोड झालेले असतील.
  • सुमारे २००,०००,००० ब्लॉग्ज आतापर्यंत नेटीझन्सने बनविले आहेत.
  • विकीपेडीया या जगातील सर्वात मोठ्या मोफत ज्ञानकोषामध्ये १५ दशलक्ष लेख आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापैकी ७८% लेख इंग्रजेतर भाषेतील आहेत. विकीपेडीयावर प्रकाशित झालेल्या प्रत्येक लेखासाठी जर १ डॉलर तुम्हाला दिला तर एका तासात तुम्ही १५६.२३ डॉलर्स कमवाल.
  • जगातील २० सर्वोत्तम ब्रँड्स बद्दल सर्च केल्यानंतर मिळणार्‍या माहितीपैकी २५% माहिती वाचकांनी लिहिलेली (User generated content) असते. म्हणजेच ब्रँड्सबद्दल वाचकांची सोशल मिडीयामधील मते ही त्या ब्रँडचे  यशापयश ठरवण्यात महत्त्वाची भुमिका पार पाडतात.
  • ३४% ब्लॉगर्स त्यांनी वापरलेल्या उत्पादनांबद्दल आणि सेवांबद्दल आपली मते आपल्या ब्लॉग्जमध्ये प्रकट करतात. ७८% ग्राहक एखादे उत्पादन व सेवा विकत घेण्याआधी सोशल नेटवर्क्स्मधील त्यांच्या मित्रांचा सल्ला घेणे पसंत करतात. जाहिराती पाहुन खरेदी करणार्‍यांची संख्या केवळ १४% इतकी आहे.
  • जगातील २५ मोठ्या वर्तमानपत्रांपैकी २४ वर्तमानपत्रांचा खप गेल्या काही वर्षांपासुन कमी होत चालला आहे. कारण बातम्यांचा मुख्य स्त्रोत म्हणुन इंटरनेटचाच वापर केला जात आहे.
  • पुर्वी एखादी खरेदी करावयाची असल्यास आपण त्याबद्दल माहिती शोधायचो आता मात्र उत्पादक स्वतःच आपल्याला शोधतात. आपण कोणत्या गोष्टींबद्दल सर्च करतो, इंटरनेटवर काय वाचतो आणि किती वेळ वाचतो, कशाबद्दल चर्चा करतो, कोणत्या जाहिरातींवर क्लिक करतो, सोशल मिडीयामध्ये कशाबद्दल बोलतो या सार्‍यांचा बारकाईने अभ्यास केला जात असतो. आपल्याला दिसणार्‍या जाहिराती, ईमेल्सद्वारे येणारी जाहिरातींची पत्रके हे सारे अशाच अभ्यासाचे फलित आहे.
मित्रांनो, वरील सर्व माहिती वाचुन अचंबीत झालात ना ! मी पण असाच अचंबीत झालो होतो. मात्र इथे ही माहिती देण्याचा उद्देश फक्त काही आश्चर्यचकीत करणारी आकडेवारी देण्याचा नाही आहे. इथे मला सांगायचं आहे की इंटरनेट आता Mature झाला आहे. आणि माहिती मिळवण्याच्या, संवाद साधण्याच्या जुन्या पद्धतींमध्ये एक अमुलाग्र बदल इंटरनेट मुळे होत आहे. सोशल मिडीयाकडे केवळ एक फॅड म्हणुन जर तुम्ही पाहत असाल तर ती घोडचुक आहे हे मला सांगायचं आहे.

इमेल चेक करणे, ePaper वाचणे, सकाळी ऑनलाईन राशीभविष्य वाचणे, झालंच तर ऑनलाईन कथा, कविता किंवा साहित्य वाचणे एवढाच इंटरनेटचा उपयोग जर तुम्ही करत असाल तर तुम्ही एका मोठ्या देणगीला मुकत आहात हे लक्षात असुद्यात. अर्थात आताशा इंटरनेटचा वापर इतक्या मर्यादित स्वरुपात करणार्‍या वाचकांची संख्या जास्त नाही आहे (अशी मला आशा आहे). सोशल नेटवर्कींग, ऑर्कुट, बझ्झ, वेव्ह, ट्वीटर, फेसबुक, linkedin, Hi5 वापरणार्‍यांची संख्या वाढते आहे ही आनंदाची बाब आहे. मात्र मला माझ्या सर्व वाचकमित्रांना सांगावेसे वाटते की एक ग्राहक आणि एक विपणक (Marketing) या दृष्टीकोनातुन सोशल नेटवर्क्सकडे पहायला सुरुवात करा. एक वेगळेच जग या सोशल नेटवर्कींगच्या आड लपलेले आहे हे तुम्हाला दिसू लागेल. आणि हे जग अधिक interesting आहे हे देखिल तुमच्या लक्षात येईल.

ब्लॉग म्हणजे एक जबरद्स्त मार्केटींग टूल आहे, ट्वीटर, ऑर्कुट, फेसबुक या सर्वांचा मार्केटींगसाठी कसा उपयोग केला जातोय?, कंपन्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल नेटवर्क्सचा कसा वापर करत आहेत हे नीट अभ्यासायला सुरुवात करा. युरोपातील औद्योगीक क्रांतीनंतर जग बदलले होतं आता या सोशल नेटवर्कींग क्रांतीमध्येही जग बदलवण्याची ताकद आहे हे लक्षात घ्या. आणि जग बदलताना पाहण्यापेक्षा या बदलाचा भाग बना.
ब्लॉग्जमध्ये विविध उत्पादनांचे paid reviews लिहिले जातात, कंपनीसाठी ट्वीटींग, ब्लॉगींग करणार्‍या Social media experts ना नोकर्‍या दिल्या जात आहेत. डेल कंपनीने केवळ ट्वीटरच्या माध्यमातुन करोडो रुपयांची उलाढाल केली आहे. ट्वीटर, फेसबुक, ऑर्कुटमधील आपल्या प्रोफाईलवरील जागा जाहिरातींसाठी विकली जात आहे. आनंद महिंद्रांसारखे प्रथितयश उद्योजक ट्वीटरद्वारे आपल्या ग्राहकांशी थेट संवाद साधत आहेत. बघा आपल्या आजुबाजुची ऑनलाईन दुनिया कशी व्यवसायात रमली आहे. आपण मात्र सोशल नेटवर्कींग एक फॅड किंवा थोडा विरंगुळा म्हणून वापरत आहोत.

मुद्दा हा की इंटरनेट म्हणजे बिझनेस, इंटरनेट म्हणजे पैसा कमावण्याचे एक प्रमुख साधन ही इंटरनेटची नविन व्याख्या आपण लवकरात लवकर आत्मसात केली पाहिजे. इंटरनेटवर चहुबाजुला व्यवसायाच्या अमर्याद संधी आहेत, डोळसपणे त्यांच्याकडे पहायला सुरुवात केली पाहिजे.

जर हा लेख तुम्ही स्वतःच्या घरामधील संगणकावर वाचत असाल तर (म्हणजे तुमच्याकडे घरी संगणक आणि इंटरनेट आहे ) आपण योग्य वेळी योग्य जागी आहोत याबद्दल देवाचे आभार माना.  कोणत्याही मोठ्या भांडवलाशिवाय करता येण्याजोग्या ऑनलाईन व्यवसायाच्या संधी शोधायला आजच सुरुवात करा. आतापर्यंत झालं ते झालं, यापुढे इंटरनेट क्रांतीमध्ये आपण कोणत्याही परीस्थीतीत मागे रहायचं नाही.

जाता जाता Gary Hayes ( Personalize Media ) या Social media expert ने बनविलेले हे infographic नजरेखालुन घालण्यास विसरु नका. सोशल मेडीयाचा आवाका जितका जास्त वाढतोय तितकाच त्याचा वेगही जास्त आहे. दर सेकंद, मिनीट, तासाला सोशल मिडीया कमालीचा पुढे जातोय. दहा मिनिटे या लेखाचा tab तसाच ठेवुन परत या आणि पहा गेल्या दहा मिनिटात काय घडले आहे ते.


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

May 27, 2010

नेटभेट ई-मासिक मे २०१०


मराठीमध्ये सातत्याने आणि वैविध्यपुर्ण लेखन करणार्‍या मराठी ब्लॉगर्समुळे ऑनलाईन मराठीचं विश्व समृद्ध होत आहे. नेटभेट.कॉम आणि नेटभेट ई-मासिकाद्वारे आम्ही देखिल यात खारीचा वाटा उचलतो आहे ही आमच्यासाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. नेटभेट ई-मासिकाला ब्लॉगर्स आणि जगभरातील मराठी वाचकांचे जे प्रेम लाभते आहे त्याचा आनंद तर केवळ अवर्णनीय ! एका वाचकाने "लहानपणी जशी "चांदोबा"ची वाट पहायचो तशीच आता नेटभेटची वाट पाहतो" असा अभिप्राय ईमेलद्वारे दिला तेव्हा आम्ही करत असलेल्या कष्टाचे चीज झाले असे वाटले.

नेटभेट ई-मासिकाचा मे २०१० चा अंक आम्ही आज प्रकाशित करत आहोत. अनेक अर्थांनी यंदाचा अंक आमच्यासाठी "स्पेशल" आहे. या महिन्यातच दादर येथे मराठी ब्लॉगर्सचा स्नेहमेळावा संपन्न झाला. महेंद्र कुलकर्णी, रोहन चौधरी आणि कांचन कराई यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये अर्थाअर्थी एकमेकांशी काहिही संबंध नसलेल्या आणि तरीही एका कुटुंबातील सदस्य वाटावेत इतक्या आपुलकिने वागणार्‍या ब्लॉगर्सनी प्रचंड प्रतीसाद दिला. मराठी ब्लॉगर्स आता संघटीत होऊन नवनिर्माणाच्या दिशेने पाउले टाकत आहेत हे पाहुन अतिशय आनंद झाला. अनेकांनी नेटभेट ई-मासिकाची संकल्पना त्यांना आवडल्याचे सांगुन आम्हाला अधिक प्रोत्साहित केले.

नेटभेट ई-मासिकाच्या या अंकातील आणखी एक स्पेशल गोष्ट म्हणजे प्रथितयश कॉर्पोरेट लॉयर आणि मराठी भाषिक तरुणांमध्ये उद्योजकता वाढीस लागावी यासाठी वर्तमानपत्रात व आपल्या ब्लॉगमध्ये लेखन करणारे श्री. नितीन पोतदार यांच्या ब्लॉगवरील लेख नेटभेटच्या या अंकात समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच मासिकाच्या जून २०१० च्या अंकामध्ये नितीन सर मराठी तरुणांसाठी आपल्या खास शैलीत मार्गदर्शन करणार आहेत.



नेटभेटच्या ईतर अंकांप्रमाणे मे २०१० हा अंक देखिल वाचकांच्या खास पसंतीस उतरेल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद.
सलिल चौधरी व प्रणव जोशी

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

May 20, 2010

ऑर्कुटवर गिरवुया प प पब्लिसिटीचा.......

शीर्षक वाचून धक्का बसला असेल ना ! तुम्ही विचार कराल की हा काय बडबड करतोय.
अ आ इ... ही बाराखडी तर आपण बालपणीच शिकलोय आता हा काय नवीन सांगतोय ! तुमचं म्हणणं खरं आहे मंडळी. पण मला या लेखासाठी हेच शीर्षक योग्य वाटलं (अर्थात ते योग्य की अयोग्य तुम्हीच ठरवा). आपल्यापैकी बर्‍याच जणांना आपण केलेले कार्य (उदाहरण द्यायचंच झालं तर आपला ब्लॉग/ किंवा एखादी साईट/ एखादा फोटो किंवा Youtube वर आवडलेला एखादा व्हिडीयो इत्यादि), मग तुम्ही तयार केलेले चित्र म्हणा किंवा कविता, लेख तुम्हाला आवडलेले असेही काही, इत्यादी तुमच्या मित्र मैत्रिणीपर्यंत पोहोचावे आणि त्यांनीही आपली दखल घ्यावी किंवा त्यांनीही त्याचा प्रचार आणि प्रसार करावा असं नक्कीच वाटेल असेल हो की नाही.
आता तुम्ही म्हणाल त्यात काय आम्ही ई मेल करू मित्र मैत्रिणींना ती माहिति देण्यासाठी बरोबर. पण असे किती जणांचे आयडीज तुम्ही पत्ता वही ( Address Book ) मध्ये साठवणार बरं  आणि किती जणांना तोच मेल पुन्हा पुन्हा फोरवर्ड करत राहणार. या आणि अशाच अनेक प्रकरच्या समस्या आपल्याला भेडसावतात.
या प्रश्नांना कायमचे उत्तर मिळाले आहे मला. आपल्यालाही ते माहित असेल कदाचित तरी पण माहिती म्हणून मला ते येथे नमूद करावेस वाटते. आपल्यापैकी बरीच मंडळी ऑर्कुट वापरतात. हल्ली ही सोशियल साईट वापरणे हे काही नविन नाही. पण याच सोशियल साईटद्वारे आपल्याला जाहिराती करता येतात.
आपण बघुया की ऑर्कुटद्वारे आपण कशी जाहिरात करु शकतो ! ते ही अगदी चकटफू पद्धतीने आणि तुम्ही एकदा orkut promote केले की तुमचे काम संपले. पुढचे काम तुमच्या ऑर्कुट परिवारातल्या  व्यक्तिंना (Friends) तुम्ही केलेला प्रचार आवडला तर
मी आपल्या साईटचा म्हणजेच Netbhet.com चा प्रचार आणि प्रसार कसा केला ते दाखवणार. तुम्ही जेव्हा ऑर्कुट अकाऊंटमध्ये लॉगिन होता त्या वेळी तुमच्या डाव्या हाताला खाली म्हणजे  profile,Scrapbook,photos असे लिहिलेले असते. तिथे promote या नावाचा एक पर्याय दिसेल. त्याच्यावर क्लिक करा.

promote या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमचे orkut चे मुख्यपान (Home Page ) काहीसे असे दिसेल. आपोआपच तुम्ही create promotion च्या पानावर येऊन पोहोचाल. लेख जास्त लांबू नये या साठी मी ते पान कसे भरायचे आणि भरून झाल्यावर कसे दिसेल हे एकाच चित्रात दाखवले आहे. तुम्ही तुमची कल्पकता वापरून तुम्हाला जसे सुचेल त्याप्रमाणे शीर्षक( title), प्रतिक्रिया (comments) आणि मसुदा/ मथळा (contents) लिहू शकता. मी माझ्या कल्पकतेने प्रमाणे नेटभेट. कॉम ची जाहिरात आणि माहिती संक्षिप्त स्वरुपात लिहीली आहे. यात text, image आणि Youtube वरील व्हिडीओ/ ऑडिओ या प्रकारांत मोडणारे काहीही तुम्ही Advertise करु शकता.
तुमची Ad म्हणजेच निवडणूकीच्या भाषेत सांगायचे झाले तर प्रचारफलक कसा दिसेल ते बाजूलाच दिसेल. सगळी माहिती भरून झाल्यावर तुम्ही create promotion या बटणावर क्लिक करा, की झाली तुमची जाहिरात तयार !!! आता ही तयार झालेली जाहिरात तुमच्या प्रोफाईलमधील मंडळींना दिसू लागेल.

त्या advertisement चा नक्की प्रचार कसा होईल आणि आपल्या जहिरात किती जणांपर्यंत पोहोचली हे कसे बघायचे ते बघुया. त्यासाठी तुम्हाला My promotion हा पर्याय निवडावा लागेल. हा पर्याय Create Promotion च्या बाजूलाच असतो. My promotion या पर्यायाचा उपयोग तुमच्या आधी तयार केलेल्या जाहिरातींमध्ये काही फेरबदल करु शकता किंवा एखादी आधीची जहिरात काढूनदेखील टाकू शकता म्हणजेच Delete करु शकता.

 तुमच्या प्रोफाईलमधील किती  व्यक्तींना ही जाहिरात दिसली, किती मंडळींनी त्यावर क्लिक केले, किती जणांनी ती प्रोमोट केली आणि किती जणांना ती आवडली नाही याचा आराखडा देखील तुम्हाला पाहता येईल. आता माझ्या प्रोफाईलमधील एका सभासदाने आपल्या साइटची मी तयार केलेली जाहिरात प्रोमोट केली आहे म्हणूनच तिचे नाव आणि promotion या भागात तिचा सहभाग झालेला दिसतंच असेल तुम्हाला.  तिला आपल्या साईटचा हा उपक्रम आवडला आणि तिने वर दाखवल्याप्रमाणे cool, promote it! या बटणावर क्लिक केले.( हे बटण आता तुम्हाला जरी inactive दिसत असले तरी तुमच्या प्रोफाईलव्यतिरिक्त, तुमच्या प्रोफाईलमधील सदस्यांना ते जेव्हा जाहिरात स्वरुपात दिसते तेव्हा हे बटण एक्टीव असते बरं का !).


चला तर मित्रहो आजच आपल्या कार्याची माहिती द्या ऑर्कुटवर आणि फुकट पब्लिसिटी मिळवा :).
आणि हो हा लेख कसा वाटला त्याबद्दल आपल्या प्रतिक्रियादेखील मला नक्की कळवा बरं का !!!
काही सूचना असतील तर त्या देखील आमच्यापर्यंत पोहोचू द्या...

प्रथमेश शिरसाट       www.lekhaankan.co.cc/prathmesh.shirsat@gmail.com

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

May 13, 2010

"गुगल अ‍ॅडसेन्स - मराठीसाठी मराठीतुन" (लेखमालिका - भाग सहावा)


ब्लॉगरमित्रहो, अ‍ॅडसेन्सबद्दलच्या आपल्या लेखमालिकेमधील पाचव्या लेखात आपण अ‍ॅडसेन्समध्ये दाखविल्या जाणार्‍या जाहिरातींचे आकारानुसार आणि चित्र अथवा शाब्दिक जाहिरात या प्रकारानुसार होणारे वर्गीकरण याबद्दल माहिती घेतली. आज या लेखात आपण ब्लॉगर.कॉम वरील ब्लॉग्जमध्ये अ‍ॅडसेन्स जाहिराती कशा दाखवाव्यात हे पाहणार आहोत.

ब्लॉगर.कॉम वरील ब्लॉग्जमध्ये अ‍ॅडसेन्सवरील जाहिराती दाखविण्यासाठी दोन पद्धती आहेत. पहिल्या व सोप्या पद्धतीमध्ये आपण ब्लॉगर.कॉम मध्येच जाहिरात बनवणार आहोत. तर दुसर्‍या पद्धतीत Adsense.com मध्ये जाहिराती तयार करुन त्याचा कोड ब्लॉगवर चिकटवणार आहोत.

१. पहिली पद्धत - पहिल्या पद्धतीमध्ये दोन उपप्रकार आहेत.


A.  ब्लॉगच्या Sidebar मध्ये जाहिराती दाखविण्यासाठी -

1. Blogger.com मध्ये लॉग-इन करा.
2. त्यानंतर ब्लॉगच्या Dashboard मध्ये जाऊन Edit html व Page element मध्ये जा.
3. येथे Add a gadget या लिंकवर क्लिक केल्यावर Gaadgets ची एक यादी दिसु लागेल.


4.  या यादीमध्ये Adsense  चे Gadget देखिल असेल त्यावर क्लिक करा.
5. Configure adsense या नावाची एक विंडो उघडेल यामध्ये जाहिरात ब्लॉगवर दाखविण्यासंबंधी काही पर्याय दिसतील, त्याची माहिती खालीलप्रमाणे -
Format   -  येथे जाहिरातीचा  आकार निवडता येतो तसेच जाहिरात फक्त शब्द किंवा शब्द आणि चित्रे या प्रकारात असावी हे ठरवता येते.
Colors - ब्लॉगच्या थीमला साजेशी जाहिरातीची रंगसंगती येथे ठरवता येते. अ‍ॅडसेन्स जाहिरातींच्या काही ठराविक थीम्सपैकी थीम निवडता येते तसेच आपल्या ब्लॉगच्या रंगसंगतीनुसार जाहिरातींचा रंग बदलता येतो.
Preview - वरील दोन पर्याय निवडल्यानंतर जाहिरात कशी दिसेल याचा preview येथे पाहता येईल.
Advanced - गुगल अ‍ॅडसेन्समध्ये एकापेक्षा अधिक अकाउंट्स वापरायचे असतील तर हा पर्याय वापरता येतो.


6. वर दिलेल्यांपैकी आवश्यक पर्याय निवडुन Save करा.

B.  ब्लॉगपोस्टस्च्या खाली जाहिराती दाखविण्यासाठी -

1. ब्लॉगच्या Dashboard मध्ये जाऊन Edit html व Page element मध्ये जा.
2. Blog post या element मध्ये Edit या लिंकवर क्लिक करा.
3. Configure blog post या नावाची विंडो उघडेल त्यामध्ये Configure inline ads असा उपपर्याय दिसेल.
4. किती पोस्ट्स नंतर जाहिराती दिसाव्यात ते इथे ठरवता येते. प्रत्येक पानावर अ‍ॅडसेन्सच्या जास्तीतजास्त तीन जाहिराती दाखविता येतात.
5. इतर पर्याय वरील क्रमांक ५ नुसारच आहेत. त्यापैकी उचित पर्याय निवडा.
6. Save बटणावर क्लिक करा.

ही झाली ब्लॉगर.कॉमवरील ब्लॉग्जमध्ये जाहिराती दाखविण्याची पहिली व सोपी पद्धत. मात्र या पद्धतीमध्ये काही त्रुटी आहेत. त्रुटी म्हणण्यापेक्षा काही पर्याय कमी असतात. मराठी ब्लॉगर्ससाठी आवश्यक असणारा एक महत्त्वाचा पर्याय यामध्ये नाही आहे. म्हणुनच आपण दुसर्‍या पद्धतीची माहिती घेणार आहोत परंतु पुढील लेखात........


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

May 02, 2010

List of Best Marathi Websites - Netbhet web directory


मराठी ब्लॉगकट्टयाच्या माध्यमातुन आम्ही १२०० मराठी ब्लॉग्जची माहिती एकत्र केली व त्यानंतर इंटरनेटवर विखुरलेल्या मराठी ई-पुस्तकांचे एकत्रीकरण आम्ही नेटभेट ई-पुस्तके या साईटमध्ये केले. एकुणच इंटरनेटवर मराठी भाषेत निर्माण होणारे साहित्य नेटभेटच्या वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न असतो.
यामागचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. ई-मराठीच्या या चळवळीत जास्तीत जास्त मराठी बांधवांचा समावेश व्हावा, मराठी मध्ये विविध विषयांवरील सकस लेखन वाढावे यासाठी जास्तीत जास्त लोकांनी ब्लॉग्ज लिहावेत किंवा संकेतस्थळे चालवावीत, इंटरनेटवर मराठीचे अस्तीत्व प्रकर्षाने जाणवेल इतका ऑनलाईन मराठी वाचक व लेखकांचा टक्का वाढावा आणि जे बांधव यापुर्वीच या कामात गुंतले आहेत त्यांना जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचविणे या उद्देशाने आमचे प्रयत्न चालु असतात. याच उद्देशांतर्गत आम्ही वाचकांसाठी इंटरनेटवर मराठीचे प्रयत्नपुर्वक प्रतिनिधीत्व करणार्‍या संकेतस्थळांची यादी घेऊन आलो आहोत. याला आपण एक छोटेखानी वेब डीरेक्टरीच म्हणुयात. सध्याजरी या यादीतील संकेतस्थळांची संख्या १२२ इतकीच असली तरी मला खात्री आहे की येत्या काही वर्षांत ही यादी हजारो माहितीपुर्ण मराठी संकेतस्थळांनी सजलेली असेल.

नेटभेट वेब डीरेक्टरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

कोणत्याही संकेतस्थळाचा या यादीत समावेश करण्यापुर्वी एकच निकष लावण्यात आला आहे तो म्हणजे "मराठी भाषा". मराठीशी संबंधीत विषयांवरील इंग्रजी संकेतस्थळांचा समावेश यामध्ये टाळण्यात आला असून फक्त आणि फक्त मराठी भाषेमध्ये लिहिल्या गेलेल्या संकेतस्थळांनाच या यादीत जागा देण्यात आलेली आहे. या यादीत काही मराठी संकेतस्थळांचे नाव देण्याचे राहिले असल्यास कृपया आमच्या निदर्शनास आणुन द्यावे अशी वाचकांना आणि संकेतस्थळाच्या संचालकांना नम्र विनंती. सध्या ही यादी अगदी प्राथमिक स्वरुपात उपलब्ध असून लवकरच विषयवार मांडणी करुन ही यादी पुनर्प्रकाशित करण्याचा आमचा मानस आहे. नेटभेटची ही वेब डिरेक्टरी अधिक प्रगल्भ आणि उपयुक्त होण्यास मदत व्हावी यासाठी वाचकांच्या प्रतीक्रीया आणि अभिप्रायांची आम्हांस अत्यंत गरज आहे. ही वेब यादी आपल्याला नक्की आवडेल याची आम्हांला खात्री आहे.


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Related Posts with Thumbnails