April 29, 2011

दुरदर्शन - सत्यम शिवम सुंदरम !

आज मी नॉस्टॅल्जीक झालोय. ( nostalgia = भूतकालीन जीवनाविषयी वाटणारी ओढ). आणि हा लेख वाचताना तुम्ही पण व्हाल याची मला खात्री आहे. मित्रांनो स्वतंत्र भारतातील एका पुर्ण पीढीवर आई-वडील आणि शिक्षकांव्यतीरीक्त आणखी एका गोष्टीने संस्कार केले आहेत. ती गोष्ट म्हणजे टेलीव्हिजन. (TV). आणि मी ज्या पीढीचं प्रतीनिधीत्व करतोय त्या पीढीसाठी संस्कार करणारा TV म्हणजे दुरदर्शन. आज मी नॉस्टॅल्जीक झालोय ते दूरदर्शन साठीच.

दूरदर्शनवरील जुन्या मालिका, जाहिराती, लहान मुलांसाठीचे कार्यक्रम, घरातील प्रत्येकाला भावणार्‍या आणि बांधून ठेवणार्‍या मालिकांची आठवण झाली की "बालपणीचा काळ सुखाचा आठवतो". आता शंभराहून अधिक चॅनेलवर सर्फींग करुनही कधीच मिळणार नाही इतका आनंद दुरदर्शनच्या DD1 आणि DD2 या दोन वाहिन्यांनी आपल्याला दिला आहे. आणि नेमका तोच अनुभव आज आपण पुन्हा अनुभवणार आहोत. आज मी तुम्हाला एका ब्लॉगची माहिती करुन देणार आहे. हा ब्लॉग पुर्णपणे दुरदर्शनला वाहिलेला आहे.

दूरदर्शनवर गाजलेल्या तलाश, फौजी, उपन्यास, सुरभी, अलिफ लैला, टीपू सुलतान, चंद्रकांता, व्योमकेश बक्षी, अजनबी, दिदी, चुनौती या मालिकांचे काही भाग किंवा शिर्षकगीते पुन्हा पहायला मिळाल्यातर आवडतील ना तुम्हाला ? वीस वर्षांपुर्वी (माझ्या ईतक्याच) लहान असलेल्या)माझ्या मित्रांनो जर He-man and masters of the Universe, Giant Robot, Jungle Book (मोगली), पोटली बाबा की, मालगुडी डेज या मालिकांचे भाग आणि शिर्षकगीते पुन्हा पहायला मिळाली तर काय मज्जा येईल नाही?

मालिका आणि लहान मुलांच्या कार्यक्रमांव्यतीरीक्त आणखी एक गोष्ट म्हणजे पुर्वीच्या जाहिराती. अमुल बटर, बुलंद भारत की बुलंद तस्वीर....हमारा बजाज, गोल्डस्पॉट, I love you रसना, जोर लगाके हैय्या (Fevicol) या जाहिराती पुन्हा पाहण्याची एक वेगळीच मजा आहे.

मला खुप खुप आवडणार्‍या काही मालिका आणि जाहिरातींचे व्हीडीओज मी येथे देत आहे.

एक अनेक और एकता (Ek anek aur ekta)

मिले सुर मेरा तुम्हारा (Mile Sur mera tumhara)

जायंट ऱोबोट (Giant Robot)

वंदे मातरम

आय लव्ह यु रसना !

जब मे छोटा बच्चा था ! बजाज लाईट्स.

नटराज पेन्सिल्स

Heman and masters of the Universe

दुरदर्शन

दुरदर्शनची पुन्हा एकदा सफर घडवून आणणार्‍या ब्लॉगची लिंक आहे http://ddnational.blogspot.com.

खरेतर हा दुरदर्शनचा अधिकृत ब्लॉग नाही आहे मात्र तरी देखिल एक अनमोल खजिना आहे. तेव्हा या ब्लॉगला अवश्य भेट द्या. आणि ते पाहून नॉस्टॅल्जीक झालात तर मला दोष देऊ नका.

पण हा खजिना आवडला तर कमेंट लिहुन नक्की कळवा.


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

April 28, 2011

नेटभेट ई-मासिक एप्रिल २०११

आजच्या आधुनिक युगात मराठी किंवा इतर भाषांमध्येही प्रकाशित साहित्यापेक्षा आंतरजालावरचे साहित्य जास्त प्रसिध्द होत आहे. यात असलेल्या अनेक कारणांपैकी एक महत्वाचे कारण म्हणजे लोकांना वाचनासाठी असणारा कमी वेळ, आंतरजालावरचे साहित्य आपले काम करता करताही फाईल अथवा वेबसाईटच्या माध्यमातून वाचता येते हा त्याचा advantage. शिवाय जगभरातल्या साहित्यिकांना व वाचकांना एकमेकांच्या संपर्कात रहाता येते ही एक उत्तम बाब आहे.

उन्हाळा म्हटलं की मग आठवतात ग्रीष्माच्या झळा आणि कुलरचा थंडावा. कुलरच्या थंडाव्यात , गार गार पन्ह्याची मज्जा काही औरच नाही का??
आम्हीही या उन्हाळ्यात तुमच्यासाठी काही थंडगार .......म्हणजेच तुम्हाला या उन्हाळ्यातही वाचनाचा थंडावा देणा-या हटके कथा व लेख नेटभेटच्या अंकातून घेऊन आलो आहोत जे तुमचे नक्की मनोरंजन करतील.


हॆप्पी समर फ्रेंडस !!

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

April 19, 2011

Moodturn.com सोबत निसर्गाच्या सानिध्यात रममाण व्हा !

वारा, पाणी, पाऊस, समुद्र, जंगल या सर्व निसर्गनिर्मीत गोष्टींमध्ये एक विलक्षण शक्ती असते. मनाला शांत करणारी, सुखावणारी एक वेगळीच भावना निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर निर्माण होते. शहरी भागात राहणार्‍या लोकांना निसर्गामध्ये रममाण होणे नेहमीच शक्य नसते त्याची पण ओढ मात्र नक्की असते. आज आपण एक अशी वेबसाईट पाहणार आहोत जिच्या सहाय्याने आपल्याला घरबसल्या या सर्व गोष्टींचा आनंद घेता येईल.

मित्रहो आपण बोलत आहोत मुडटर्न्.कॉम (Moodturn.com) या साईटबद्दल. Moodturn मध्ये पावसाचा आवाज, पक्ष्यांच्या चिवचिवाटाचा आवाज, वर्षावनात जाणवणारा विषीष्ट आवाज, किनार्‍यावर आदळणार्‍या लाटांचा आवाज असे अनेक अत्यंत खरेखुर्‍या आवाजांची रेकॉर्डींग आहे. या साइटला भेट द्या, आपली आवडती आवाजाची थीम निवडा आणि आपला आवडता आवाज पाहिजे तितका वेळ ऐकत रहा. ब्राउजर मध्ये moodturn चालू ठेवुन आपण संगणकावरील आपले काम चालु ठेवु शकतो.

मुडटर्न मध्ये आवाजाबरोबर या सर्व निसर्गदृष्यांची चित्रे देखिल आहेत. जिवंत वाटणारी ही चित्रे आणि त्यासोबतचे आवाज आपल्याला खरोखरच निसर्गाच्या सानिध्यात घेउन जातात. एकदा ही साईट चालु करुन पहा. थोड्याच वेळात आपण या आवाजाशी एकरुप होउन जातो. मग आपण खरोखरच समुद्रकिनारी, जंगलात किंवा नदीकिनारी असल्याचे भासू लागते.

मला स्वतःला समुद्राच्या लाटांच्या आवाजाचे प्रचंड आकर्षण आहे. म्हणून नेहमी एखादी ब्लॉगपोस्ट लिहत असताना किंवा वेबसाईट डीझाईनचे काम करत असताना मी moodturn वरील समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकतो. त्यामुळे मनावरचा ताण हलका होउन माझी कार्यक्षमता वाढते असा माझा वैयक्तीक अनुभव आहे. तुम्हीही पहा आजमावून. मला खात्री आहे की तुमचाही मुड टर्न होउन जाईल :-)

मुडटर्न्.कॉम (Moodturn.com)

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

April 18, 2011

"मुंबई दर्शन" करा गुगल मॅप्स (Google Maps) च्या मदतीने !

खरी मुंबई पहायची असेल तर लोकल ट्रेन आणि लाल रंगाच्या "बेस्ट" बसेस शिवाय पर्याय नाही. मुंबईचं अवघं जीवन या ट्रेन्स आणि बसेसच्या अवतीभवतीच फिरत असतं. मात्र हा प्रवास सोपा नाही हे काही वेगळ सांगायला नको. आपणा मुंबईकरांना याची सवय झाली असेल कदाचित, परंतु नियमीत प्रवास न करणार्‍या मुंबईकरांना तसेच मुंबईत येणार्‍या पाहुण्यांना या प्रवासाची धास्तीच असते. कोणती टेन, किती वाजता, कुठे पकडायची असे प्रश्न तर असतातच त्यासोबत स्टेशन पासून पुर्वेला बाहेर पडायचे की पश्चीमेला, कोणती बस, कोठून पकडायची, कुठे उतरायचे असे अनेक प्रश्न मनात घेऊन नवख्या माणसांना प्रवास करावा लागतो. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपल्याला या लेखात मिळणार आहेत.

आपल्या गुगल काकांनी या प्रश्नावरही उत्तर शोधले आहे. गुगल काकांच्या यशाचे रहस्य दैनंदिन जीवनातील प्रश्नांवर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सोपी उत्तरे शोधण्याच्या त्यांच्या कलेत दडलेले आहे. चला तर मग पाहुया गुगल काकांनी आपल्याला कशी मदत केली आहे ते.

गुगल मॅप्स (Google Maps) या सेवेमध्ये गुगलने संपुर्ण जगाचा नकाशा यापुर्वीच उपलब्ध करुन दिला होता. याच सेवेसोबत आता गुगलने मुंबईच्या बस आणि ट्रेनचे मार्ग, वेळापत्रक इत्यादी माहिती एकत्र गुंफली आहे. http://maps.google.co.in या लिंकवर क्लिक करुन आपल्याला गुगल मॅप्स वर जाता येईल. तेथे डाव्याबाजुला सर्वात वरती Get Directions असे लिहिलेले आढळेल. त्यावर क्लिक करा.


A आणि B असे दोन पर्याय दिसतील. A मध्ये सुरुवातीचे ठीकाण आणि B मध्ये जेथे जायचे आहे ते ठिकाण लिहा. आणि Get Directions (वरील चित्रात पहा) या बटणावर क्लिक करा. तुम्ही दिलेल्या पत्ता अचूक नसल्यास त्याच्याशी मिळताजुळता पर्याय खाली दिलेला दिसेल, त्यांपैकी योग्य ते ठिकाण निवडा. आता उजव्या बाजुला नकाशात A पासून B पर्यंत जाण्याचा रस्ता दिसेल आणि डाव्या बाजुला त्याबद्दल माहिती आणि प्रवासासाठी लागणारा वेळ दिसु लागेल.

मात्र आपल्याला लोकल ट्रेन आणि बसचा मार्ग (Public Transit) पहायचा आहे. त्यासाठी A आणि B च्या वर चित्रात दाखविल्याप्रमाणे ट्रेनचे एक चिन्ह दिसेल. त्यावर क्लिक करा.


A आणि B च्या खाली आणखी काही पर्याय दिसतील त्यांचे स्पष्टीकरण -

  • Leave Now - त्वरीत प्रवासास निघायचे असल्यास हा पर्याय वापरा.
  • Depart At - ज्या वेळेस तुम्ही प्रवासास सुरुवात करणार आहात त्या वेळेवर उप्लब्ध असणार्‍या ट्रेन्सची माहिती मिळवण्यासाठी हा पर्याय वापरा.
  • Arrive By - ज्या वेळेपर्यंत तुम्हाला ईच्छीत स्थळी जायचे असेल त्यानुसार प्रवासाचे नियोजन करण्यासाठी हा पर्याय वापरा.

उदाहरणादाखल आपण येथे ठाणे स्टेशन (A) ते सिद्धीविनायक मंदीर, दादर (B) या प्रवासाची माहिती घेउया. त्यासाठी येथे क्लिक करा.

डाव्या बाजुला प्रवासाचे विविध पर्याय दिसतील. त्यावर क्लिक केल्यास त्या पर्यायाची सविस्तर माहिती मिळेल.


अगदी ट्रेन मधून उतरल्यावर कोणत्या दिशेला किती मिनेटे चालावे लागेल, किती नंबरची बस कोठून मिळेल आणि त्यानंतर किती थांब्यांनंतर उतरावे लागेल अशी बारीकसारीक परंतु उपयुक्त माहिती देखिल यात देण्यात येते. मोबाईल मध्ये ईंटरनेट असल्यास हीच माहिती आपण कधीही आणि केव्हाही पाहू शकतो.

मुंबईतील प्रवास सुकर होवो न होवो, निदान या माहितीमुळे प्रवासाचे दडपण तरी नक्कीच दूर होईल. या अप्रतीम सेवेसाठी गुगल काकांना माझा सलाम !

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

April 17, 2011

गुगल म्युझिक इंडीया (Labs) - हिंदी व मराठी चित्रपट गीतांचा खजिना !

हिंदी चित्रपट संगीत हा आपल्या भारतवासियांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. आणि म्हणूनच आपल्यापैकी बरेच जण कधीना कधी ईंटरनेटवर गाणी, गाण्याचे बोल, गाणी डाउनलोड (चकट-फू) करण्यासाठीच्या लिंक्स शोधण्यासाठी प्रयत्न केले असतीलच. आपल्या सर्व searches वर नजर ठेवून असणार्‍या गुगल काकांनी हे पाहिले आणि यातुनच खास भारतीयांच्या या संगीतवेडाला उत्तर म्हणून गुगल काकांनी गुगल ईंडीया म्युझिक (Labs) ची सुरुवात केली आहे.

www.google.co.in/music या संकेतस्थळावर गुगल काकांनी नवी-जुनी हजारो हिंदी गाणी रसिकांसाठी मोफत उपलब्ध करुन दिली आहेत. या संकेतस्थळावर जाउन हवे ते गाणे सर्च करता येते आणि एका नविन पॉप-अप विंडो मध्ये गाणे चालु करता येते. गाणे डाउनलोड करण्याची किंवा कोणतेही सॉफ्टवेअर डाउनलोड करण्याची बिलकुल आवश्यकता नाही. तसेच कलाकार, गायक, संगीतकार, चित्रपटाचे नाव इत्यादीवरुन गाणे शोधण्याची सोय देखिल यामध्ये आहे.

गुगल ईंडीया म्युझीक हे माझ्यामते एक अप्रतीम बिझनेस मॉडेल आहे. वरवर साध्या-सोप्या दिसणार्‍या या सेवेने एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत.

ग्राहकांचे फायदे -

  • गाण्यांची सीडी विकत घेणे सर्वांनाच शक्य होत नाही , आणि सर्वच गाण्यांच्या सीडी विकत घेणे तर कोणालाच शक्य होत नाही. विकत घेतलेल्या सीडीज सांभाळून ठेवणे, आपल्याला हवे आहे ते गाणे ऐकण्यासाठी योग्य सीडी शोधून काढणे हे त्रासदायक आणि वेळखाउ काम आहे. तसेच डाउनलोड केलेल्या गाण्यांमधून आपल्याला हवे ते गाणे शोधून काढणेही तितकेसे सोपे नसते. गुगल काकांनी सर्व गाणी कलाकार, गायक, संगीतकार, चित्रपटाचे नाव इत्यादीवरुन शोधण्याची सोय पुरविल्यामुळे काही सेकंदातच आपल्याला हवे असलेले गाणे वाजवता येते.
  • या सेवेमध्ये गाण्यांचे live streaming होते. म्हणजे गाणे किंवा कोणतेही सॉफ्टवेअर डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही. यामुळे संगणकातील महत्त्वाची आणि महागडी मेमरी स्पेस वाया जात नाही. तसेच डाउनलोडींगसाठीचा वेळही वाया जात नाही. सर्व काही चुटकीसरशी उप्लब्ध होते !
  • मुख्य म्हणजे गुगलच्या इतर सर्व सेवांप्रमाणेच ही सेवा देखिल सर्वांसाठी पुर्णपणे मोफत आहे.
  • गाणी ऐकण्याची सोय ऑनलाईन असल्यामुळे जगात केव्हाही आणि कोठूनही (जिथे संगणक आणि इंटरनेट उपलब्ध आहे) गाण्यांचा आनंद लुटू शकतो.

गुगलचे फायदे -

  • गुगलकाकांनी यासाठी सारेगामा. इन्.कॉम आणि सावन्.कॉम या भारतीय वेबसाईट्सशी संगनमत केले आहे. गाण्यांचे इंटरनेट प्रसारणांचे हक्क या भारतीय वेबसाईट्सने विकत घेतलेले असतात. त्यामुळे गुगल काकांना ही गाणी विकत घ्यावी लागत नाहीत तसेच ही गाणी आपल्या सर्वर्स (Servers) वर होस्ट करावी लागत नाहीत.
  • प्रत्येक गाणे एका नविन विंडो मध्ये चालु होते आणि या प्रत्येक विंडोमध्ये गुगलतर्फे जाहिराती दाखविल्या जातात. जाहिरातींपासून मिळणारे उत्पन्न वर दिलेल्या भारतीय साईट्सबरोबर वाटून घेतले जाते.
  • तिसरा आणि गुगल साठी सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे सर्व हिंदी गाणी आता गुगलच्या शोध यंत्रणेमध्ये समाविष्ट झालेली आहेत. लाखो-करोडो भारतीय दररोज वेगवेगळ्या गाण्यांचा गुगलवर शोध घेऊन इतर साईट्सवर जात होते ते आता पुन्हा गुगलच्याच गुगल ईंडीया म्युझीक या संकेतस्थळाकडे वळवले जातात. त्यामुळे इंटरनेटवर गाणी शोधणारे ८०% पेक्षा जास्त ग्राहक गुगलकडेच राहतात आणि त्यांना गुगलतर्फे दाखविल्या जाणार्‍या जाहिराती पहाव्या लागतात.
  • म्हणजे अत्यंत कमी खर्चात गुगलने जाहिरातदारांना आकर्षीत करणारे काही करोड भारतीय ग्राहक आपल्या मुठीत ठेवले आहेत.

वर दिलेल्या दोनही फायद्यांपेक्षा अतीशय महत्त्वाचा आणखी एक फायदा आहे. गुगल तर्फे ऐकवले जाणारे हे संगीत पुर्णपणे कायदेशीर आहे. यामुळे संगीत क्षेत्राला music piracy (संगीत चौर्य) पासून मुक्ती मिळणार आहे. आपणही एक सजग नागरीक म्हणून नक्कीच कायदेशीर मार्गाचा अवलंब करुन मताचाआपल्या आवडत्या संगीताचा मनमुराद आनंद लुटू शकतो.


यामध्ये प्रामुख्याने हिंदी गाण्यांचा समावेश केलेला असला तरी काही मराठी आणि तमिळ गाणी देखिल ऐकता येतात. सध्या प्रायोगीक तत्त्वावर सुरु केलेल्या या सेवेमध्ये गुगलकाका नक्कीच खुप सुधारणा करतील.

तेव्हा मित्रांनो गाणी शोधण्यासाठी वेळ वाया न घालवता आजच www.google.co.in/music ला भेट द्या आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा मनमुराद आनंद लुटा.


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Related Posts with Thumbnails