आजच्या मुक्त अर्थव्यवस्थेत जगण्याचा एक मुख्य फायदा आहे. आपण गरीब रहावं, मध्यमवर्गीय असावं की श्रीमंत व्हावं हे निवडण्याची संधी आपल्याला आजचं जग देतय. पण तरीही आपल्यापैकी बरेच जण गरीब किंवा मध्यमवर्गीयच राहिले आहेत. प्रसिद्ध लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्या मते हे आपलं नशीब नसून ही आपली चॉईस आहे. रॉबर्ट कियोसाकी यांची "रिच डॅड , पुअर डॅड" आणि " कॅशफ्लो क्वॉड्रंट" ही अर्थिक नियोजनावर भाष्य करणारी दोन पुस्तके तुफान गाजली. यातील " कॅशफ्लो क्वॉड्रंट" या पुस्तकांमध्ये रॉबर्ट कियोसाकी यांनी आपल्यापैकी बरेचजण गरीब किंवा मध्यमवर्गीय का रहिले आहेत याचा उहापोह केला आहे. त्यांचा हा विचार "" कॅशफ्लो क्वॉड्रंट" या नावाने जगभर प्रसिद्ध आहे. मित्रांनो मी आज या व्हीडीओमध्ये "कॅशफ्लो क्वॉड्रंट" सोप्या मराठीत समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद ! सलिल सुधाकर चौधरी नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com |