If you fail to plan, then you are planning to fail.
नमस्कार मित्रांनो, बिझनेस सुरू करण्याची इच्छा बऱ्याच जणांना असते परंतु त्यासाठी योग्य प्रकारे योजना आखणे म्हणजेच बिझनेसचे प्लॅनिंग करणे मात्र प्रत्तेकाला जमतेच असे नाही. बऱ्याच जणांना तर बिझनेस प्लॅन ची गरज आहे तेच माहीत नसते. मित्रानो बिझनेसचं प्लॅनिंग करणे अत्यंत आवश्यक आहे कारण बिझनेस प्लॅन हा तुमच्या बिझनेस बद्दल काही उत्तरं देतो, काही प्रश्न महत्वाचे असतात जे तुमच्या बिझनेस बद्दल इन्व्हेस्टरला जाणून घ्यायचे असतात. बँक किंवा इन्व्हेस्टर यांना तुमच्या बिझनेसमध्ये पैसे गुंतवण्याआधी तुमच्या बिझनेसची माहिती देणं गरजेचं असतं. तुम्ही काय आणि कसे करणार आहात ते पाहायचं असतं. आणि त्यामुळे बिझनेस प्लॅन हे असं डॉक्युमेंट असतं, जे तुमच्या इन्वेस्टर्सला किंवा प्लॅन वाचणाऱ्या कोणालाही पाच प्रश्नांची उत्तरं देतं आणि ते प्रश्न म्हणजे Why ,What ,Who, When आणि How ! 👉तुम्ही बिझनेस का करताय ? (Why) 👉तो नक्की कसला बिझनेस आहे? (What) 👉नक्की हा बिझनेस कोण करणार आहे? (Who) 👉तो बिझनेस कधी प्रॉफिट करायला सुरुवात करणार आहे? किंवा कधी रेव्हेन्यु मिळविणार आहे? (When) 👉आपण तो बिझनेस कसा करणार आहात? (How) हे अगदी महत्वाचे प्रश्न आहेत. कारण तुम्ही बिझनेस कसा करणार आहात हे इन्व्हेस्टरला आणि सर्व स्टेक होल्डर्सना जाणून घ्यायचं असतं. आणि त्यासाठी बिझनेस प्लॅन हा महत्वाचा असतो. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ही तुमच्या बिझनेस प्लॅन मध्ये असली पाहिजेत. बिझनेस प्लॅन म्हणजे काय आणि त्यामध्ये काय लिहाल? हे आम्ही नेटभेटच्या वाचकांसाठी या व्हिडिओ मध्ये सांगितले आहे. प्रत्येक उद्योजकाने नक्की पाहिलाच पाहिजे असा हा विडिओ जरूर पहा आणि आपल्या इतर उद्योजक मित्रांसोबत जरूर शेअर करा !👍 बायोडेटा हा आपल्या करीअरसाठी अतिशय महत्वाचा आहे. आपला बायोडेटा हा आपला प्रतिनिधित्व करत असतो. आपला बायोडेटा पाहत असताना मुलाखत घेणारी व्यक्ती आपण एक व्यक्ती म्हणून कसे आहोत हे आखत असते. तर मित्रांनो आपण आपल्या करिअर साठी महत्वाचा असलेला बायोडेटा कसा लिहायचा हे आपण या व्हिडीओ मधून पाहणार आहोत. व्हॉट्सऍप चे संस्थापक जैन कॉम यांनी नुकताच फेसबुक सोडली. फेसबुक सोडल्यानंतर जान कॉम यांनी मीटर मध्ये केलेले एक वक्तव्य महत्त्वाचे आहे. "मी फेसबुकला माझ्या ग्राहकांची प्रायव्हसी विकली... आणि याबद्दल मी माझ्या ग्राहकांची माफी मागतो" असं ते विधान होतं.
मित्रांनो, चार वर्षांपूर्वी फेसबुक ने तब्बल 19 बिलीयन डॉलर्सना विकत घेतलेला व्हॉट्सऍप आता पूर्णपणे फेसबुकची संपत्ती आहे. आणि या संपत्तीचा फायदा फेसबुक ने नाही घेतला तरच नवल. आत्तापर्यंत जाहिरातींपासून मुक्त असलेला व्हॉट्सऍप 2019 नंतर मात्र तसं राहणार नाही. फेसबुक ने व्हाट्सअप मध्ये जाहिराती आणण्याचा प्रयत्न चालवला आहे आणि ज्यान कॉम यांनी फेसबुक सोडण्याचा ते मुख्य कारण आहे. सुरुवातीला व्हाट्सएप स्टोरीज मध्ये जाहिराती दिसतील अशा काही बातम्या इंटरनेट जगात जगतामध्ये पसरल्या आहेत. काही अंशी त्यामध्ये तथ्य आहे असं वाटतंय. परंतु जाहिराती दाखवणे तितकं सोपं नाहीये. कारण व्हॉट्सऍप मधील आपण पाठवलेला प्रत्येक मेसेज हा एनक्रिप्टेड असतो. त्यामुळे ग्राहकांबद्दल ची माहिती आणि मेसेज बद्दलची माहिती कोणालाच कळत नाही. परंतु जर जाहिराती दाखवायचाच असतील तर मात्र इंक्रीप्शन थोडस सहील होईल हे नक्की. व्हाट्सअप स्टोरीज हे फीचर फार वापरला जात नाही, त्यामुळे सुरुवातीला कदाचित या जाहिरातींमुळे आपल्याला त्रास जाणवणार नाही. पण पुढे पुढे व्हाट्सअप मध्ये इतरत्र देखील जाहिराती येऊ शकतात. तर मित्रांनो मोफत होतं म्हणून एवढे दिवस आपण व्हाट्सअप वापरत होतो, आणि आता त्याची सवय लागल्यानंतर आपण अत्यंत महागडी किंमत देऊन म्हणजेच आपली वैयक्तिक माहिती देऊन व्हाट्सअप विकत घेणार आहोत. 2019 मध्ये जर असं झालं च , तर मला सांगा तुम्ही काय करणार? व्हाट्सअप वापरत राहणार? की नव्या एखाद्या जाहिरात मुक्त मेसेज प्लॅटफॉर्मचा वापर सुरू करणार? सलिल सुधाकर चौधरी नेटभेट ई लर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू या ! www.netbhet.com |