जपान देश स्वच्छतेच्या बाबतीत जगात सर्वात अग्रेसर मानला जातो. अगदी चकचकीत रस्ते, स्वच्छ आणि सुंदर आखीव रेखीव शहरे आणि प्रचंड शिस्तबद्ध जपानी नागरिक यांच अप्रूप आपल्याला सतत वाटत राहतं.
मित्रांनो, जपानी लोकांच्या या गुणामध्ये तेथील शिक्षण पद्धतीचा मोलाचा वाटा आहे. लहानपणीच जपानी शाळांमध्ये मुलांवर स्वच्छता आणि स्वयंशिस्त यांचे संस्कार कसे केले जाते ते नेटभेटच्या या व्हीडीओ मध्ये पाहता येते. भारातीयांना स्वच्छतेबाबत अजून बराच पल्ला गाठायचा आहे. या व्हिडीओ मधून निदान सुरुवात कशी करावी ते तरी कळेल. प्रत्येक भारतीयाने आवर्जून पहावा आणि आपल्या इतर मित्रांसोबत (प्रामुख्याने जे पालक आहेत त्यांच्यासोबत) जरुर शेअर करावा असा हा व्हिडीओ ! व्हिडीओ आपल्याला कसा वाटला ते खाली कमेंटस मध्ये अवश्य लिहून कळवा ! तुम्हाला जर आपल्या लघु उद्योगाला मोठ्या उद्योगामध्ये रूपांतरित करायचं असेल तर त्यासाठी आपला ब्रँड उभा करणं आवश्यक आहे. ब्रँडिंग म्हटलं की त्यासाठी खूप गुंतवणूक लागेल, पैसा लागेल, एक्सपर्ट ची मदत लागेल असं वाटतं. काही अंशी ते खरं देखील आहे. परंतु आपल्या सुदैवाने आपण सध्या अशा काळामध्ये जगत आहोत जिथे तंत्रज्ञानामुळे अगदी जगभरातल्या कोणत्याही व्यक्तीपर्यंत सहज पोहोचता येऊ शकतं, आपला ब्रँड तिथपर्यंत घेऊन जाता येऊ शकतो.
आज या लेखामध्ये मी अशाच काही अत्यंत कमी खर्चाच्या ब्रँडिंग टिप्स माझ्या उद्योजक मित्रांना देणार आहे. मला खात्री आहे या सोप्या आणि जलद ब्रँडिंग टिप्स तुमचा लघुउद्योग मोठा करण्यासाठी नक्कीच मदत करतील. एक भिकारी आपला व्यवसाय वाढविण्यासाठी एका मार्केटिंग तज्ञाला भेटतो. तेव्हा मार्केटिंग तज्ञ त्याला काय सल्ला देतो आणि त्याचा कसा फायदा होतो हे सांगणारा गमतीशीर व्हिडीओ !
माझ्या प्रत्येक ट्रेनिंग मध्ये आणि मार्केटिंग व्हिडिओ मध्ये मी नेहमी उद्योजकांना दोन टिप्स देत असतो. उद्योग वाढविण्यासाठी "आपले योग्य ग्राहक निवडणं" (Target customers) आणि "स्पर्धकांपेक्षा काहीतरी वेगळं करणं" (Differentiation Strategy) या त्या दोन टिप्स आहेत. आज एका मित्राने एक व्हिडिओ माझ्यासोबत शेअर केला. वर दिलेल्या या दोन्ही गोष्टी त्यामध्ये अत्यंत गमतीशीरपणे समजावल्या आहेत. प्रत्येक उद्योजकाने नक्की पहावा असा हा व्हिडीओ. (व्हीडीओ वेगळ्याच भाषेत आहे म्हणून व्हिडीओच्या खाली मराठी भाषेत अनुवाद केला आहे.) तुम्ही यातून काय शिकलात ते खाली कमेंट मध्ये लिहायला विसरू नका ! नेटभेटच्या यूट्यूब चैनल वर , आमच्या फेसबुक पेजवर किंवा व्हॉट्सऍप मध्ये एक प्रश्न मला जवळपास दररोज विचारला जातो. तो म्हणजे, मला माझा जॉब सोडून बिझनेस सुरू करायचा आहे त्यासाठी मला मार्गदर्शन करा.
मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती वेगवेगळी असते , प्रत्येकाचे शिक्षण, त्यांचे कौशल्य, घरातून असलेला सपोर्ट, त्यांचं नेटवर्क, त्यांची बुद्धिमत्ता, मेहनत करण्याची शारीरिक आणि मानसिक तयारी वेगवेगळी असते. आणि म्हणून या प्रश्नाचं सरळ साधं सोपे उत्तर देता येणं कठीण असतं. बहुतेक वेळा मी असे प्रश्न टाळतो, त्यांना उत्तरच देत नाही. प्रत्येकाची केस समजुन घेऊन उत्तर देणे वेळेअभावी शक्य होत नाही. आणि म्हणूनच, आज या लेखामधून ढोबळमानाने नोकरी सोडून व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेताना कसा विचार करावा हे मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो, कदाचित हे प्रश्न तुम्हाला घाबरवतील, हा लेख कदाचित तुम्हाला आवडणारही नाही. पण उगाचच मोटिवेशनल बोलण्यात मला रस नाही. उद्योजक आणि जुगारी यांचा मध्ये फरक असतो. उद्योजकाला आपली रिस्क नक्की कोठे आहे, किती आहे हे ठाऊक असतं. वरील सर्व प्रश्नांमधून तेच सांगण्याचा मी मनापासून प्रयत्न केला आहे. |