नमस्कार मित्रहो,
२०१९ साल सरत आले आहे आणि आता आपल्या सगळ्यांनाच नवीन वर्षांची सन २०२० ची चाहूल खुणावत आहे. आपल्या धकाधकीच्या आयुष्यात थोडंसं थांबून येणाऱ्या नवीन वर्षांसाठी योग्य प्लॅनिंग करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. २०२० साल आपल्या आयुष्यातील एक यशस्वी वर्ष बनवायचं असेल तर त्यासाठी योग्य ध्येय ठरवणे आणि ते पूर्ण करण्यासाठी Action Plan बनविणे हे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणूनच मित्रांनो यावेळच्या “ग्रेटभेट” या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमा मध्ये आपण माहिती घेणार आहोत ध्येय निश्चिती ते ध्येय सिध्दी २०२० याबद्दल . याविषयी नेटभेटच्या सर्व सभासदांना मोलाचे मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत आहोत प्रसिद्ध ट्रेनर, प्रेरणादायी वक्ते आणि उद्योजक श्री. केतन गावंड यांना ! दिनांक ५ डिसेंबर २०१९, गुरुवारी संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत आपण “श्री केतन गावंड” यांना भेटूया नेटभेट च्या फेसबुक पेजवर LIVE ! फेसबुक लाईव्ह पाहण्यासाठी आणि आपल्या प्रश्नांची live उत्तरे मिळविण्यासाठी https://www.facebook.com/marathi.netbhet/ या लिंकवर क्लिक करून नेटभेट च्या फेसबुक पेजला भेट द्या! धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया! www.netbhet.como edit. आपण नेहमी आपल्यासारख्या समविचारी माणसांसोबत वेळ घालवणेच नेहमी पसंत करतो. किंबहुना आपण सोयीस्कररीत्या अशी सवय लावून घेतो.
आपल्यासारखेच वागणारे,आवडी-निवडी सारखे असणारे, समान विचार करणारे आणि आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसोबत वेळ घालवणे हे आपल्यासाठी सोयीचे आणि मोकळेपणाचे ठरते. हे लोकं आपल्याला आपण एकटे नाहीत याची जाणीव करून देत असतात. परंतु हे लोक आपण आपले स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून सिद्ध करण्यासाठी अथवा वाढ होण्यासाठी तसेच निरनिराळ्या अनुभवाने समृद्ध होण्यासाठी पुरेशी नसतात. म्हणूनच समृद्ध होण्यासाठी,अनुभव संपन्न होण्यासाठी,यशस्वी होण्यासाठी काहीसा न आवडणारा ⅓ नियम पाळणे महत्त्वाचे ठरते.पण हा नियम पाळायचा म्हणजे नक्की काय हे आपण सविस्तर पाहू. =================== नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ जे तुमच्यापेक्षा हुशार,वरचढ आहेत अशा लोकांसोबत तुमचा ⅓ वेळ घालवा.ते तुमचे मार्गदर्शक,गुरु म्हणून नेहमी मदत करतील.अगदी तुमचे समवयस्क मित्र ज्यांनी यशाचा टप्पा काहीसा आधीच गाठला आहे.असे लोक अथवा मित्र ज्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगती केली आहे,अश्या लोकांच्या निव्वळ सानिध्यात राहिल्याने देखील तुमच्यात आमूलाग्र बदल होऊ शकतात. तुमचा दुसरा एक तृतीयांश वेळ अश्या लोकांसोबत घालवा जे अगदी तुमच्यासारखेच आहेत.तुमचे मित्र,ऑफिस मधले सहकारी असे लोक जे आता सध्या तुम्ही यशाच्या ज्या पायरी जवळ आहात ते देखील त्याच टप्प्यावर आहेत आणि त्यांनादेखील तुमच्या प्रमाणेच प्रगती करायची आहे. उदा. असे मित्र ज्यांची शैक्षणिक तसेच करिअरची सुरुवात तुमच्यासोबत झाली आहे,जे तुमच्यासारखेच पहिल्यांदाच पालक होणार आहेत.अश्या मित्रांच्या,व्यक्तींच्या सोबत वेळ घालवल्याने तुम्ही चालत असलेल्या मार्गावरून पुढे जात असताना विश्वास,दिलासा मिळतो.असे मित्र तुमच्या अडचणी,समस्या समजून घेण्यास सदैव तयार असतात आणि आपल्याला सतत आपण एकटे नाही आहोत याची जाणीव करून देतात.जितकी गरज तुम्हाला त्यांची असते तितकीच त्यांनाही तुमची गरज असते. तुमचा तिसरा ⅓ वेळ जी लोकं तुमच्यासारखी यशस्वी होण्याचा प्रयत्न करत आहेत,अश्या लोकांसोबत घालवा.तुम्ही जितकं स्वतःला अपडेट करत राहाल, तसाच प्रयत्न हिलोकं सुद्धा तुमच्यासारखं बनण्यासाठी प्रयत्न करत राहती.ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्यापेक्षा जास्त यशस्वी लोंकाना तुमचा आदर्श मानता,मदत घेता त्याचप्रमाणे तुमचे योग्य सल्ले,मार्गदर्शन त्यांना तुमच्याप्रमाणे बनण्यास मदत करतील.तुम्ही जितकं जास्तीत जास्त ज्ञान त्यांना द्याल तितकं जास्त आणि नवनवीन माहिती,ज्ञान मिळवण्यासाठी स्वतःला सज्ज ठेवाल.त्यामुळे स्वतःला अहंकारापासून दूर ठेवू शकाल. आपण ज्या व्यक्तींच्या सहवासात रमतो त्यांचा,त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. म्हणूनच आपण कोणती सोबत निवडतो हे आपल्या सर्वांगीण विकासासाठी खूप मोलाचे ठरते. म्हणूनच म्हटले आहे.... सुसंगती सदा घडो।सुजन वाक्य कानी पडो! =================== नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com कोणत्याही बिझनेसमध्ये जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत पोहोचणे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. ग्राहकांसोबत व्यवहार करताना नेमक्या काय गोष्टींचा विचार केला पाहिजे जेणेकरून बिझनेससाठी फायद्याचे ठरू शकते यासाठी काही छोट्या पण खास टिप्स.
1. सेल्स मीटिंग किवा कॉल च्या पहिल्या चार सेकंदात तुमची बुद्धी,उत्साह आणि अनुभव याची चुणुक दाखवा. 2. ग्राहकांचे कुतूहल जागृत होईल असे प्रश्न विचारा 3. ग्राहक विकत घेताना तर्कशुद्ध विचार करत नाहीत तर भावनाधिन होऊन विचार करा. 4.ग्राहकाला खरोखरच या व्यवहाराची गरज का आहे हे पटवून द्या. 5.तुमचा उत्तम आणि सकारात्मक भविष्याचा दृष्टिकोन विका. =================== नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ 6. ग्राहकांच्या नेमक्या गरजा जाणून घेण्यासाठी त्यांच्याबद्दल अधिकाधिक माहिती घ्या. 7.तुमचे उत्पादन कसे अप्रतिम आहे हे एकापेक्षा अधिक वेळा सांगा, त्यामुळे ग्राहक त्यादृष्टीने विचार करू लागतो 8. किंमत कमी करून विकण्याचा प्रयत्न करणे हा अपयशाचा हमखास मार्ग आहे 9. प्रत्येक ग्राहकांशी बोलताना सुरुवात कशी करणार, कोणती वाक्ये बोलणार, कोणते शब्द उच्चरणार याची कसून तयारी करा 10. प्रत्येक ग्राहक विकत घेईलच असे नाही. सुरुवातीच्या अपयशाने धीर सोडू नका, प्रयत्न करत रहा ! =================== नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही जगाला बदलण्याचा नाद सोडून देता, आणि स्वतःच्या बदलासाठी स्वतःच्या प्रत्येक कृतीचे निरीक्षण-परीक्षण करता.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं लोकांना, ते जसे आहेत तसे स्वीकारता. प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला समजायला लागते कि जीवनात प्रत्येकजण आप आपल्या जागी बरोबर असतो. प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही घेण्या पेक्षा देण्यावर जास्त भर देता. प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं नात्या मधल्या अपेक्षा सोडून देता आणि त्यागाची भावना स्वीकारता. प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुमचं आत्मीक सुखं नेमकं कशात आहे ते तुम्हांला समजतं. प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं किती हुशार आहात, किती मोठे आहात, हे जगाला पटऊन देण्याच्या भानगडीत पडत नाही. प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही इतरांकडून स्तुती आणि शब्बास्कीची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे काम करता. =================== नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःची तुलना इतरांशी करणं सोडून देता. प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःमध्ये देखील रममाण होता. प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला गरज आणि हव्यास यातील फरक स्पष्ठपणे जाणवतो. प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं माणसांच्या बरोबर माणुसकीने बोलता, वागता. प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं न सुटणारे प्रश्न सोडून देता. प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही आपली प्रगती करत असताना इतरांना देखील मोठं करत असता. प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं चांगल्या गोष्टींचं निरपेक्ष भावाने,मनापासून कौतुक करता. प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला जाणीव होते कि आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये. आणि शेवटी अती महत्वाचे प्रगल्भता म्हणजे : जेव्हा आपण अंतरीक सुखाचा संबंध भौतिक गोष्टींशी जोडणे सोडून देता. Be Happy with Nothing, You will be Happy with Everything. =================== नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com नमस्कार मित्रहो, शेअर बाजार हा विषय आपल्याला जवळचाही वाटतो आणि तितकाच परकाही. अजूनही साधारण दहापैकी ८ लोक शेअर मार्केटपासून अनभिज्ञ आहेत.योग्य माहितीच्या अभावामुळे किंवा चुकीच्या माहितीमुळे शेअर बाजाराच्या नादाला आपण जातच नाही. यासाठीच नेटभेट तर्फे एक फेसबुक लाईव्ह चर्चा आयोजित करण्यात आली होती आणि यात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सहभागी झाले होते श्री.चंद्रशेखर ठाकूर सर. ठाकूर सर गेली ५२ वर्षे मुंबई शेअर बाजारामध्ये कार्यरत आहेत. CDSL मध्ये गुंतवणुकदार प्रशिक्षण या विभागाचे ते माजी प्रमुख होते. आर्थिक साक्षरता प्रसारासाठी त्यांनी १५०० पेक्षाही जास्त व्याख्याने देशभरात दिली आहेत. शहरातच नव्हे तर अगदी खेडेगावातही त्यांनी आर्थिक साक्षरता प्रसाराचे काम केले आहे. तेव्हा मित्रहो,ठाकूर सरांनी शेअर बाजार, म्युच्युअल फंड्स, गुंतवणुकीचे विविध पर्याय याबद्दल अतिशय मोलाची माहिती नेटभेटच्या या फेसबुक लाईव्ह चर्चेमध्ये आपल्यासोबत शेअर केली. त्यांच्या सोबतच्या चर्चेचा हा व्हिडीओ नेटभेटच्या वाचकांसाठी सादर करत आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू! www.netbhet.com नमस्कार, मित्रांनो ,प्रत्येकाला वाटतं की आपण आपले आयुष्य आपल्या मनासारखे जगावे ,नेहमी सकारात्मक विचार करावा..आकर्षणाचा सिद्धांत म्हणजे नक्की काय? शास्त्रोक्त पद्धतीने आपल्या मनाला कसे वळण लावायचे ,आपली जीवनशैली कशी बदलायची ,आपल्या मनानुसार जीवन कसे जगायचे अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी तसेच आपल्या मनातील प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी नेटभेटच्या #ग्रेटभेट या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात "आकर्षणाचा सिद्धांत : विचार बदला,आयुष्य घडवा" या विषयावरील चर्चेमध्ये सहभागी झाल्या होत्या वृंदा आचार्य. त्यांच्या सोबतच्या चर्चेचा हा व्हिडीओ नेटभेटच्या वाचकांसाठी सादर करत आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
|