गुगलने ग्रामीण भागातील मुलांचे वाचन कौशल्य वाढण्यासाठी अँड्रॉइड स्मार्टफोनवर ‘बोलो’ नावाचे अॅप लॉन्च केले आहे. या योजनेचा उद्देश जी मुले शाळेत जाऊ शकत नाहीत अशा मुलांना मदत करण्याचा आहे. बोलो अॅप गुगलच्या प्ले स्टोअर मधून विनामूल्य डाउनलोड होऊ शकतो.हे अॅप ऑफलाइन देखील कार्य करू शकतो. हे अप्लिकेशन लहान मुलांना इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषेत मोठ्याने वाचन करण्यास प्रोत्साहित करते तसेच त्यानंतर लगेच अभिप्राय हि देते. गुगल ने म्हटले आहे कि या बोलोअॅपमध्ये गुगल असिस्टंट प्रमाणे एक शिक्षक सुद्धा आहे जिचं नाव आहे दिया.दिया मुलांना केवळ मजकूर वाचुन दाखवत नाही,तर इंग्रजी मजकुराचा हिंदी अर्थ देखील समजावून सांगू शकेल.
बोलोला स्मार्टफोनवर 50 एमबी पेक्षा जास्त स्टोरेज स्पेसची आवश्यकता नाही. हे अॅप साईड लोड केले जाऊ शकते आणि Google खात्यावर साइन इन केल्याशिवाय देखील वापरता येऊ शकते.बोलो अॅपमध्ये चाळीस इंग्रजी आणि पन्नास हिंदी गोष्टींचा समावेश आहे. भविष्यात आणखी गोष्टी वाढवण्याची योजना आहे. याव्यतिरिक्त, यामध्ये शब्दकोडी आणि रिवॉर्ड्स देखील समाविष्ट आहेत जेणेकरून युजर्स अधिकाधिक वापर करतील बोलो अॅप वरील सर्व वाचन सामग्री विनामूल्य आहे आणि त्यात अधिक गोष्टी वाढवण्यासाठी गुगल इतर संबंधित कंपन्यांशी संपर्कात आहे. तंत्रज्ञानाकडे शिक्षण आणि शिक्षणपद्धती बदलण्यासाठी मदत करण्याची शक्ती आहे आणि गुगलची उत्पादने,प्रोग्राम्स सक्रियपणे मार्गदर्शन करीत आहेत जेणेकरुन सर्व विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल",असे गुगलने सांगितले. ================ नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - SUBSCRIBE - https://goo.gl/JtFkBR =============== धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com |