एव्हान्स विलियम्स Evan Williams (wikipedia) Blogger.com एव्हान्स विलियम्स ने आपल्या सर्वांच्या आवडीच्या blogger.com ची सुरुवात केली. वेबलॉग हा प्रकार त्याच्यामुळेच अस्तित्वात आला. "ब्लॉगर" हा शब्द पहिल्यांदा एव्हान्सनेच वापरात आणला. २००३ साली गुगलने ब्लॉगर.कॉम विकत घेतल्यानंतर एव्हान्सने गुगलमध्येच २ वर्षे काम केले. पुढे त्याने आणखी एक कंपनी (भागीदारीत) Obvious Corp या नावाने चालू केली. Obvious Corp मध्येच ट्वीटर या संकल्पनेचा उगम झाला. पुढे ट्वीटर एक स्वतंत्र म्हणून उदयास आली. आणि २००८ मध्ये एव्हान्सने ट्वीटरचा CEO म्हणून काम पाहणे (जॅक डॉर्सी चेअरमन झाला.) सुरु केले. रेड हॉफमेन Reid Hoffman LinkedIn. (wikipedia) रेड हॉफमेन Reid Hoffman, पेपाल (PayPal) येथे एक्झीक्युटीव वाईस प्रेसीडेंट म्हणून काम करत होता. तेथील नोकरी सोडून त्याने LinkedIn (लिंक्ड्-ईन) नावाचे पहिले प्रोफेशनल सोशल नेटवर्क चालु केले. नोकर्या शोधण्यासाठी व नोकर्यांसाठी उमेदवार शोधण्यासाठी LinkedIn चा वापर केला जातो. मॅट मुलेनवेग Matt Mullenweg WordPress. (wikipedia) मॅट मुलेनवेग Matt Mullenweg ने वेबसाईट बनविणे हा प्रकार अतिशय सोपा केला. त्याने WordPress नावाची जगातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वाधिक वापरली जाणारी Conetent Management system (CMS) बनविली. वर्डप्रेस ही OPen source system असल्याने पुर्णपणे मोफत आहे. जगातील काही प्रमुख वेबसाईट्स WordPress CMS चाच वापर करत आहेत. चॅड हार्ले Chad Hurley, स्टीव्ह चेन Steve Chen, आणि जावेद करीम Jawed Karim Youtube. (wikipedia) चॅड हार्ले, स्टीव्ह चेन, आणि जावेद करीम (Chad Hurley, Steve Chen, and Jawed Karim ) यांनी देखिल सुरुवात पे-पाल मधुनच केली होती. नंतर तिघांनी मिळून जगातील सर्वात प्रसिद्ध व्हीडीओ शेअरींग साईट युट्युब (Youtube.com) ची स्थापना केली. चॅड हार्लेने डीझाईन व स्टीव्ह चेन आणि जावेद करीमने इतर तांत्रिक बाबींचे काम केले. या त्रिकुटाने बनविलेली युट्युब लवकरच लोकप्रीय झाली. केवळ दीड वर्षातच गुगलने युट्युब.कॉम तब्बल १६५ करोड डॉलर्सना विकत घेतली. पीटर थीएल Peter Thiel Paypal. (wikipedia) ईंटरनेटवर पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी, पीटर थीएलने ( Peter Thiel) ने PayPal ची स्थापना केली. पैसे ट्रान्सफर करण्यासाठीची ही सुविधा eCommerce च्या जगात लवकरच लोकप्रीय झाली. पीटरने PayPal ची सुरुवात केली तेव्हा तो ३१ वर्षांचा होता. त्यानंतर चार वर्षांनी त्याने eBay या कंपनीला PayPal १५० करोड डॉलर्सला विकली. पीअर मोराड ओमीदयार - Pierre Morad Omidyar Ebay. (wikipedia) पीअर ओमीदयार Pierre Omidyar ने ई-बे (eBay) नामक पहिला ऑनलाईन बाजार भरवला. त्याने संपुर्ण जगातील खरेदी व विक्री करणार्यांना एकत्र आणले. लिलावाद्वारे इंटरनेट वस्तु विकण्याची कल्पना देखिल त्यानेच पहिल्यांदा शोधली आणि यशस्वीरीत्या वापरली. अमेरीकेत आणि जगात इतर ठीकाणी बरेच असे लोक आहेत ज्यांचा मुख्य व्यवसाय ई-बेवर खरेदी-विक्री हाच आहे. इथे पती सेकंदाला १८०० डॉलर्स इतक्या किंमतीचे सामान विकले जाते. यावरुन ई-बे चा आवाका तुमच्या लक्षात आला असेलच ! निकलस झेनस्टॉर्म - Niklas Zennstrom Skype. (wikipedia) निकलस झेनस्टॉर्म Niklas Zennstrom ने इतिहासातील सर्वाधिक वेगाने वाढणार्या संवाद प्रणालीची (कम्युनिकेशन सीस्टम) म्हणजेच स्काईप (Skype) ची सुरुवात केली. संगणकाच्या सहाय्याने अतीशय उच्च प्रतीची दुरध्वनी सेवा पुरविणार्या स्काईप कंपनीने आता मोबाईल मध्येही ही सेवा उपलब्ध करुन दिली आहे. ईंटरनेटच्या किमयागारांचा हा लेख मी दोन भागांमध्ये संपवणार होतो मात्र हे दोन लेख लिहिताना मला ईंटरनेट क्षेत्रातील आणखी काही महान व्यक्तींची ओळख झाली. आणि म्हणूनच मी आणखी एका (तिसर्या) लेखाद्वारे त्यांना वाचकांसमोर घेउन येण्याचे ठरवले आहे.
धन्यवाद ! सलिल सुधाकर चौधरी नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com |