मित्रांनो, हा फोटो पलक मुछल या एका २४ वर्षीय तरुणीचा आहे. सहसा तुम्ही कोणी तिला ओळखत नसाल. M.S.Dhoni ह्या चित्रपटातील ' कौन तुझे' हे गीत तिने गायले आहे.त्यामुळे कदाचित आपल्यापैकी काही लोक तिला पार्श्वगायिका म्हणून ओळ्खत असतील.परंतु तिची खरी ओळ्ख ही वेगळीच आहे. पलक व तिचा भाऊ हे भारतात तसेच परदेशात वेगवेगळे गाण्याचे शो करतात्.व त्यामधून ते हृदयविकार युक्त गरीब मुलांना त्यांच्या उपचारासाठी फंड गोळा करुन देतात. वयाच्या अवघ्या ७व्या वर्षापासुन तिने गायला सुरुवात केली.कारगील युध्दात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या परिवारासाठीही तिने फंड गोळा केला.तिने 'निधि विनय मंदीर'या शाळेत सुध्दा चॅरीटी शोज केले.व तिथल्या विद्याथ्यांना वैद्यकिय उपचारासाठी निधी गोळा करून दिला.सन २०००मध्ये लोकेश या मुलाच्या हॄदय शस्त्रक्रियेसाठी पलक व तिच्या परिवाराने ५१०००रु निधी गोळा करून दिला .जून २००९ मध्ये पलक व तिच्या परिवाराने मिळून संपूर्ण जगभरात १४६० स्टेज शोज केले आणि १.७१करोड रुपये Palak Muchhal Foundation साठी गोळा केले.व त्या पैशांतून ३३८ मुलांचा जीव वाचविला. ती रुग्णांसाठी इतकं करते की डॉक्टरांनी तिला ऑपरेशन थिएटरमध्ये प्रवेश मुभा दिली आहे.ती तिथे उभी राहुन भगवद्गीताचे पठण करते हा सुध्दा तिच्या सामाजिक कार्याचा एक भाग आहे. पलक आणि तिचा परिवार या चॅरिटी शोमधून जमा झालेला पैसा कोण्त्याही वैयक्तिक खर्चासाठी वापरत नाही.त्यांच्या या महान कार्याची दखल 'Guinness book of world record व Limka book of world record' येथे नोंदवली गेली आहे.सीबीएसइ आणि महाराष्ट्र बोर्ड ने पलक च्या या महान सामाजिक कार्याचे वर्णन सातवीच्या Moral Science या पुस्तकात सामाविष्ट केले आहे. पलकने वयाच्या ७व्या वर्षापासुन इतक्या महान सामाजिक कार्याला सुरूवात केली.जेव्हा आपण फक्त खेळाचाच विचार करत होतो.तेव्हा तिने एक सामाजिक कार्यकर्ता बनुन अनेक प्राण वाचविले.खरोखरच तिचे समाजकार्यात असणारे योगदान हे प्रशंसनीय आहे. मित्रांनो कोणतेही समाजकार्य करण्यासाठी पैसाच हाती हवा असं नाही. तसं करण्याची आंतरिक इच्छा आणि तळमळ मात्र हवी. पलक मुछलच्या या महान कार्याला नेटभेटचा मानाचा मुजरा ! Salil Chaudhary Founder - Netbhet Elearning Solutions www.netbhet.com |