कोणत्याही उद्योगात नफा मिळविण्यासाठी दोन गोष्टी करणे आवश्यक असते. पहिलं म्हणजे पैसे कमवणेआणि दुसरं म्हणजे पैसे वाचवणे. यापैकी "पैसे वाचवणे" प्रकार कॉस्ट कटींगच्या रुपाने समोर येतो म्हणून तो फारसा स्वागतार्ह नसतो. परंतु त्यामुळे कॉस्ट कटींगचे व्यवसायातील महत्त्व कधीच कमी होत नाही. मित्रहो, आज मी तुम्हाला एका कंपनीने राबविलेल्या अनोख्या कॉस्ट कटींग बद्दल सांगणार आहे. बिझनेस यशस्वी करण्यासाठी जसे मोठे मोठे निर्णय घ्यावे महत्त्वपुर्ण ठरतात, तितकेच काही क्षुल्लक वाटणारे लहानसे निर्णयही उपयोगी ठरतात. त्यामुळे अशा दुर्लक्ष करता कामा नये. २०१३ मध्ये भारतातील गो-एअर या विमान वाहतुक कंपनीने डॉलर्सच्या वाढत्या किंमतीमुळे वाढणार्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक अनोखा निर्णय घेतला. विमानामधील कर्मचारी (Cabin Crew) मध्ये फक्त महिलांचाच समावेश करायचे गो-एअरने ठरविले. कारण महिलांचे वजन हे पुरुषांपेक्षा किमान १५-२० किलोने कमी असते. विमानामधील प्रत्येक एक किलो वजनामागे ईंधन खर्च प्रतीतास ३ रुपये इतका वाढतो. महिला कर्मचार्यांमुळे हा खर्च बराचसा कमी ठेवता येतो. यामुळे गो-एअरला वार्षीक ३ करोड रुपये वाचविता आले. अर्थात ही काही फार मोठी बचत नाही आहे. परंतु अशा छोट्या छोट्या बचतीच्या योजनांमुळेच गो-एअर बरेच वर्ष नफ्यात राहिली आहे. (भारतातील इतर सर्व विमान कंपन्या तोट्यात आहेत!) या योजनेचा दुसरा फायदा म्हणजे गो-एअरची ही कल्पना जगभरातील वृत्तपत्रे आणि मासिकांमध्ये छापून आली. त्यामुळे कंपनीची मोफत जाहिरात झाली. उद्योजकांनो, व्यवसाय वाढविणे म्हणजे एका मोठ्या हौदाला पाण्याने भरण्यासारखे आहे. अधिक पाणी या हौदात भरले पाहिजेच पण कुठे गळती थांबविता येईल याचा देखिल विचार केला पाहिजे. धन्यवाद ! सलिल सुधाकर चौधरी नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com |