" एकमेका सहाय्य करु, अवघे धरु सुपंथ " याचे उत्तम उदाहरण म्हणजे निखिल दुगल आणि अक्षय गोयल यांचा "आदान" हा नवउद्योग ! आपल्या व्यवहारिक जिवनात ' टाकाऊपासुन टिकाऊ ' या तत्वाचा वापर करुन उद्योगाच्या जगतात क्रान्ति घड्विण्याचा उपक्रम य जोडिने केला. घरबांधणी हा मानवी इतिहासाचा ए़़क भाग असुन गेल्या काही द्शकापासुन सिमेंट हा बांधकाम निर्मितीचे एक प्रमुख स्त्रोत म्ह्णुन सर्वानाच परिचित आहे.परंतु या ग्रुहनिर्मितिला एक नवे रुप देण्याचा प्रयत्न करुन या उद्योगात या दोघांनीही पहिले पाऊल टाकले. 'आदान' या त्यांच्या उपक्रमात जुने shipping container चा वापर करुन योग्य असे eco friendly infrastructure बनविणयाच्या त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. वेगळे काहीतरी करण्याच्या विचाराने दोघांनी सामाजिक उद्योगाच्या माध्यमातुन सन २०१५ मध्ये कंपंनीची स्थापना केली. दिल्ली येथे एक योग्य जागा शोधुन त्यांनी त्यांच्या कामाला सुरुवात केली. परीपुर्ण सुविधांसह, उत्तम तन्त्रज्ञानाचा वापर करुन container द्वारे ग्रुहनिर्मिति करुन ती योग्य जागेवर पोचविण्याची जवाबदारी त्यांनी स्विकारली. कठिण परिश्रम करुन अनेक ठिकाणी उत्तम डिजाइनर कन्टेनर त्यांनी निर्माण केले. मानवी वस्तीपासुन दुर तसेच कोणत्याही सुविधा नसलेल्या जागी , जेथे सिमेंटचे बांधकाम करणे कठीण आणि खर्चिक ठरते अशा ठिकाणी ही कंटेनर रुपी घरे पोहचविणे हा त्यांच मुळ उद्देश्य होता. आज वेगवेगळ्या क्षेत्रात मग ते उद्योग-वसाहति असोत,रेस्टोरंट असोत, NGO/CSR चे ईव्हेंट्स असोत त्यांच्या ह्या डिजाइनर कंटेनरला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. हे कंटेनर्स वापरुन दुकाने, लायब्ररी, घरे इत्यादी वास्तु बनविता येतात. एवढेच नव्हे मोठ्या ट्रक्सवर अशा वास्तु स्थापीत करुन त्यांना "फिरते" स्वरुपही देता येते. म्हणजे कुठेही जागा भाड्याने घ्यायची आणि तिथे आपलं हे घर घेऊन जायचं. इतकं सोपं.
कंटेनर पासून बनलेली घरं स्वस्त असतात, त्यांची वाहतूक करता येते आणि घरे बनविण्यास जास्त वेळ देखिल लागत नाही. इतकच नव्हे तर "आधन"ने घरांवर सौर उर्जा संच देऊन संपुर्ण घर बाहेरुन विज न घेता देखिल वापरता येतील अशी बनविली आहेत. आणि सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे अशी "कंटेनररुपी" घरे वापरल्याने घर बांधणीत होणारा पर्यावरणाचा र्हास देखिल थांबवता येतो. सध्या त्यांच्या या व्यवसायाचे ऑनलाइन तसेच ऑफलाइन मार्केटिंग चालु आहे. त्यांच्या या व्यवसायाची NDTV वरील Real Deal ह्या कार्यक्रमाने दखल घेतली. त्यानंतर त्यांच्या व्यवसायाची चांगलीच मार्केटिग झाली. आज त्यांच्या या डिजाइनर कंटेनरला सर्वात जास्त मागणी NGO मधुन येत आहे. सध्या त्यांचे प्रकल्प मुंबई,तमिळ्नाडु,छत्तिसगड्,नोइडा व इतर अनेक ठिकाणी चालु आहे. त्यांचे लक्ष्य Eco-friendiy rental store आणि High-end toilet ची निर्मीती आहे.जेणेकरुन कोणत्याही इवेंट्च्या ठिकाणी ते भाड्याने देउन व्यवसायात भर पडू श़़कते. आज सामाजिक उद्योगात 'आदान'ने एक महत्त्वाची भूमिका बजवली आहे. मोठ्यात मोठा व्यवसाय फ्क्त जास्त पैशाने नव्हे तर चांगल्या, अभिनव कल्पनेने मोठा होतो हे त्यांनी दाखवुन दिले. जेव्हा सगळ्यांसाठी अशक्य असते तेव्हाच काहितरी करुन दाखविण्याची संधी शोधतात तेच खरे उद्योजक्. कंटेनद्वारा ग्रुहनिर्माणाच्या ह्या नवीन संकल्पनेने मानवी जीवनाला पुर्णपणे नवे रुप देण्याचा त्यांचा प्रयन्त खरोखरच उल्लेखनीय आहे . http://www.aadhan.org/ धन्यवाद ! सलिल सुधाकर चौधरी नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com |