मित्रांनो, 2018 हे वर्ष माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स मध्ये अनेक नवीन सुधारणा झाल्या, नवीन कोर्सेस लॉंच केले. तसेच अनेक नवीन ठिकाणी सेमिनार देखील घेतले. यादरम्यान अनेक नवीन ओळखी झाल्या, नवे मित्र मिळाले आणि नवे ग्राहक देखील मिळाले. या सर्वांमुळे 2018 मध्ये खूप काही शिकायला मिळालं आणि त्यामधून माझ्यामध्येच अनेक सुधारणा मला करता आल्या. मित्रांनो, दरवर्षी मला काय नवीन शिकता आलं या की मी यादी करत असतो. यावर्षी देखील मी अशी यादी तयार केली आहे. आणि प्रथमच मी आपल्याबरोबर या स्वरूपात 2018 मध्ये मी काय शिकलो ते शेअर करत आहे.
मित्रांनो, 2018 मध्ये मी हे सहा धडे शिकलो. मला खात्री आहे, तुम्हालाही अशा प्रकार च्या गोष्टी शिकायला मिळाल्या असतील. आपण थोडा वेळ थांबून त्यांची नोंद मात्र करत नाही. तेव्हा आजच, एका वहीमध्ये गेल्या वर्षी तुम्ही काय शिकलात हे लिहून काढा. जर तुम्ही वहीत लिहिलं नाही, तर ते मनात बिंबवलं जाणार नाही. माझ्या या सहा धडयांपैकी कोणता तुम्हाला जास्त उपयोगी वाटतो ते मला अवश्य कळवा ! धन्यवाद ! यशस्वी भव ! धन्यवाद ! सलिल सुधाकर चौधरी नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया www.netbhet.com |