मित्रांनो आज मी अपल्याला सांगणार आहे एक सोपी युक्ती, जी वापरुन तुम्ही फेसबुक वरील कोणताही व्हीडीओ डाउनलोड करु शकता (How to Download Facebook videos?) . ते देखील कोणत्याही सॉफ्टवेअरची मदत न घेता. फेसबुकने हल्ली टाइमलाईन मध्ये जास्तीत जास्त व्हीडीओ दाखविण्याचा सपाटा लावला आहे. आणि खरेच खुप छान, मजेशीर, उपयुक्त व्हीडीओ आपल्याला फेसबुक वर पहायला मिळतात. परंतु हे व्हीडीओ आपल्याला जे फेसबुक वापरत नाहीत अशा व्यक्तींसोबत शेअर करता येत नाहीत. तसेच हे व्हीडीओ "सर्च" करता येत नाही. म्ह्णजे आज आवडलेला व्हीडीओ पुन्हा काही दिवसांनी पहायचा असेल तर तो शोधणे खुप अवघड असते. आणि अशा वेळेला आपल्याला व्हीडीओ डाउनलोड करणे आवश्यक ठरते. परंतु फेसबुकने व्हीडीओ डाउनलोड करण्याचा कोणताही मार्ग वापरकर्त्यांना दिलेला नाही आहे. मात्र फेसबुकने एक चुक केली आहे ज्यामुळे आपण फेसबुक वरील व्हीडीओ सहज डाउनलोड करु शकतो. अर्थात ही चुक जर फेसबुकच्या लक्षात आली तर कदाचित व्हीडीओ डाउनलोड करता येणार नाहीत्..परंतु तोपर्यंत आपण ही पद्धत बिनधास्त वापरु शकतो. तसे फेसबुक वरील व्हीडीओ डाउनलोड करण्यासाठी अनेक सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. परंतु आपण मात्र कोणतेही सॉफ्टवेअर न वापरता फेसबुक वरील व्हीडीओ डाउनलोड कसे करावेत ते पाहणार आहोत. व्हीडीओ आवडल्यास आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या इतर मित्रांसोबत सोशल मिडीयावर शेअर करायला विसरु नका ! धन्यवाद ! नेटभेट ई लर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू या ! www.netbhet.com |