नमस्कार मित्रहो, मी सलिल सुधाकर चौधरी. या वेब डेव्हलपमेंट कोर्सचा शिक्षक. मी इलेक्ट्रिकल इंजीनीअरिंग आणि MBA चं शिक्षण घेतलं आहे. आणि त्यानंतर १४ वर्षे सेल्स, सर्विस , मार्केटींग मध्ये कॉर्पोरेट क्षेत्रात काम केलं. २००८ साली मी एक छंद' म्हणून' नेटभेट.कॉम (netbhet.com) ही वेबसाईट सुरु केली आणि त्यानंतर गेली ८ वर्षे मी ब्लॉगलेखन, वेब डिझाईन, सोशल मेडीया मार्केटींग आणि ट्रेनर म्हणून काम करत आहे. नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्वाचं ठरेल असं जास्तीत जास्त शिक्षण मराठी भाषेतून उपलब्ध करून देण्याचा निर्धार करून मी नेटभेटची सुरुवात केली आणि गेली ८ वर्षे अव्याहत पणे हे काम मी करत आहे. वेब डिझाईन च्या या कोर्स प्रमाणेच इतर अनेक मराठी कोर्सेस मी माझ्या टीम सोबत बनवत आहे. आणि माय मराठीच्या सेवेत हे ज्ञान वाटपाच काम पुढे नेत आहे. तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा अशाच पाठीशी राहूद्यात ! धन्यवाद !!! जय हिंद ! जय महाराष्ट्र !! सलिल सुधाकर चौधरी [email protected] |