बिझनेस सुरु केल्यापासून ते मोठा करत असताना बिझनेस आणि फायनान्सशी संबंधीत अनेक संकल्पना उद्योजकाला शिकाव्या लागतात. या संकल्पना किंवा सज्ञा यांना म्हणजे बिझनेसची भाषाच आहेत.
तर अशी ही बिझनेसची भाषा एका अतिशय सोप्या उदाहरणाच्या सहाय्याने समजावून सांगणारा हा व्हीडीओ आम्ही प्रस्तुत करत आहोत. नेटभेटच्या सर्व सभासदांना हा व्हीडीओ नक्कीच आवडेल आणि उपयुक्त ठरेल याची आम्हाला खात्री आहे. व्हीडीओ कसा वाटला ते आम्हाला अवश्य कमेंट्स मध्ये लिहून कळवा. आणि व्हीडीओ शेअर करुन आपल्या मित्रमंडळीकडे देखिल ही माहिती पोहोचवा ! नेटभेट प्रस्तुत करत आहेत महाराष्ट्राच्या घराघरात उद्योजक तयार करणारा मराठी ऑनलाइन कोर्स
- उद्योजकता विकास प्रशिक्षण ( Entrepreneurship Development Programme) नमस्कार मित्रहो,
जगभरात मोठे म्हणजेच जास्त किमतीचे सेल्स करताना हमखास वापरली जाणारी SPIN SELLING ही पद्धत नक्की काय आहे आणि ती आपण आपला सेल्स वाढवण्यासाठी कशा प्रकारे वापरू शकतो हे शिकविणारा हा मराठी व्हीडीओ ...सादर करत आहोत खास नेटभेटच्या प्रेक्षकांसाठी.... https://www.youtube.com/watch?v=4YFuoIWTqHI =================================================== नेटभेटचे नवीन अपडेट्स, लेख आणि कोर्सबद्दल माहिती whatsapp वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा ! =================================================== करिअर आणि बिझनेस मध्ये प्रगती करण्यासाठी उपयोगी ठरतील असे अनेक कोर्सेस आम्ही मराठीतून उपलब्ध करून दिले आहेत. यापैकी काही कोर्सेस मोफत शिकता येतील. या संधीचा फायदा घेण्यासाठी www.netbhet.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या ! =================================================== मित्रांनो, आगामी आर्टीफिशीयल इंटेलिजन्स (कृत्रीम बुद्धीमत्ता) , थ्रीडी प्रिंटींग, आधुनिक शेती तंत्र, स्वयंचलित गाड्या, सौर उर्जा, ऑनलाईन शिक्षण आणि नव्या प्रकारचे जॉब्स या अनेक क्षेत्रात भरपूर प्रगती होत आहे. हीच आहे चौथ्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात.
ही औद्योगिक क्रांती जग बदलवून टाकणार आहे.....आपल्या डोळ्यासमोर येत्या काही वर्षात अनेक बदल होणार आहेत. कदाचित खुप चांगले आणि कधाचित खुप भयानक बदलांना आपण सामोरे जाणार आहोत. - स्वयंचलित गाड्या आल्यानंतर आपल्या पुढच्या पिढीला कदाचित कधीच ड्रायविंग लायसेन्स काढावं लागणार नाही, - भविष्यामध्ये सौर-उर्जेचा प्रभाव कसा असेल, - प्राण्यांची कत्तल केल्या शिवायही मांस बनवता येईल, - जमीनी शिवाय शेती करता येईल - आणि उच्चशिक्षण प्रत्येकाच्या कक्षेत येईल भविष्यातील या रंजक आणि अचंबित करणार्या तंत्रज्ञानाची सफर घडविणारा हा व्हीडीओ सादर करत आहोत. नेटभेटच्या वाचकांना भविष्याची ही सफर नक्कीच आवडेल. मित्रांनो, 2018 हे वर्ष माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स मध्ये अनेक नवीन सुधारणा झाल्या, नवीन कोर्सेस लॉंच केले. तसेच अनेक नवीन ठिकाणी सेमिनार देखील घेतले. यादरम्यान अनेक नवीन ओळखी झाल्या, नवे मित्र मिळाले आणि नवे ग्राहक देखील मिळाले.
या सर्वांमुळे 2018 मध्ये खूप काही शिकायला मिळालं आणि त्यामधून माझ्यामध्येच अनेक सुधारणा मला करता आल्या. मित्रांनो, दरवर्षी मला काय नवीन शिकता आलं या की मी यादी करत असतो. यावर्षी देखील मी अशी यादी तयार केली आहे. आणि प्रथमच मी आपल्याबरोबर या स्वरूपात 2018 मध्ये मी काय शिकलो ते शेअर करत आहे. जपान मध्ये फ्रेशनेस बर्गर नावाची एक मोठी बर्गर चेन आहे. फ्रेशनेस बर्गर ना आढळून आलं की त्यांच्या मेनू मधला "क्लासिक बर्गर" हा त्यांचा सगळ्यात मोठ्या आकाराचा बर्गर फारसा विकला जात नव्हता. किमतीमध्ये अनेक बदल करून पाहिले, डिस्काउंट देऊन पाहिले, तो बर्गर आरोग्यासाठी कसा चांगला आहे त्याच्या अनेक जाहिराती करून पाहिल्या परंतु तरीही बर्गर चा सेल काही वाढत नव्हता.
मार्केटिंग डिपार्टमेंट ने बर्गर च्या विक्रीचा नीट अभ्यास करायला सुरुवात केला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की महिला हा बर्गर विकतच घेत नाहीत. त्यामुळे इतर पदार्थांच्या तुलनेत क्लासिक बर्गरची विक्री जवळपास निम्म्या इतकीच असते. एकदा ही माहिती मिळाल्यानंतर मार्केटिंग डिपार्टमेंटने महिला क्लासिक बर्गर का विकत घेत नाहीत याचा अभ्यास सुरू केला. जेव्हा महिलांच्या दृष्टिकोनातून त्यांनी या प्रश्नाकडे पाहिले तेव्हा त्यांना उत्तर सापडले. |