घरासाठी आणि ऑफिससाठी फर्निचर बनवणारी IKEA (आईकिया) ही जगातील सगळ्यात मोठी कंपनी आहे. अनेक वेगवेगळ्या इनोव्हेशनसाठी प्रसिद्ध असलेल्या या कंपनीने फर्निचर क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे.
प्रचंड मोठे शोरूम, सहजगत्या जोडता येणारे मॉड्युलर फर्निचर , अत्यंत कमी खर्चात उपलब्ध करून दिलेलं फर्निचर अशा अनेक नव्या कल्पना IKEA ने सर्वात प्रथम राबवल्या. IKEA ने जेव्हा रेस्टॉरंट आणि कॉफी शॉप्स सुरू केले तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. परंतु यामागे IKEA ची एक चांगली मार्केटिंग कल्पना होती. |