• Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect

Blogs, Thoughts & Updates

चायनीज  मनी ट्रॅप

5/14/2019

Comments

 
Picture
भारतात सावकारी पद्धत फार पूर्वापार चालत आलेली आहे. त्याचे फायदे आणि तोटे हे दोन्ही आपल्याला चांगलेच माहिती आहेत. कर्ज देणारे सावकार पैशाच्या जोरावर अधिकाधिक श्रीमंत होत जातात आणि जे त्यांचे कर्ज फेडू शकत नाहीत असे गरजवंत परिस्थीतिशी झुंजत राहतात.

तुम्हाला जर मी खुप सारे पैसे उधार म्हणून दिले आणि तुमच्या खर्चासाठी अथवा बिझनेस उभा करण्यासाठी वापरण्यास सांगितले तर तुम्ही ते नक्कीच घ्याल आणि काही वर्षांनी ते परत करण्यास असमर्थ ठरलात तर त्या बदल्यात मी तुमचा बिझनेस माझ्या मालकीचा करून घेतला तर? तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हाच आहे चायनीज मनी ट्रॅप.

जगातले  अनेक विकसनशील देश सध्या आर्थिक मंदीच्या तणावात आहेत . त्यांना  त्यांच्या देशात अनेक विकासकामांसाठी पैसे लागतात.जसे कि रस्ते,विमानतळे,बंदरे इत्यादि.  अश्या गोष्टी प्रत्येक देशाच्या विकासासाठी आणि इतर देशांशी व्यापारविनिमय करण्यासाठी या अतिशय महत्त्वाच्या असतात. चीन अश्या लहान आणि विकसनशील देशांना हेरून त्यांना बिलियन डॉलर्स मध्ये कर्ज देतो.चीन कडून कर्ज हे अर्थात जागतिक बँकेच्या नियमावलीपेक्षा  कमी व्याजदाराचे असते.त्यामुळे ते गरीब देशांसाठी सोयीचे होते.

एक उदाहरण पाहू,श्रीलंकेसारख्या लहान आणि विकसनशील देशाने रस्ते बांधणी,पूल,विमानतळ,बंदरे उभारण्यासाठी किंवा मोठमोठ्या उंच इमारती ज्यांना स्कायस्कीपर्स म्हणतात अश्या बांधकामासाठी चीन कडून कर्जस्वरूपात पैसे घेतले काही वर्षानंतर कर्जांची रक्कम आणि त्यावरील व्याज यांची परतफेड न करू शकल्याने त्या त्या भूभागावर आणि त्यांनी उभारलेल्या सर्व बांधकामांवर चीन ने आपला हक्क दाखवला आहे किंबहुना त्या त्या ठिकाणी आपली माणसे नेमली आहेत आणि आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. श्रीलंकेमधी;ल बंदरे आता चीन ला व्यापारासाठी फुकटात वापरता येतील. एवढच नव्हे तर युद्ध प्रसंगी श्रीलंकेमध्ये शस्त्र देखील आणता येतील.
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================


फक्त श्रीलंकाच नाही तर पापुआ न्यू गिनी(papua new guinea),मालदीव,पाकिस्तान,मलेशिया,लाओस,कझागिस्तान,मंगोलिया,इजिप्त,केनया,
साऊथ आफ्रिका यासारखे अनेक देश चीन कडून घेतलेले कर्ज परत न केल्याने स्वतःच्याच देशात चिनी आक्रमण थांबवू शकले नाहीत.या देशातले पूल,इमारती,विमानतळे,बंदरे असे प्रकल्प सध्या चीनकडून हाताळण्यात येत आहेत.जगाच्या नकाशावर जर बारकाईने पाहिलं तर असे मोठमोठे रस्ते,पूल याद्वारे जमीन आणि बंदरे याद्वारे समुद्र मार्गे चीन आपले हातपाय पसरू पाहत आहे हे फक्त वाटतं तितकं साधासरळ नाहीय तर यातून एक खूपच महत्त्वाकांक्षी प्रकल्प समोर येतो आहे तो म्हणजे ‘न्यू सिल्क रूट’.

जगभरात आधीच चिनी वस्तुंनी आपले स्थान मार्केट काबीज केले आहे आणि आता संपूर्ण जग चिनी अधिपत्याखाली येण्याच्या मार्गावर आहे.

यावरून वैयक्तिक पातळीवर आपण एवढं तर नक्कीच शिकू शकतो कि अनाठायी खर्चापासून आणि कर्जापासून हि शक्य तितकं दूर राहील पाहिजे.  

सोर्स- नास डेली
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
धन्यवाद,

टीम नेटभेट
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
Netbhet.com


Comments
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet E-learning Solutions LLP
602, Shivdarshan CHS, Sector 20D, Airoli, Navi Mumbai
​400708, Maharashtra, India

contact - [email protected]
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect