आपण कित्येकदा ऐकतो, “तुम्ही नवा व्यवसाय सुरु करताय? मानलं बा तुम्हाला. ” “नवीन शहरात बदली झाली आहे? अरे वाह, पण तिथली काही माहिती आहे का?” अगदी “व्यायाम सुरु करताय?” पासून ते “कॅमेरा समोर काम करताय?” पर्यंतचे असंख्य खोचक प्रश्न लोकं विचारत असतात. कधी विचार केलाय ह्याचा? कि का लोकांना असे प्रश्न पडत असतील? तुम्ही काय करताय, ह्यापेक्षा तुम्ही ते करायचे धाडस केले ही गोष्टच कित्येक जणांना न पेलणारी असते. कारण कोणतीही नवी गोष्ट करायला किंवा बदल घडवून आणायला मनात धाडस असावे लागते, आणि ते सगळ्यांना जमतेच असे नाही. धाडस म्हणजे निर्भय नव्हे. तर धाडस म्हणजे मनात भीती असून सुद्धा त्या भीतीवर मात करून काम करणे. मग ते काहीही असू शकते, जसे कि काहीतरी नवीन सुरु करायचे धाडस. चुकीचे काहीतरी होत असताना ते थांबवण्याचे धाडस. किंवा व.पु काळे म्हणतात तसं - “पोटी आहे ते ओठी आणायला सुद्धा धाडसच लागते”. ================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ सर्वात मोठे धाडस काय आहे माहित आहे? स्वतः जसे आहोत तसे जगणे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वतः म्हणून किंवा स्वतःचे अस्तित्व जपून जगणे सोडून दिले आहे. “लोग क्या कहेंगे?” ह्या भीतीने आपण पछाडले गेलो आहोत. आपण सगळे एक खोटा मुखवटा घेऊन वावरत आहोत. ज्यात भीती आहे, संशय आहे आणि काळजी आहे. आपण धाडसाने मनाप्रमाणे जगण्याऐवजी भीती ला आपल्या मनात थारा दिला आहे. आपण कायम ह्या भीती पोटी धाडस किंवा साहस करायचे टाळतो. मित्रांनो, मी तुम्हाला आव्हान देतो- उद्यापासून आपण स्वतः म्हणून जगायचे धाडस करायचे आहे. उद्या..परवा..आणि पुढे आयुष्यभर. आपण हक्काने जगण्याचे आणि वागण्याचे धाडस करायचे आहे. आपला नवा व्यवसाय थाटण्याचे धाडस करा. पुस्तक लिहायचे, गाणे गायचे धाडस करा. स्वछंदी आयुष्य जगण्याचे धाडस करा. असे साहस करा कि आयुष्यभर लोकांच्या लक्षात राहाल. आपल्याकडे एकच आयुष्य आहे, त्याचा पूर्ण आनंद घ्या. धाडसी होण्यासाठी आधी धाडस करणे गरजेचे आहे. “केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे.” तर मग तयार आहात ना? मित्रांनो, खाली कंमेंट्स मध्ये एक अशी गोष्ट लिहा जी तुम्ही इच्छा असून देखील आज पर्यंत कधी केली नाहीत, पण पुढे धाडसाने नक्की कराल. आणि आम्ही तुम्हाला ते करायला लावणारच. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com |