• Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect

Blogs, Thoughts & Updates

स्वयंचलित कार्सचं युग येतंय !

4/27/2019

Comments

 
Picture
​उबर कंपनीने नुकताच स्वतःच्या स्वयंचलित कार्सच्या बिझनेससाठी 1 अब्ज डॉलर्स उभे केले आहेत. स्वयंचलित गाड्या बाजरात आणण्याच्या त्यांच्या या संकल्पनेमुळे आगामी आयपीओमध्ये उबरच्या शेअर्सना प्रचंड मागणी येउन कंपनीचे मूल्यांकन सुमारे १२० बिलियन डॉलर्स इतके होणार आहे.
 
याच आठवड्यात गुगलच्या "वेयमो" या स्वयंचलित टॅक्सीचे (रोबोटॅक्सी ) जगातील पहिले अ‍ॅप लाँच केले आहे. सध्या अमेरिकेतील काही शहरांमध्ये ही सेवा सुरु झाली आहे.
 
याच महिन्यात टेस्लाच्या एलॉन मस्कने जाहिर केले की येत्या २ वर्षात म्हणजे २०२० पर्यंत टेस्लाच्या कार्स पुर्णपणे स्वयंचलित झालेल्या असतील. एलॉन मस्क असेही म्हणाला की केवळ २-३ वर्षांतच अशी परिस्थीती असेल की आपण रोबो टॅक्सी (कोणीही ड्रायव्हर नसलेली टॅक्सी) मध्ये बसून आपले ठिकाण येईपर्यंत बिनधास्त झोपू शकतो.
 
युनायटेड किंगडम (UK) हा जगातील पहिला देशभर स्वयंचलित गाड्यांसाठी तयार असणारा देश बनणार आहे. त्यांच्या परिवहन मंत्रालयाने सांगितले आहे की २०२१ पर्यंत स्वयंचलित गाड्या रस्त्यावर धावण्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयी उपलब्ध करुन दिल्या जातील.
 
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================

जगामध्ये याघडीला साधारण ५० वेगवेगळ्या स्वयंचलित गाड्यांची चाचणी केली जात आहे. होंंडा, फोर्ड, जनरल मोटर्स, टोयोटा, वोल्वो, ह्युंडाई, डेमलर, बीएमडब्लु या प्रमुख कार कंपन्यांनी  २०२१ पर्यंत स्वयंचलित कार्स बाजारात आणण्याची घोषणा केली आहे.
 
मित्रांनो, आयफोन लाँच झाल्यानंतर केवळ चारच वर्षात कंप्युटर्सला मागे टाकत स्मार्टफोनने बाजी मारली. कोणालाही स्मार्टफोन हा शब्ददेखिल माहित नव्हता तिथपासून प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन्स येण्यासाठी ७-८ वर्षेच लागली.अगदी तसेच स्वयंचलित गाड्यांचेही होणार आहे. ही विज्ञानकथा वाटणारी गोष्ट अगदी आपल्या पुढ्यात येऊन बसलीये !
 
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
 
धन्यवाद,
टीम नेटभेट 
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
https://www.netbhet.com
Comments
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet E-learning Solutions LLP
602, Shivdarshan CHS, Sector 20D, Airoli, Navi Mumbai
​400708, Maharashtra, India

contact - [email protected]
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect