जर तुम्ही नवा व्यवसाय सुरू करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाचा सल्ला. आपल्या उत्पादनांपेक्षा आपल्या ग्राहकांकडे जास्त लक्ष केंद्रित करा. आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा कशी देता येईल ह्याकडे जास्त लक्ष दिले तर, आपल्या उत्पादनात ग्राहकांच्या गरजेनुसार बदल करता येईल. पण जर तुम्ही आपल्या उत्पादनाकडेच जास्त लक्ष देत राहिलात तर तुमचे ग्राहक त्यांच्या गरजेनुसार तुमचे किंवा इतर उत्पादन ही निवडू शकतील. जर तुम्ही भर चौकात उभे राहून आपले ग्राहक शोधत असाल तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे. आपण औद्योगिक युगतून तंत्रज्ञान युगात प्रवेश केला आहे त्यामुळे आता उत्पादन आणि उत्पादकतेपेक्षा ग्राहक आणि वैयक्तिकरण ला जास्त महत्त्व आहे. उत्पादन सुधारणा आणि क्षमतेवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा ग्राहकांच्या अनुभव आणि वैयक्तिकरण कडे लक्ष देणे जास्त गरजेचे आहे. तुमचा व्यवसाय तेव्हा सुरू होत नाही जेव्हा तुमच्याकडे उत्पादन असते तर तेव्हाच सुरू होतो जेव्हा तुमच्याकडे ग्राहक असतो. मग कोण आहे तुमच्या व्यवसायासाठी योग्य ग्राहक? आता स्वतःला विचारा- समस्या (Problem)- आपल्या ग्राहकांची समस्या काय आहे? वचन (Promise)- तुम्ही ग्राहकांच्या समस्येचे निवारण कसे कराल? आणि ग्राहकांना त्याचा कसा फायदा होईल? उत्पादन (Product)- इतर उत्पादनांपेक्षा तुमचे उत्पादन कशाप्रकारे चांगली सोय देऊ शकते? पुरावा (Proof)- ग्राहकांनी तुमच्यावर विश्वास का ठेवावा? ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ आपली उत्तरे नियमित अपडेट करत रहा. कारण आपल्या ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा ह्या कायम बदलत राहतात. आणि एकदा का तुम्हाला धागा गवसला, की तुमच्या ग्राहकांच्या आधीच तुम्हाला त्यांच्या गरजा कळतील आणि तुम्ही त्यानुसार त्यांना उत्तमात उत्तम सेवा देऊ शकाल. स्टीव्ह जॉब्स म्हणतो, “आपल्या ग्राहकांशी इतकी जवळीक साधा, कि त्यांच्या आधी तुम्हाला त्यांच्या गरजा कळल्या पाहिजेत”. आपल्याकडे जर आपल्या उत्पादनांवर प्रेम करणारे ग्राहक असतील, तर आयुष्यात अापल्याला आपल्या व्यवसायाची चिंता करायची गरज नाही. प्रेम करणारे ग्राहक असणे हे जिंकण्याचे सर्वांत सोपे सूत्र आहे. आणि ग्राहकांपेक्षा आपल्या उत्पादनांवर जास्त प्रेम करणे म्हणजे हरण्याचा सर्वांत सोपा मार्ग आहे. त्यामुळे वरील ४ सूत्रांचे अवलंबन करा, आणि आपला व्यवसाय उत्तमरित्या यशस्वी करा. ================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! Netbhet.com |