• Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect

Blogs, Thoughts & Updates

आयुष्यात यशस्वी कसे व्हायचे?

4/20/2019

Comments

 
Picture
​त्यासाठी एकच मार्ग आहे, जो मी सहा सोप्या स्टेप्समध्ये सांगणार आहे. 

१. स्वतःला प्रश्न विचारा
एका कागदावर दोन रकाने (column) करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

१. आज तुम्ही कोण आहात? 

२. उद्या तुम्हाला कोण व्हायचंय? 

उदाहरणार्थ: *आरोग्य- 
आज मी जाड आणि आजारी आहे. 

उद्या मी तंदुरुस्त आणि निरोगी असेन . 

*काम- 
आज मला माझी नोकरी आवडत नाही. 

उद्या मी माझ्या मनासारखी नोकरी करत असेन.  

*शिक्षण- 
आज मी काहीच शिकत नाहीये. 

उद्या मी दोन पुस्तके वाचेन. 

*आर्थिक स्थिती- 
आज मी कर्जात बुडालोय.

उद्या मी कर्जमुक्त असेन. 

२. दोन्ही उत्तरे रेघेने जोडा
आधीचे आणि नंतरचे विधान एका रेघेने जोडा. म्हणजेच आज काय आहात आणि उद्या काय व्हायचंय ह्या दोन विधानांमध्ये एक रेघ आखा.

===================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR     
================ 

३. ध्येपूर्तीसाठी काय करावे लागेल ते निश्चित करा
आता ह्यातला सर्वात कठीण भाग- अंतिम ध्येय गाठण्यासाठी काय करावे लागेल ते ह्या रेघेवर लिहा. काय प्रयत्न केले तर मी माझ्या ध्येयापर्यंत पोहचेन हे ह्या रेघेवर लिहा.

४. ठरवलंय ते करा 
नुसते ठरवून चालत नाही तर तशी कृती पण करा. 

५. आपल्या कृतींची १००% जबाबदारी घ्या 

आपण जे काही करणार आहोत, त्याची पूर्ण जबाबदारी घेऊन ते ध्येय पूर्ण करा.

पण.. पण.. ते कठीण आहे.”  

पण.. पण.. कसे करायचे मला माहित नाही.” 

पण.. पण.. मला कोणी मदत करत नाही.” 

पण.. पण.. माझ्याकडे पैसा नाहीये.” 

होय, कारणे अनेक सापडतील, पण लक्षात ठेवा कि हीच कारणे तुमच्या आळशीपणाला वाव देतील आणि तुम्हाला यशस्वी होण्यापासून लांब ठेवतील.

जेव्हा जेव्हा तुम्हाला असे वाटेल कि तुम्ही यशस्वी होत नाही आहात, तेव्हा तेव्हा ह्या उपक्रमातला तिसरा आणि चौथा मुद्दा परत वाचा. 

६. ध्येय गाठे पर्यंत सतत प्रयत्नशील राहा 
एकदा ध्येय ठरले की ते पूर्ण करण्यासाठी अथक मेहनत करा. अर्ध्यातून सोडून देऊ नका. 


एक गोष्ट कधीच विसरू नका- 
उद्या तुम्ही काय बनणार आहात, हे तुम्ही आज काय करता ह्यावर अवलंबून आहे. 

तेव्हा आजच आपले ध्येय निश्चित करा, त्यासाठी लागणारे सर्व प्रयत्न नियमितपणे करा आणि मग बघा यश तुमचेच आहे.

===================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR     
================ 

धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
Comments
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet E-learning Solutions LLP
602, Shivdarshan CHS, Sector 20D, Airoli, Navi Mumbai
​400708, Maharashtra, India

contact - [email protected]
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect