घरासाठी आणि ऑफिससाठी फर्निचर बनवणारी IKEA (आईकिया) ही जगातील सगळ्यात मोठी कंपनी आहे. अनेक वेगवेगळ्या इनोव्हेशनसाठी प्रसिद्ध असलेल्या या कंपनीने फर्निचर क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे.
प्रचंड मोठे शोरूम, सहजगत्या जोडता येणारे मॉड्युलर फर्निचर , अत्यंत कमी खर्चात उपलब्ध करून दिलेलं फर्निचर अशा अनेक नव्या कल्पना IKEA ने सर्वात प्रथम राबवल्या. IKEA ने जेव्हा रेस्टॉरंट आणि कॉफी शॉप्स सुरू केले तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. परंतु यामागे IKEA ची एक चांगली मार्केटिंग कल्पना होती.
===========================================
नेटभेटचे नवीन अपडेट्स, लेख आणि कोर्सबद्दल माहिती whatsapp वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा ! ============================================ करिअर आणि बिझनेस मध्ये प्रगती करण्यासाठी उपयोगी ठरतील असे अनेक कोर्सेस आम्ही मराठीतून उपलब्ध करून दिले आहेत. यापैकी काही कोर्सेस मोफत शिकता येतील. या संधीचा फायदा घेण्यासाठी www.netbhet.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या ! ============================================ मित्रांनो, तसं पाहिलं तर रेस्टॉरंट आणि फर्निचर चा काही संबंध नाही. परंतु IKEA ने तो संबंध शोधला आणि आपली विक्री वाढवण्यासाठी वापरला. आपल्या ग्राहकाच्या मनात नक्की काय चालले आहे, आणि त्याला आपल्या पर्यंत घेऊन येण्यासाठी काय दिलं पाहिजे त्याचा नक्की अभ्यास करा. वरवर जरी आपल्या बिझनेस संबंधित नसलं तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका. ग्राहकांच्या मनाचा अचूक आढावा घेऊन त्यांचे अव्यक्त प्रश्न सोडवणे म्हणजेच खरी मार्केटिंग ! धन्यवाद आणि ऑल द बेस्ट ! सलिल सुधाकर चौधरी नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! WWW.NETBHET.COM |