सौंदर्यप्रसाधने हे तर स्त्रियांसाठी खास असते.आतापर्यंत बाजारात अनेक उत्तमोत्तम ब्रॅण्ड्स ची अनेक प्रॉडक्ट उपलब्ध आहेत.टीव्ही वर सर्वात जास्त जाहिराती या सौंदर्यप्रसाधांच्या प्रॉडक्टच्या असतात.
सौंदर्यप्रसाधनांना सामान्यपणे सुंदर दिसण्यासाठी वापरले जाण्याची मानसिकता अजूनही जनमानसात आहे.पण सौंदर्यप्रसाधने फक्त सुंदर दिसण्यासाठी नाही तर केसांपासून ते पायाच्या नखनपर्यंत त्वचेची काळजी घेण्यासाठी देखील असतात. एकंदरीतच सर्वसामान्यपणे प्रत्येकाचा शारीरिक वर्ण आणि त्वचेचा पोत यानुसार नक्की कोणते प्रॉडक्ट्स वापरले पाहिजेत याची कल्पना बऱ्याच जणांना नसते आणि जी माहिती असते तीदेखील पुरेशी नसते.सर्वात मोठी गोष्ट म्हणजे योग्य माहिती देणारे पर्याय खूपच कमी उपलब्ध असतात. याच प्रश्नांचा अनुभव असताना स्वतःचं पंचवीस वर्षांचं उत्तम करिअर मागे ठेवून सौंदर्यप्रसाधनांच्या दुनियेत प्रवेश करणारी कर्तृत्ववान महिला फाल्गुनी नायर म्हणजेच आजच्या काळातला जलद रीतीने वाढत जाणारा अग्रगण्य ब्रँड नायका(Nykaa)च्या संस्थापक. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाटसप वर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ आय आय एम अहमदाबाद मधून मॅनॅजमेण्टचं शिक्षण पूर्ण करून फाल्गुनी नायर यांनी आपल्या करिअरची सुरुवात A. F. Ferguson या कंपनीतून केली. त्यानंतर कोटक महिंद्रा फायनान्स मध्ये काम करण्यास सुरुवात केली. कंपनीची लंडन येथे शाखा सुरु करून अल्पावधीतच अमेरिकेत देखील ऑफीस स्थापन केले. भारतात परत येऊन २०१२ पर्यन्त कोटक महिंद्रा फायनान्स मध्येच काम करत राहिल्या.अमेरिकेत असताना त्यांच्या निदर्शनास आलेली एक गोष्ट म्हणजे तेथे असलेल्या सौंदर्यप्रसाधनांची मोठमोठी आणि महागडी दुकाने.त्यामुळे भारतामध्ये सौंदर्यप्रसाधने सर्वच स्तरातील ग्राहकांना योग्य दरात आणि घरपोच उपलब्ध करून देणे हा एक विचार त्यांच्या या स्टार्टअप मागे मुख्यत्वे होता. इतक्या वर्षांच्या कॉर्पोरेटमधल्या कामाचा अनुभव असताना २०१२ मध्ये त्यांनी आपल्या उत्तम अश्या करिअरला राम राम केला आणि 'नायका' या ईकॉमर्स स्टार्टअप कंपनीची स्थापना केली. यामध्ये सौंदर्यप्रसाधने, पर्सनल केअर तसेच आरोग्यविषयक प्रोडक्ट्स चा समावेश होता.सर्वच उत्पादने ऑनलाइन आणि वाजवी दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे अल्पावधीतच नायका ग्राहकांच्या पसंतीस उतरला. आंतरराष्ट्रीय पातळीची कार्यप्रणाली आणि ब्रॅण्ड्स यांची सांगड घालून व्यवसाय उभारणीचा हा एक उत्तम प्रयत्न होता.सुरुवातीच्या काळात नायकाच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर इतर ब्रॅंड्सचे प्रोडक्ट्स उपलब्ध असायचे.यूजर्सची संख्या वाढल्यानंतर आणि अर्थात चांगला प्रतिसाद मिळत गेल्यानंतर नायकाचे स्वतःचे ब्युटी प्रॉडक्ट्स ऑनलाइन विक्रीस उपलबध केले गेले.ऑनलाइन पर्यायामुळे जे त्यावेळी भारतात नुकतच सुरु झालं होतं, नायकाचा पहिल्या दोन वर्षांचा टर्नओव्हर पंधरा करोड वरून २०१७ मध्ये २१४ करोड वर पोहोचला,तीन लाख यूजर्स वरून अडीच करोड झाले. यावरून फाल्गुनी यांच्या व्यावसायिक कौशल्याचा अंदाज आपण लावू शकतो. आज नायका भारतातील सौंदर्य प्रसाधनांच्या अग्रगण्य ब्रॅण्डपैकी एक मानला जातो. नायर यांच्या कौशल्य आणि नियोजनबद्ध विचारसरणीमुळे अनेक मोठे गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी पुढे आले. २०१५ मध्ये नायकाचे पहिले स्टोअर सुरु करण्यात आले. २०२० पर्यंत भारतटामध्ये ८० स्टोअर सुरु करण्याचा कंपनीचा मानस आहे. करिअरच्या उत्तम स्थितीमध्ये असताना देखील आपल्या निरीक्षण,अनुभवाच्या आधारावर ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन आपल्या व्यवसायाची सुरुवात करणे आणि नियोजनपूर्वक तो पुढे वाढवत नेणे कशा रीतीने शक्य होऊ शकते हे फाल्गुनी नायर यांनी आपल्या व्यवसायातून दाखवून दिले आहे. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाटसप वर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! Netbhet.com |