• Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect

Blogs, Thoughts & Updates

सावधान ! व्हाट्सअप मध्ये लवकरच जाहिराती येत आहेत !

10/12/2018

Comments

 
Picture
व्हॉट्सऍप चे संस्थापक जैन कॉम यांनी नुकताच फेसबुक सोडली. फेसबुक सोडल्यानंतर जान कॉम यांनी मीटर मध्ये केलेले एक वक्तव्य महत्त्वाचे आहे. "मी फेसबुकला माझ्या ग्राहकांची प्रायव्हसी विकली... आणि याबद्दल मी माझ्या ग्राहकांची माफी मागतो" असं ते विधान होतं.
मित्रांनो, चार वर्षांपूर्वी फेसबुक ने तब्बल 19 बिलीयन डॉलर्सना विकत घेतलेला व्हॉट्सऍप आता पूर्णपणे फेसबुकची संपत्ती आहे. आणि या संपत्तीचा फायदा फेसबुक ने नाही घेतला तरच नवल.


आत्तापर्यंत जाहिरातींपासून मुक्त असलेला व्हॉट्सऍप 2019 नंतर मात्र तसं राहणार नाही. फेसबुक ने व्हाट्सअप मध्ये जाहिराती आणण्याचा प्रयत्न चालवला आहे आणि ज्यान कॉम यांनी फेसबुक सोडण्याचा ते मुख्य कारण आहे.


सुरुवातीला व्हाट्सएप स्टोरीज मध्ये जाहिराती दिसतील अशा काही बातम्या इंटरनेट जगात जगतामध्ये पसरल्या आहेत. काही अंशी त्यामध्ये तथ्य आहे असं वाटतंय. परंतु जाहिराती दाखवणे तितकं सोपं नाहीये. कारण व्हॉट्सऍप मधील आपण पाठवलेला प्रत्येक मेसेज हा एनक्रिप्टेड असतो. त्यामुळे ग्राहकांबद्दल ची माहिती आणि मेसेज बद्दलची माहिती कोणालाच कळत नाही.


परंतु जर जाहिराती दाखवायचाच असतील तर मात्र इंक्रीप्शन थोडस सहील होईल हे नक्की.


व्हाट्सअप स्टोरीज हे फीचर फार वापरला जात नाही, त्यामुळे सुरुवातीला कदाचित या जाहिरातींमुळे आपल्याला त्रास जाणवणार नाही. पण पुढे पुढे व्हाट्सअप मध्ये इतरत्र देखील जाहिराती येऊ शकतात.


तर मित्रांनो मोफत होतं म्हणून एवढे दिवस आपण व्हाट्सअप वापरत होतो, आणि आता त्याची सवय लागल्यानंतर आपण अत्यंत महागडी किंमत देऊन म्हणजेच आपली वैयक्तिक माहिती देऊन व्हाट्सअप विकत घेणार आहोत.


2019 मध्ये जर असं झालं च , तर मला सांगा तुम्ही काय करणार? व्हाट्सअप वापरत राहणार? की नव्या एखाद्या जाहिरात मुक्त मेसेज प्लॅटफॉर्मचा वापर सुरू करणार?

सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू या !
​www.netbhet.com

Comments
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet E-learning Solutions LLP
602, Shivdarshan CHS, Sector 20D, Airoli, Navi Mumbai
​400708, Maharashtra, India

contact - [email protected]
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect