मित्रांनो, आपल्या सर्वाना सहा ज्ञान इंद्रियांबद्दल तर माहित आहेच,या इन्द्रियांपैकी
सर्वात वरचं किंवा महत्त्वाचं इंद्रिय कोणतं असा प्रश्न विचारला तर उत्तर देणं कठीण असेल.कल्पना करा यापैकी डोळ्यांनी काम करणे बंद केले तर? अचानक काही काळासाठी आपली बघण्याची क्षमता काढून घेतली तर?आणि ते हि समोर स्वादिष्ट असे जेवण असताना? डोळ्यांसमोर फक्त गडद अंधार! या अंधारात ही तुम्हाला सामोर असलेल्या जेवणाचा आस्वाद फक्त अंदाजाने आस्वाद घ्यायचाय! आहे ना विलक्षण आणि वेगळा अनुभव? होय! असा अनुभव तुम्हाला मिळू शकतो 'डायलॉगस इन द डार्क' (Dialogues in the Dark) या रेस्टारंट मध्ये.तुम्ही जेव्हा या रेस्टॉरंट मध्ये जाता तेव्हा तुम्हाला तुमच्याकडच्या लाइट असलेल्या किंवा प्रकाशित होणाऱ्या सर्व वस्तू म्हणजे मोबाईल, घड्याळ, लाईटर इ. सगळं काही एका लॉकर मध्ये ठेवायला सांगतात,अगदी तुमच्या चष्म्या सकट.तुम्ही आत प्रवेश केल्यानंतर लगेचच दरवाजा बंद केला जातो. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ मित्रांनो,जर मी तुम्हाला असे सांगितलले की तुमच्या डोळ्यावर मी एक कापडी पट्टी बांधणार आहे तर तुम्ही थोडे का होईना स्वतःला सावराल कारण असे केल्यावरही तुमच्या डोळ्यांना आजूबाजूचा प्रकाश जाणवेल, पण या रेस्टॉरंट मध्ये अतिशय गडद अंधार असतो. आत गेल्यावर आपले जर सोबती असतील तर आपल्याला एकामागे एक अशी साखळी करण्यास सांगतात आणि अशी साखळी करून आतला एक आपला वेटर मित्र आपल्याला आपल्या जेवणाच्या टेबलपर्यंत घेऊन जातो व आपल्या जागेवर बसण्यास मदत करतो. हे सगळं होत असताना आपले निरागस डोळे कुठूनतरी एखाद्या प्रकाशाची ज्योत येईल का ह्याची केविलवाणी आशा करत असतात पण तसे अजिबातच होत नाही.नंतर एक वेटर आपल्या जवळ येऊन आपल्याला पाण्याचा ग्लास पुढे करतो व तो कुठे ठेवला आहे त्याचा अंदाज देतो. मागाहून आपलं जेवणही येत. आता एक अंदाज लावा की तुम्हाला तुमचे जेवण जेवायचे आहे तेही समोर वाढलेल्या ताटाचा फक्त अंदाज घेऊन!! इथे वाढणारे वेटर्स हे इतक्या अंधारातही इतके सराईतपणे सर्व कामे करतात हे पाहून आश्चर्य नक्कीच वाटते पण त्याहून मोठा धक्का बसतो जेव्हा तुम्हाला हे कळतं कि आपल्याला कि आत घेऊन जाणारा आपला मित्र, वाढणारे वेटर्स हे अंध आहेत. इथून जेवून बाहेर पडलेल्यांसाठी हा एक वेगळा आणि विलक्षण अनुभव असतो यात शंका नाही.हे रेस्टारंट संवेदनशील व्यक्तींना अंध व्यक्तींच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींचं आणि अनुभवांचं थोड्या काळासाठी दर्शन घडवतं.अशा पद्धतीचं रेस्टारंट सुरु करण्यामागे हीच सामाजिक भावना आहे कि एखाद्या व्यक्तीच्या अपंगत्वावर सहानुभूती दाखवण्यापेक्षाही,त्यांचं आयुष्य जगण्याचा छोटासा प्रयत्न देखील तुमचे विचार पूर्णपणे बदलून टाकतात आणि आपण एका वेगळ्याच उंचीवर जातो. मित्रांनो, गेल्या आठवड्यात आपण "मिरची अँड माईम" या अनोख्या हॉटेलबद्दल माहिती घेतली. (त्यबद्दल इथे वाचा - https://www.netbhet.com/blog/mirchi-and-mime-a-special-restaurant-and-amazing-business ) आणि आज ‘डायलॉगस इन द डार्क’ बद्दल ! ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com
सध्या भारतात अनेक स्टार्टअप निर्माण होत आहेत जे काही खास दृष्टिकोनातून आणि काही विशेष उद्दीष्ट समोर ठेवून बनवले जात आहेत.
’द अशिओतो (Ashioto) क्राउड अनॅलिटीक्स’ हे स्टार्टअप देखील एक असे उदाहरण आहे कि जे खास 2015 मध्ये झालेल्या नाशिक येथील कुंभमेळ्यामध्ये होणाऱ्या गर्दीसाठी बनवल गेलं. अशिओटो (Ashioto) म्हणजे जपानी भाषेत ‘पाऊल’.हि एक अशी खास मॅट (चटई) आहे जी एखाद्या ठिकाणी होणारी गर्दीची माहिती तिच्यामध्ये असलेल्या सेन्सर्स द्वारे एकत्रित करून गर्दीच व्यवस्थापन करण्यास मदत करते. 2015 मध्ये कुंभ मेळा हा पहिला कुंभ मेला होता ज्यात शून्य मनुष्यहानी झाली. याचे श्रेय जाते ते अतिशय तरुण अशा निलय कुलकर्णी आणि त्याच्या टीमला.मूळचा नाशिकचाच असणारा नीलय लहानपणापासूनच त्याच्या आजोबांकडून कुंभमेळा,त्यात होणारी गर्दी तसेच चेंगराचेंगरी याबद्दल ऐकत होता. 2013 च्या कुंभमेळ्यामध्ये जेव्हा 42 जण मृत्यूमुखी पडले आणि किमान 45 जण जखमी झाले तेव्हा मात्र यावर काहीतरी उपाययोजना करण्यासाठी त्याने स्वतःला असलेल्या प्रोग्रामिंगचे ज्ञान आणि नाविन्यपूर्ण संकल्पनेद्वारे या संकटावर मार्ग शोधण्याचा विचार केला आणि दरवर्षी होणाऱ्या भयानक मृत्यूचे निराकरण करण्याचे ठरवले.त्यावेळी तो अवघ्या पंधरा वर्षांचा होता. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ त्याने बनवलेली हि mat अतिशय वैशिट्यपूर्ण आहे.सेन्सर्स बसवलेल्या या मॅट्स कुंभमेळ्यात ठिकठिकाणी ठेवण्यात आल्या. मॅट्स वर पडणाऱ्या पावलांचे सॉफ्टवेअर द्वारे संकलन करण्यात आले.अश्या रीतीने एखाद्या पॉईंट वर होणाऱ्या गर्दीचे मोजमाप करून गर्दीची माहिती पोलिसांना देण्यात आली.यामुळे गर्दीचे योग्य पद्धतीने निवारण करणे आणि चेंगराचेंगरी सारख्या समस्येवर नियंत्रण मिळवणे सोपे गेले. अवघ्या अठरा वर्षाचा निलय त्याच्या स्टार्ट अप बिझनेसचा सॉफ्टवेअर प्रमुख म्हणून काम पाहतो. त्याच्या मते उद्योजक हा लोकांच्या समस्येवर विचार करून त्या आपल्या उद्योगातून सोडवण्याचा विचार करणारा असतो.दीर्घकाळ चालणाऱ्या व्यवसायाची उभारणी करणे तो व्यवसाय टिकवणे ही एक अशी गोष्ट आहे जी लोकांच्या मनात तुमच्याबद्दल आणि तुमच्या उद्योगाबद्दल विश्वास तयार करण्यास मदत करते तसेच आज जे विद्यार्थी स्वतःच स्टार्टअप सुरू करण्याच्या दुविधेमध्ये आहेत त्यांनी आपल्या वयाचा विचार न करता नवीन निर्मिती सुरु ठेवावी,असे निलय कुलकर्णी त्याच्या tedtalk मध्ये या स्टार्टअप बद्दल बोलताना म्हणतो. (त्याचा व्हिडीओ ब्लॉग वर बघण्यासाठी क्लीक करा) ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com तुम्ही कधी तुमचे इअरफोन्स किंवा चार्जर घरी विसरला आहात आणि तुम्हाला ते हवेच आहेत.
तुम्हाला एका खास दुकानातून काही सामान विकत घ्यायचीय? एखाद्या दूरच्या हॉटेल मधून तुमची आवडती डिश ऑर्डर करायचीय? किंवा एखादे महत्त्वाचे पेपर्स झेरॉक्स करायचे आहेत?पण वेळ मिळत नाहीय? मित्रानो अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करायच्या आहेत पण वेळ नाहीय. अशा सर्व लहानातल्या लहान अथवा मोठ्यातल्या मोठ्या गोष्टी तुम्ही सहज करू शकता Dunzo app वापरून.हे अॅप सुरु करण्याचं मुळात हेच उद्दिष्ट होत कि जी कामे तुमच्या लिस्टमध्ये आहेत पण ती पूर्ण होत नाहीत अशा गोष्टी तुम्ही Dunzo app वापरून करू शकाल. खरंतर Dunzo app चे सी इ ओ कबीर विश्वास यांची हि एक साधी कल्पना होती कि त्यांना जी कामे करायला वेळ मिळत नाहीय किंवा आवडत नाहीत अशी कामे करून देणारी काहीतरी सर्व्हिस असायला हवी. म्हणून त्यांनी आधी हि कल्पना व्हॉटस ग्रुप वर करून पहिली. त्यांनी ग्रुप वरील मेम्बर्सची पेंडिंग कामे करून देण्यास सुरुवात केली. यातून बऱ्याचश्या गोष्टी त्याना अभ्यासता आल्या जसे कि नक्की कशा प्रकारची कामे,मग त्यांचे वर्गीकरण मग त्यासाठी इतर सेवा देणाऱ्या कंपन्यांशी सांगड कशी घालता येईल अशा प्रकारे अनेक प्रश्नोत्तरातून अखेरीस डंझो अॅपची निर्मिती झाली.गमतीची गोष्ट अशी आहे कि याआप साठी चे गुंतवणूकदार देखल कबीर यांना या व्हॉटस ग्रुप द्वारेच मिळाले. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ Dunzo आपल्या शहरामध्ये काहीही वितरीत करतो,आपले आवडते पिझ्झा किंवा बर्गर, फार्मसी, किराणा, कपडे धुण्याचे यंत्र, पाळीव प्राणी , पुस्तके, आपला फोन किंवा इतर अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू या सारख्या सर्व प्रकारच्या गोष्टी आपण डंझोअॅप द्वारे मागवू शकतो.किंवा इतर कोणाला पाठवू हि शकतो. याव्यतिरिक्त आपण जर का आपल्या घरी काही वस्तू विसरलो असू तर त्या सुद्धा Dunzo आपल्याला आणून देतो.फळे,भाज्या एवढंच काय किराणा खरेदी देखील करू शकतो. या मागे खूप सारा अभ्यास आणि अतिशय कणखर असे मॅनॅजमेन्ट जे कि तुम्हाला हे आप वारंवार वापरण्यास प्रवृत्त करते. जुलै २०१५ मध्ये विकसित झालेल्या या Dunzo app ची सेवा सध्या बंगलोर, पुणे, गुडगाव, दिल्ली, नोएडा, हैदराबाद आणि चेन्नई या शहरांमध्ये 24x7 उपलब्ध आहे.अशा या सर्व प्रकारच्या ऑन डिमांड सेवा पुरवणाऱ्या आप मध्ये नुकतीच गुगल ने थेट गुंतवणूक केली आहे.चार वर्षात एका व्हॉटस ग्रुपने सुरु होऊन एका २१० करोड गुंतवणूक असणाऱ्या यशस्वी स्टार्टअप ची ही गोष्ट. अश्या प्रकारच्या स्टार्टअप्स ना Hyper locals business म्हंटले जाते.छोट्या कार्यक्षेत्रांमध्ये सेवा देणे हे अनेक मोठ्या कंपन्यांना शक्य होत नाही त्यामुळे नविन व्यवसाय करण्याची इच्छा असणाऱ्या सर्वाना hyper local business ही सुवर्णसंधीच आहे.व्हाट्सअप्प सारख्या सेवेचा वापर करून तुम्हालाही असाच एखादा सर्विस बिझनेस सुरू करता येईल त्यासाठी गुंतवणुकीची ही अजिबात गरज नाही.बघा तर मग तुम्हालाही काही सुचतं का! ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! Netbhet.com उबर कंपनीने नुकताच स्वतःच्या स्वयंचलित कार्सच्या बिझनेससाठी 1 अब्ज डॉलर्स उभे केले आहेत. स्वयंचलित गाड्या बाजरात आणण्याच्या त्यांच्या या संकल्पनेमुळे आगामी आयपीओमध्ये उबरच्या शेअर्सना प्रचंड मागणी येउन कंपनीचे मूल्यांकन सुमारे १२० बिलियन डॉलर्स इतके होणार आहे.
याच आठवड्यात गुगलच्या "वेयमो" या स्वयंचलित टॅक्सीचे (रोबोटॅक्सी ) जगातील पहिले अॅप लाँच केले आहे. सध्या अमेरिकेतील काही शहरांमध्ये ही सेवा सुरु झाली आहे. याच महिन्यात टेस्लाच्या एलॉन मस्कने जाहिर केले की येत्या २ वर्षात म्हणजे २०२० पर्यंत टेस्लाच्या कार्स पुर्णपणे स्वयंचलित झालेल्या असतील. एलॉन मस्क असेही म्हणाला की केवळ २-३ वर्षांतच अशी परिस्थीती असेल की आपण रोबो टॅक्सी (कोणीही ड्रायव्हर नसलेली टॅक्सी) मध्ये बसून आपले ठिकाण येईपर्यंत बिनधास्त झोपू शकतो. युनायटेड किंगडम (UK) हा जगातील पहिला देशभर स्वयंचलित गाड्यांसाठी तयार असणारा देश बनणार आहे. त्यांच्या परिवहन मंत्रालयाने सांगितले आहे की २०२१ पर्यंत स्वयंचलित गाड्या रस्त्यावर धावण्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयी उपलब्ध करुन दिल्या जातील. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ जगामध्ये याघडीला साधारण ५० वेगवेगळ्या स्वयंचलित गाड्यांची चाचणी केली जात आहे. होंंडा, फोर्ड, जनरल मोटर्स, टोयोटा, वोल्वो, ह्युंडाई, डेमलर, बीएमडब्लु या प्रमुख कार कंपन्यांनी २०२१ पर्यंत स्वयंचलित कार्स बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. मित्रांनो, आयफोन लाँच झाल्यानंतर केवळ चारच वर्षात कंप्युटर्सला मागे टाकत स्मार्टफोनने बाजी मारली. कोणालाही स्मार्टफोन हा शब्ददेखिल माहित नव्हता तिथपासून प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन्स येण्यासाठी ७-८ वर्षेच लागली.अगदी तसेच स्वयंचलित गाड्यांचेही होणार आहे. ही विज्ञानकथा वाटणारी गोष्ट अगदी आपल्या पुढ्यात येऊन बसलीये ! ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! https://www.netbhet.com पैसा हा पाण्यासारखा असतो. तो जास्त वेळ ओंजळीत राहत नाही. आपल्याला ह्या ना त्या मार्गाने पैसे खर्च करावे लागतात, आणि मग अचानक पैश्याची चणचण जाणवू लागते. त्यामुळे प्रत्येकाने आर्थिक नियोजन करणे हे अतिशय महत्वाचे आहे. तर आता बघुयात कि आपण आर्थिक नियोजन कसे करू शकतो.
मध्यमवर्गीयांसाठी आर्थिक नियोजनाच्या काही महत्वाच्या टिप्स १. आपल्या आणि आपल्या कुटुंबासाठी एक चांगला आरोग्य विमा काढा. आजारपण काही सांगून येत नाही, त्यामुळे अचानक आलेल्या आजारपणामुळे आपले आर्थिक नियोजन ढासळण्याची शक्यता असते. २. आर्थिक बचत करा. खर्च करण्या आधी बचत करायला शिका. खर्च झाल्यावर वाचते त्यातून बचत करण्याऐवजी बचत करून जे वाचते त्यातून खर्च करा. ३. आपण बचत केलेल्या पैश्याची गुंतवणूक करा. जेवढ्या लवकर तुम्ही गुंतवणूक कराल, तेवढे तुमचे आर्थिक उत्पन्न वाढण्याची जास्त शक्यता आहे. ४. आपत्कालीन खर्चासाठी वेगळ्याने पैसे बाजूला ठेवा, ज्यात किमान तुमचे ६ महिन्यांचे खर्च भागातील. ५. आपल्या आर्थिक ध्येया नुसार (म्हणजेच, मुलांचे शिक्षण, सेवा निवृत्ती, इ.) गुंतवणूक करा. ६. अगदीच गरजेचे असल्याशिवाय कर्जाच्या जाळ्यात अडकू नका. ७. क्रेडिट कार्ड चा वापर, तेवढीच गरज असल्याशिवाय करू नका. त्यामुळे तुमच्या वायफळ खर्च करण्याच्या सवयीला आळा बसेल. अशा प्रकारे आपण आपल्या संपत्तीचे व्यवस्तीत नियोजन केले, तर आपल्याला आर्थिक अडचण कधीच भासणार नाही. मित्रांनो, तुम्ही हॉटेल मध्ये जाता का?
मग तुम्हाला हे माहीतच असेल कि कुठल्याही हॉटेल मध्ये जाऊन वेटरला मेनू विचारला, कि तो भली मोठी नावांची यादीच सांगतो, किंवा शे-दोनशे मेनू असलेले मेनूकार्ड आपल्या पुढ्यात आणून ठेवतो. पण मुंबई मधल्या एका हॉटेल मधले चित्र थोडे वेगळे आहे. पवई हिरानंदानी बिझनेस पार्क मध्ये स्थित "मिरची अँड माईम" हॉटेलची खासियत काही औरच आहे. येथे सांकेतिक खाणा-खुणांच्या द्वारे तुमची ऑर्डर विचारली जाते. आणि तुम्हीही सांकेतिक भाषेत पदार्थ सांगायचा असतो. कारण "मिरची अँड माईम" मध्ये काम करणारे कर्मचारी हे मूकबधिर आणि कर्णबधिर आहेत. मिरची अँड माईम मध्ये भारतीय पद्धतीचे जेवण मिळते. मिरची हे भारतीय जेवणातील महत्वाचे घटक आहे, आणि इथे प्रत्येक गोष्ट मूकअभिनय (MIME) करून दाखवावी लागते, त्यामुळे ह्या हॉटेलचे नाव मिरची अँड माईम ठेवले आहे. त्यांच्या मेनू कार्डवर सांकेतिक भाषेच्या सूचना आहे. त्यानुसार मूकअभिनय करून तुम्ही हवे ते अन्न मागवू शकता. हॉटेलचे बुकिंग सहजासहजी मिळत नाही, इतके लोकांच्या पसंतीस उतरले आहे हे हॉटेल. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ समाजासाठी काहीतरी करावे ह्या उद्देशाने प्रशांत इस्सर आणि अनुज शाह या मध्यमवयीन गृहस्थांनी हे हॉटेल सुरु कले आहे. 'आमच्याकडे असलेल्या कर्मचाऱ्यांसारख्या आणखी लोकांना भविष्यात हॉस्पिटॅलिटी उद्योगात स्थान मिळावं. एकटा-दुकटा नव्हे तर संपूर्ण टीम याच लोकांची असावी, हे आमचं ध्येय असल्याचंही त्यांनी सांगितलं.अशा कर्मचाऱ्यांना घेऊन हॉटेल सुरू करणं हे एक आव्हान होतं. हॉटेलमध्ये काम करू शकणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना, त्यांच्या आई-वडिलांना विश्वासात घ्यावं लागणार होतं. त्यासाठी प्रशांत व अनुज यांनी अनेक संस्थांची मदत घेतली आणि अखेर एक स्वप्न प्रत्यक्षात आलं. 'कोणाचीही सहानुभूती वा शाबासकी मिळवण्यासाठी आम्ही हे हॉटेल उघडलेलं नाही. मूक व्यक्ती आदरातिथ्याचं काम जितकं चांगलं करू शकते, तितकं नॉर्मल व्यक्तीही करू शकत नाही, असा आमचा विश्वास आहे. तो सार्थही ठरला आहे. ग्राहक आमच्यावर प्रचंड खूष आहेत,' असं प्रशांत यांनी सांगितलं. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ मिरची अँड माईम म्हणजे -स्वादिष्ठ अन्न, उत्तम वातावरण आणि मूकबधिर आणि कर्णबधिर व्यक्तींना मदत करणारी एक अनोखी व्यावसायिक संकल्पना. (शेवटचा मुद्दा भारतात खूप कमी आढळतो). समाजाचे आपण काही देणे लागतो ह्या विचारानेच अशा अनोख्या व्यावसायिक संकल्पना जन्माला येतात. मित्रांनो, गेल्या आठवड्यात आपण "सेवा कॅफे" या अनोख्या हॉटेलबद्दल माहिती घेतली. (त्यबद्दल इथे वाचा - https://www.netbhet.com/blog/seva-cafe ) आणि आज "मिरची अँड माईम" बद्दल ! या दोनीही हॉटेल्सने बिझनेस मध्ये नाविन्यपूर्ण कल्पना राबविल्या. केवळ जेवणाची चव, किंमत किंवा हॉटेलचे इंटीरीअर या नेहमीच्या गोष्टींपेक्षा ग्राहकाला एक अनपेक्षीत अनुभव देण्यात ही दोन्हीही हॉटेल्स यशस्वी झाली आहेत. आपणही आपल्या बिझनेस मध्ये ग्राहकांना असे "अनुभव" देण्यावर भर देतो का ? ग्राहक बाहेर जाऊन आपल्या बद्दल इतरांशी बोलतील असे काही मुद्दे आपल्या बिझनेसमध्ये आणू शकतो का याचा विचार करा आणि ते अमलात आणा ! त्यानंतर पहा ग्राहकच आपली मार्केटिंग करु लागेल्...आणि आपोआप व्यवसाय वाढू लागेल ! स्टीव्ह जॉब्ज आपल्याला आधीच सांगून गेला आहे " Think Different" ! ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! https://www.netbhet.comhere to edit. आपलं मन जे विचार करतं आणि ज्यावर विश्वास ठेवतं ते साध्य होतेच.
मित्रानो आज डिजिटल आणि सोशल मीडियामुळे फक्त एखाद्याचे व्यक्तिगत आयुष्यच नव्हे तर एखाद्या देशाचे राजकीय भविष्य देखील किती मोठ्या प्रमाणात बदलू शकते याची कल्पना आजचा हा लेख वाचल्यावर तुम्हाला येईल. युक्रेन या देशामध्ये रविवारी रात्री उशिरापर्यंत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे निकाल घोषित केले गेले. एक विनोदी अभिनेता वोलोडायमिर झेलेन्स्की(वय 41) हे 73%मतांनी विजयी झाले आहेत.आश्चर्याची गोष्ट हि आहे कि झेलेन्स्की यापूर्वी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हते तर त्यांनी ‘सर्व्हन्ट ऑफ द पीपल’ या टीवी मालिकेत ‘वासिल होलोबोरोड्को’ नावाच्या शिक्षकाची भूमिका साकारली होती,जो भ्रष्टाचाराविरुद्ध भाषण करतो.या शिक्षकाचे हे भाषण मालिकेमध्येच सोशल मिडियावर व्हायरल होते आणि ते मालिकेमध्येच देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले. या टीव्ही शोमुळे वर्तमान सरकार आणि त्याचे अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को यांविरुद्ध असंतोष वाढू लागला. साहजिकच ‘सर्व्हन्ट ऑफ द पीपल’ या मालिकेच्या लोकप्रियेत वाढ झाली. पुढे या टीव्ही शो मध्ये झेलेन्स्की यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध लढा दिलेला दाखवला आहे त्यामुळे त्यांची तशी प्रतिमा होत गेली. गेल्यावर्षीच निवडणूकपूर्व चाचणी मध्ये झेलेन्स्की हे सर्वाधिक मतांनी निवडून येणार असे आढळले होते. पण गमतीची गोष्ट म्हणजे त्यावेळेस ते निवडणुकीसाठी उभे देखील राहिले नव्हते.त्यांना मत देणे म्हणजे विद्यमान सरकारचा धिक्कार करणारे मत(जसे आपल्याकडे NOTA हा पर्याय असतो.)असे मानून लोकांनी त्यांना भरघोस मते दिली आणि खरोखरच ते राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ टीव्ही शो सारखच त्यांच्या राजकीय पक्षाचे नाव देखील तेच होते ‘सर्व्हन्ट फॉर द पीपल’. आणि त्याचा मुख्य फोकस हा टीव्ही मालिकेसारखाच भ्रष्टाचाराला विरोध हाच होता. निवडणुकीआधी त्यांनी एकही टीव्ही मुलाखत दिली नाही आणि तत्कालीन राष्टध्यक्षांसोबत कोणताही वादविवाद केला नाही.पारंपरिक राजकीय प्रचार न करता त्यांनी स्टेज शोज केले ज्यामध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध लढा कसा देणार याचे नाट्य रूपांतर दाखवले जायचे. हि अनोखी कल्पना जनतेला खूपच आवडली. त्यांच्या राजकीय अजेंड्याबद्दल फक्त YouTube आणि Instagram वर पोस्ट केले गेले. खरंतर याची सुरुवात एक विनोद म्हणून झाली होती.पण बघता बघता सर्व राजकारण्यांना धक्का देणारा निर्णय जनतेने दिला.१०० वर्षांपूर्वी नेपोलियन हिल यांनी अनेक यशस्वी लोकांचा अभ्यास करून यशाचे रहस्य नेमके कशात असते ते सांगितले होते त्याला द कार्नेगी सिक्रेट (The Carnegie Secret)म्हणतात जे एका वाक्यात सांगायचं तर असं आहे कि ‘आपलं मन जे विचार करतं आणि ज्यावर विश्वास ठेवतं ते साध्य होतेच.’ आज, सोशल मीडिया आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने कमीतकमीवेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे आणि गोष्टी व्हायरल होणे खूप सोपे झाले आहे त्यामुळे कोणतेही अशक्य वाटणारे स्वप्न खऱ्याखुऱ्या आयुष्यात जगणेही शक्य नक्कीच झाले आहे.व्होडायमीर झेलेंस्की यांना जिंकल्यानंतर कसे वाटले असे विचारल्यावर त्यांचे उत्तर होते,"एक युक्रेनियन नागरिक म्हणून मी सर्व जगाला सांगू शकतो, या जगात सर्व काही शक्य आहे. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com खेळणी, वाहनांचे सुटे भाग अश्या गोष्टी बनविण्यासाठी आतापर्यंत ‘३डी प्रिन्टर’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत होता. नाक-कानासारखे अवयव तयार करण्यासाठीही अलिकडे त्याचा उपयोग होऊ लागला आहे.
मात्र इस्रायलमधील तेलअवीव विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी त्याच्याही पुढे जाऊन, या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मानवी पेशी आणि रक्तवाहिन्या वापरून चक्क हृदयाची निर्मिती केली आहे. या यशस्वी प्रयोगामुळे जगभरातील वैद्यकशास्त्राला नवी दिशा आणि नवीन आव्हाने मिळणार आहेत . . हे संशोधन यशस्वी करणाऱ्या टीमचे प्रमुख डॉ.ताल डवीर यांच्या म्हणण्यानुसार, आजवर ३डी प्रिंटरच्या साहाय्याने अनेकांनी हृदयाच्या प्रतिकृती बनविल्या आहेत. पण प्रत्यक्ष मानवी पेशी, रक्तवाहिन्या, कप्पे आदी असलेले हे हृदय पहिल्यांदाच बनविण्यात आले आहे. वैज्ञानिकांनी अखेरीस जगातील पहिले 3D प्रिंटेड हृदय बनविण्यात यश मिळविले आहे. हे हृदय आकाराने छोटे असले तरीही ते पूर्णपणे मानवाच्या हृदयाप्रमाणेच बनविण्यात आले असून त्याचप्रमाणे कामही करते. या प्रिंटेड हृदयात मानवी हृदयासारखे कप्पे, रक्तवाहिन्या बनविण्यात आल्या आहेत.हे हृदय रुग्णाच्या पेशींपासून बनविण्याचे मुख्य कारण म्हणजे मानवी शरीर या हृदयाला प्रतिसाद देईल.या शोधामुळे सर्वात महत्त्वाचा फायदा असा कि यापुढे तातडीने गरज भासल्यास अवयव दात्याची बराच काळ वाट पाहावी लागणार नाही.या हृदयामध्ये सेल्स म्हणजेच पेशींचे रोपण केल्यावर ते लगेचच रक्त ढकलण्यास सुरुवात करते. भविष्यात यामुळे हजारो रुग्णांचे प्राण वाचतील. =================== नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR =================== खरंतर काही देशांमध्ये आपल्या शरीराचे भाग आधीपासूनच 3D प्रिंट होत आहेत, फिनलंडच्या टँपेर विद्यापीठात मानवी डोळ्यांचा एक नाजूक भाग ‘कॉर्नियास’ ३D प्रिंट होत आहे ज्यामुळे अंधत्वावर उपचार केले जात आहेत.चीनने देखील मानवी पोटाचे यशस्वीपणे 3D प्रिंट केले आहे. ऑस्ट्रेलियन रूबेन लिटर हि व्यक्ती 3 डी प्रिंटेड पायचे हाड मिळवणारा जगातील पहिली व्यक्ती होती तसेच डेंटल इम्प्लांट आणि हाडे बदलण्यामध्ये 3 डी प्रिंटिंग मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे. स्वीडनमध्ये रूग्णांच्या स्वतःच्या पेशी वापरुन 3 डी प्रिंटेड त्वचा, नाक आणि कान देखील बनवले गेले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून इटलीमध्ये 3 डी प्रिंटिंग केस बनवले गेले आहेत आणि त्याद्वारे पूर्ण केस प्रत्यारोपण केले जात आहेत. येत्या दशकात, सर्वच मोठ्या हॉस्पिटलमध्ये अवयव प्रिंटर उपलब्ध असतील अशी या टीमची अपेक्षा आहे.तसेच प्रिंट करण्यायोग्य अवयव तयार करण्याचे प्रमाणही येणाऱ्या दशकात खूप वाढलेले असेल. आपण आपल्या शरीरातील बऱ्याच अवयवांमध्ये हवे ते बदल करू शकतो इतके तंत्रज्ञान वेगाने विकसित होईल. सध्या आपण एका नवीन युगाच्या उंबरठ्यावर आहोत, जिथे आपण मानव म्हणून काय विचार करतो,कृती करतो हे खूप महत्तवाचे असेल कारण कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थ केवळ स्मार्ट रोबोट नसून कृत्रिम मनुष्य देखील असू शकतो. याबद्दल आपल्याला नक्की काय वाटतं? ही चांगली गोष्ट आहे का? कि तंत्रज्ञानाचा तोटा आहे? किंवा दोन्ही? =================== नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com मित्रानो उद्योग सुरू करणे आणि सुरू केल्यानंतर उद्योगाचे व्यवस्थापन करणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत,प्रत्येक मॅनेजर उद्योजक नसला तरी प्रत्येक उद्योजकाला एक चांगला मॅनेजर बनणे आवश्यक असते.
काही महत्त्वाचे नियम प्रत्येक उद्योजकाने स्वतःला लावून घेतले पाहिजेत.आज या लेखामध्ये उद्योग व्यवस्थापनाचे महत्त्वाचे 10 नियम मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या व्यवसायाच्या प्रत्येक पायरीवर हे नियम दिशादर्शक ठरतील. १. व्यवसायामध्ये कोणी मित्र नसतो, त्यात फक्त आपापल्या सोयी प्रमाणे नाती असतात. २.स्पर्धा नेहमी आपल्या उत्पादनाच्या गुणवत्तेनुसार करा,कधीही किमतीवर स्पर्धा करू नका,भविष्यात कधीतरी कोणीतरी तुमच्यापेक्षा कमी किमतीवर विकणारा स्पर्धक येईल त्यामुळे किमतीवर केलेली स्पर्धा कधीही न संपणारी असते. 3. ग्राहकाच्या गरजा, ग्राहकाचा आदर,स्वाभिमान आणि नफा हे प्रत्येक व्यवहाराचे मूलभूत आधारस्तंभ आहेत. 4.कोणत्याही व्यवसायातून अपेक्षा /आकांक्षा ठेवण्या आधी वेळ द्या आणि एखाद्या लहान मुलाप्रमाणे प्रमाणे तो जोपासा.बाळ वाढवताना भविष्यामध्ये फायदा किंवा तोटा होईल याचा विचार केला जात नाही अगदी तसाच विचार व्यवसाय वाढवताना किमान 3 वर्षे केला पाहिजे. 5.नोकरी जाण्यापेक्षा बिझनेस अकाली बंद पडण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे बिझनेस करत असताना पुढील 1 ते 2 वर्षे पुरेल इतकी सेविंग अवश्य जवळ बाळगा. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ 6. काहिही बदल न करता जे चालू आहे ते तसेच चालू ठेवणे या मानसिकतेला उद्योग क्षेत्रामध्ये जागा नसते. सतत स्वतःहून बदल करत राहणे किंवा आलेल्या बदलाला स्वतःहून स्वीकारणे अत्यंत महत्वाचे आहे. 7. आपल्या कल्पना आणि योजना बद्दल इतरांना कन्व्हिन्स करण्यापेक्षा तुमचे सर्वोत्तम प्रदर्शन करून शांतपणे उत्तराची वाट बघा. 8.उद्योगाच्या आकारमानापेक्षा (turnover) नफा मिळवणे हे प्राथमिक उद्दिष्ट असले पाहिजे, काही लघुउद्योग सुद्धा अवाढव्य कारखान्यापेक्षा मोठा नफा मिळवून देऊ शकतात.आधी खूप जास्त गुंतवणूक आणि नंतर उशिराने नफा असे गणित असलेल्या व्यवसायामध्ये जाण्याचे टाळा. 9. उद्योजकाला सगळ्या गोष्टींचे थोडे थोडे ज्ञान असलेच पाहिजे मग ते तांत्रिक, निर्मिती, अर्थव्यवहार असो वा मार्केटींग किंवा एच. आर असो. हे माझे क्षेत्र नाही किंवा मला हे जमत नाही असे म्हणण्याचा उद्योजकाला अधिकारच नसतो. 10.तुमच्याकडे पुढील महिन्याचा किंवा येणाऱ्या वर्षाचा प्लान ऑफ ऍक्शन तयार करून उद्योगाला सगळ्या अडचणींना सामोरे जाऊन खूप दूरवर न्यायची दुरदृष्टी हवी. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com या जगामध्ये दोन प्रकारचे लोक असतात. मला जगाकडून काय मिळतंय ? (मागणारे) आणि मी जगाला काय देऊ शकतो ? (देणारे) असा विचार करणारे !
मागणे हे नैसर्गिकतःच आपल्यामध्ये असते. मागण्यासाठी काहीच कष्ट लागत नाहीत आणि ते देण्यापेक्षा नक्कीच सोपे असते. मात्र "मी जगाला काय देऊ शकतो?" याचे उत्तर शोधणारे कमी असतात. कारण "देणे" सोपे नसते. देण्यासाठी वेळ, उर्जा, संपत्ती खर्च करावी लागते. परंतु केवळ स्वतःचाच विचार करणार्या माणसांना ही गोष्ट लक्षातच येत नाही जे लोक जगाला काही देण्याचा प्रयत्न करतात तेच अधिकाधिक मौल्यवान होत जातात. सतत काही न काही मागणी करणार्या लोकांना आपण टाळतो. कोणालाही त्यांच्यासोबत वेळ घालवायला आवडत नाही. पण तरीही जग अशा लोकांनी भरलेले आहे. याउलट "देणार्या" लोकांशी मैत्री, जवळीक करायला सर्वांनाच आवडतं. आणि त्यांच्याकडून मिळालेलं ज्ञान, प्रेम , सौख्य आपणही इतरांमध्ये आनंदाने वाटतो. गाय दुध, शेण, गोमुत्र देते तसेच फळं, लाकूड, प्राणवायू देतात म्हणून झाडं अत्यंत महत्त्वाची असतात. जेवढं गवत खाते त्यापेक्षा कित्येक पटीने गाय परत देते, जेवढी खतं लागतात त्यापेक्षा कित्येक पटीने वृक्ष मानवाला परत देतात. मित्रांनो, यालाच इंग्रजी मध्ये "Value" हा शब्द आहे. नोकरी असो, व्यवसाय असो अथवा जीवनातील कोणतीही बाब असो, जेवढी जास्त "वॅल्यु" आपण इतरांना देणार तेवढा मोबदला आपल्याला मिळणार, प्रेम आणि आदर वाढत जाणार. यश हे आपण किती "वॅल्यु" जगाला देतो या एकाच गोष्टीवर अवलंबून असतं ! ================ नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - SUBSCRIBE - https://goo.gl/JtFkBR =============== - नोकरीत आपण किती काम करतोय, यापेक्षा आपण केलेलं काम कंपनीला किती उपयोगाचं ठरतंय ते महत्त्वाचं ! - बिझनेसमध्ये आपण ग्राहकाला जे उत्पादन विकतोय, ते आकारलेल्या किंमतीपेक्षा ग्राहकाला किती जास्त फायदेशीर ठरतं ते महत्त्वाचं ! माझ्या ऑफीसमध्ये एक पिऊन होता. ऑफेसमधली बारीक सारिक कामं करायचा. शिक्षण बिलकुल नव्हतं पण स्वतःहून कंप्युटर चालवायला , डेटा एंट्री करायला शिकला. स्वतःहून इतरांना मदत करु लागला. काही दिवसांनंतर कंत्राटी लोकांना सामावून घेण्यासाठी जागा निघाल्या तेव्हा तो बॅक ऑफीस जॉबसाठी तयार होता. कोणाकडे वशिला लावला नाही, की कोणाकडे दया मागितली नाही. स्वतःची "वॅल्यु" वाढविली आणि "वॅल्युएबल" बनला. उगाचंच मी खुप काम करतो म्हणून माझा पगार वाढला पाहिजे असा आक्रोश करण्यात काहीच फायदा नसतो. तुम्हाला जे हवंय ते जग तुम्हाला देत नसून, तुम्ही किती वॅल्यु देता त्यावर अवलंबून असतं. आणखी एक गोष्ट ! काही लोक देतात पण मोजून मापून ! दिलं की लगेच किती आणि कधी परत मिळणार याची गणितं सुरु होतात. याला "देणे" म्हणत नाही हा व्यवहार झाला. ================ नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - SUBSCRIBE - https://goo.gl/JtFkBR =============== या वॅल्यु मधूनच "वॅल्युएबल" (Valueable) हा शब्द तयार झाला आहे हे विसरू नका ! Valueable म्हणजे मौल्यवान बनायचं असेल तर "द्यायला" शिका ! यशाच्या मागे न धावता, आपली किंमत वाढवायला , स्वतःला मौल्यवान करण्यासाठी वेळ, उर्जा आणि पैसा खर्च करा ! मग बघा यश कसं पायघड्या घालंत येतं ते ! यशस्वी भव ! All the best ! सलिल सुधाकर चौधरी Netbhet elearning solutions मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !! www.netbhet.com कल्पना करा कि तुम्ही एखाद्या रेस्टोरंट मध्ये नेहमीप्रमाणे जेवण मागवता आहात ,जेवणानंतर छानसं डेजर्ट ही मागवले आहे आणि भरपेट स्वादिष्ट अशा जेवणाची चव चाखल्यानंतर तुमच्या हातात बिल येण्याऐवजी रिकामं पाकीट आणून दिलं आहे,कारण तुमच्या जेवणाचं बिल आधीच भरून तुमचं जेवण हे कोणीतरी गिफ्ट केलं आहे? आश्चर्य वाटलं ना? पण असं रोज घडतं अहमदाबाद मधल्या सेवा कॅफे मध्ये.
खरं तर आजच्या व्यवसायाभिमुख जगात उद्योग,विस्तार,नफा अशा गोष्टींचाच जास्त विचार केला जातो परंतु ‘ग्रामश्री’ ‘मानव सदन’ आणि ‘स्वच्छ सेवा’ यासारख्या एन जी ओ द्वारे चालवल्या जाणाऱ्या सेवासदनची गोष्ट थोडी वेगळी आहे. गेल्या अकरा वर्षांपासून हा कॅफे गिफ्ट इकॉनामी या तत्वावर चालवण्यात येतो आहे.आता हि गिफ्ट इकॉनामी नक्की काय आहे? तर आपल्याला आपलं जेवण झाल्यानंतर बिल द्यावे लागत नाही कारण ते आधीच कोणीतरी भरलेले असते,मग आपण ही तसेच दुसऱ्या कोणासाठी तरी आपल्या मनाप्रमाणे पैसे द्यायचे आणि या साखळीला पुढे चालवत ठेवायचं.. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ सेवा कॅफे हा फक्त नेहमीसारखा कॅफे नसून हि एक विचारपद्धती आहे. जी खरंतर वर्षानु वर्षे पुढे चालत येत आहे, ती म्हणजे अतिथी देवो भवं! जसे आपल्या घरी पाहुणे येतात आणि आपण त्यांना आनंदाने जेऊखाऊ घालतो तसेच या कॅफेतही स्वयंसेवक स्वतःहून येतात,सर्व प्रकारचे जेवण बनवतात, येणाऱ्या पाहुण्यांना स्वतःच्या कुटुंबातील सदस्यप्रमाणे मानून अतिशय प्रेमाने ते सर्व्ह करतात, आणि त्यानंतर ची स्वच्छता हि करतात मुख्य म्हणजे हे सगळं ते स्मितहास्यासह आनंदाने करतात.सेवा कॅफे अशा पद्धतीने निस्वार्थ भावनेने केल्या जाणाऱ्या आदरातिथ्याने येणारे हि आश्चर्यचकित होतात आणि स्वतःहून काही रक्कम जास्त गिफ्ट करतात असा इथल्या स्वयंसेवकांचा अनुभव आहे.हा एकप्रकारचा सामाजिक प्रयोगच आहे जिथे विद्यार्थ्यांपासून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत,गृहिणीपासून ते अगदी परदेशी पर्यटकांपर्यंत एकच संदेश पोहोचतो कि खरा आनंद निस्वार्थ भावनेने दुसऱ्याला काहीतरी देण्यात आहे आणि या जगात अजूनही माणुसकी शिल्लक आहे. या कॅफे तुन मिळणाऱ्या नफ्याची रक्कम ही काही संस्थांना मदत म्हणून दिली जाते. तर अश्या या सेवा कॅफेत तुम्ही जेव्हा जाल, तेव्हा तुमच्या हातात बिल येईल ज्यावर 0 रुपये किमतीसह एक तळटीप लिहिलेली असेल,ती म्हणजे “आपलं जेवण हे आधी आलेल्या पाहुण्यांनी तुम्हाला गिफ्ट केलेलं आहे,म्हणून आम्ही तुम्हाला सुद्धा अशाच गिफ्ट ची साखळी अखंडित ठेवण्यासाठी आमंत्रित करत आहोत.” मित्रानो,व्यवसायामध्ये स्टॅंडर्ड प्रॉडक्ट पेक्षा नेहमी काहीतरी वेगळं देणं हे यशाचं हमखास उत्तर असतं.सेवा कॅफे ने केवळ रेस्टॉरंट या दृष्टीने बिजनेसकडे न बघता त्या मध्ये एक सामाजिक उपक्रम देखील गुंफला आहे. साहजिकच ग्राहक याकडे व्यवहार म्हणून न बघता एक सोशल कोज म्हणून बघतो. ग्राहकांची भावनिक गुंतवणूक मिळाल्यास एक दृढ नाते तयार होते आणि त्यामुळे ग्राहकांचा ओघ कधी ही कमी होत नाही. गिफ्ट इकॉनॉमि ची आयडिया तुम्हाला देखील वापरता येते का पहा. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com त्यासाठी एकच मार्ग आहे, जो मी सहा सोप्या स्टेप्समध्ये सांगणार आहे.
१. स्वतःला प्रश्न विचारा एका कागदावर दोन रकाने (column) करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. १. आज तुम्ही कोण आहात? २. उद्या तुम्हाला कोण व्हायचंय? उदाहरणार्थ: *आरोग्य- आज मी जाड आणि आजारी आहे. उद्या मी तंदुरुस्त आणि निरोगी असेन . *काम- आज मला माझी नोकरी आवडत नाही. उद्या मी माझ्या मनासारखी नोकरी करत असेन. *शिक्षण- आज मी काहीच शिकत नाहीये. उद्या मी दोन पुस्तके वाचेन. *आर्थिक स्थिती- आज मी कर्जात बुडालोय. उद्या मी कर्जमुक्त असेन. २. दोन्ही उत्तरे रेघेने जोडा आधीचे आणि नंतरचे विधान एका रेघेने जोडा. म्हणजेच आज काय आहात आणि उद्या काय व्हायचंय ह्या दोन विधानांमध्ये एक रेघ आखा. =================== नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ ३. ध्येपूर्तीसाठी काय करावे लागेल ते निश्चित करा आता ह्यातला सर्वात कठीण भाग- अंतिम ध्येय गाठण्यासाठी काय करावे लागेल ते ह्या रेघेवर लिहा. काय प्रयत्न केले तर मी माझ्या ध्येयापर्यंत पोहचेन हे ह्या रेघेवर लिहा. ४. ठरवलंय ते करा नुसते ठरवून चालत नाही तर तशी कृती पण करा. ५. आपल्या कृतींची १००% जबाबदारी घ्या आपण जे काही करणार आहोत, त्याची पूर्ण जबाबदारी घेऊन ते ध्येय पूर्ण करा. पण.. पण.. ते कठीण आहे.” पण.. पण.. कसे करायचे मला माहित नाही.” पण.. पण.. मला कोणी मदत करत नाही.” पण.. पण.. माझ्याकडे पैसा नाहीये.” होय, कारणे अनेक सापडतील, पण लक्षात ठेवा कि हीच कारणे तुमच्या आळशीपणाला वाव देतील आणि तुम्हाला यशस्वी होण्यापासून लांब ठेवतील. जेव्हा जेव्हा तुम्हाला असे वाटेल कि तुम्ही यशस्वी होत नाही आहात, तेव्हा तेव्हा ह्या उपक्रमातला तिसरा आणि चौथा मुद्दा परत वाचा. ६. ध्येय गाठे पर्यंत सतत प्रयत्नशील राहा एकदा ध्येय ठरले की ते पूर्ण करण्यासाठी अथक मेहनत करा. अर्ध्यातून सोडून देऊ नका. एक गोष्ट कधीच विसरू नका- उद्या तुम्ही काय बनणार आहात, हे तुम्ही आज काय करता ह्यावर अवलंबून आहे. तेव्हा आजच आपले ध्येय निश्चित करा, त्यासाठी लागणारे सर्व प्रयत्न नियमितपणे करा आणि मग बघा यश तुमचेच आहे. =================== नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com महान बॉक्सर मोहम्मद अली यांनी बॉक्सिंग शिकायला सुरुवात केली त्याचं खरं कारण फार गमतीशीर आहे. मोहम्मद अली १२ वर्षाचे असताना त्यांची सायकल एका मुलाने पळविली होती. त्याला धडा शिकविण्यासाठी म्हणून मोहम्मद अलींनी बॉक्सिंगची सुरुवात केली.
त्यांची सायकल परत मिळाली की नाही ते ठाऊक नाही...पण त्या एका निर्णयाने जगाला एक सर्वोत्कृष्ट बॉक्सर आणि खेळाडू मिळाला ! म्हंटलं तर हे फार क्षुल्ल्लक कारण आहे. पण त्याला मोहम्मद अलींनी दिलेली प्रतीक्रीया महत्वाची आहे. अशा क्षुल्लक वाटणाऱ्या बऱ्याच घटना आपल्यासोबतही घडत असतात. त्यावर आपण काय करतो, करू शकतो याचा थोडं थांबून विचार करणं आणि नंतर प्रतिसाद देणं महत्वाचं आहे. =================== नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com लोकांना नेहमी असं वाटतं की यशस्वी लोक खुप नशीबवान किंवा ईश्वरी देणगी लाभलेले असतात. पण खरंतर नशीबाने त्यांच्या यशाबद्दल काहीच ठरवलेलं नसतं, अथक परीश्रम, अभ्यास आणि संघर्ष करुन त्यांनी ते यश खेचून आणलेलं असतं.....
खरंतर असं यश मिळविण्याची, महान बनण्याची सुरुवात त्या दिशेने टाकलेल्या छोट्या पावलाने होते. महान बनण्याची सुरुवात तुम्ही स्वतःसाठी पाहिलेल्या एका स्वप्नाने होते. त्या स्वप्नाचे एक ध्येय बनतं आणि ते ध्येय मी साध्य करणारंच या विश्वासानेच माणूस महानतेच्या दिशेने चालू लागतो. आणि जेव्हा तुम्ही या ध्येयाच्या दिशेने चालू लागतो तेव्हा मार्गात येणारा सगळ्यात मोठा अडथळा तुमच्या भोवतालच्या जगातून कधीच येत नसतो. तुमचा संघर्ष विरुद्ध खेळणार्या संघाबरोबर नसतो, शर्यतीत आपल्याबरोबर धावणार्या खेळाडूसोबत नसतो, तुमच्या बिझनेस मधील स्पर्धकांसोबत नसतो, किंवा ऑफीसमधील सहकार्यांसोबत नसतो तुमचा खरा संघर्ष स्वतःशीच आपला आपल्याशीच असतो. तुम्हीच तुमचा सगळ्यात मोठा अडथळा असता. तुमच्या यश किंवा अपयशाचं मुख्य कारण तुम्हीच असता दररोज सकाळी उठून एक सर्वसाधारण आयुष्य जगायचं की काहीतरी विलक्षण साध्य करायचं हे तुम्ही ठरवता. तुमचा दृष्टीकोन ते ठरवत असतो. जेव्हा कोणीही तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवत नाही आणि हाती घेतलेलं काम अशक्य वाटू लागतं तेव्हा तुमचा आत्मविश्वासच कामी येतो. तुमच्या स्वप्नांच्या मध्ये कोणताही अडथळा उभा असेल, तो पार करणं कितीही अशक्य वाटत असेल तरी तो पार करता येईल.......फक्त आरशात तुमच्याकडे पाहणार्या व्यक्तीला तसा विश्वास वाटला पाहिजे !! ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com लोकांना नेहमी असं वाटतं की यशस्वी लोक खुप नशीबवान किंवा ईश्वरी देणगी लाभलेले असतात. पण खरंतर नशीबाने त्यांच्या यशाबद्दल काहीच ठरवलेलं नसतं, अथक परीश्रम, अभ्यास आणि संघर्ष करुन त्यांनी ते यश खेचून आणलेलं असतं.....
खरंतर असं यश मिळविण्याची, महान बनण्याची सुरुवात त्या दिशेने टाकलेल्या छोट्या पावलाने होते. महान बनण्याची सुरुवात तुम्ही स्वतःसाठी पाहिलेल्या एका स्वप्नाने होते. त्या स्वप्नाचे एक ध्येय बनतं आणि ते ध्येय मी साध्य करणारंच या विश्वासानेच माणूस महानतेच्या दिशेने चालू लागतो. आणि जेव्हा तुम्ही या ध्येयाच्या दिशेने चालू लागतो तेव्हा मार्गात येणारा सगळ्यात मोठा अडथळा तुमच्या भोवतालच्या जगातून कधीच येत नसतो. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ तुमचा संघर्ष विरुद्ध खेळणार्या संघाबरोबर नसतो, शर्यतीत आपल्याबरोबर धावणार्या खेळाडूसोबत नसतो, तुमच्या बिझनेस मधील स्पर्धकांसोबत नसतो, किंवा ऑफीसमधील सहकार्यांसोबत नसतो तुमचा खरा संघर्ष स्वतःशीच आपला आपल्याशीच असतो. तुम्हीच तुमचा सगळ्यात मोठा अडथळा असता. तुमच्या यश किंवा अपयशाचं मुख्य कारण तुम्हीच असता दररोज सकाळी उठून एक सर्वसाधारण आयुष्य जगायचं की काहीतरी विलक्षण साध्य करायचं हे तुम्ही ठरवता. तुमचा दृष्टीकोन ते ठरवत असतो. जेव्हा कोणीही तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवत नाही आणि हाती घेतलेलं काम अशक्य वाटू लागतं तेव्हा तुमचा आत्मविश्वासच कामी येतो. तुमच्या स्वप्नांच्या मध्ये कोणताही अडथळा उभा असेल, तो पार करणं कितीही अशक्य वाटत असेल तरी तो पार करता येईल.......फक्त आरशात तुमच्याकडे पाहणार्या व्यक्तीला तसा विश्वास वाटला पाहिजे !! ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com १५ वर्षानंतर अथक संघर्षानंतर अमेरिकन खेळाडू एल्ड्रिक टाँट टायगर वूड्स ने गोल्फ या क्रीडाप्रकारात पाचव्यांदा मास्टर्स किताब जिंकला आहे.
या १५ वर्षांचा टायगर चा प्रवास नेमका कसा होता? इतका संघर्ष त्याला का करावा लागला ते पाहू.. 2004 - 264 आठवडे विजेतेपद राखल्यानंतर टाइगरने विजय सिंगद्वारा वर्ल्ड नंबर 1 गोल्फ रैंकिंग पद गमावले. 2005 - टायगरने PGA टूर इव्हेंट्स (आणि त्यांचे शेवटचे मास्टर्स) जिंकले आणि काही काळासाठी पुन्हा विजेतेपद परत मिळविले. 2007 - त्याच्या वडिलांच्या निधनानंतर फॉर्म मध्ये येण्यासाठी खूप झगडावे लागले. 200 9 - गुडघ्याचे ऑपरेशन मुळे त्याला खेळापासून आठ महिने दूर राहावे लागले. कार अपघात,वैवाहिक आयुष्यातली अस्थिरता अशा कारणामुळे तो प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत राहिला. 2010 - टाइगरच्या आयुष्यातल्या अनेक खाजगी गोष्टी सार्वजनिक झाल्या.त्याची पत्नी एलिनने त्याला घटस्फोट दिला.त्याने त्याचे प्रमुख प्रायोजक गमावले.जाहिरातींमध्ये 22 दशलक्ष डॉलर्स आणि शेअर्स मध्ये 12 अब्ज डॉलर्सचे नुकसान अशा अनेक गोष्टी जगासमोर आल्या.तो दीड महिने व्यसनमुक्तीकेंद्रात दाखल झाला, 2015 - पाच वर्ष सतत निराशजनक कामगिरी होत असताना पुन्हा एकदा टायगरला पाठीच्या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले, त्यामुळे त्याला चालणेही कठीण होत होते,हा काळ त्याच्यासाठी खुपच खडतर होता. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ 2016 - टाइगरच्या पाठीचा दुखणं सुरूच होतं.तो म्हणतो, "कमीत कमी चार ते सहा महिने दररोज मला उठण्यासाठी मदत घ्यावी लागत असे अश्या परिस्थितीत पुन्हा गोल्फ खेळू शकेन असा विचारही माझ्या मनात येत नसे.मला फक्त हाच विचार सतावत असे कि, मी या वेदनापासून दूर कसा जाऊ शकतो? मी पुन्हा आयुष्य कसे जगू? 2017 -पाठीच्या अजून एका शस्त्रक्रियेनंतर,गोळ्यांच्या अतिसेवनामुळे त्याला DUI अंतर्गत अटक करण्यात आली. 2018 - दुखापतीनंतर चार वर्षांनी टायगर मैदानात उतरला,त्याच्या शून्यातून पुन्हा उभे राहण्याच्या जिद्दीला पाहून त्याच्या सोबतचे खेळाडू त्याला चालतां बोलता चमत्कार "Walking Miracle.” म्हणू लागले. 201 9 - आज 14 वर्षांनंतर आणि गेममध्ये परतल्यानंतर , टायगरने 5 व्यांदा मास्टर्स पदक जिंकले. हे त्याचे 81 वे पीजीए टूर विजेतेपद आहे. आज जिंकल्यानंतर टायगर म्हणाला की माझ्या आयुष्याचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. १९९७ साली मी जिंकलो तेव्हा माझे वडील माझ्या सोबत इथे हजर होते आणि आज मी वडील आहे व माझी मुले माझा विजय पाहत आहेत. मला खात्री आहे, माझा कठीण काळ पाहिल्यानंतरचा आजचा दिवस माझ्या मुलांना सतत प्रेरणा देत राहील. टायगर वूड्सच्या आयुष्यात आलेल्या अनेक कठीण प्रसंगावर त्याच्या जिद्दीने त्यावर मात करत तो या यशापर्यंत पोहोचलाय.यातून काही गोष्टी नक्कीच विचार करण्यासारख्या आहेत, त्या म्हणजे… > आयुष्यात येणाऱ्या प्रतिकूल गोष्टीमध्ये तुम्ही किती काळ टिकून राहू शकता ? >अपयशानंतर पुन्हा उभं राहण्यासाठी किती तयारी कराल? > यशस्वी होण्यासाठी तुम्ही किती प्रयन्त कराल? मित्रांनो, संकटांना कंटाळून, शारीरिक व्याधींना त्रासून, गतवैभव नष्ट झाल्यामुळे किंवा निराशेने आपण जर कधी माघार घेण्याचा विचार करत असाल तर टायगर वूड्स च्या प्रेरणादायी विजयाची आणि संघर्षाची ही कहाणी जरूर आठवा ! ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com एकदा आम्ही एका कॅफे मध्ये गेलेलो.
तिथला एक वेटर आम्हाला वाढत असताना त्याच्याकडून चुकून माझ्या एका मित्राच्या पांढऱ्या शर्टवर साॅस सांडला. एका क्षणासाठी दोघेही स्तब्धपणे त्या डागाकडे बघत राहिले. वेटर घाबरून म्हणाला, “मला माफ करा सर, तुम्ही माझ्याबरोबर वाॅशरूममध्ये या, मी तुम्हाला हा डाग साफ करून देतो. घाबरून त्याला घाम फुटला होता. माझा मित्र ह्यावर हसत म्हणला, “ठीक आहे, होते असे कधीकधी, मला फक्त वॉशरूम कुठे आहे ते सांग, मी करतो हा डाग साफ.” मित्र मागे वळून परत वेटरला हसत म्हणला, “काळजी नको करु, मी टीप द्यायचा विचार बदलणार नाहीये. त्यावर वेटरही हसला. खूप दिवस होऊन सुद्धा धोब्याने कपडे दिले नाहीत म्हणून आम्ही त्याच्याकडे गेलो. धोब्याने कपडे दिले आणि घाबरत घाबरत एक शर्ट जळलाय सांगत आम्हाला दाखवला. मित्र त्या ५०-६० वर्षाच्या धोब्याच्या थकलेल्या आणि सुरकुतलेल्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला, “काही हरकत नाही काका, त्या निमिताने तुम्ही मला एक नवीन शर्ट घेण्याचे कारण दिले.” त्याने हसून त्याचा हात धरला व घाबरलेल्या त्या धोब्याला धीर आला. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ बरेच दिवस झाले आमच्या बिल्डिंगचे वाॅचमन आले नाहीत म्हणून माझा मित्र त्यांच्या घरी गेला. तिथे गेल्यावर त्याला कळले की ते आजारी होते आणि त्यांच्या मुलीचे लग्न अगदी तोंडावर आले होते. तो पूर्ण दिवस तिथेच राहिला आणि त्यांच्या मुलाला लग्नाच्या तयारीसाठी त्याने मदत केली. लग्नाच्या दिवशीसुद्धा पाहुण्यांचे अगत्य आणि मानपान करण्यासाठी तो सज्ज होता. सहानुभती म्हणजे इतरांच्या वेदनांची जाणीव होऊन त्यात एकरूप होत, त्यांना आनंद देण्याची कला आहे. कोणाचा तरी दिवस चांगला बनवण्याचा तो एक प्रत्यत्न आहे. अत्यंत महत्त्वाची, पण तरीही कमी लेखली जाणारी एकमेव गोष्ट म्हणजे सहानुभूती आपले व्यकतिमत्त्व खुलून दाखवणारा असा हा गुण अंगी बाळगणे सहज शक्य आहे. त्यासाठी पैसा लागत नाही आणि श्रम ही लागत नाही. बघा तर मग, आजपासून कुठे सहानुभूतीने वागण्याची संधी मिळते का ते? ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com आंध्र प्रदेशातील, मछलीपट्टनम गावातील एका गरीब जोडप्याला एक मुलगा झाला. तो मुलगा जन्मतःच अंध होता. एके दिवशी तो वडिलांबरोबर शेतात काम करत असताना त्याच्या वडिलांना जाणवले कि अंध असल्यामुळे त्याला शेतात काम करणे कठीण जाते, त्यामुळे त्याने शेतात काम करण्याऐवजी शाळेत शिकले पाहिजे. गावात अंध मुलांसाठी शाळेची सोय नसल्यामुळे वडिलांनी त्याचे नाव दुसऱ्या गावातल्या एका शाळेत घातले. शाळेत कुणीही त्याला किंमत देत नसे. दहावी मध्ये त्याला ९०% मिळाले, तेव्हा कुठे शाळेत त्याला ओळखू लागले.
दहावीनंतर, त्याने बारावीत विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचे ठरवले पण तेव्हाही लोकांनी त्याला ‘अंध मुलांनी कला शाखेतच प्रवेश घ्यायचा असतो’ असे सांगितले. शासनाने सुद्धा त्याला विज्ञान शाखेत प्रवेश नाकारला. त्याने शासना विरोधात गुन्हा दाखल केला. तेव्हा शासनाने त्याला स्वतःच्या जबाबदारी वर विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यास परवानगी दिली. ह्या सर्व प्रकारात त्याचे ६ महिने वाया गेले, सर्वांना वाटले आता इतक्या थोड्या वेळात हा काय शिकणार? पण त्याने जिद्दीने अभ्यास करून बारावीत ९७ टक्के मिळवले. इथे त्याचा संघर्ष संपला नाही. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ पुढे त्याने IIT मध्ये प्रवेश घ्यायचे ठरवले, पण अंध असल्यामुळे IIT ने त्याचे प्रवेशपत्र नाकारले. तेव्हा निराश न होता तो म्हणला, “IIT ला माझी गरज नाहीये, तर मला ही IIT ची गरज नाहीये”. ह्याच जिद्दीने पुढे त्याने परदेशात शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला, आणि MIT सारख्या मोठ्या विद्यापीठात त्याला प्रवेश घेण्याची संधी मिळाली. तिथून पदवीधर झाल्यावर अमेरिकेतील कैक नामवंत कंपन्यांमधून त्याला नोकरीसाठी मागणी आली, परंतु त्याला भारतातच काहीतरी कल्पक काम करायचे होते. ह्या मुलाचे नाव होते श्रीकांत बोल्ला. भारतात आल्यावर श्रीकांत ह्यांनी समन्वय संस्थेची स्थापना केली, जी शारीरिक अपंगत्व असलेल्या मुलांना शैक्षणिक, आर्थिक व व्यावसायिक मदत करते. २०१२ मध्ये शंभरहुन अधिक अपंग लोकांना घेऊन श्रीकांत बोल्ला ह्यांनी बोलंट (Bollant)कंपनीची स्थापना केली, ज्यात ते सुपारीच्या पानांपासून नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक वस्तू बनवतात. आज तीच कंपनी ६-१० दशलक्ष डॉलर्स ची झाली आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये स्थापन झालेल्या Surge Impact Foundation चे ते संचालक आहेत. एप्रिल २०१७ मध्ये Forbes मासिकाने प्रसिद्ध केलेल्या “३० वर्षाच्या आतल्या ३० प्रभावशाली व्यक्ती” ह्या यादीत तीनच भारतीयांची नावे होती, ज्यात एक नाव श्रीकांत बोल्ला ह्यांचे होते. तर ही होती श्रीकांत बोल्ला ह्यांची कहाणी. श्रीकांतच्या प्रेरणादायी प्रवासाकडे बघून आपणही शिकू शकतो कि “आयुष्यात कसलीच तक्रार करू नका, काहीच अशक्य नाहीये." ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com नीलकमल या प्लास्टीक्स आणि फर्निचर क्षेत्रातील कंपनीने नुकताच "वेलो" या सामाजिक संस्थेच्या मदतीने एक वेगळं आणि अत्यंत उपयोगी उत्पादन बाजारात आणलंय. या उत्पादनाचं नाव आहे "वेलो वॉटर व्हील".
आजही ग्रामीण भागातील लाखो स्त्रियांचा रोजच्या कामाचा अर्धा वेळ दुरून डोक्यावरून पाणी आणण्यात जातो. आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी या स्त्रियांना एकावर एक हंडे रचून दुरून पाणी आणावे लागते. रोजच अशा कमीत कमी पाच ते सहा फेऱ्या माराव्या लागल्यामुळे वेळ तर जातोच. पण त्याचसोबत जड भांडी डोक्यावरून आणल्याने मानेच्या, कंबरेच्या आणि डोळ्यांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. दुरून पाणी आणण्यात गेलेला वेळ हा त्यांच्या इतर कामावर देखील परिणामकारक ठरतो जो वेळ या स्त्रिया इतर कामांसाठी अथवा स्वतःसाठी खर्च करू शकतात. ग्रामीण भागातील या समस्येवर नीलकमल लिमिटेड कंपनी आणि वेलो यांनी एक उत्तम पर्याय उपलब्ध करून दिला आहे ते म्हणजे नीलकमल वेलो वॉटर व्हील.वेलो वॉटर व्हीलच्या नाविन्यपूर्ण चाकांसारख्या डिझाइनमुळे लांब अंतराहुन स्वच्छ पाणी वाहून आणणे हे एकदम सोपे झाले आहे.तसेच या वॉटर व्हीलची पंचेचाळीस लिटर पाणी सामावण्याची क्षमता असल्यामुळे अर्ध्या वेळेस दुप्पट प्रमाणात पाणी आणता येते आणि ग्रामीण स्त्रीला तिच्या कामासाठी पुरेसा वेळ तसेच मुलांच्या शिक्षण आणि इतर गोष्टींसाठी वेळ येऊ शकतो. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ अनेक गावांमध्ये नीलकमल वेलो वॉटर व्हील विनामूल्य किंवा अत्यंत स्वस्त किंमतीत उपलब्ध करुन देणे हा नीलकमलचा प्रयत्न आहे.विविध एनजीओ आणि कॉरपोरेट कंपन्यांसोबत भागीदारी करून 16,000 हून अधिक नीलकमाल वेलो वॉटर व्हीलचे फेब्रुवारी 2015 पासून आतापर्यंत दान केले गेले आहे. एक सामाजिक उपक्रम म्हणून ही उत्तम कल्पना आहेच. परंतु एक बिझनेस म्हणून देखिल हे एक चांगले प्रॉडक्ट आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश तसेच अफ्रिका खंडातील अनेक देशांना या उत्पादनाची गरज लागणार आहे. दिवसेंदिवस पाणी मिळणे कठीण होत आहे त्यामुळे हे मार्केट मोठे होईल यात शंका नाही. मित्रांनो, आपल्या आसपास असे हजारो प्रॉब्लेम्स आहेत. त्यावर "वेलो वॉटर व्हील"सारखे अनेक सोपे उपाय शोधता येतील आणि त्याचेच एका सॉलिड बिझनेस मध्ये रुपांतर करता येईल. तेव्हा शोधा....म्हणजे सापडेल !! ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! https://www.netbhet.com अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांच्या आईला कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी कधी कधी भीकही मागावी लागत होती.
- वयाच्या १४ व्या वर्षी शाळा सोडावी लागली. - कुटुंबाला आर्थिक मदत करताना त्यांचे संपूर्ण तारुण्य हाताने शर्टस शिवण्यात शिवण्यात गेले. - स्वतःचे पहिले दुकान सुरु करण्यापूर्वी जवळ जवळ २५ वर्षे त्यांनी अविरत कष्ट केले - आणि आज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये त्यांनी ६ वे स्थान प्राप्त केले आहे . मित्रांनो, हे आहेत अमॅन्सियो ऑर्टेगा, स्पेनच्या इंडिटेक्स फॅशन ग्रुप या जगप्रसिद्ध फॅशन कंपनीचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष. इंडिटेक्स फॅशन ग्रुप हि जगातील सर्वात मोठी फॅशन क्लोथिंग कंपनी आहे. इंडिटेक्स ग्रुपचा “झारा(zara)” हा कपड्यांचा ब्रँड अतिशय लोकप्रिय आहे.कंपनी ची जगभरात सुमारे ७,२०० स्टोअर्स असून ९३ बाजारपेठेत स्वःताचे स्थान टिकवून आहे. पण कपड्यांची कंपनी असलेला, अर्धवट शाळा शिकलेला एक माणूस जगातील सर्वात मोठी फॅशन कंपनी कशी स्थापन करु शकला? एवढंच नव्हे तर जिथे सर्वात श्रीमंत यादीमध्ये मोठमोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांचे मालक दिसतात तिथे कपड्याच्या कंपनीचा मालक कसा पोचला ? या प्रश्नांचं उत्तर शोधणे जास्त रंजक ठरेल. अमॅन्सियो ऑर्टेगा यांनी सुरुवातीपासूनच वापरलेल्या दोन मुख्य स्ट्रॅटेजीजमुळे झारा हा ब्रँड एवढा मोठा बनू शकला. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ पहिली स्ट्रॅटेजी म्हणजे वेग ! आणि दुसरी स्ट्रॅटेजी म्हणजे ग्राहकाला पाहिजे आहे ते देणे ! फॅशन ही खुप वेगाने बदलत असते. नवी फॅशन किंवा स्टाईल्स प्रमुख फॅशन शो मध्ये पहिल्यांदा आल्यानंतर प्रत्यक्षात दुकानात येण्यासाठी कधी कधी २ महिने लागायचे. "झारा"ने हा वेळ कमी करुन ३-४ दिवस केला. त्यामुळे नवनविन फॅशनचे कपडे केवळ झारा मध्येच मिळतात हे ग्राहकांना पटले आणि आपसूकच ग्राहकांचा प्रवाह झारा कडे वळायला लागला. एवढच नव्हे तर झाराच्या दुकांनांमध्ये काम करणार्या सर्वांना ग्राहकांची फॅशनची आवड, नवीन गरजा काय आहे याचा अभ्यास करायचं ट्रेनिंग दिलं जातं. दररोज झाराचे डिझायनर्स स्टोअर मॅनेजर्स बरोबर बोलतात आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजांच्या अनुषंगाने दररोज ३ नव्या डीझाईन्स तयार केल्या जातात. त्यानंतर त्याचे प्रॉडक्शन सुरु होते. खुप वेळ पडून राहणार नाही इतके कमी, आणि स्टॉक संपून जाणार नाही इतके जास्त प्रॉडक्शन घेतले जाते. यामागचा प्रचंड अभ्यास आणि गुंतागुंतीची गणीते हे झाराच्या यशाचे प्रमुख कारण आहे. आजही जगभरातील स्टोअर्समध्ये आठवड्यातून दोन वेळा नवे कपड्यांचा माल आणला जाण्याची कसरत केली जाते. त्यामुळे झारा च्या शॉप मध्ये ग्राहक गेला आणि त्याला नविन काही आढळले नाही असे होतच नाही.इतकेच काय तर दर रविवारी आणि दर गुरुवारी कपड्यांचा नवा स्टॉक येणार, सोमवारी आणि शुक्रवारी चपलांचा स्टॉक येणार असे वार देखिल ठरलेले असतात. चोखंदळ ग्राहकांची पावले आपोआप या दिवशी झारा स्टोअर्स मध्ये वळतात. मित्रांनो, प्रत्येक बिझनेसमध्ये एक किंवा दोन अशा गोष्टी असतात ज्या पुर्ण बिझनेसचा चेहरा मोहरा बदलवून टाकू शकतात. व्यवस्थापनाच्या भाषेत यांना "लिवर्स" असे म्हंटले जाते. भाराभार सुधारणा करण्याऐवजी या एक किंवा दोन लीवर्स वर काम केले तर बिझनेसला जास्त फायदा होऊ शकतो. तेव्हा तुमच्या बिझनेसचे योग्य लिवर्स काय आहेत याचा शोध आजच सुरु करा. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com निवडणुका जवळ आल्या की नेते मंडळी अनेक मोठ्या मोठ्या घोषणा करतात, वेगवेगळी वचने देतात. मतदारांच्या दाराशी जातात. पण एकदा का निवडणुका संपल्या की मग पुढील पाच वर्षे आपल्याला ही नेते मंडळी दिसतही नाहीत. त्यांनी दिलेल्या वचनांचा, त्यांनी केलेल्या कामाचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी, त्यावर आपला अभिप्राय नोंदवण्यासाठी सामान्य मतदाराकडे कोणतीच सुविधा उपलब्ध नाही.
तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या कामाबाबत तुम्ही असमाधानी असाल किंवा तुम्ही निवडलेले प्रतिनिधी त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करणे विसरले असतील तर तुम्ही नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना जाब विचारू शकता? हे कसं शक्य आहे याचे उत्तर 27 वर्षीय तरुण उद्योजक प्रथम मित्तल याने शोधले आहे. वाढत्या तंत्रज्ञानांच्या युगात आपण कार चालकांपासून ते रेस्टॉरंट्स पर्यंत सर्व काही इंटरनेटवर पाहून त्यांना रेटिंग देऊ शकतो,म्हणूनच 27 वर्षीय तरुण उद्योजक प्रथम मित्तल याने ‘नेता’ नावाचे मोबाईल अॅप विकसित केले आहे,ज्याद्वारे मतदार त्यांनी निवडलेल्या प्रतिनिधींना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर ‘रेटिंग’ देऊ शकतात.जर मतदार निवडलेल्या नेत्यांच्या कामाबाबत असमाधानी असतील तर ते त्यांचे मत काढून घेऊन दुसऱ्या कार्यक्षम नेत्याला देऊ शकतात.राजकीय नेत्यांसाठी हे अॅप एक अभिप्राय यंत्रणा म्हणून कार्य करेल जे दर दिवशी रोजच्या कामांविषयी आढावा घेण्यास उपयुक्त ठरेल. प्रत्येक विभागात कोणत्या नेत्याला किंवा पक्षाला सर्वाधिक रेटिंग आहे, कोणाची लोकप्रियता कमी किंवा जास्त होत आहे हे दररोज एकाच ठिकाणी जनतेला आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांना पाहता येईल. त्यामुळे प्रत्येक नेत्याला आपोआपच दररोजची स्पर्धा करावी लागेल आणि याचा अंतिम फायदा जनतेला होईल हा या अॅपचा मुख्य विचार आहे. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ मतदारांव्यतिरिक्त, राजकीय पक्षांना तिकीट देण्यासाठी योग्य उमेदवार निवडण्यास देखील मदत होते. मित्तल यांच्या टीमने संपूर्ण भारतातील मतदारसंघाचे डेटाबेस आणि राजकीय पक्षांची माहिती एकत्र केली आहे. प्रत्येक मतदारसंघातील टॉप पाच स्पर्धकांची यादी आहे आणि मतदार त्यांचे मतदानाच्या अभिप्रायाच्या आधारावर त्यांचे मत ऑनलाइन देऊ शकतात, यामुळे पक्षांना अधिक प्रभावीपणे तिकीटवाटपास मदत होते. आतापर्यंत नेता अॅप आणि त्याच्या संबंधित वेबसाइटने काही राज्यांमध्ये 15 दशलक्ष युजर्स एकत्र केले आहेत. 2019 च्या निवडणुकीपूर्वी आम्ही 100 दशलक्षांवर पोहोच असा मित्तल यांचा विश्वास आहे. यावर्षीच्या सर्वसाधारण निवडणुका होतील तेव्हा मित्तल यांचा मतदारांसाठी एकच संदेश असेल: "जातीच्या आधारावर मत देऊ नका किंवा जो चांगला बोलतो त्यालाही मत देउ नका, आपल्या नेत्यांचा अहवाल आणि रेटिंग पाहूनच मत द्या. नेता अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा - https://play.google.com/store/apps/details?id=in.netaapp&hl=en_IN ================ नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - SUBSCRIBE - https://goo.gl/JtFkBR =============== धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com "तारे जमीन पर" चित्रपटातला आमिर खानने रंगवलेला "राम शंकर निकुंभ" सारखा शिक्षक केवळ सिनेमातच दिसतो असा जर तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे. कारण तुम्ही अद्याप दिनेश बडगैंडी ना भेटला नाही आहात.
ग्रामीण भागातील मुलांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणून प्रयत्न करणार्या बैंगलोरस्थित दिनेश बडगैंडी यांनी एक स्टार्टअप सुरु केले आहे. मित्रांनो, या त्यांच्या स्टार्टअपचे नाव आहे "तारे जमीन पर"! जगातील सर्वात मोठे डोळ्यांचे हॉस्पीटल कोठे आहे? मला खात्री आहे की माझ्याप्रमाणे तुमच्यापैकी बर्याच जणांना वाटत असेल की जगातील सर्वात मोठे डोळ्यांचे हॉस्पीटल अमेरीका, इंग्लंड किंवा तत्सम प्रगत देशामध्ये असेल. पण मित्रांनो, हे हॉस्पीटल आपल्या भारत देशामध्येच आहे. तामिळनाडू मधील "मदुराई" या शहरात असलेल्या या हॉस्पीटलचे नाव आहे - "अरविंद आय केअर सीस्टम (Arvind eye care system)".
अरविंद आय केअर हॉस्पीटल हे सरकारी हॉस्पीटल नाही किंवा कोणत्याही मोठ्या संस्थेने चालवलेले हॉस्पीटल नाही. डॉ. गोविंदप्पा वेंकटस्वामी यांनी स्वतःच्या बळावर स्वतःच्या खर्चाने चालु केलेले हे हॉस्पीटल आहे. डॉ. वेंकटस्वामी यांना अरविंद हॉस्पीटल मध्ये डॉ. व्ही (Dr. V) असे संबोधले जाते. डॉ. वेंकटस्वामी यांनी १९७६ अरविंद आय केअरची स्थापना केली त्यावेळी त्यांचे वय होते ५८ वर्षे. या वयात जेव्हा लोकांना निवृत्तीचे वेध लागतात तेव्हा डॉ. वेंकटस्वामींनी ११ खाटांचे हे हॉस्पीटल चालू केले. एव्हढेच नव्हे तर तेव्हा त्यांना स्वतःला rheumatoid arthritis नावाचा आजार झाला होता आणि त्यामुळे त्यांचा एक हात लुळा झाला होता. मात्र असे असतानाही दुर्दम्य ईच्छाशक्तीच्या बळावर डॉ. वेंकटस्वामी यांनी या हॉस्पीटलची स्थापना केली. हेतू केवळ एकच, जास्तीत जास्त अंध लोकांपर्यंत पोहोचून त्यांना नविन दृष्टी द्यायची. संपुर्ण जगात सुमारे ४५ दशलक्ष लोकांना अंधत्व आलेले आहे. त्यापैकी १२ दशलक्ष लोक भारतात आहेत. आणि मुख्य म्हणजे भारतातील १२ दशलक्ष लोकांपैकी ८०% लोकांचे डोळे उपचाराने बरे करता येतील. म्हणजेच या ८०% लोकांचे अंधत्व दूर करता येईल. अत्यंत गरीब , अशिक्षीत लोकांना डोळ्यांसाठी साधा चष्मा घेणे देखिल शक्य नसते. आपल्यापैकी शहरात राहणार्या कित्येकांना चष्मा वापरावा लागतो, बर्याच वेळा चष्मा आपल्या फॅशनचा एक भाग बनतो. पण समाजात काही लोक असे आहेत की, ज्यांना चष्मा विकत घेणे परवडत नाही आणि त्यामुळे त्यांना अंधत्व पत्करावे लागते. असाच काहीसा प्रकार मोतीबिंदू बाबतही आहे. केवळ गरिबीमुळे आणि अज्ञानामुळे मोतीबिंदूचे ऑपरेशन करता न आल्याने अनेक जण अंधत्व पत्करतात. एका डोळ्याला मोतीबिंदू झाल्यावर दुसरा डोळा शाबूत आहे तोपर्यंत कसेबसे काम निभावून नेतात. मात्र दृष्टीहीन झाल्यावर हातावर पोट असलेल्या या लोकांचे अतीशय हाल होतात. या दुष्टचक्रातून त्यांची सुटका करण्याच्या हेतूने डॉ. वेंकटस्वामी यांनी अरविंद आय केअरची सुरुवात केली आणि आज हे हॉस्पीटल जगातील सर्वात मोठे डोळ्यावरील उपचार करणारे हॉस्पिटल झाले आहे. डॉ. वेकंटस्वामी यांनी या प्रकल्पाची मांडणी करताना मॅकडॉनल्ड्स या सुप्रसिद्ध फास्टफुड कंपनीच्या कार्यप्रणालीचा आधार घेतला होता. वाचून हसु येईल कदाचित पण हे खरे आहे. जगातील विविध भागांतील लोकांना एकाच प्रकारे प्रशिक्षण देऊन, सर्वत्र एकसमान पद्धती आणि प्रणाली वापरून मॅ़कडोनल्ड्सच्या कोणत्याही हॉटेल मध्ये एकसमान उत्पादन देण्याच्या क्षमतेची डॉ. वेंकटस्वामी यांनी डोळ्यांच्या उपचारांशी गाठ घातली. अरविंद आय केअर मधील ऑपरेशन्स हे याच प्रणालीवर आधारीत असतात. यामध्ये डॉक्टर्स एका जागी उभे असतात आणि कारखान्यातील उत्पादनांप्रमाणे रुग्ण एका मागोमाग एक येत असतात. सर्व वेळखाउ आणि सोप्या गोष्टी डॉक्टरांच्या मदतीला असलेल्या नर्स आणि तंत्रज्ञांनी केल्यामुळे डॉक्टरांवर अतीरीक्त भार पडत नाही आणि त्यामुळे डॉक्टरांची उत्पादकता वाढते. भारतातील इतर डॉक्टर्स वर्षाला २२० डोळ्यांची ऑपरेशन्स करतात मात्र अरविंद आयकेअर मधील डॉक्टर्स वर्षाला २००० ऑपरेशन्स करतात. येथे डॉक्टरांना जास्त पैसे दिले जात नाहीत , परंतू रुग्णांची संख्याच ईतकी जास्त असते की डॉक्टर्सना येथे जास्तीत जास्त शिकण्याची संधी मिळते. अरविंद आयकेअर मध्ये दररोज सुमारे ८५० ते १००० ऑपरेशन्स होतात. दरदिवशी सुमारे ६००० पेशंट्स येथे उपचारासाठी आलेले असतात. ज्यांना पैसे देणे जमत नाही त्यांच्याकडून उपचारासाठी एकही पैसा घेतला जात नाही. याशिवाय त्यांच्यासाठी मोफत राहण्याची आणि जेवण्याची सोय केली जाते. ज्यांना पैसे देणे शक्य आहे त्यांच्याकडून बाजारभावाने पैसे घेतले जातात. दरवर्शी सुमारे ४०% लोक पैसे देऊन आणि ६०% लोक मोफत उपचार करून घेतात. उपचाराची सोय मोफत असली तरी बरेच जण माहिती अभावी किंवा हॉस्पीटल पर्यंत येणे शक्य नसल्याने उपचार करु शकत नाही. त्यांच्यासाठी अरविंदच्या खास बस आहेत. या बस गावोगावी जाऊन तेथे मोफत कँप्स आयोजीत करतात. लोकांच्या डोळ्यांची तपासणी करून त्यांना योग्य तो सल्ला मोफत दिला जातो. ज्यांना उपचारांची त्वरीत गरज आहे अशा लोकांना बसने थेट मुख्य ईस्पीतळात आणले जाते. एक दिवस प्राथमिक चाचण्या, दुसर्या दिवशी ऑपरेशन आणखी दोन दिवस देखभाल करून पाचव्या दिवशी बसने त्यांच्या गावी नेऊन सोडले जाते. ================ नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - SUBSCRIBE - https://goo.gl/JtFkBR नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com =============== एवढे सगळे करूनही अरविंद आय केअरच्या लक्षात आले की एकुण गरजुंपैकी केवळ ७% लोकांपर्यंत त्यांना पोहोचता येत आहे. यावर उपाय म्हणून त्यांनी "टेलीमेडीसीन कार"चा वापर केला. या गाड्यांमध्ये बसून अरविंद आय केअरचे तंत्रज्ञ दुरच्या गावांमध्ये जाऊन तेथील लोकांची तपासणी करतात. या सर्व गाड्या सॅटेलाईट द्वारे मुख्य ईस्पीतळाशी जोडलेल्या असतात. टेलीमेडीसीन कार मध्ये तपासणी करून एका कॅमेर्याद्वारे रुग्णाचे फोटो घेऊन ते मुख्य ईस्पीतळात पाठवले जातात. मुख्य ईस्पीतळातील तज्ञ डॉक्टर तपासणी करून लगेचच रीपोर्ट बनवून पाठवतात. हा रीपोर्ट टेलीमेडीसीन कार मध्ये प्रींट होतो आणि रुग्णाला लगेचच दिला जातो. यासाठी प्रत्येक रुग्णाकडून केवळ २० रुपये आकारले जातात. इतक्या कमी खर्चात गरजू रुग्णांना त्यांच्या गावात जाऊन उपचार पुरविण्याचा हा प्रकार आगळा म्हणावा लागेल. मोतीबिंदुच्या ऑपरेशन नंतर डोळ्यात बसविण्याची लेन्स भारतामध्ये कोठेही उपलब्ध नव्हती. परदेशातून आयात करण्यासाठी लेन्सच्या प्रत्येक जोडीसाठी ३५ डॉलर्स इतका खर्च यायचा. हा प्रश्न सोडवण्यासाठी डॉ. वेंकटस्वामी यांनी ऑरोलॅब ची स्थापना केली आणि या लेन्स भारतात सर्वप्रथम यशस्वी पणे बनवल्या त्यादेखील केवळ ५ डॉलर्स इतक्या कमी कीमतीत. आज ऑरोलॅब मधील उत्पादने जगभरातील ८५ देशांमध्ये निर्यात केली जातात. अतीशय कमी खर्चात जास्तीत जास्त ऑपरेशन्स करण्याचे आपले ज्ञान केवळ स्वतः पुरता मर्यादीत न ठेवता अरविंद आय केअरने भारतातील आणि ईतर देशांतील अनेक ईस्पीतळांना हे ज्ञान पुरविण्यास (Consulting) सुरुवात केली. अरविंद आय केअरने ज्या ईस्पीतळांना मदत केली त्यांची उत्पादकता दुपटीने वाढली. अरविंद आय केअर ही एक यशस्वी सेवाभावी संस्था असली तरी देखिल तो एक यशस्वी व्यवसाय आहे हे विसरून चालणार नाही. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त सुविधा पुरविणार्या अरविंद आयकेअरने युनायटेड किंगडम मधील अधिकृतरीत्या प्रकाशित झालेल्या एका रीपोर्टच्या आधारे स्वतःची तुलना UK मधील इस्पीतळांशी केली. यामध्ये असे निष्पन्न झाले की संपुर्ण UK मध्ये जेवढी ऑपरेशन्स होतात त्याच्या ६०% ऑपरेशन्स एकट्या अरविंद आय केअर मध्ये होतात. आणि यासाठी आलेला खर्च हा UK मधील खर्चाच्या केवळ १% इतका आहे. म्हणजेच UK मध्ये जे ऑपरेशन १०० रुपयांत होईल ते ऑपरेशन अरविंद आय केअर मध्ये केवळ १ रुपयांत केले जाईल. असे असले तरी उपचारांच्या गुणवत्ते बाबतीत अरविंद आय केअर UK आणि US मधील इस्पीतळांच्या तुलनेत खुपच उजवे ठरले आहे. ६०% रुग्णांना मोफत सुविधा देउनही दरवर्षी सुमारे ३९% नफा कमावणार्या अरविंद आय केअरच्या व्यवसायाचे गणित अनेकांना उलगडले नाही. त्याबद्दल मी तुम्हाला पुढील एक-दोन लेखांअध्ये सांगणार आहेच. प्रचंड ईच्छाशक्ती, स्वच्छ हेतू आणि innovation च्या बळावर कोणतीही गोष्ट अशक्यप्राय नाही हे दाखवून देणार्या डॉ. वेंकटस्वामींचे २००६ मध्ये निधन झाले मात्र त्यांनी सुरु केलेला हा यज्ञ अखंड चालत आहे, चालत राहणार आहे. मित्रांनो हा लेख वाचल्यानंतर यांपुढे "अशक्य" हा शब्द आपण आपल्या डिक्शनरीतून काढून टाकला पाहिजे. मी आतापर्यंत वाचलेल्या/ऐकलेल्या सर्वाधीक प्रेरणादायी कथांमधील सर्वोत्तम आणि काळजाला भिडणारी ही कथा आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल याचा मला विश्वास वाटतो. या लेखाचा शेवट मी डॉ. वेंकटस्वामींच्याच एका वाक्याने करतो - “When you grow in spiritual consciousness, we identify with all that is in the world so there is no exploitation. It is ourselves we are helping. It is ourselves we are healing.” ================ नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - SUBSCRIBE - https://goo.gl/JtFkBR नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com =============== धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com जानेवारी महीन्याच्या एका सकाळी वॉशिंग्टनमधील मेट्रो रेलवे स्टेशन वर एक माणुस येउन बसला आणि त्याने व्हायोलीन वाजवायला सुरुवात केली. त्याने सुमारे ४५ मिनिटे सुमधुर संगीताच्या सहा फैरी वाजवल्या. सकाळ असल्याने कामावर जाणार्या हजारो माणसांची लगबग त्यावेळी स्टेशनवर होती.
काही मिनिटे झाली आणि एका वॄद्ध गृहस्थाचे त्या वादकाकडे लक्ष गेले. आपला वेग थोडासा मंदावुन ते तेथे काही क्षण थांबले आणि पुन्हा लगबगीने आपल्या मार्गाला लागले. त्यानंतर काही मिनिटांतच त्या वादकाची पहीली कमाई झाली. एका महीलेने एक डॉलर त्याच्या दीशेने भिरकावला आणि न थांबताच ती तेथुन निघुन गेली. आणखी काही मिनिटांनंतर एक माणुस ते गाणे ऐकण्यासाठी थांबला, पण घड्याळाकडे लक्ष जाताच घाईघाईने पुन्हा चालु लागला. त्याला बहुदा ऑफीसमध्ये जायला उशीर झाला होता. ================ नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ मात्र एका ३ वर्षाच्या मुलाचे त्याच्याकडे लक्ष गेले आणि तो तेथेच उभा राहुन अगदी मनापासुन त्या वादकाकडे आणि वादनाकडे लक्षपुर्वक पाहु लागला. तो मुलगा त्याच्या आईबरोबर होता आणि त्याची आई त्याला पुढे जाण्यासाठी ओढतच नेत होती. तेथुन जाणार्या प्रत्येक मुलासोबत असेच होत होते. प्रत्येक मुल ते गाणे ऐकायला थांबु पाहत होते आणि प्रत्येक पालक त्यांना ओढुन नेत होते. ४५ मिनिटांच्या वादनात फक्त ६ जणांना ते गाणे ऐकण्यासाठी क्षणभर का होईना थांबावेसे वाटले. जवळपास २० लोकांनी त्या वादकाला पैसे दीले मात्र तेही न थांबता तेथुन निघुन गेले. त्या वादकाने ३२ डॉलर्सची कमाई केली. पण जेव्हा त्याने वादन थांबवले तेव्हा संगीत बंद झाल्याचे कोणाच्या लक्षात देखील आले नाही. कोणी टाळ्या वाजवल्या नाहीत की त्याला शाबासकी दीली नाही. कोणालाही हे कळले नाही की तो वादक दुसरा तीसरा कोणीही नसुन जगातील सर्वोत्कॄष्ट व्हायोलीन वादक जोशुआ बेल हा होता. आणि त्याने वाजवलेली तान हे सुमारे ३.५ दशलक्ष डॉलर्स इतक्या कीमतीचे व्हायोलीनवर बनलेले जगातील सर्वोत्कॄष्ट संगीत होते. स्टेशनवर व्हायोलीन वाजवण्याच्या दोनच दिवस आधी बॉस्टनमधील एका सभागॄहात झालेल्या त्याच्या कार्यक्रमाची तीकीटे अगदी १०० डॉलर प्रतीव्यक्ती इतक्या जास्त किमतीला गेली होती. ही एक सत्य घटना आहे. खरेतर विविध गोष्टींचा आस्वाद घेण्याच्या लोकांच्या पद्धतीवर आणि प्राधान्यांवर प्रकाश टाकण्यासाठी केलेला हा एक प्रयोग होता. या प्रायोगाचा मुख्य हेतु खालील काही प्रश्नांचा उलगडा करणे हा होता. - एखाद्या सार्वजनीक ठीकाणी आणि अयोग्य वेळी आपण सौंदर्याचा, कलेचा आस्वाद घेतो का? - तो घेण्यासाठी आपण थांबतो का? - अगदी वेगळ्याच मार्गाने नकळत समोर आलेल्या कलाकौशल्याला आपण तीतक्याच रसीकतेने वाखाणतो का? या प्रयोगाचा एक निश्कर्ष असा देखील काढता येइल की - जर जगातील सर्वोत्कृष्ट वादकाचे सर्वोत्कृष्ट संगीत ऐकण्यासाठी एक क्षण थांबण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो , तर मग विचार करा दररोज अशा कितीतरी गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आहे? बघा विचार करा आणि आपली उत्तरे आपणच शोधण्याचा प्रयत्न करा. ================ नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com मित्रांनो,आपल्या सर्वाना फिट आणि निरोगी राहायला नेहमीच आवडतं.आपल्यापैकी काहीजण त्यासाठी जिममध्ये पैसे भरून मेम्बरशिप घेतात. इतकेच काय त्यासाठी खास कपडे, बुटांची खरेदी देखील केली जाते.पण यातला सर्वात कठीण भाग म्हणजे रोज सकाळी झोपेतून उठून बाहेर पडून जिम मध्ये जाणे हा असतो.अशा वेळी आपल्याला सतत सांगणारं ,व्यायामासाठी प्रेरणा देणार कोणी असेल तर सकाळी उठण्याचा ‘टास्क’ जरा हलका होईल असं नाही का वाटत.
अशाच काहीश्या अडचणींना सामोरे जाणारे तीन जिवलग मित्र मिसाल तुरुखिया (28), अभय पाई (27), आणि शिजीत घाटगे (28).फिटनेस आणि व्यायामाची या तिघांनाही आवड होतीच पण त्यासाठी दररोज त्याचे फायदे सांगणारं आणि त्यासाठी प्रोत्सहन देणारं काहीतरी हवं होतं,याच कल्पनेतून या तिघांनी एक अॅप तयार केलं आहे. जे आहे स्टेपसेटगो(StepSetGo-SSG). हे अॅप आपल्याला फिट राहण्यासाठी व्यायाम करायला सतत प्रोत्सहन देत राहत.हे अॅप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला व्यायामाच्या ठराविक टप्प्यानंतर कॉईनच्या स्वरूपात इंसेण्टिइव्हस मिळवून देत.उदाहणार्थ प्रत्येक शंभर पावले चालल्यावर आपल्याला एक पॉईंट अर्थात कॉइन मिळतो अशा प्रकारेजास्तीत जास्त कॉईन्स मिळवण्यासाठी अर्थात रोज नियमितपणे व्यायाम करणं अपेक्षित आहे. हे कॉईन्स वापरून आपण अॅपस्टोअर मधून वस्तू विकत घेऊ शकतो अथवा डिस्काउंट मिळवू शकतो. या प्रकारे सहज आणि सोप्या रीतीने व्यायाम करणायासाठी लोक या अॅप कडे वळत आहेत.हे अॅप कशाप्रकारे काम करते ते पाहू. ================ नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - SUBSCRIBE - https://goo.gl/JtFkBR नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com =============== या अॅपमध्ये पाच लेव्हल्स आहेत. पहिल्या लेव्हल वर, आपण 5,000 पावले चालुन दररोज पाच नाणी कमावू शकतो. तीन दिवस सतत पाच नाणी कमावल्यानंतर,आपल्याला पुढील पातळीवर प्रवेश दिला जातो, जेथे आपण दररोज सुमारे 10 कॉइन्स कमावू शकतो.लेव्हल 2 मध्ये, जर आपण दररोज किमान पाच नाणी कमावले नाहीत तर आपल्याला फ्लॅग/ झेंडा🚩 मिळेल. तीन झेंडे आपल्याला परत पहिल्या पातळीवर घेऊन जातील. ही प्रक्रिया पाच लेव्हल पर्यंत लागू होते.युजर्स ना ऑफर किंवा सूट घेण्यासाठी कमीतकमी 10 नाणे मिळविण्याची गरज आहे. परंतु अॅप-स्टोअरमधील स्वस्तात स्वस्त वस्तूसाठी कमीत कमी 300-500 नाणी मिळविण्याची आवश्यकता आहे.या ऑफर्स अथवा वस्तू या डिस्काउंट व्हाउचरपासून आयफोन पर्यंत असू शकतात. कालांतराने या अॅप मध्ये अपडेट्स येत राहतील. युजर्स ना व्यस्त ठेवण्यासाठी नवं नवीन उत्पादने येत राहतील. बूटस्ट्रॅप स्टेपसेटगो मध्ये सध्या केवळ चालण्याच्या व्यायामापासून सुरुवात केली आहे,परंतु भविष्यात सायक्लिंग, जॉगिंग, कॅलरी-आधारित व्यायाम इ.व्यायामप्रकारांवर भर देण्याची आणि ते सुद्धा सहभागी करून घेण्याची योजना आहे. या अॅपद्वारे कॉईन्स वाढवण्यासाठी तरी आपली पावले व्यायामाकडे नक्की वळतील,अशी आशा आहे. https://play.google.com/store/apps/details?id=com.pepkit.ssg ================ नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - SUBSCRIBE - https://goo.gl/JtFkBR नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com =============== धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com |