पंजाबमधील संगरूर प्रांतात नरेश गोयल यांचा जन्म झाला.लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हापासूनच अनेक कठीण प्रसंगांचा आणि अडचणींचा त्यांना सामना करावा लागला. शिक्षण चालू असतानाच, गोयल यांनी दिल्लीमध्ये त्यांच्या मामाच्या लहानश्या ट्रॅव्हल कंपनीमध्ये कॅशियर म्हणून काम करण्यास सुरवात केली. पुढे बी.कॉम ची पदवी पूर्ण केली आणि जनरल सेल्स एजंट म्हणून एका आंतरराष्ट्रीय एअरलाइन्समध्ये नोकरीस सुरुवात केली.या अनुभवाच्या जोरावर पुढे त्यांनी अनेक वेगवेगळ्या एअरलाईन्स मध्ये निरनिराळ्या पदावर जबाबदारीने काम पहिले. एअरलाइन्सच्या कामाचा अनुभव त्यांना अधिकाधिक समृद्ध बनवत होता.लवकरच गोयल, एअरलाइन्सच्या व्यवसायातले बारकावे शिकले आणि या क्षेत्रातील स्पर्धकांचा आणि कामाचा जवळून अनुभव त्यांना घेता आला. त्यामुळे या क्षेत्रात त्यांच्या ओळखीही वाढल्या.अर्थात याचा उपयोग त्यांना पुढे स्वतःचा बिझनेस उभारण्यासाठी नक्कीच झाला.त्यांच्या आतापर्यँतच्या एअरलाइन्समध्ये काम करण्याच्या अनुभवावरून भारताला योग्य किमतीच्या आणि योग्य वेळी योग्य आणि तत्पर सेवा पुरवेल अश्या विमानसेवेची आवश्यकता होती हे लक्षात यायला त्यांना जास्त वेळ लागला नाही. त्यांच्या या क्षेत्रातील ओळखी आणि संपर्कांच्या मदतीने; 1991 मध्ये त्यांनी जेट एअरवेज सुरू करण्यासाठी पुरेसे भांडवल उभे केले. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ मैत्रीपूर्ण आणि उदारमतवादी स्वभाव असलेल्या नरेश गोयल यांनी लवकरच अनुभवाच्या जोरावर जेट एअरवेजला नावारूपाला आणले. त्याना अनेक पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले.आपल्या कर्मचा-यांचे आणि व्यवसायाशी संबंधित इतर अनेकांचे योगदान त्यांनी वेळोवेळी जाहीर करून त्याबद्दल ऋण व्यक्त केले. त्यांची जीवन गाथा भारतीय उद्योजकतेचे प्रमाण म्हणून पाहिले गेले. तरीही; बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या अतिआत्मविश्वासामुळे त्यांनी बऱ्याचदा चुकीचे निर्णय घेतले. एअरलाइन्स क्षेत्र खराब परिस्थितीतून जात होते मात्र गोयल यांना आपल्या विमानसेवेची ‘श्रीमंतांसाठीची एअरलाईन्स’ हि इमेज बदलू द्यायची नव्हती म्हणूनच जेट एअरवेज मध्ये अधिकाधिक सेवा व सुविधा पुरवल्या गेल्या परंतु प्रत्यक्षात तेवढा मोबदला मात्र मिळत नव्हता.मोठ्या प्रमाणात होणारे खर्च आणि कमी उत्पन्न यामुळे कंपनीला नुकसान सहन करावे लागत होते.काही उद्योग तज्ज्ञांच्या मते गोयल राजीनामा देतील किंवा जेटएअरवेज इतर कंपन्यांकडे सोपवतील असे वाटत होते.पण गोयल यांनी यातले काहीही न करता जेटएरवेज चालूच ठेवण्याचा मार्ग अवलंबला. त्यांच्या या धोरणामुळे त्यांचे कर्मचारी आणि भांडवलदार याबाबत अजिबातच समाधानी नव्हते आणि म्हणूनच गोयल यांचा मोठ्या प्रमाणात निषेध होऊ लागला.वाढता असंतोष आणि विरोधात जाणारी परिस्थिती यामुळे अखेरीस, नरेश गोयल यांनी कंपनीचे अध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीने सदस्यपदाचा राजीनामा दिला.एका उत्कृष्ट नेतृत्वगुणाचा हा एक अतिशय खेदजनक अंत होता. कोणताही व्यवसाय सुरु करून तो यशस्वी करणे,ते यश पचवणे आणि त्याहून महत्तवाचे सतत मिळणारे यश टिकवणे हे किती कठीण असू शकते किंबहुना गरजेचे असते हे याद्वारे लक्षात घेता येईल.आत्मविश्वास जेव्हा गर्वात रूपांतर होतो तेव्हा त्याची मातीच होते. ================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! Netbhet.com |