• Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect

Blogs, Thoughts & Updates

उद्योजकांमध्ये असल्याच पाहिजेत अशा काही प्रमुख आणि महत्वाच्या कला

5/4/2019

Comments

 
Picture
 वाटाघाटीची कला 
तुम्ही विकत असलेली वस्तू किंवा सेवा कितीही चांगली किंवा वाईट असो, जर तुम्ही समोरच्याला ती वस्तू किंवा सेवा घेण्यासाठी पटवून देऊ शकला नाहीत, तर काहीच उपयोग नाही, त्यातून तुम्हाला अपेक्षित फळ मिळणार नाही. 

व्यवसायात तुम्ही दररोज ग्राहक, विक्रेता, कर्मचारी किंवा सरकारला पटवून देण्याच्या प्रयत्नात असता. 
असा एखाद दुसराच व्यवसाय असेल ज्यात तुम्हाला इतरांना खात्रीपूर्वक समजवावे लागत नाही. ही कला देखील साधी सोपी नाहीये. त्यासाठी तुम्हाला बाजारपेठेची, आसपासच्या वातावरणाची, किंवा समोरच्या व्यक्तीच्या परिस्थितीची समज आणि माहिती असणे गरजेचे आहे.  

 व्यक्ती व्यवस्थापन 
तुमचे उत्पादन किंवा सेवा कितीही चांगली किंवा वाईट असो, पण ते सादर करणारी किंवा विकणारी व्यक्ती बरोबर नसली, तर तुम्हाला अपेक्षित फळ मिळत नाही. 

वाटाघाटी प्रमाणेच ही पण एक कला आहे. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, आणि त्या प्रत्येक व्यक्ती ला पटवून देण्याकरता तुमची मानसिक समज तेवढी परिपक्व असणे गरजेचे असते. 
त्यासाठी तुमचे कर्मचारी, तसे उत्साही असणे गरजेचे असते. तुम्ही त्यांच्या नजरेत प्रभावी असणे गरजेचे आहे. त्यांना तुमचा अभिमान वाटला पाहिजे. 

तुमच्या ग्राहक किंवा विक्रेत्याशी बोलताना तुम्हाला त्यांच्या स्वभावाचा विचार करून बोलणे गरजेचे आहे. एक चुकीचे पाऊल, किंवा एका रागाचा शब्द, किंवा एक रागाचा क्षण तुमच्या व्यवसायाच्या अधोगतीला आमंत्रण देऊ शकतो. 

===================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR     
===================

 वित्त व्यवस्थापन 
तुमचे उत्पादन किंवा सेवा कितीही चांगली किंवा वाईट असो, पण जर तुम्हाला उत्पादनाच्या किंमत, खर्च, कर ह्या  संबंधी नीट माहिती समजून घेतली नाही, तर तुम्हाला अपेक्षित फळ मिळणार नाही. 

अनेक लोक जे व्यवसायात उतरतात, त्यांना व्यवसायाच्या अर्थशास्त्राची पूर्ण माहिती व ज्ञान नसते. जेव्हा व्यवसाय लहान असतो, तेव्हा भागून जाते, पण जसजसा व्यवसाय वाढत जातो, तशी आर्थिक ज्ञानाची गरज वाढत जाते. CA किंवा अकाउंटंट तुम्हाला मदत करतात परंतु घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी पूर्णपणे जबाबदार तुम्हीच असता. 
लक्षात ठेवा १०% बचत म्हणजे १०% नफ्या मध्ये वाढ.

अनेक व्यावसायिकांना हेच माहित नसते कि आपल्याला व्यवसायात फायदा कधीपासून  (Break-even) मिळायला लागेल. ते फक्त व्यवसाय सुरु करतात आणि मग वर्षा- दोन वर्षांनी त्यांना जाणीव होते की एवढे पैसे खर्च करून देखील आपल्याला व्यवसायात काहीच फायदा होत नाहीये. म्हणूनच नक्की फायदा कधी पासून सुरु होईल आणि तोपर्यंत काय तरतूद करावी लागेल ह्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. 

 बोनस पॉईंट- आपल्या व्यवसायाचे भविष्य जाणणे 
उद्योजक ह्या नात्याने जर तुम्ही हे समजु शकले नाही कि बाजारात सतत होणारे बदल तुमचा व्यवसाय कशाप्रकारे उध्वस्त करू शकतात, तर तुम्हाला अपेक्षित फळ मिळणार नाही. 

व्यावसायिक ह्या नात्याने तुम्हाला हे माहित असणे गरजेचे आहे कि पुढील १ वर्षात किंवा ५ वर्षात तुमचा व्यवसाय कुठे असेल. त्यामुळे तुम्हाला त्या संबंधी काळजी घेणे सोपे जाईल. 

जर तुम्हाला असे वाटले कि अकस्मात येणाऱ्या प्रतिस्पर्धी आणि तंत्रज्ञानातील येऊ घातलेला बदल तुमचा व्यवसाय उध्वस्त करणार आहे, ज्यामुळे तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता आहे, तर तुम्हाला आधीच त्याचे नियोजन आखले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्याला विरोध करता येईल किंवा त्याचा व्यवसाय बदलण्यास भाग पाडता येईल.

मित्रांनो, नियोजन ही व्यवसायाची पहिली पायरी आहे, ती चुकवून चालत नाही. नियोजनशिवाय आपला व्यवसाय देखील चालत नाही. नियोजना बरोबरच, वरील सांगितलेल्या कला देखील आपण अभ्यासपूर्वक आत्मसात करणे गरजेचे आहे. एक उत्तम उद्योजक होण्यासाठी आपण आजच ह्या गोष्टींचा विचार करा, आणि तशी कृती देखील करा, आणि पहा आपला व्यवसाय कसा वाढत जातो ते.

​===================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR     
================

धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.comढत जातो ते.









to edit.
Comments
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet E-learning Solutions LLP
602, Shivdarshan CHS, Sector 20D, Airoli, Navi Mumbai
​400708, Maharashtra, India

contact - [email protected]
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect