आंध्र प्रदेशातील, मछलीपट्टनम गावातील एका गरीब जोडप्याला एक मुलगा झाला. तो मुलगा जन्मतःच अंध होता. एके दिवशी तो वडिलांबरोबर शेतात काम करत असताना त्याच्या वडिलांना जाणवले कि अंध असल्यामुळे त्याला शेतात काम करणे कठीण जाते, त्यामुळे त्याने शेतात काम करण्याऐवजी शाळेत शिकले पाहिजे. गावात अंध मुलांसाठी शाळेची सोय नसल्यामुळे वडिलांनी त्याचे नाव दुसऱ्या गावातल्या एका शाळेत घातले. शाळेत कुणीही त्याला किंमत देत नसे. दहावी मध्ये त्याला ९०% मिळाले, तेव्हा कुठे शाळेत त्याला ओळखू लागले.
दहावीनंतर, त्याने बारावीत विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचे ठरवले पण तेव्हाही लोकांनी त्याला ‘अंध मुलांनी कला शाखेतच प्रवेश घ्यायचा असतो’ असे सांगितले. शासनाने सुद्धा त्याला विज्ञान शाखेत प्रवेश नाकारला. त्याने शासना विरोधात गुन्हा दाखल केला. तेव्हा शासनाने त्याला स्वतःच्या जबाबदारी वर विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यास परवानगी दिली. ह्या सर्व प्रकारात त्याचे ६ महिने वाया गेले, सर्वांना वाटले आता इतक्या थोड्या वेळात हा काय शिकणार? पण त्याने जिद्दीने अभ्यास करून बारावीत ९७ टक्के मिळवले. इथे त्याचा संघर्ष संपला नाही. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ पुढे त्याने IIT मध्ये प्रवेश घ्यायचे ठरवले, पण अंध असल्यामुळे IIT ने त्याचे प्रवेशपत्र नाकारले. तेव्हा निराश न होता तो म्हणला, “IIT ला माझी गरज नाहीये, तर मला ही IIT ची गरज नाहीये”. ह्याच जिद्दीने पुढे त्याने परदेशात शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला, आणि MIT सारख्या मोठ्या विद्यापीठात त्याला प्रवेश घेण्याची संधी मिळाली. तिथून पदवीधर झाल्यावर अमेरिकेतील कैक नामवंत कंपन्यांमधून त्याला नोकरीसाठी मागणी आली, परंतु त्याला भारतातच काहीतरी कल्पक काम करायचे होते. ह्या मुलाचे नाव होते श्रीकांत बोल्ला. भारतात आल्यावर श्रीकांत ह्यांनी समन्वय संस्थेची स्थापना केली, जी शारीरिक अपंगत्व असलेल्या मुलांना शैक्षणिक, आर्थिक व व्यावसायिक मदत करते. २०१२ मध्ये शंभरहुन अधिक अपंग लोकांना घेऊन श्रीकांत बोल्ला ह्यांनी बोलंट (Bollant)कंपनीची स्थापना केली, ज्यात ते सुपारीच्या पानांपासून नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक वस्तू बनवतात. आज तीच कंपनी ६-१० दशलक्ष डॉलर्स ची झाली आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये स्थापन झालेल्या Surge Impact Foundation चे ते संचालक आहेत. एप्रिल २०१७ मध्ये Forbes मासिकाने प्रसिद्ध केलेल्या “३० वर्षाच्या आतल्या ३० प्रभावशाली व्यक्ती” ह्या यादीत तीनच भारतीयांची नावे होती, ज्यात एक नाव श्रीकांत बोल्ला ह्यांचे होते. तर ही होती श्रीकांत बोल्ला ह्यांची कहाणी. श्रीकांतच्या प्रेरणादायी प्रवासाकडे बघून आपणही शिकू शकतो कि “आयुष्यात कसलीच तक्रार करू नका, काहीच अशक्य नाहीये." ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com |