• Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect

Blogs, Thoughts & Updates

एका नवख्या ब्रँडने बलाढ्य प्रतिस्पर्ध्यावर कशी मात केली त्याची कथा.

5/28/2019

Comments

 
Picture
चॉकलेट्स.. अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचंच चॉकलेट्स हे अत्यंत आवडीचं. या चॉकलेट्स चे सर्वात मोठे आणि नावाजलेले ब्रँडस म्हणजे हर्षेज (Harshyes)आणि मार्स(Mars). आपला व्यवसाय मोठा करण्यासाठी कश्या आणि कोणत्या प्रकारच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजिज अवलंबल्या पाहिजेत आणि  योग्य वेळी त्यांचा कसा वापर केला पाहिजे याचे उत्तम उदाहरण म्हणून या दोन्ही ब्रॅण्ड्स ची नावे आपण विचारात घेऊ शकतो. मार्केटिंग स्ट्रॅटेजिज बिझनेससाठी कश्या प्रभावशाली ठरतात हे या दोन्ही कंपन्यांच्या उदाहरणादाखल पाहू.

हर्षेज आणि मार्स या  अमेरिकेतील बलाढ्य आणि यशस्वी चॉकलेट्स उत्पादन करणाऱ्या कंपन्या.आजच्या घडीला या दोन्ही कंपन्यांचा चॉकलेट्स मार्केट मध्ये सर्वात मोठा हिस्सा असणाऱ्या आहेत.
1894 मध्ये मिल्टन एस. हर्षे यांनी पेंसिल्वेनिया येथे चॉकलेट्स बनवणारी कंपनी म्हणजेच ‘हर्षेज’ ची  स्थापना केली.त्यावेळी 5 सेंट(0.05 डॉलर्स) ना मिळणारं हर्षेज चॉकलेट हे खूपच लोकप्रिय प्रॉडक्ट होते. आणि पुढे बराच काळ त्याची किंमत तीच ठेवण्यात आली होती.

त्यावेळी हर्षेज चॉकलेटबार ची किंमत 5 सेंट हीच असावी अशी बिझनेस स्ट्रॅटेजी होती.जी तेव्हा खूप जास्तही नव्हती आणि खूप कमीही नव्हती. पण चॉकलेट बनवण्यासाठी लागणारे महत्त्वाचे रॉ मटेरियल कोकोआ(Cocoa) पावडर याची किंमत वाढत असताना हर्षेज चॉकलेटची 5 सेंट हि किंमत कायम ठेवणे हे आवाहनात्मक होते. पण मिल्टन एस. हर्षे हा अतिशय हुशार बिझनेसमन होता. त्याने किंमत कायम ठेवून चॉकलेट बारचा आकार प्रत्येक दशकात कमी केला.हा इतका छोटा बदल सहज लक्षात येण्यासारखा नव्हता.दिवसेंदिवस हर्षेज चॉकलेट्स अधिकाधिक लोकप्रिय होत होते आणि कंपनीहि चांगलीच नावारूपाला आली.


इकडे ‘फॉरेस्ट मार्स’ हा त्याच्या सुरुवातीच्या काळात वडिलांच्या मालकीच्या एका लहान कंपनीत काम करत होता.पण पुढे त्याने वडिलांशी न पटल्यामुळे त्यांची कंपनी सोडली आणि हर्षेज चॉकलेट कंपनी मध्ये काम करण्यास सुरवात केली.फॉरेस्ट मार्स हा अतिशय हुशार माणूस होता. हर्षेज मध्ये काम करत असताना त्याने मिल्टन हर्षेजच्या व्यवसायाचा अतिशय काळजीपूर्वक अभ्यास करण्यास सुरुवात केली. काही वर्षे काम केल्यानंतर मार्सला एक कल्पना सुचली.खूप विचार करून त्याने हर्षेज सोडले आणि त्याच्या वडिलांकडे परतला.


फॉरेस्ट मार्स नक्की काय शिकला आणि त्याची नेमकी काय कल्पना होती?

मार्सच्या एक गोष्ट लक्षात आली होती कि चॉकलेटचं महत्त्वाचं रॉ मटेरियल कोकोआ पावडरची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे  आणि त्यामुळेच हर्षेज कंपनी प्रत्येक वर्षी चॉकलेटचा आकार कमी करत आहे.
या समस्येवर उपाय म्हणून मार्सने कोकोआ पावडरचे प्रमाण कमी ठेवून शेंगदाणे,कॅरॅमल ,नगेट्स अशा काही पदार्थांचा समावेश करण्याचा ठरवले.त्यामुळे रॉ मटेरियल कमी वापरून देखील किंमत कमी ठेवून मोठ्या आकारमानाचे चॉकलेट्स बनवणे साध्य झाले.याचाच परिणाम म्हणजे ग्राहकांचा ओघ सारखीच किंमत पण कमी आकार असलेल्या हर्शेज चॉकलेट्स वरून मोठ्या आकारमानाच्या आणि वेगवेळ्या फ्लेवर्सच्या मार्स चॉकलेट्सकडे वाढला.मार्स चॉकलेट्स कंपनीला आघाडीची चॉकलेट कंपनी बनवण्यात ही युक्ती महत्त्वाची ठरली.
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================




हर्षेजने यावर उत्तर म्ह्णून अमेरिकन जनमानसात हर्षेज हे नाव कायम राहण्यासाठी  हर्षेंजची कायम असलेली किंमत वाढवली आणि चॉकलेट्सचा आकारही वाढवला.पण याचा काहीही फायदा न होता कंपनीला अधिक नुकसानच सोसावे लागले.  

याच दरम्यान चित्रपट निर्माते स्टीव्हन स्पीलबर्ग यांना त्यांच्या आगामी चित्रपटासाठी चॉकलेट्स वर आधारित काही दृश्य चॉकलेट्ससहित दाखवायचे होते.त्या चित्रपटातील एक कॅरेक्टर E.T  जो कि एक एलियन असतो, हा एलियन चॉक्लेटप्रेमी असतो.त्याची चॉकलेट्ससोबतची काही दृश्ये चित्रित करण्यासाठी चॉकलेट्सची गरज होती.स्टीव्हन यांनी आधी मार्सला त्याच्या चॉकलेट्सची या चित्रपटाद्वारे जाहिरात करण्याची ऑफर दिली. पण मार्सचे म्हणणे असे होते कि मार्स चॉकलेटस  हे माणसांसाठी आहे,एलियनसोबतच्या दृश्यांचा मार्सच्या चॉकलेट्स विक्रीवर नकारात्मक परिणाम होईल.

मार्सकडून नकार मिळाल्याने स्टीव्हन हर्षेज कडे गेले.हर्षेजने हि ऑफर स्वीकारून E.T या कॅरेक्टर सोबत त्यांच्या प्रसिद्ध अश्या “रीझ पीनट बटर कप”ची दृश्ये चित्रित करण्यास परवानगी दिली. हि एक चाल  हर्षेजला पुन्हा एकदा मार्केट मधील टॉपची चॉकलेट कंपनी बनवण्यात महत्त्वाची ठरली.


मित्रांनो या दोन आघाडीच्या कंपन्यांच्या उदाहरणावरून खूप काही घेण्यासारखे आहे.उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न करणे आणि त्यासाठी आपल्या प्रॉडक्टमध्ये अनुकूल अशा पर्यायांचा विचार करणे, बदलत्या काळाप्रमाणे आपल्या उत्पादनामध्ये आवश्यक ते बदल करणे, स्पर्धक कंपनीच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीच्या एक पाऊल पुढे जाऊन विचार करणे या सारख्या काही महत्त्वाच्या विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत.​
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR

================

Comments
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet E-learning Solutions LLP
602, Shivdarshan CHS, Sector 20D, Airoli, Navi Mumbai
​400708, Maharashtra, India

contact - [email protected]
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect