• Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect

Blogs, Thoughts & Updates

बिझनेस मॉडेल म्हणजे काय ? | बिझनेस कसा सुरु करावा ?

11/9/2018

Comments

 
नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण बिझनेस कॅटेगरी काय आहेत हे पाहिलं. तर आता या बिझनेसमध्ये आपण बिझनेस मॉडेल्स बद्दल शिकणार आहोत. 

बिझनेस मॉडेल्स म्हणजे काय?
बिझनेस मॉडेल्स म्हणजे बिझनेसस स्वतःसाठी व्हॅल्यू कशी तयार करतात त्याला बिझनेस मॉडेल्स म्हणतात. आता तुम्हाला यामध्ये व्हॅल्यू क्रीएशन हा शब्द जरा अवघड वाटेल, परंतु या व्हिडिओसाठी आपण त्याला सोपं करूयात. या व्हिडिओसाठी आपण व्हॅल्यू क्रिएशन म्हणजेच बिझनेस पैसे कसे कमवतो त्याला म्हणतात बिझनेस मॉडेल. कोणत्याही बिझनेसची एक विशिष्ट पद्धत असते. ज्याच्यामधून तो बिझनेस पैसे कमवत असतो. तुम्हाला आता असे वाटेल की हे तर साहजिक आहे की माझं प्रॉडक्ट विकलं की मी पैसे कमवणार. कोणत्याही बिझनेसच तसंच असतं. परंतु मित्रांनो तसं नाहीये,  बिझनेस मॉडेल्स कसे फसवे असतात, याच एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या आवडत उदाहरण म्हणजे गूगल किंवा फेसबुक. गूगल आणि फेसबुक या कंपन्या आपलं प्रॉडक्ट  वापरण्यासाठी ग्राहकांकडून काहीच पैसे घेत नाही. परंतु त्या बदल्यात ते आपल्याला जाहिराती दाखवतात. त्यामुळे त्यांचं जे बिझनेस मॉडेल आहे ते ऍडव्हर्टाईजींग बिझनेस मॉडेल. ते पैसे जाहिरातींमधून कमवतात. ते आपल्याकडून म्हणजेच युझर्स कडून पैसे कमवत नाहीत. तर युझर्सना च जाहिराती दाखवण्याचे पैसे घेतात. हे एक वेगळं बिझनेस मॉडेल आहे. 

तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की, बिझनेस मॉडेल म्हणजे फक्त आपलं प्रॉडक्ट विकणं एवढंच नाही. वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस मॉडेल्स आहेत. हल्ली टेकनॉलॉजि मुळे आणखी नवीन बिझनेस मॉडेल्स आले आहेत. 
उदाहरणार्थ, पूर्वी तुम्ही एखाद्या शॉपिंग मॉल मध्ये आपले प्रॉडक्ट्स विकत आहात तर ते एक रिटेलच उदाहरण झालं. परंतु, तुम्ही तेच जेव्हा ऑनलाईन विकता तेव्हा ते इ- कॉमर्स बिझनेस मॉडेल झालं. त्याचप्रकारे न्यूजपेपर प्रत्येकजण दररोज जाऊन पैसे देऊन विकत घ्यायचो.  त्यानंतर न्यूजपेपरचे सब्स्क्रिप्शन स्कीम्स यायला लागल्या. किंवा आपण मॅगझिन्स घेतो. त्याची वार्षिक वर्गणी घेतो. हे झालं सब्स्क्रिप्शन बिझनेस मॉडेल. म्हणजे आपल्याला दर युनिट चे पैसे आकारले जात नाही तर पूर्ण महिना किंवा पूर्ण वर्षभराचे पैसे आकारले जातात. 

जर नेटभेट इ-लर्निंग सोल्युशन जर बघितलं तर हे एक सब्स्क्रिप्शन बिझनेस मॉडेल आहे. नेटभेट मध्ये आम्ही जे कोर्सेस विकतो ते कोर्सेस तुम्ही दर महिन्याला विकत घेऊ शकता किंवा वर्षभरासाठी  किंवा मग लाईफ टाइमसाठी विकत घेऊ शकता. अशी खूप सारे बिझनेस मॉडेल्स आहेत. तर पुढील भगतमध्ये आपल्याला ट्रॅडिशनल बिझनेस मॉडेल म्हणजे पारंपरिक बिझनेस मॉडेल सांगणार आहे आणि त्याच्या पुढच्या भागात नवीन बिझनेस मॉडेल कशाप्रकारचे आहेत आणि उद्योजक त्याचा वापर किंवा फायदा कश्याप्रकारे करतात हे सांगणार आहे. तूर्तास फक्त बिझनेस मॉडेल म्हणजे काय हे लक्षात घेउयात. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट जी आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे बिझनेस मॉडेल हे काही फिक्स नसतं.

एक उद्योजक जेव्हा नवीन उद्योक सुरु करतो त्यावेळी ते एक बिझनेस मॉडेल ठरवतात परंतु त्याच्या पुढे कदाचित ग्राहकांच्या अनुभवावरून किंवा मार्केट मधील रिस्पॉन्स वरून आपलं बिझनेस मॉडेल आपल्याला बदलता येऊ शकत. त्यामुळे कधीही बिझनेस मॉडेल जरी फिक्स केलं तरी सुद्धा इतर बिझनेस मॉडेल्सवर आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि आणखी कोणत्या मार्गाने आपल्या बिझनेस मधून पैसे कमावता येतील ते आपण पाहिलं पाहिजे. 
तर मित्रांनो मला खात्री आहे की बिझनेस मॉडेल म्हणजे काय ते तुम्हाला समजलं असेल.
​ऑल द बेस्ट ! धन्यवाद !!
Comments
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet E-learning Solutions LLP
602, Shivdarshan CHS, Sector 20D, Airoli, Navi Mumbai
​400708, Maharashtra, India

contact - [email protected]
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect