1.Brand is everything
ब्रँड सगळ्यात महत्वाचा असतो, प्रॉडक्ट पेक्षा मोठा आणि कंपनी पेक्षाही मोठा. भाजपा ने भाजप सरकार बोलण्यापेक्षा, "मोदी" सरकार अशीच संकल्पना मतदारांपुढे ठेवली. कारण मोदी हा पर्सनल ब्रँड भाजपा या कंपनी पेक्षा मोठा आहे. 2.Protect your brand at all costs - काही करून ब्रँड व्हॅल्यू जपणे महत्वाचे आहे. एकदा ब्रँड खराब झाला की पुन्हा त्याला चांगलं करणं प्रचंड कठीण आहे. राहुल गांधी यांच्याबद्दल काहीही माहीत नसलेल्यानी "पप्पू" हा शब्द लक्षात ठेवला आहे. हीच त्यांची ब्रँड इमेज त्यांना जिंकू देत नाही. 3.Do not confuse customers - आपल्या ग्राहकांना संभ्रमात ठेवू नका. पंतप्रधान कोण बनणार, हिंदुत्व, प्रखर राष्ट्राभिमान हे भाजपाचे मुद्दे मतदारांना योग्य प्रकारे माहिती करून देण्यात आले होते. याउलट काँग्रेस व इतर पक्षांनी पंतप्रधान कोण होणार हे गुलदस्त्यात ठेवले होते. कधी गरिबी, कधी शेतकरी तर कधी अल्पसंख्याक तर कधी भ्रष्टाचार असे अनेक मुद्दे त्यांनी घेतले त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. उद्योजकांनी आपल्या प्रॉडक्ट्सची असंख्य वैशिष्ट्ये दाखविण्यापेक्षा मोजक्या एक किंवा दोन महत्वाच्या ग्राहकोपयोगी वैशिष्टयांवर लक्ष केंद्रित केले पाहीजे. 4.Everybody is not your customer - समाजातील सर्व घटकांना एकत्र जिंकून घेण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा महत्वाच्या किंवा मोठ्या घटकांना आकर्षित करण्याची भाजपची स्ट्रॅटेजी होती. उद्योजकांनीही आपल्यासाठी योग्य मार्केट ठरवून ते डेव्हलप करण्यासाठी मेहनत केली पाहिजे. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ 5.Commnunicate more and clear / talk to your customers - वेगवेगळ्या मार्गानी पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत जनतेच्या संपर्कात राहिले. जनतेला आपल्या योजनांबद्दल सतत सांगून त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला. जनतेलाही सरकारी कामकाजाबाबत कधी नव्हे इतकी माहिती होती. 6.Every brand needs revival - भाजपाने "मोदी" ब्रँडवर फोकस केले त्यामुळे भाजपा जिंकली याविरुद्ध कांग्रेस ने त्यांच्या "काँग्रेस" ब्रॅंडला नवे रूप दिलेच नाही. याबाबत लाईफबॉय किंवा होंडा सिटी या दोन ब्रॅन्डस कडून शिकता येईल. खूप जुने ब्रॅण्डस असूनही या दोनीही ब्रँड्सने वेळोवेळी कात टाकली आहे. सतत नव्या रूपात आणि नव्या पॅकेजिंगमध्ये दिसत असल्याने हे दोन्ही ब्रॅण्डस टिकून आहेत. 7.Customers don't buy they choose - एकवेळ तुम्ही सर्वोत्तम नसलात तरी चालेल परंतु तुम्ही इतर स्पर्धकांपेक्षा वेगळे असले पाहिजे. ग्राहक सर्वोत्तमाच्या नव्हे तर वेगळेपणाच्या शोधात असतो. मोदींनी अनेक चुका केल्या असतीलही परंतु केवळ त्यांच्या वेगळेपणामुळे मतदारांनी त्यांना पसंती दिली. उद्योजकांनीही आपल्या उत्पादन व सेवांमध्ये काय वेगळं देता येईल याचा अभ्यास केला पाहिजे. 8.Make your customers your promoters - जोपर्यंत आपले ग्राहक आपले चाहते बनणार नाहीत तोपर्यंत मोठं यश मिळणार नाही. मोदींच खरं प्रमोशन त्यांच्या चाहत्यांनीच केलं (ज्यांना भक्त म्हणून संबोधलं गेलं !) , परंतु भक्ती ही शक्ती किंवा युक्ती पेक्षा नेहमीच सरस ठरत आली आहे. उद्योजकानो , तुम्ही स्वतः किती चांगले आहात हे जगाला सांगण्यापेक्षा , तुम्ही किती चांगले आहात हे जगाला सांगणारे इतर लोक तयार करा. (मार्केटिंगच्या भाषेत त्याला social proof म्हणतात.) ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद ! सलिल सुधाकर चौधरी नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com |