मित्रांनो, सध्या भारतात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो आहे. आपल्या घरासाठी जशी वीज गरजेची असते तशी स्मार्टफोनसाठी इंटरनेट कनेक्शन.इतकी त्याची गरज वाढली आहे. त्यात जिओ मुळे तर डेटा पॅकसाठीची स्पर्धा अजूनच तीव्र झाली आहे. पण त्यातही एक वेगळे स्टार्टअप आपले लक्ष वेधून घेत आहे ते म्हणजे (Wifi dabba) वायफाय डब्बा.हे नाव जरी काहीसं वेगळं वाटत असलं. तरी बंगलोर मध्ये हे नवीन नाही.बंगलोर मध्ये सध्या सर्वत्र पिवळ्या रंगाचे वायफाय डब्बे दिसत आहेत. हे आपल्या नेहमीच्या वायफाय राउटर प्रमाणेच इंटरनेट कनेक्शन च काम करतात. शहरातील स्थानिक किराणा दुकाने,चहा विक्रेते आणि बेकरी अशा ठिकाणी हे वायफाय डब्बे बसवण्यात आले आहेत. याचा वापर करण्यासाठी तुम्हाला या विक्रेत्यांकडून टोकन्स विकत घ्यावे लागतात. तुमच्या मोबाइललमध्ये विशिष्ट माहिती भरून झाली कि तुम्ही इंटरनेट वापरू शकता. यात दोन रुपये ते वीस रुपये किमतीपर्यंत टोकन्स उपलब्ध असून चोवीस तास कालावधी साठी तुम्ही इंटरनेट वापरू शकता.दोन रुपये १०० mb,१० रुपये ५०० mb आणि २० रुपए १ gb साठी असे प्लॅन्स २४ तासासाठी उपलब्ध आहेत. ================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ शहरातील स्थानिक किराणा दुकाने,चहा विक्रेते आणि बेकरी अशा ठिकाणी हे वायफाय डब्बे बसवण्यात आले आहेत. याचा वापर करण्यासाठी तुम्हाला या विक्रेत्यांकडून टोकन्स विकत घ्यावे लागतात. तुमच्या मोबाइललमध्ये विशिष्ट माहिती भरून झाली कि तुम्ही इंटरनेट वापरू शकता. यात दोन रुपये ते वीस रुपये किमतीपर्यंत टोकन्स उपलब्ध असून चोवीस तास कालावधी साठी तुम्ही इंटरनेट वापरू शकता.दोन रुपये १०० mb,१० रुपये ५०० mb आणि २० रुपए १ gb साठी असे प्लॅन्स २४ तासासाठी उपलब्ध आहेत. वायफाय डब्बा या स्टार्टअप चे को फाउंडर शुभेंदु शर्मा यांच्या मते भारतात डेटा दर सध्या खूपच जास्त आहे.आम्ही किंमत आणखी कमी करूच. सध्या तरी वायफाय डब्बा हि सेवा केवळ बेंगलोर मध्येच उपलब्ध आहे,लवकरच इतर शहरांमध्ये देखील वायफाय डब्बा सुरु करण्याची योजना आहे.वायफाय डब्बा प्रसिद्ध होण्याचं कारण म्हणजे ग्राहक फक्त दोन रुपयांमध्ये चोवीस तासासाठी ऑनलाइन असू शकतो आणि हे शहरात सर्वत्र सहज उपलब्ध होऊ शकते.हि गोष्ट इतर मोठ्या कंपन्यांच्या महिन्याभराच्या कालावधीच्या डेटापॅक च्या तुलनेत बसत नसली तरी लोकांना एका दिवसासाठी सहज परवडणारी आहे. Cavin kare ne नव्वदीच्या दशकात शाम्पूच्या मोठ्या बाटलीची विक्री होत नव्हती म्हणून १ रुपयाला लहान सॅशे विक्रीसाठी बाजारात आणले.जे लोकांना परवडू लागले. किंबहुना तशीच मानसिकता तयार होऊ लागली आणि लोकांना शाम्पू ची बाटली विकत घेणे महाग वाटू लागले होते. यावरच आधारित वायफाय डब्बे काम करत आहेत आणि एकदा लोकांनी वायफाय डब्याचे दिवसभराचे डेटापॅक वापरणे सुरु केल्यानंतर ते हळू हळू मोठ्या पॅककडे वळतील,अशी या स्टार्टअप मागे स्ट्रॅटेजी आहे. या नवीन पण अनोख्या स्टार्टअप वरून एक गोष्ट नक्कीच लक्षात घेण्यासारखी आहे जरी मोठ्या कंपन्यांची स्पर्धा तीव्र असली तरी ग्राहकांना हळू हळू आपल्या प्रोडक्टची सवय करून देणे आणि तसे त्यांच्या मनावर बिंबवणे हि देखील एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे आणि भविष्यात ती नक्कीच उपयोगी पडेल. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! Netbhet.com |