मराठीतून सर्वप्रथम ! आता अडोबी फोटोशॉप शिका आपल्या मातृभाषेतून.
अडोबी फोटोशॉप मध्ये "एक्स्पर्ट" बना !
|
₹ 1160/-
|
What Will I Learn ?
या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल ? |
प्रोफेशनल दर्जाचे इमेज एडिटिंग म्हणजेच फोटोशॉप हे पक्के समीकरण आहे. अडोबी फोटोशॉप सी एस 6 या लर्निंग प्रोग्राम मध्ये ही कौशल्ये प्रोफेशनल लेवल पर्यंत शिकवण्यात आली आहेत. या डीव्हीडी मध्ये मराठी आणि हिंदी दोन्ही प्रोग्राम्स चा समावेश केलेला आहे.
फोटोशॉप फंडामेंटल्स हा कोर्स मराठी मध्ये आणि फोटोशॉप बेसिक से एडवांस हा कोर्स हिंदी मध्ये उपलब्ध आहे. एकाच DVD मध्ये आपल्याला दोन्ही कोर्स एकत्र मिळतील. |
Who is this for ?
हा कोर्स कोणासाठी आहे ? |
|
Course Description
कोर्सबद्दल माहिती |
Adobe Photoshop परिचयापासून ते अॅडव्हांस लेव्हल च्या इमेज एडिटिंग साठी, इमेज काम्पोजिशन्स तयार करण्यासाठी वापरली जाणारी विविध टूल् त्यांचे कार्य, त्यांचा प्रत्यक्ष उपयोग, त्यासाठीच्या स्मार्ट टिप्स अशी उपयोगी विविध कौशल्ये या प्रोग्राम मधून शिकता येणार आहेत.
लेसन मध्ये शिकलेल्या भागाचे प्रात्यक्षिक तुम्हाला स्वतःला करून पाहण्यासाठी ट्रेनिंग DVD मध्ये प्रोजेक्ट फाइल्स सुद्धा देण्यात आल्या आहेत. या ट्रेनिंगमध्ये शिकविलेली कौशल्ये आत्मसात केल्यानंतर तुम्ही फोटोग्राफचे बेसिक ते अॅडव्हांस लेव्हलचे एडिटिंग, अचूक कलर करेक्शन, रिटचिंग, अल्बम डिझाईनिंग, फोटोचे बॅकग्राउंड बदलणे, वेगवेगळ्या इमेजेस एकत्र करून त्यांचे काम्पोजिशन्स तयार करणे, टेक्स्ट इफेक्टस् देणे अशी विविध कामे सहजपणे करू शकता. "फोटोशॉप फंडामेंटल्स" हा मराठी अणि "फोटोशॉप बेसिक से एडवांस" हा हिंदी असे दोन्ही प्रोग्राम्स एकाच डीवीडी मध्ये आपल्याला मिळतील. यातील कोणताही एक किंवा दोन्ही प्रोग्राम्स आपण वापरू शकता. कोर्स विकत घेण्यापूर्वी खालील महत्वाची माहिती वाचा - १. हा कोर्स मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये एकत्र उपलब्ध आहे. एकाच DVD मध्ये दोन्ही भाषांमधील कोर्स मिळेल. कोर्स ऑनलाईन उपलब्ध नाही आहे. २. हा कोर्स एका सॉफ्टवेअर प्रोग्रामच्या स्वरुपात साठविण्यात आला आहे. केवळ एकाच कंप्युटरवर हा कोर्स इंस्टॉल करता येईल. ३. कोणत्याही परीस्थीतीत दुसर्या कंप्युटर मध्ये हा प्रोग्राम (कोर्स) इंस्टॉल करता येणार नाही. ४. कोर्स इंस्टॉल केल्यानंतर ACTIVATE करावा लागतो. ACTIVATION CODE तुम्हाला ईमेल आणि SMS द्वारे कळवण्यात येईल. ५. फोटोशॉप सॉफ्टवेअरचे ट्रेनिंग या कोर्स मध्ये समाविष्ट करण्यात आले असून फोटोशॉप सॉफ्टवेअरचा यामध्ये समावेष नाही. नेटभेट आणि स्वयमलर्न फोटोशॉप हे सॉफ्टवेअर विकत नाहीत. ६. WINDOWS XP ते WINDOWS 10 या संगणकीय प्रणालीमध्ये हा कोर्स (प्रोग्राम) इंस्टॉल करता येतो. उबंटू, एपल आणि इतर प्रणाली मधील संगणकांमध्ये हा प्रोग्राम इंस्टॉल करता येणार नाही. |
Course Fees
(अध्यापन शुल्क) |
स्पीड पोस्ट किंवा कुरिअरने DVD घरपोच
₹ 1160/- |
Course Content अनुक्रमणिका
01 Introduction
Adobe Photoshop CS6 ची तोंडओळख, फोटोशॉप च्या युजर इंटरफेसची ओळख. 02 image Handeling डिजटल इमेज म्हणजे काय? इमेज मधील पिक्सेलचे महत्त्व, व्हेक्टर आणि रास्टर ग्राफिक मधील फरक, फोटोशॉप मध्ये ईमेज ओपन करणे, झूम, पॅन करणे 03 Brightness/Contrast ईमेजचे प्राथमिक स्वरुपाचे light correction करण्यासाठी या टूलचा वापर करणे. तसेच Hue/Saturation या टूलने इमेजमधील कलर टोन दुरुस्त करणे. 04 History फोटोशॉप मध्ये केलेली कोणतीही क्रीया काढून टाकण्यासाठी केवळ एकदाच Undo हे टूल वापरता येते. मात्र एकापेक्षा अधिक क्रीया काढून टाकण्यासाठी History टूलचा वापर, त्यासंबंधी सेटींग्ज 05 Hue/Saturation ईमेज मधील ठराविक रंगाचे, अथवा संपुर्ण ईमेज मधील सर्व रंगांचे प्रमाण कमी जास्त करण्यासाठी Hue/Saturation या टूलचा वापर आणि त्याच्या सेटींग्ज 06 Levels इमेज मधील light आणि shadows यांचे प्रमाण अधिक अचकपणे दुरुस्त करुन ईमेजचे advance level चे करेक्शन Levels या टूलने कसे केले जाते ? 07 Curves इमेज चे advance level चे light करेक्शन करण्यासाठी फोटोशॉप मध्ये Curves हे आणखी एक टूल उपलब्ध आहे. त्याचा वापर कसा केला जातो ? 08 Crop ईमेज मधील अनावश्यक भाग काढून टाकून ईमेज अधिक आटोपशीर करण्यासाठी Crop या टूलचा वापर कसा करावा ? 09. Image Size - डिजिटल इमेजची पिक्सेल आणि सेंटीमीटर मधील साईझ कशी मोजली जाते. इमेजचा dpi म्हणजे काय ? त्याचा इमेज वर कसा परिणाम होतो, इमेजचा आकार कसा कमी-जास्त करावा ? 10 brush tool डिजिटल पेंटिंग करण्यासाठी फोटोशॉप मध्ये उपलब्ध असलेले ब्रश , त्यांचे विविध प्रीसेट यांचा वापर 11 Healing tools फोटोमधील दोष (चेहर्यावरील व्रण, मुरुमे, धब्बे, जुन्या फोटोमधील डाग इत्यादी) घालविण्यासाठी विविध Healing tools चा वापर 12 Blur, Sharpen, Sponge - डीजीटल ईमेज मधील अनावश्यक डीटेल्स घालविण्यासाठी, काही वेळा डीटेल्स वाढविण्यासाठी , ठराविक भागाला उठाव देण्यासाठी Blur, Sharpen, Sponge या टूल्सचा वापर कसा करावा 13 Layers-1 - एकापेक्षा अधिक इमेजेस, ग्राफिकल घटक, टेक्स्ट वापरुन ईमेज कम्पोजीशन करण्यासाठी फोटोशॉप मधील Layers या शक्तीशाली सुविधेचा वापर करावा लागतो. फोटोशॉप मध्ये Layers कशा प्रकारे काम करतात, नविन लेयर कशा प्रकारे तयार करावेत, लेयर active करणे, lock करणे, अशी विविध तंत्रे 14 Layers-2 - या लेसन मध्ये Layer वापरण्यासाठी आवश्यक असलेली प्रगत तंत्रे शिकता येणार आहेत. 15 Adjustment Layers इमेज मधील advance level चे कलर करेक्शन, लाईट करेक्शन करण्यासाठी Adjustment Layers या प्रगत सुविधेचा वापर कसा केला जातो हे या लेसन मध्ये शिकता येणार आहे. 16 Saving file - फोटोशॉप मध्ये कुशलतेने आर्टवर्क करण्याबरोबरच केलेले काम योग्य पधतीने save करणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. या लेसन मध्ये फोटोशॉप मध्ये फाईल save करण्यासाठी उपलब्ध असलेले विविध पर्याय, image format, त्यांची योग्य निवड 17 Marquee tools इमेज मध्ये चौकोनी अथवा वर्तुळ सिलेक्शन करण्यासाठी मार्की टूल्सचा वापर या लेसन मध्ये शिकता येणार आहे 18 Pattern tool - मार्की आणि पॅटर्न या दोन टूल्सचा एकत्र वापर करुन फोटोशॉप मध्ये एका मोठ्या फोटोग्राफ पासून एका प्रिंटमध्ये पासपोर्ट आकाराचे अनेक फोटो कसे बसवावेत हे या लेसन मध्ये शिकता येणार आहे. 19 Rulers, Guide, Grid फोटोशॉप मध्ये कम्पोजिशन करताना विविध ग्राफिकल घटक एकमेकांना अलाईन करण्यासाठी Rulers, Guide, Grid या उपयोगी सुविधांचा वापर कसा करावा ? |
20 Composition -
फोटोग्राफ टेक्स्ट, फोटोशॉप ग्राफिक्स अशा विविध घटकांचा वापर 21 Lasso tools - ईमेज मध्ये कोणत्याही आकारातील फॉर्म सिलेक्शन करण्यासाठी lasso टूल्स वापरले जातात. त्यातील lasso आणि Magnetic lasso या टूल्सचा वापर 22 Polygonal lasso इमेज मधील हव्या त्या भागाचे, कोणत्याही आकाराचे अचूक सिलेक्शन करण्यासाठी Polygonal lasso हे टूल मोठ्या प्रमाणात वापरले जाते. एखाद्या फोटोग्राफ मधील बॅकग्राउंड बदलण्यासाठी सर्वप्रथम ईमेज मधील मुख्य भाग select कसा करायचा, select केलेला भाग background पासून वेगळा कसा करायचा आणि ईमेज मध्ये नविन background कसे आणायचे हे या लेसन मध्ये शिकायला मिळणार आहे. 23 Magic wand Magic wand हे सुद्धा सिलेक्शन टूल आहे. विषेश परीस्थीती मध्ये या टूलचा वापर करुन ईमेज background पासून विलग कशी करायची हे या लेसन मध्ये शिकायला मिळणार आहे. 24 Quick Selection Tool फोटोशॉप मध्ये ईमेज मधील सिलेक्शन करण्यासाठी विविध सिलेक्शन टूल्स वेगवेगळ्या परीस्थीती मध्ये वापरावी लागतात. Quick Selection Tool ने सुद्धा विशेष परीस्थीती मध्ये सिलेक्शन करता येते. या लेसन मध्ये Quick Selection Tool चा वापर करुन सिलेक्शन कसे केले जाते हे शिकता येणार आहे. 25 Quick Selection Tool 2 एखाद्या ईमेजमधील background काढताना सर्वात आव्हानात्मक भाग म्हणजे एखाद्या पोर्ट्रेट मध्ये चेहरा आणि केसांचा भाग background पासून वेगळा करणे. Quick Selection Tool च्या मदतीने हे काम कसे करायचे हे या लेसन मध्ये शिकता येणार आहे. 26 Eraser इमेज मधील अनावश्यक भाग पुसून टाकण्यासाठी Eraser हे टूल वापरले जाते. विशेषतः ईमेज कम्पोजिशन करताना Eraser टूल साठी अनेक सेटींग्ज वपरुन हे टूल अतिशय प्रभावशाली बनविता येते. 27 Quick maskQuick mask हे टूल सुद्धा सिलेक्शन टूल म्हणून वापरता येते. Quick mask टूलचा वापर कसा करावा हे या लेसन मध्ये शिकता येणार आहे. 28 layer mask Eraser टूलने ईमेज मधील पिक्सेल्स कायमच्या पूसून टाकल्या जातात. पण eraser ऐवजी layer mask टूल वापरुन ईमेज मधील भाग पारदर्शक कसा करायचा ते या लेसनमध्ये शिकायला मिळणार आहे. 29 Gradient संपुर्ण ईमेजमध्ये विविध कलर्स पासून बनवलेल्या gradient चा फिल कसा केला जातो हे या लेसन मध्ये शिकता येईल. 30 Text इमेज मध्ये text कसे ड्रॉ करावे, त्यात कलर, Gradient यांचा फिल कसा करावा हे या लेसन मध्ये शिकता येणार आह 31 Shapes फोटोशॉप मध्ये ग्राफिक तयार करताना आवश्यकतेप्रमाणे विविध शेप्स वापरावे लागतात. अशा शेप्स ची भलीमोठी लायब्ररी फोटोशॉप मध्ये आहे. त्यांचा वापर कसा करावा हे या लेसन मध्ये शिकता येईल. 32 Blending Operations फोटोशॉप मधील ग्राफिकल घटकांना Shadow, Bevel/emboss, Stroke, Glow, Colour fill असे विविध ईफेक्ट्स देवून त्यांच्या परिणामकारकतेत भर कशी घालायची हे या लेसनमध्ये शिकता येणार आहे. 33/34 Filters ईमेज मध्ये वेगवेगळे आणि विलक्षण परिणाम आणण्यासाठी फोटोशॉप मध्ये फिल्टर्सची मोठी लायब्ररी उपलब्ध आहे. त्यांचा वापर कसा करायचा हे या दोन लेसन्स मध्ये शिकता येणार आहे. 35 Composition फोटोशॉप मध्ये आतापर्यंत शिकलेली विविध टूल्स वापरुन एक ईमेज कंपोजिशन या लेसनमध्ये तयार केले जाणार आहे 36 Image retouching पोर्ट्रेट फोटोग्राफ मधील मॉडेलच्या त्वचेला soft focus देणे, ओठांचा रंग हलका गडद करणे, दातांचा पिवळेपणा घालवणे, दात शुभ्र करणे अशा अनेक टेकनिक्स या लेसन मध्ये शिकता येणार आहेत. 37 Black and white to colour जुन्या Black and white फोटोला त्याच्या मूळ रचनेत आणि सदस्यात कसलाही बदल न करता रंगीत कसे करायचे हे या लेसन मध्ये शिकता येणार आहे. 38 Actions एकाच प्रकारची ठराविक क्रिया अनेक ईमेजेसवर करायची असेल तर त्यासाठी फोटोशॉप Actions कशा वापरायच्या हे या लेसनमध्ये शिकता येणार आहे. |