|
आजच वर्डप्रेस सोबत वेबसाइट डेवलपमेंट
|
काय, तुम्हाला कोडींग (Coding) येत नाही किंवा आवडत नाही ?
चांगलं आहे...मलाही आवडत नाही....येथे तुम्ही सॉफ्टवेअर एक ओळही न लिहिता पुर्ण वेबसाइट बनविणार आहात ! नमस्कार, नेटभेट आपल्यासाठी घेऊन येत आहे एक अतिशय उपयोगी आणि करीअरसाठी महत्त्वाचा कोर्स "वर्डप्रेस सोबत वेबसाइट डेवलपमेंट". वर्डप्रेस हे जगातील सर्वात प्रसिद्ध वेबसाईट बनवणारे सॉफ्टवेअर वापरुन, (प्रोग्रामींगची एकही ओळ न लिहिता) आपण वेबसाईट बनवायला शिकणार आहोत. या कोर्स मध्ये भरपूर व्हिडिओंचा वापर केला आहे ज्यामुळे कोर्स समजणे सोपे आहे. आपल्याला वेळ मिळेल तसा हा कोर्स तुम्ही करू शकता. अगदी आपल्या वेगाने. कोर्स लवकर संपवायची घाई नाही की वेळ न मिळाल्यामुळे क्लास बुडण्याची भिती नाही ! घरी, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, प्रवासात बस आणि ट्रेनमध्ये अगदी कोठेही आणि केव्हाही शिकता येण्यासारखा हा कोर्स आहे. घरी संगणक नसला तरी हरकत नाही. हा कोर्स तुम्ही मोबाईल फोनवरही पाहून पूर्ण करू शकता. आणि काही मदत लागली तर आम्ही आहोतच, कोर्स पूर्ण झाल्या नंतरही आम्ही मदतीला असूच ! |
|
या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल ?
पूर्ण Syllabus पाहण्यासाठी येथे क्लिक करा. |
हा कोर्स कोणासाठी आहे ?
तर मग तुम्ही योग्य ठीकाणी आला आहात. वेब डीजायनर्सना हजारो रुपये देऊन आपली वेबसाईट बनवून घेण्यापेक्षा स्वतःच वेबसाईट बनवा, किंवा इतरांसाठी वेबसाईट बनवून पैसे कमवा !! |
ऑनलाईन कोर्सचे फायदे काय ?
|
वेब डिझाईन (Web Design) शिकण्याचे फायदे -
वेब डीझाईन शिकण्याचे अनेक फायदे आहेत. वेब डीझाईन एक चांगला करीअर ऑप्शन आहेच, पण त्याहुनही आणखी काही फायदे आहेत. ईंटरनेट जोमाने वाढत आहे आणि वाढतच जाणार आहे. छपाईयंत्राच्या शोधानंतर प्रकाशन क्षेत्रात अमुलाग्र बदल झाला होता, त्याहुनही कित्येक पटीने जास्त बदल वेबसाईट्सच्या वापरामुळे झाला आहे आणि यापुढेही होणार आहे. नव्या जगाचे हे नवे तंत्र आत्मसात केले नाही तर आपण मागे पडणार हे नक्की ! वेब डीझाईन हा कमीत कमी खर्चात, कमीत कमी भांडवलाच्या सहाय्याने घरच्या घरी करता येण्यासारखा उद्योग आहे. आणि जागतीक बाजारपेठेत या ज्ञानाला मागणीही मोठी आहे. चांगले उत्पन्न, नाविन्यपुर्ण कामाचा आनंद आणि आपल्या वेळेनुसार व मर्जीनुसार काम करण्याची सोय असे अनेक फायदे देणारे "वेब डीझाईनींग"चे क्षेत्र निश्चीतच खुप आकर्षक आहे ! |
|