March 26, 2013

ऑनलाईन शिक्षणाचा राजमार्ग - भाग १/३


ज्ञानार्जनाला सुरुवातीपासून अनन्यसाधारण महत्त्व लाभले आहे. सतत शिकत राहण्याच्या वृत्तीमुळेच माणसाची प्रगती झालेली आहे. आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणाला आणि ज्ञानाला सर्वोत्तम संपत्ती म्हणून ओळखलं जातं.

बदलत्या काळाबरोबर ज्ञानाचं महत्त्व अबाधित राहिलं तरी ज्ञानार्जनाच्या पद्धतींमध्ये मात्र अमुलाग्र बदल झालाय. कॉलेज आणि विद्यापीठांच्या चार भिंतींमध्येच बंदिस्त असलेलं ज्ञान आता संगणकाच्या मदतीने मुक्त झालं आहे. Online Education ने मोठी मजल मारलेली आहे. सर्वच मुख्य विद्यापीठांनी ऑनलाईन शिक्षणाकडे मोर्चा वळविला आहे. वेब २.० च्या क्रांतीमध्ये अनेक असे Online courses उपलब्ध झाले आहेत. आणि यापैकी बरेच courses मोफत उपलब्ध आहेत. आपल्याला जमेल तसा वेळ देऊन आपल्या गतीने हे courses पूर्ण करता येतात.

आज मी तुम्हाला अशा काही वेबसाईट्सची माहिती देणार आहे ज्यांद्वारे ज्ञानाची असंख्य कवाडं आपल्यासमोर उघडी होतील. या वेबसाईट्स वर असलेले courses हे जगभरातील नामांकीत वियापीठांनी / प्राध्यापकांनी बनविलेले आहेत. विविध देशांतील शिक्षकांचा सहभाग असल्याने एकंदरीत या courses ची गुणवत्ता देखिल वाखाणण्याजोगी आहे. (मी स्वतः आतापर्यंत असे चार online courses याच साइट्सच्या माध्यमातून पूर्ण केले आहेत.)

Khan Academy (खान अ‍ॅकेडमी) -

खान अ‍ॅकेडेमी हे नाव आपल्यापर्यंत कधीतरी पोहोचले असेलंच. २००४ साली सलमान खान ("दबंग" खान नव्हे !) या बोस्टन स्थित तरुणाने विविध विषयांवरील माहिती देणारे व्हीडीओ youtube या साईटवर अपलोड करायला सुरुवात केली. सुरुवातीचे काही व्हीडीओ त्याने आपल्या भाच्यांना मदत म्हणून youtube वर अपलोड केले होते. त्या व्हीडीओजना इतरांकडूनही खुप प्रतीसाद मिळाला आणि तेव्हाच सलमानने सर्वांना मोफत ज्ञान देण्याच्या उद्देशाने खान अ‍ॅकेडमीची सुरुवात केली. आज खान अ‍ॅकेडमीने विविध विषयांवरील ४००० हून अधिक व्हीडीओज सर्वांना मोफत उपलब्ध करुन दिले आहेत. गणित, संख्याशास्त्र, विज्ञान, अर्थशास्त्र, भाषा, संगणक, खगोल, समाजशास्त्र, भूगोल, जैव, वैद्यक अशा अनेक विषयांवरील ज्ञान या व्हीडीओज मुळे आता सर्वांसाठी खुले झाले आहे.

केवळ विद्यार्थीच नव्हे तर अनेक शिक्षकही khan Academy चे व्हीडीओ शाळेत्/कॉलेज मध्ये शिकवण्यासाठी वापरतात. आता  khan Academy मध्ये त्या त्या विषयांबद्दल लगेचच प्रश्नोत्तरे विचारण्याची सोयही केलेली आहे. त्यामुळे विषय आपणांस किती समजला आहे हे लगेचच कळते. शिक्षकांनाही वर्गात मुलांना कितपत विषय समजला आहे हे लगेचच पडताळून पाहता येते. प्रत्येक विद्यार्थ्याचा एक आलेखच शिक्षकांसमोर मांडण्याची सोय khan Academy ने केली आहे.

गेल्या वर्षी शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगीरीबद्दल khan Academy ला गुगलने १० लाख डॉलर्सचे पारितोषिक दिले.

EdX (एडएक्स) -


EdX ही खान अ‍ॅकेडमी पेक्षा वेगळी साइट आहे. यामध्ये प्रत्येक Course ची नीट मांडणी केलेली असते. आणि प्रत्येक Course सुरु करण्याचा आणि पुर्ण करण्याचा कालावधी ठरलेला असतो. Massachusetts Institute of Technology (MIT), Harvard university, University of Toronto, Austrelian National University अशा नामांकीत युनिव्हर्सीटीजने बनविलेले courses यामध्ये समाविष्ट केलेले असतात. विषयांची संख्या खुपच कमी असली तरी गुणवत्ता मात्र अत्युच्च पातळीची असते.

Coursera (कोर्सेरा) -


Coursera ही साईट म्हणजे खान अ‍ॅकेडमी आणि एडएक्स यांचा सुवर्णमध्य साधणारी आहे. जगभरातील ४० हून अधिक युनिव्हर्सीटीजतर्फे दिले जाणारे ऑनलाईन कोर्सेस या साईटवर उपल्ब्ध करुन देण्यात आलेले आहेत. ऑनलाईन कोर्सेस साठी ही माझी सर्वात आवडती साईट आहे. सुमारे १० लाखाहुन अधिक विद्यार्थ्यांनी आतापर्यंत coursera चा फायदा घेतला आहे.


Canvas Network (कॅनव्हास नेटवर्क) -


Canvas Network ही साईट या क्षेत्रात काहीशी नविन आहे. पण तरीदेखिल coursera च्या खालोखाल Canvas Network ही माझी आवडती साईट आहे. विविध विषयांवरील कोर्सेस या साईटवर मांडण्यात आलेले आहेत. Canvas Network मध्ये विषयांची मांडणी आणि एकुणच शिकण्या-शिकवण्याची पद्धती आकर्षक आहे. जगभरातील वेगवेगळ्या देशांचे लोक एकत्र एका वर्गात शिकत आहेत ही भावना Canvas Network मध्ये शिकत असताना अनुभवायला मिळते. कोर्सचं पुर्ण मटेरीयल एकत्र उपलब्ध करुन न देता, टप्प्या टप्प्याने दिले जाते. asaaignments, case studies, peer evaluation, group work यामुळे खरोखरीच कॉलेजची आठवण होते.

Udacity (युडॅसीटी ) -


 Udacity ही साईट मुख्यत्वेकरुन संगणक विज्ञान (Computer science)  मधील कोर्सेस उपलब्ध करुन देते. काठीण्यपातळीनूसार beginner, intermidiate आणि Advanced अशी कोर्सेसची वर्गवारी येथे केलेली आहे.

युडॅसीटी चे forum देखिल खुप चांगले आहे. येथे विद्यार्थी त्यांच्या सहपाठींसोठींचर्चा करु शकतात.


Academic Earth (अ‍ॅकेडेमीक अर्थ) -


Academic Earth या वेबसाईटवर तुम्हाला अनेक व्हीडीओ लेक्चर्स मिळतील. हे सर्व लेक्चर्स pre-recorded आहेत.

मित्रांनो ऑनलाईन शिक्षण उप्लब्ध करुन देणार्‍या या काही प्रमुख साईट मी येथे नमूद केल्या. या व्यतीरीक्त ऑनलाईन शिक्षणाचे आणखीही अनेक मार्ग उपलब्ध आहेत. त्यांच्याबद्दल माहिती आपण पाहुया पुढील लेखात. तोपर्यंत वर दिलेल्या साईट्सपैकी एका तरी कोर्सला तुम्ही सुरुवात केलेली असेलच !

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

उद्धब भराली - The grassroot innovator




मित्रहो, आज मी तुमची भेट एका अवलियाशी करुन देणार आहे. हा अवलिया एक अतिशय हुशार , बुद्धीमान आणि मेहनती असा संशोधक आहे. उद्धब भराली (Uddhab Bharali) नावाच्या या व्यक्तीकडे एकुण ३९ जागतीक पेटंट्स आहेत आणि त्यांनी ९८ वेगवेगळी उत्पादने बनविली आहेत.
आसाम मध्ये राहणार्‍या उद्धब यांनी बनविलेल्या एका उपकरणाला नुकताच नासाने (NASA) NASA Exceptional Technology Achievement या पुरस्काराने गौरविले.

उद्धब हे लहानपणापासूनच अत्यंत हुशार होते. त्यांच्या या हुशारीमुळेच त्यांना शाळेत असताना पहिलीतून थेट तिसरीत आणि पुढे पाचवीतून थेट दहावीत प्रवेश मिळाला होता. त्यांना गणित या विषयात विशेष रुची होती. शाळेत असताना देखिल ते ११-१२ ची कठीण गणिते सोडवु शकत होते. उद्धबजींनी पुढे इंजीनीअरींगला प्रवेश मिळवला परंतु आर्थिक समस्येमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. काम करुन घरखर्च चालवण्याची जबाबदारी त्याम्च्यवर पडली आणि यातूनच त्यांना त्यांच्यातील संशोधकाची ओळख झाली.

वडीलांच्या तोट्यात गेलेल्या व्यवसायामुळे उद्धब यांच्या घरावर बॅंकेचे १८ लाख इतके कर्ज झाले होते. कोणतीही नोकरी करुन इतके कर्ज फेडता येणे शक्य नव्हते हे उद्धबना ठाऊक होते. त्याचवेळेस एका कंपनीस पॉलीथीन बनविणार्‍या एका परदेशी मशिनची कॉपी करुन तशीच मशीन कमीत कमी खर्चात भारतात बनवाय्चे होती. उद्धबजींनी हे आव्हान स्वीकारले. ५ लाख रुपये किंमत असलेल्या या मशीनची प्रतीकृती त्यांनी बनवून दाखविली आणि ते देखील फक्त ६७००० रुपये इतक्या कमी किमतीत. तेव्हा उद्धबजीम्चं वय होते २३ वर्षे. आपल्यातील या कौशल्याची त्यांना जाणीव झाली नंतर त्यांनी अनेक अशी उत्पादने बनविण्याचा सपाटाच लावला.

२००५ साली National Innovation foundation (NIF) Ahmedabad यांनी उद्धब भरालींच्या उत्पादनांची आणि शोधांची दखल घेतली. आणि त्यानंतर उद्द्बजींना कधीच मागे वळून पहावे लागले नाही.



उद्धब यांनी मुख्यत्वेकरुन शेती साठी उपयुक्त ठरतील अशी अनेक उपकरणे बनविली. त्यांचे सर्वात जास्त गाजलेले संशोशन म्हणजे Pomegranate de-seeder.(डाळींब सोलण्याचे यंत्र). डाळींबाचे फळ सोलण्यासाठीचे यंत्र बनविण्यासाठी अमेरीकेतील इंजीनीअर्स बरेच प्रयत्न करत होते. परंतु ३० वर्ष मेहनत करुन देखील असे यंत्र त्यांना बनवता आले नव्हते.

जेव्हा उद्धबजींना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी या यंत्रावर काम करण्याचे ठरविले. आसाममध्ये डाळिंब हे फळ सहजगत्या उपलब्ध नव्हते. म्हणून त्यांना फळे विकत  आणण्यासाठी ५०० किमी प्रवास करावा लागत असे. अनंत प्रयोग करुन अखेरीस त्यांनी हे यंत्र बनवून दाखविलेच. याच यंत्राला NASA , MIT या मोठ्या संस्थांनी नावाजले. आणि उद्धब भराली हे व्यक्तीमत्व जगासमोर आले. आज त्यांना अनेक विविध देशांमधून वेगवेगळी उत्पादने बनविण्याची कामे दिली जात आहेत.



Pomegranate de-seeder.(डाळींब सोलण्याचे यंत्र) प्रमाणेच सुपारी फोडण्याचे यंत्र, अपंगांसाठी बनविलेली Mechanised toilet , चहाच्या पानांपासुन चहा पावडर (CTC) बनविण्याचे यंत्र ही त्यांची गाजलेली इतर उत्पादने होत.




एवढ्या विविध उपकरणांचा शोध लावून देखील उद्धबजींनी कोणतेही उपकरण गरजु आणि गरीब शेतकर्‍यांना विकले नाहे, तर ते त्यांनी मोफत वाटले आहे. तसेच या उपकरणांची व्यापारी तत्त्वावर निर्मीती (Commercial production) करणे त्यांनी टाळले. पैसा आणि संपत्ती ही माणसाला वेडं करते आणि त्यामुळे नविन संशोधन होऊ शकत नाही असे त्यांचे ठाम मत आहे. आपले कुटूंब आणि संशोधनाचा खर्च चालावा यासाठी ते आपली उत्पादने बनविणार्‍या कंपन्यांकडून Royalty च्या स्वरुपात पैसे घेतात.

असा हा जागतीक दर्जाचा innovator  हा भारताचा खरा सुपुत्र आहे. उद्धब भरालींसारख्या व्यक्ती भारतात असणे ही आपणां भारतीयांसाठी गर्वाची बाब आहे.

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

March 05, 2013

आपल्या जीमेल अकाऊंटला अधिक सुरक्षीत कसे कराल ?




अगर वो जान भी मांग लेते तो शिकवा न था
मगर कम्बख्त ने जीमेल का पासवर्ड मांग लिया ...........

जीमेल च्या पासवर्ड चे महात्म्य सांगण्यासाठी मला यापेक्षा चांगली प्रस्तावना करता आली नसती :-)
मित्रहो आपला जीमेलबॉक्स हा रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. खाजगी, व्यावसायाशी संबंधीत , आर्थिक असे अनेक महात्वाचे दस्तऐवज आपल्या जीमेलबॉक्स मध्ये दडलेले असतात. हा अतिमहात्वाचा ऐवज असलेली तिजोरी असते ती केवळ पासवर्ड रुपी किल्लीच्या भरवशावर ! साहाजीकच ही तिजोरी उघडण्यासाठी अनेक चोर टपून बसलेले असतात. अशा चोरांपासून जीमेलबॉक्सला अधिक सूरक्षीत करण्यासाठी गुगलने Two Step Verification ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यालाच Two Factor Authentication असेही म्हणतात.

Two Step Verification म्हणजे काय ?

सोप्या भाषेत सांगायच तर Two step verification म्हणजे गुगल अकाउंट वापरण्यासाठी एक नव्हे तर दोन पासवर्ड वापरणे. यापैकी पहिला पासवर्ड आपला नेहमीचा जीमेल / गुगल पासवर्ड असतो. पहिला पासवर्ड बरोबर असल्यास दुसरा पासवर्ड विचारला जातो. हा दुसरा पासवर्ड मोबाइल फोन मध्ये SMS च्या स्वरूपात पाठवला जातो. किंवा असा पासवर्ड generate करणारे अप्लीकेशन्स Android/ iphone/ Blackberry मध्ये उपलब्ध आहेत.


Two Step Verification कसे वापरावे ?

Step 1 -  गुगल अकाउंट / जीमेल मध्ये Log In करा आणि खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे Account ला क्लिक करा



Step 2 -  Security या लिंक वर क्लिक करा.





















Step 3 -  Settings या बटनावर क्लिक करा. आता तुम्हाला पुन्हा जीमेल मध्ये Log in  करावे लागेल. 



















Step 4 - २ स्टेप वेरीफिकेशन ची प्रक्रिया येथून  सुरु होते.


















Step 5 -  ज्या मोबाईल नंबर वर २ स्टेप वेरीफिकेशन कोड यायला हवा तो क्रमांक येथे लिहा आणि चित्रात दाखविल्या प्रमाणे Text Message हा पर्याय निवडा.



















Step 6 -  गुगल द्वारे एक SMS  त्वरीत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठविला जाईल. या SMS  मध्ये एक कोड दिलेला असेल. तो खाली चित्रात दाखविलेल्या चौकोनात लिहा आणि Verify  या बटनावर क्लिक करा.




















Step 7 -  

















   Step 8 -  आता २ step verification  ची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. यापुढे Log in करताना दोन पासवर्ड द्यावे लागतील. दुसरा पासवर्ड गुगलद्वारे SMS केला जाईल अथवा मोबाईल अप्लिकेशनवर दाखविला जाईल.
















     जर तुमचा मोबाईल फोन हरवला तर -
https://accounts.google.com/SmsAuthConfig या लिंक वर जाऊन आपल्याला आणखी एक मोबाईल क्रमांक (Backup phone number ) सेव्ह करता येतो.

जर तुम्ही परदेशात असाल, किंवा कोणत्याही मोबाइल पासुन दूर असाल तर
https://accounts.google.com/SmsAuthConfig याच लिंक वर जाऊन काही security codes  प्रिंट करून ठेवण्याची सोय देखील उपलब्ध आहे.

2  Step Verification चे मोबाईल अप्लिकेशन्स डाउनलोड करा -
Android -  https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.authenticator2
iPhone -  https://itunes.apple.com/us/app/google-authenticator/id388497605?mt=8

आजच 2  Step Verification कार्यान्वित करा आणि निश्चिंतपणे गुगलच्या सर्व सेवांचा उपयोग करा. आता चोरांपासून तुमच्या गुगल अकाऊंटला बिलकूल धोका नाहीं.

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

January 04, 2013

IFTTT - तुमचा ईंटरनेट असिस्टंट




मित्रहो आज मी तुम्हाला एका अतिशय उपयुक्त वेबसाईट बद्दल सांगणार आहे. या वेबसाईट्चे नाव आहे IFTTT. होय हेच नाव आहे. खरे तर हा नावाचा शॉर्टफॉर्म आहे. आणि या साईटचे पुर्ण नाव आहे IF This Then That. एका वाक्यात सांगायचे तर IFTTT  ही साईट म्हणजे तुमचा ईंटरनेट असिस्टंट आहे. चला तर मग पाहुया हा ईंटरनेट असिस्टंट नक्की कसा काम करतो ते.

IF This Then That चा मराठी अर्थ म्हणजे "जर असे घडले तर तसे करा."






IFTTT वापरुन आपण ईंटरनेट वापरताना अनेक वेळा स्वतःहुन (Manually) करत असलेल्या गोष्टी आपण आपोआप (Automatically) करु शकतो.

उदाहरणार्थ -
  1. एखाद्या ब्लॉगमध्ये विशिष्ट विषय (किंवा शब्द) असलेला लेख प्रकाशित झाला तर ते IFTTT आपल्याला ईमेल द्वारे कळवू शकते.
  2. जर फेसबुकवरील profile picture बदलले तर आपोआप ट्वीटर अकाउंट वरील profile picture मध्ये बदल
  3. फेसबुकवर अपलोड केलेली सर्व चित्र आपोआप Dropbox, Google drive किंवा Skydrive मध्ये save करता येतात.
  4. फेसबुक स्टेट्स अपडेट आपोआप ट्वीटर वर पोस्ट करता येते.
  5. विशिष्ट विषय (किंवा शब्द) असलेल्या ईमेल मधील attachment आपोआप Dropbox, Google drive, Skydrive किंवा Evernote अकाउंट मध्ये save करु शकता
  6. ठरवुन दिलेल्या वेळेवर किंवा ठराविक कालांतराने ट्वीट किंवा फेसबुक अपडेट्स पोस्ट करता येतात.
  7. Youtube वरील व्हीडीओ नंतर पाहण्यासाठी save करता येतात.
  8. Gmail मध्ये नविन ईमेल आल्यावर स्वतःला SMS करता येतो.
  9. पाऊस पडण्याची शक्यता असल्यास तसे आदल्या दिवशी ईमेल/SMS ने कळवता येईल.
  10. तुम्ही wordpress/blogger/tumblr वरील ब्लॉगमध्ये पोस्ट केल्यावर त्याची माहिती facebook/Twitter/Linkedin या सोशल साईट्सवर आपोआप पोस्ट करता येते.
ही फक्त काही उदाहरणे आहेत. IFTTT ने अनेक सेवांना आपल्यामध्ये सामावुन घेतले आहे. वर दाखविलेल्या उदाहरणांना IFTTT मध्ये  recipie (रेसीपी) असे म्हणतात. अशा प्रकारच्या २५०० हून अधिक रेसीपी म्हणजेच IFTTT चे उपयोग त्यांच्या वेबसाईटवर दिलेले आहेत.

IFTTT ची मला आवडणारी आणखी एक गोष्ट म्हणजे ही साईट वापरण्यास खुपच सोपी आहे. आणि मुख्य म्हणजे IFTTT वापरण्यास मजा येते. एक वेगळाच अनुभव आहे हा तो जरुर अनुभवा. आणि IFTTT च्या सहाय्याने super productive व्हा :-)

काही मदत हवी असली तर खाली कमेंट्स मध्ये लिहा. नेटभेट आहेच की तुमच्या मदतीला.

Visit - https://ifttt.com/

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

June 24, 2012

मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील Keyboard shortcuts - Function Keys

मित्रहो, मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील Keyboard shortcuts संबंधी माहिती आपण यापुर्वीच्या काही लेखांमध्ये घेतली आहे. आज आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील काही Advance Keyboard shortcuts बद्दल जाणून घेणार आहोत.
संगणकाच्या कीबोर्ड वर बारा function keys असतात. या function keys चा वापर एक्सेलमध्ये 
 shortcut म्हणून कसा करावा ते आपण  पाहुया.
खाली सर्व function keys चे काय काम आहे हे लिहिले आहे. आणि प्रत्येक Function Key कशी वापरावी हे दाखविण्यासाठी एक व्हीडीओ येथे देत आहे. हा व्हीडीओ पाहिल्यानंतर तुमची excel keyboard shortcuts चे expert बनण्याच्या दिशेने वाटचाल नक्कीच सुरु झालेली असेल.


F1 HELP / मदत  चा शॉर्टकट
F2 सिलेक्ट केलेल्या सेल मध्ये EDIT करण्यासाठी (Double click)
F3 फॉर्म्युला ठरावीक नावांच्या सहाय्याने मांडणे
F4 शेवटची Command वा Action पुन्हा करणे
F5 Go to Dialogue box चा शॉर्टकट
F6 स्प्लिट विंडोमधील प्रत्येक भागामध्ये जाण्याकरीता
F7 स्पेलींग तपासण्याकरीता शॉर्टकट
F8 एकापेक्षा अधिक cells सिलेक्ट करण्याकरीता
F9 फॉर्म्युला व त्यामधील किंमती तपासण्याकरीता
F10 मेनुबार मधील विविध पर्याय निवडण्याकरीता
F11 Column type chart बनविण्याकरीता
F12 "Save As" Dialogue box चा शॉर्टकट



असे अनेक उपयोगी व्हीडीओ पाहण्यासाठी नेटभेट च्या Youtube channel ला अवश्य भेट द्या आणि Subscribe करा.



Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Related Posts with Thumbnails