या जगामध्ये दोन प्रकारचे लोक असतात. मला जगाकडून काय मिळतंय ? (मागणारे) आणि मी जगाला काय देऊ शकतो ? (देणारे) असा विचार करणारे !
मागणे हे नैसर्गिकतःच आपल्यामध्ये असते. मागण्यासाठी काहीच कष्ट लागत नाहीत आणि ते देण्यापेक्षा नक्कीच सोपे असते. मात्र "मी जगाला काय देऊ शकतो?" याचे उत्तर शोधणारे कमी असतात. कारण "देणे" सोपे नसते. देण्यासाठी वेळ, उर्जा, संपत्ती खर्च करावी लागते. परंतु केवळ स्वतःचाच विचार करणार्या माणसांना ही गोष्ट लक्षातच येत नाही जे लोक जगाला काही देण्याचा प्रयत्न करतात तेच अधिकाधिक मौल्यवान होत जातात. सतत काही न काही मागणी करणार्या लोकांना आपण टाळतो. कोणालाही त्यांच्यासोबत वेळ घालवायला आवडत नाही. पण तरीही जग अशा लोकांनी भरलेले आहे. याउलट "देणार्या" लोकांशी मैत्री, जवळीक करायला सर्वांनाच आवडतं. आणि त्यांच्याकडून मिळालेलं ज्ञान, प्रेम , सौख्य आपणही इतरांमध्ये आनंदाने वाटतो. गाय दुध, शेण, गोमुत्र देते तसेच फळं, लाकूड, प्राणवायू देतात म्हणून झाडं अत्यंत महत्त्वाची असतात. जेवढं गवत खाते त्यापेक्षा कित्येक पटीने गाय परत देते, जेवढी खतं लागतात त्यापेक्षा कित्येक पटीने वृक्ष मानवाला परत देतात. मित्रांनो, यालाच इंग्रजी मध्ये "Value" हा शब्द आहे. नोकरी असो, व्यवसाय असो अथवा जीवनातील कोणतीही बाब असो, जेवढी जास्त "वॅल्यु" आपण इतरांना देणार तेवढा मोबदला आपल्याला मिळणार, प्रेम आणि आदर वाढत जाणार. यश हे आपण किती "वॅल्यु" जगाला देतो या एकाच गोष्टीवर अवलंबून असतं ! ================ नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - SUBSCRIBE - https://goo.gl/JtFkBR =============== - नोकरीत आपण किती काम करतोय, यापेक्षा आपण केलेलं काम कंपनीला किती उपयोगाचं ठरतंय ते महत्त्वाचं ! - बिझनेसमध्ये आपण ग्राहकाला जे उत्पादन विकतोय, ते आकारलेल्या किंमतीपेक्षा ग्राहकाला किती जास्त फायदेशीर ठरतं ते महत्त्वाचं ! माझ्या ऑफीसमध्ये एक पिऊन होता. ऑफेसमधली बारीक सारिक कामं करायचा. शिक्षण बिलकुल नव्हतं पण स्वतःहून कंप्युटर चालवायला , डेटा एंट्री करायला शिकला. स्वतःहून इतरांना मदत करु लागला. काही दिवसांनंतर कंत्राटी लोकांना सामावून घेण्यासाठी जागा निघाल्या तेव्हा तो बॅक ऑफीस जॉबसाठी तयार होता. कोणाकडे वशिला लावला नाही, की कोणाकडे दया मागितली नाही. स्वतःची "वॅल्यु" वाढविली आणि "वॅल्युएबल" बनला. उगाचंच मी खुप काम करतो म्हणून माझा पगार वाढला पाहिजे असा आक्रोश करण्यात काहीच फायदा नसतो. तुम्हाला जे हवंय ते जग तुम्हाला देत नसून, तुम्ही किती वॅल्यु देता त्यावर अवलंबून असतं. आणखी एक गोष्ट ! काही लोक देतात पण मोजून मापून ! दिलं की लगेच किती आणि कधी परत मिळणार याची गणितं सुरु होतात. याला "देणे" म्हणत नाही हा व्यवहार झाला. ================ नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - SUBSCRIBE - https://goo.gl/JtFkBR =============== या वॅल्यु मधूनच "वॅल्युएबल" (Valueable) हा शब्द तयार झाला आहे हे विसरू नका ! Valueable म्हणजे मौल्यवान बनायचं असेल तर "द्यायला" शिका ! यशाच्या मागे न धावता, आपली किंमत वाढवायला , स्वतःला मौल्यवान करण्यासाठी वेळ, उर्जा आणि पैसा खर्च करा ! मग बघा यश कसं पायघड्या घालंत येतं ते ! यशस्वी भव ! All the best ! सलिल सुधाकर चौधरी Netbhet elearning solutions मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !! www.netbhet.com महान बॉक्सर मोहम्मद अली यांनी बॉक्सिंग शिकायला सुरुवात केली त्याचं खरं कारण फार गमतीशीर आहे. मोहम्मद अली १२ वर्षाचे असताना त्यांची सायकल एका मुलाने पळविली होती. त्याला धडा शिकविण्यासाठी म्हणून मोहम्मद अलींनी बॉक्सिंगची सुरुवात केली.
त्यांची सायकल परत मिळाली की नाही ते ठाऊक नाही...पण त्या एका निर्णयाने जगाला एक सर्वोत्कृष्ट बॉक्सर आणि खेळाडू मिळाला ! म्हंटलं तर हे फार क्षुल्ल्लक कारण आहे. पण त्याला मोहम्मद अलींनी दिलेली प्रतीक्रीया महत्वाची आहे. अशा क्षुल्लक वाटणाऱ्या बऱ्याच घटना आपल्यासोबतही घडत असतात. त्यावर आपण काय करतो, करू शकतो याचा थोडं थांबून विचार करणं आणि नंतर प्रतिसाद देणं महत्वाचं आहे. =================== नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com लोकांना नेहमी असं वाटतं की यशस्वी लोक खुप नशीबवान किंवा ईश्वरी देणगी लाभलेले असतात. पण खरंतर नशीबाने त्यांच्या यशाबद्दल काहीच ठरवलेलं नसतं, अथक परीश्रम, अभ्यास आणि संघर्ष करुन त्यांनी ते यश खेचून आणलेलं असतं.....
खरंतर असं यश मिळविण्याची, महान बनण्याची सुरुवात त्या दिशेने टाकलेल्या छोट्या पावलाने होते. महान बनण्याची सुरुवात तुम्ही स्वतःसाठी पाहिलेल्या एका स्वप्नाने होते. त्या स्वप्नाचे एक ध्येय बनतं आणि ते ध्येय मी साध्य करणारंच या विश्वासानेच माणूस महानतेच्या दिशेने चालू लागतो. आणि जेव्हा तुम्ही या ध्येयाच्या दिशेने चालू लागतो तेव्हा मार्गात येणारा सगळ्यात मोठा अडथळा तुमच्या भोवतालच्या जगातून कधीच येत नसतो. तुमचा संघर्ष विरुद्ध खेळणार्या संघाबरोबर नसतो, शर्यतीत आपल्याबरोबर धावणार्या खेळाडूसोबत नसतो, तुमच्या बिझनेस मधील स्पर्धकांसोबत नसतो, किंवा ऑफीसमधील सहकार्यांसोबत नसतो तुमचा खरा संघर्ष स्वतःशीच आपला आपल्याशीच असतो. तुम्हीच तुमचा सगळ्यात मोठा अडथळा असता. तुमच्या यश किंवा अपयशाचं मुख्य कारण तुम्हीच असता दररोज सकाळी उठून एक सर्वसाधारण आयुष्य जगायचं की काहीतरी विलक्षण साध्य करायचं हे तुम्ही ठरवता. तुमचा दृष्टीकोन ते ठरवत असतो. जेव्हा कोणीही तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवत नाही आणि हाती घेतलेलं काम अशक्य वाटू लागतं तेव्हा तुमचा आत्मविश्वासच कामी येतो. तुमच्या स्वप्नांच्या मध्ये कोणताही अडथळा उभा असेल, तो पार करणं कितीही अशक्य वाटत असेल तरी तो पार करता येईल.......फक्त आरशात तुमच्याकडे पाहणार्या व्यक्तीला तसा विश्वास वाटला पाहिजे !! ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com लोकांना नेहमी असं वाटतं की यशस्वी लोक खुप नशीबवान किंवा ईश्वरी देणगी लाभलेले असतात. पण खरंतर नशीबाने त्यांच्या यशाबद्दल काहीच ठरवलेलं नसतं, अथक परीश्रम, अभ्यास आणि संघर्ष करुन त्यांनी ते यश खेचून आणलेलं असतं.....
खरंतर असं यश मिळविण्याची, महान बनण्याची सुरुवात त्या दिशेने टाकलेल्या छोट्या पावलाने होते. महान बनण्याची सुरुवात तुम्ही स्वतःसाठी पाहिलेल्या एका स्वप्नाने होते. त्या स्वप्नाचे एक ध्येय बनतं आणि ते ध्येय मी साध्य करणारंच या विश्वासानेच माणूस महानतेच्या दिशेने चालू लागतो. आणि जेव्हा तुम्ही या ध्येयाच्या दिशेने चालू लागतो तेव्हा मार्गात येणारा सगळ्यात मोठा अडथळा तुमच्या भोवतालच्या जगातून कधीच येत नसतो. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ तुमचा संघर्ष विरुद्ध खेळणार्या संघाबरोबर नसतो, शर्यतीत आपल्याबरोबर धावणार्या खेळाडूसोबत नसतो, तुमच्या बिझनेस मधील स्पर्धकांसोबत नसतो, किंवा ऑफीसमधील सहकार्यांसोबत नसतो तुमचा खरा संघर्ष स्वतःशीच आपला आपल्याशीच असतो. तुम्हीच तुमचा सगळ्यात मोठा अडथळा असता. तुमच्या यश किंवा अपयशाचं मुख्य कारण तुम्हीच असता दररोज सकाळी उठून एक सर्वसाधारण आयुष्य जगायचं की काहीतरी विलक्षण साध्य करायचं हे तुम्ही ठरवता. तुमचा दृष्टीकोन ते ठरवत असतो. जेव्हा कोणीही तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवत नाही आणि हाती घेतलेलं काम अशक्य वाटू लागतं तेव्हा तुमचा आत्मविश्वासच कामी येतो. तुमच्या स्वप्नांच्या मध्ये कोणताही अडथळा उभा असेल, तो पार करणं कितीही अशक्य वाटत असेल तरी तो पार करता येईल.......फक्त आरशात तुमच्याकडे पाहणार्या व्यक्तीला तसा विश्वास वाटला पाहिजे !! ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com १५ वर्षानंतर अथक संघर्षानंतर अमेरिकन खेळाडू एल्ड्रिक टाँट टायगर वूड्स ने गोल्फ या क्रीडाप्रकारात पाचव्यांदा मास्टर्स किताब जिंकला आहे.
या १५ वर्षांचा टायगर चा प्रवास नेमका कसा होता? इतका संघर्ष त्याला का करावा लागला ते पाहू.. 2004 - 264 आठवडे विजेतेपद राखल्यानंतर टाइगरने विजय सिंगद्वारा वर्ल्ड नंबर 1 गोल्फ रैंकिंग पद गमावले. 2005 - टायगरने PGA टूर इव्हेंट्स (आणि त्यांचे शेवटचे मास्टर्स) जिंकले आणि काही काळासाठी पुन्हा विजेतेपद परत मिळविले. 2007 - त्याच्या वडिलांच्या निधनानंतर फॉर्म मध्ये येण्यासाठी खूप झगडावे लागले. 200 9 - गुडघ्याचे ऑपरेशन मुळे त्याला खेळापासून आठ महिने दूर राहावे लागले. कार अपघात,वैवाहिक आयुष्यातली अस्थिरता अशा कारणामुळे तो प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत राहिला. 2010 - टाइगरच्या आयुष्यातल्या अनेक खाजगी गोष्टी सार्वजनिक झाल्या.त्याची पत्नी एलिनने त्याला घटस्फोट दिला.त्याने त्याचे प्रमुख प्रायोजक गमावले.जाहिरातींमध्ये 22 दशलक्ष डॉलर्स आणि शेअर्स मध्ये 12 अब्ज डॉलर्सचे नुकसान अशा अनेक गोष्टी जगासमोर आल्या.तो दीड महिने व्यसनमुक्तीकेंद्रात दाखल झाला, 2015 - पाच वर्ष सतत निराशजनक कामगिरी होत असताना पुन्हा एकदा टायगरला पाठीच्या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले, त्यामुळे त्याला चालणेही कठीण होत होते,हा काळ त्याच्यासाठी खुपच खडतर होता. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ 2016 - टाइगरच्या पाठीचा दुखणं सुरूच होतं.तो म्हणतो, "कमीत कमी चार ते सहा महिने दररोज मला उठण्यासाठी मदत घ्यावी लागत असे अश्या परिस्थितीत पुन्हा गोल्फ खेळू शकेन असा विचारही माझ्या मनात येत नसे.मला फक्त हाच विचार सतावत असे कि, मी या वेदनापासून दूर कसा जाऊ शकतो? मी पुन्हा आयुष्य कसे जगू? 2017 -पाठीच्या अजून एका शस्त्रक्रियेनंतर,गोळ्यांच्या अतिसेवनामुळे त्याला DUI अंतर्गत अटक करण्यात आली. 2018 - दुखापतीनंतर चार वर्षांनी टायगर मैदानात उतरला,त्याच्या शून्यातून पुन्हा उभे राहण्याच्या जिद्दीला पाहून त्याच्या सोबतचे खेळाडू त्याला चालतां बोलता चमत्कार "Walking Miracle.” म्हणू लागले. 201 9 - आज 14 वर्षांनंतर आणि गेममध्ये परतल्यानंतर , टायगरने 5 व्यांदा मास्टर्स पदक जिंकले. हे त्याचे 81 वे पीजीए टूर विजेतेपद आहे. आज जिंकल्यानंतर टायगर म्हणाला की माझ्या आयुष्याचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. १९९७ साली मी जिंकलो तेव्हा माझे वडील माझ्या सोबत इथे हजर होते आणि आज मी वडील आहे व माझी मुले माझा विजय पाहत आहेत. मला खात्री आहे, माझा कठीण काळ पाहिल्यानंतरचा आजचा दिवस माझ्या मुलांना सतत प्रेरणा देत राहील. टायगर वूड्सच्या आयुष्यात आलेल्या अनेक कठीण प्रसंगावर त्याच्या जिद्दीने त्यावर मात करत तो या यशापर्यंत पोहोचलाय.यातून काही गोष्टी नक्कीच विचार करण्यासारख्या आहेत, त्या म्हणजे… > आयुष्यात येणाऱ्या प्रतिकूल गोष्टीमध्ये तुम्ही किती काळ टिकून राहू शकता ? >अपयशानंतर पुन्हा उभं राहण्यासाठी किती तयारी कराल? > यशस्वी होण्यासाठी तुम्ही किती प्रयन्त कराल? मित्रांनो, संकटांना कंटाळून, शारीरिक व्याधींना त्रासून, गतवैभव नष्ट झाल्यामुळे किंवा निराशेने आपण जर कधी माघार घेण्याचा विचार करत असाल तर टायगर वूड्स च्या प्रेरणादायी विजयाची आणि संघर्षाची ही कहाणी जरूर आठवा ! ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com जानेवारी महीन्याच्या एका सकाळी वॉशिंग्टनमधील मेट्रो रेलवे स्टेशन वर एक माणुस येउन बसला आणि त्याने व्हायोलीन वाजवायला सुरुवात केली. त्याने सुमारे ४५ मिनिटे सुमधुर संगीताच्या सहा फैरी वाजवल्या. सकाळ असल्याने कामावर जाणार्या हजारो माणसांची लगबग त्यावेळी स्टेशनवर होती.
काही मिनिटे झाली आणि एका वॄद्ध गृहस्थाचे त्या वादकाकडे लक्ष गेले. आपला वेग थोडासा मंदावुन ते तेथे काही क्षण थांबले आणि पुन्हा लगबगीने आपल्या मार्गाला लागले. त्यानंतर काही मिनिटांतच त्या वादकाची पहीली कमाई झाली. एका महीलेने एक डॉलर त्याच्या दीशेने भिरकावला आणि न थांबताच ती तेथुन निघुन गेली. आणखी काही मिनिटांनंतर एक माणुस ते गाणे ऐकण्यासाठी थांबला, पण घड्याळाकडे लक्ष जाताच घाईघाईने पुन्हा चालु लागला. त्याला बहुदा ऑफीसमध्ये जायला उशीर झाला होता. ================ नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ मात्र एका ३ वर्षाच्या मुलाचे त्याच्याकडे लक्ष गेले आणि तो तेथेच उभा राहुन अगदी मनापासुन त्या वादकाकडे आणि वादनाकडे लक्षपुर्वक पाहु लागला. तो मुलगा त्याच्या आईबरोबर होता आणि त्याची आई त्याला पुढे जाण्यासाठी ओढतच नेत होती. तेथुन जाणार्या प्रत्येक मुलासोबत असेच होत होते. प्रत्येक मुल ते गाणे ऐकायला थांबु पाहत होते आणि प्रत्येक पालक त्यांना ओढुन नेत होते. ४५ मिनिटांच्या वादनात फक्त ६ जणांना ते गाणे ऐकण्यासाठी क्षणभर का होईना थांबावेसे वाटले. जवळपास २० लोकांनी त्या वादकाला पैसे दीले मात्र तेही न थांबता तेथुन निघुन गेले. त्या वादकाने ३२ डॉलर्सची कमाई केली. पण जेव्हा त्याने वादन थांबवले तेव्हा संगीत बंद झाल्याचे कोणाच्या लक्षात देखील आले नाही. कोणी टाळ्या वाजवल्या नाहीत की त्याला शाबासकी दीली नाही. कोणालाही हे कळले नाही की तो वादक दुसरा तीसरा कोणीही नसुन जगातील सर्वोत्कॄष्ट व्हायोलीन वादक जोशुआ बेल हा होता. आणि त्याने वाजवलेली तान हे सुमारे ३.५ दशलक्ष डॉलर्स इतक्या कीमतीचे व्हायोलीनवर बनलेले जगातील सर्वोत्कॄष्ट संगीत होते. स्टेशनवर व्हायोलीन वाजवण्याच्या दोनच दिवस आधी बॉस्टनमधील एका सभागॄहात झालेल्या त्याच्या कार्यक्रमाची तीकीटे अगदी १०० डॉलर प्रतीव्यक्ती इतक्या जास्त किमतीला गेली होती. ही एक सत्य घटना आहे. खरेतर विविध गोष्टींचा आस्वाद घेण्याच्या लोकांच्या पद्धतीवर आणि प्राधान्यांवर प्रकाश टाकण्यासाठी केलेला हा एक प्रयोग होता. या प्रायोगाचा मुख्य हेतु खालील काही प्रश्नांचा उलगडा करणे हा होता. - एखाद्या सार्वजनीक ठीकाणी आणि अयोग्य वेळी आपण सौंदर्याचा, कलेचा आस्वाद घेतो का? - तो घेण्यासाठी आपण थांबतो का? - अगदी वेगळ्याच मार्गाने नकळत समोर आलेल्या कलाकौशल्याला आपण तीतक्याच रसीकतेने वाखाणतो का? या प्रयोगाचा एक निश्कर्ष असा देखील काढता येइल की - जर जगातील सर्वोत्कृष्ट वादकाचे सर्वोत्कृष्ट संगीत ऐकण्यासाठी एक क्षण थांबण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो , तर मग विचार करा दररोज अशा कितीतरी गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आहे? बघा विचार करा आणि आपली उत्तरे आपणच शोधण्याचा प्रयत्न करा. ================ नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com
|