• Home
  • Online Courses
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • Blog
  • consulting
  • Webinars
  • Connect
  • Greatbhet
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • Blog
  • consulting
  • Webinars
  • Connect
  • Greatbhet

Blogs, Thoughts & Updates

संधी शोधल्यावर तिचे व्यवसायात रुपांतर करण्याच्या ५ पायऱ्या !

11/8/2018

Comments

 
नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत कि, उद्योजक संधी कशी शोधतात आणि त्यानंतर त्या संधीवर काम कसे करतात. खरंतर एखादा बिझनेस लाँच करण्याची एक प्रोसेस असते. आणि त्या काय स्टेप्स किंवा कोणती प्रोसेस आहे ती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण जास्त सविस्तर शिकणार नाही. पुढील व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत.  आज आपण फक्त बिझनेस लाँच करण्यासाठी काय स्टेप्स असतात ते पाहणार आहोत.  प्रॉडक्टची आयडिया आल्यापासून ते लाँच होईपर्यंत उद्योजकांनी कोणत्या स्टेप्स घेतल्या पाहिजेत हे शिकणार आहोत. 

१. संधी शोधा. (Identifying   the Oppotunity )

संधी नक्की कुठे दडलेली आहे. हे जेव्हा एखाद्या उद्योजकाला कळतं की, या गोष्टींमध्ये मी व्यवसाय करू शकतो. इथे व्हॅल्यू एडिशन आहे किंवा मार्केटमध्ये गॅप आहे जी कोणतीही कंपनी देत नाही. तेव्हा असं उत्पादन करून मी एक गरज भागवू शकतो किंवा ती सर्विस आपण देऊ शकतो किंवा लोकांची गरज भागवू शकतो आणि आपला बिझनेस सुरु शकतो.  अशाप्रकारची संधी जेव्हा उद्योजकाला समजते तेव्हा तो त्या संधीवर काम करायला सुरु करतो. तर सगळ्यात पहिली म्हणजे संधी शोधणे. 
एखादी संधी शोधल्यानंतर आपण लगेच ते प्रॉडक्ट किंवा आयडिया लाँच करत नाही. बरेच उद्योजक हि चूक करतात. परंतु ती चूक अक्षम्य आहे. ती चूक पुन्हा सुधारता येत नाही. त्यामुळे कधीही एखादी संधी मिळाल्यानंतर पुढची स्टेप जी आपल्याला करायची असते ती म्हणजे मार्केट रिसर्च. 

मार्केट रिसर्च :
मार्केट रिसर्च हि एक मेंटल ऍक्टिव्हिटी आहे. आणि त्यासाठी आपल्याला रिसर्च करायचं असतं. गूगल, इंटरनेट किंवा प्रत्यक्ष मार्केटमध्ये रिसर्च करा. ग्राहकांना जाऊन भेटा. तुमच्या प्रतिस्पर्धीना जाऊन भेटा. त्या संधी बद्दल जेवढी माहिती गोळा करता येईल तेवढी करा. 
​
त्या माहितीमध्ये आपण जी संधी शोधली आहे ती खरी आहे का ? की फक्त आपल्यालाच  असं वाटतंय की हा प्रॉब्लेम खरा आहे. आणि त्याच निरसन करून आपण पैसे कमवू शकतॊ किंवा आपला बिझनेस करू शकतो. तो खरंच एक प्रॉब्लेम आहे का ?  तो प्रॉब्लेम कोणी सोडवला आहे का ? त्याचा कोणाला फायदा होणार आहे का ? इतरांना देखील त्याची गरज वाटते का?  किंवा त्यासाठी दुसरा पर्याय उपलब्ध आहे का ? अशाप्रकारची रिसर्च आपण केली पाहिजे. 

दुसरी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे या संधीला भविष्यात काही पोटेन्शिअल आहे का? किंवा कदाचित तुम्ही निवडलेली संधी हि तात्पुरती असेल आणि त्या नंतर भविष्यात त्यासाठी नवीन काहीतरी पर्याय येईल किंवा लोकांच्या गरजा बदलतील. म्हणून हे असं होऊ नये म्हणून मार्केटच भविष्यातील पोटेन्शिअल किती आहे या सगळ्या गोष्टींचं नीट रिसर्च करणं खूप गरजेचं आहे. 

त्यासाठी प्रायमरी आणि सेकंडरी रिसर्च करणं गरजेचं आहे. प्रायमरी रिसर्च म्हणजे इंटरनेट किंवा गूगल किंवा इतर साईट्स वर जे रिसर्च करणार आहात किंवा रिपोर्ट्स वाचून जो करणार आहात तो. आणि प्रत्यक्ष मार्केट मध्ये जाऊन किंवा ग्राहकांशी संपर्क साधून जो रिसर्च करणार आहात तो सेकंडरी रिसर्च. अन अतिशय महत्वाची स्टेप आहे जी करणं गरजेचं आहे. 

एकदा तुमचं मार्केट रिसर्च झालं आणि त्यानंतर तुम्हाला समजलं की, हा प्रॉडक्ट, बिझनेस किंवा सर्विस आपण मार्केटमध्ये आणू शकतो. यात आपण बिझनेस करू शकतो. तर त्यानंतर जी स्टेप असते ती कन्सेप्ट टेस्टिंग. 

कन्सेप्ट टेस्टिंग :
आतापर्यंत आपण मार्केट रिसर्चमध्ये मिळालेली माहिती आणि आपल्या मनात असलेलं उत्पादन यांचं मेळ घालून एक प्रोटोटाईप उत्पादन किंवा बेसिक सर्विस बनवतो. अगदी तुमची सर्व्हिस खरी नसली ती सध्या कागदावर बनवलेली असली तरी चालेल. याला म्हणतात कन्सेप्ट टेस्टिंग. प्रॉडक्ट लोकांना वापरायला द्या. लोकांशी संपर्क साधा. एक युझर म्हणून तुम्हाला आता ग्राहक शोधायचे आहेत. ते तुम्हाला पैसे देणार नाहीत परंतु तुमचा माल, उत्पादन किंवा तुमची सर्विस वापरून बघतील. जेव्हा ते प्रॉडक्ट किंवा सर्विस वापरली जाते किंवा टेस्ट केली जाते तेव्हा तुम्हाला तुमच्या प्रॉडक्ट बद्दल बरीचशी माहिती मिळते. त्यामध्ये काय चुकतंय ते कळतं. आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या फायनल प्रॉडक्ट कडे जाऊ शकता. तर कन्सेप्ट टेस्टिंग यशस्वी झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप असते प्लॅनिंग.

प्लॅनिंग :
प्लॅनिंग मध्ये महत्वाचं असतं की आपण यातून पैसे कसे कमवायचे. आपलं बिझनेस मॉडेल काय असणार आहे. आपण कशाप्रकारे ग्राहकांना चार्जे करणार आहोत. आपण ही सर्विस किंवा प्रॉडक्ट कशाप्रकारे डिलिव्हरी करणार आहोत. तुम्ही रिटेल शॉप चालू करणार आहात की एखाद्या मॉलमध्ये तुमचं दुकान सुरु करणार आहात. तुम्ही ऑनलाईन इ- कॉमर्स मध्ये जाणार आहात, किंवा तुम्ही सब्स्क्रिप्शनवर प्रॉडक्ट देणार आहात. किंवा जाहिरातींमधून पैसे कमावणार आहात. कशाप्रकारे तुम्ही पैसे कमवणार आहात. कोणते ग्राहक तुम्हाला पैसे देतील, किती पैसे देतील, तुमची ऑर्डर साईझ किती असणार आहे. या प्रकारचा जो अभ्यास असतो तो प्लॅनिंग मध्ये येतो. 
पुढील काही व्हिडीओमध्ये आपण बिझनेस मॉडेल बद्दल बोलणार आहोत. मी इथे सविस्तरमध्ये सांगत नाही. 
प्लॅनिंग मध्ये आणखी एक गोष्ट येते आणि ती म्हणजे रिसोर्सेस. आपल्या बिझनेससाठी लागणारा जो काही पैसा आहे तो तुम्ही कुठून मिळवणार आहात. जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती तुम्ही कुठून मिळणार आहात हे देखील आपल्याला या प्लॅनिंग मध्ये ठरवायचं आहे. आपण स्वतः पैसे टाकणार आहोत की पार्टनर आणणार आहोत की इन्व्हेस्टर शोधणार आहोत, या सगळ्या गोष्टी आपल्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये असल्या पाहिजेत. 

आणखी दोन महत्वाचे रिसोर्सेस आपण लक्षात घेतले पाहिजेत आणि पाहिलं म्हणजे तुमची स्किल इन्व्हेंटरी. तुमचा बिझनेस बनवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी तुम्हाला काय स्किल्स असल्या पाहिजेत किंवा तुमच्याकडे आहेत का? जर ते स्किल तुमच्याकडे नसेल तर त्यासाठी तुम्हाला काही माणसं कमला ठेवावी लागतील. कदाचित तुम्हाला त्यांना को-फाऊंडर म्हणून घ्यावं लागेल. किंवा त्यांना कर्मचारी म्हणून घ्यावं लागेल. आणखी एक रिसोर्स आपण बघितला पाहिजे आणि तो म्हणजे सोशल कॅपिटल. सोशल कॅपिटल म्हणजे या बिझनेसशी निगडित आपले कोणते कोणते कॉन्टॅक्टस आहेत. बिझनेस सर्कल मधील कोणत्या कोणत्या मोठ्या लोकांना आपण ओळखतो. आणि ते आपल्याला कोणत्या प्रकारे मदत करू शकतील. ते आपल्याला योग्य लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकतात का? या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत. 
तर मित्रांनो पहिल्या फेज मध्ये संधी शोधली गेली आहे, दुसऱ्या फेजमध्ये आपण मार्केट रिसर्च केलं, तिसऱ्या फेजमध्ये कन्सेप्ट टेस्ट केलं, आणि चौथ्या फेजमध्ये प्लॅनिंग केली. आणि आता पाचव्या फेज मध्ये तुम्ही प्रॉडक्ट लाँच करण्यासाठी तयार आहात. 

लाँच :
तर आता लाँच कसं आणि कधी करायचं आणि तसेच बिझनेस मॉडेल कसे ओळखायचे ये देखील आपण पुढील भागात पाहणार आहोत. तोपर्यंत ऑल द बेस्ट ! धन्यवाद !!
Comments
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet Elearning Solutions
Workloft,
61 Der Deutsche Park,
next to Nahur railway station,
​Nahur west

contact - admin@netbhet.com
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • Blog
  • consulting
  • Webinars
  • Connect
  • Greatbhet