• Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect

Blogs, Thoughts & Updates

लघु उद्योगाचं मोठ्या उद्योगात रुपांतर करण्यासाठी 10 महत्वाच्या ब्रँडिंग टिप्स -  Branding Tips in Marathi

12/14/2018

Comments

 
Picture
तुम्हाला जर आपल्या लघु उद्योगाला मोठ्या उद्योगामध्ये रूपांतरित करायचं असेल तर त्यासाठी आपला ब्रँड उभा करणं आवश्यक आहे. ब्रँडिंग म्हटलं की त्यासाठी खूप गुंतवणूक लागेल, पैसा लागेल, एक्सपर्ट ची मदत लागेल असं वाटतं. काही अंशी ते खरं देखील आहे. परंतु आपल्या सुदैवाने आपण सध्या अशा काळामध्ये जगत आहोत जिथे तंत्रज्ञानामुळे अगदी जगभरातल्या कोणत्याही व्यक्तीपर्यंत सहज पोहोचता येऊ शकतं, आपला ब्रँड तिथपर्यंत घेऊन जाता येऊ शकतो.
आज या लेखामध्ये मी अशाच काही अत्यंत कमी खर्चाच्या ब्रँडिंग टिप्स माझ्या उद्योजक मित्रांना देणार आहे. मला खात्री आहे या सोप्या आणि जलद ब्रँडिंग टिप्स तुमचा लघुउद्योग मोठा करण्यासाठी नक्कीच मदत करतील.

लघु उद्योगांसाठी ब्रँडिंग म्हणजे जास्तीत जास्त ग्राहकांच्या मनात आपल्या बिझनेस बद्दल/ किंवा आपल्या उत्पादनाबद्दल सकारात्मक भावना निर्माण करणे. त्यासाठी सध्या ग्राहक आपल्या उत्पादनाबद्दल किंवा सेवेबद्दल कसा विचार करत आहेत त्याचा आढावा घेतला पाहिजे.

त्यासाठी खालील काही प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा -
  • तुमच्या व्यवसायाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?
  • तुमची उत्पादने किंवा सेवा ग्राहकांना नेमके कोणते फायदे देतात?
  • ज्यांना तुमच्या व्यवसाय बद्दल बिलकुल माहिती नाही अशा भावी ग्राहकांना जेव्हा तुमच्याबद्दल पहिल्यांदा कळतं तेव्हा त्यांच्या मनात नेमकी कशी प्रतिमा तयार होते?
  • ज्यांनी तुमच्याशी व्यवहार केला आहे अशा ग्राहकांच्या मनात तुमच्याबद्दल कोणती प्रतिमा तयार झाली आहे?
  • तुमच्या व्यवसायाबद्दल जेवढी गुणवैशिष्ट्ये तुम्हाला वाटतात त्यांची यादी बनवा 
==================
नेटभेटचे नवीन अपडेट्स, लेख आणि कोर्सबद्दल माहिती whatsapp वर मिळविण्यासाठी आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा .
==================
1. ग्राहकांचा अभ्यास करा -
ग्राहकांच्या गरजा, त्यांचे नेमके प्रश्न काय आहेत त्याचा अभ्यास करा. ग्राहक काय विचार करतात? आणि त्यांना नेमका आपल्या व्यवसायातील कोणता पॉईंट आवडतो किंवा आवडत नाही त्याचा देखील अभ्यास करा. आणि त्यानुसार आपल्या बिझनेसची गुणवैशिष्ट्ये ठरवून त्याबद्दल जास्तीत जास्त लोकांशी बोलायला सुरुवात करा. हीच गुणवैशिष्ट्ये पुढे तुमच्या ब्रँड व्हॅल्यू (Brand Values) मध्ये रुपांतरीत होतील.
एकदा तुमच्या बिझनेसची आणि विशिष्ट गुणवैशिष्ट्यांची व्याख्या तयार केलीत की त्यानंतर जगापुढे ती मांडण्यासाठी खालील पर्यायांचा वापर करा -

2. आपला लोगो बनवा -
आपल्या व्यवसायासाठी लोकांच्या लक्षात राहील असा सोपा लोगो तयार करा. लोगो तयार करताना नक्की काय काळजी घ्यावी आणि कमीत कमी किमतीत चांगला लोगो कसा तयार करावा याबद्दलची सविस्तर माहिती मी यापूर्वीच एका युट्यूब व्हिडिओ मध्ये दिली होती. https://www.youtube.com/watch?v=afQXkwnO01c या लिंक वर क्लिक करून तो व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल.
लोगो बनवल्यानंतर तो आपल्या विजिटिंग कार्ड वर, वेबसाईटवर, लेटर हेडवर, सोशल मीडियावर सगळ्या ठिकाणी सारखा दिसेल आणि प्रथम पाहिला जाईल अशाप्रकारे दाखवा.

3. बिझनेस ची टॅगलाईन बनवा -
एक छोटीशी, सोपी आणि आपल्या बिझनेसचे उद्दिष्ट चांगल्या प्रकारे मांडू शकेल अशी टॅगलाईन तयार करा. तुमच्या ब्रँडची संकल्पना टॅग लाईन मध्ये अचूक पकडली जाईल याकडे लक्ष द्या.

4. आपली ब्रांड पीच तयार करा -
केवळ 60 सेकंदांमध्ये आपले उत्पादन किंवा सेवा स्पर्धकांपेक्षा चांगल्या आणि वेगळ्या का आहेत हे समजावून सांगता आलं पाहिजे. त्याला पीच (Pitch) असं म्हणतात. आपल्या बिझनेस साठी पीच तयार करा आणि केवळ 60 सेकंदात ते प्रभावीपणे मांडता येईल यासाठी प्रॅक्टीस करा.

==================
नेटभेटचे नवीन अपडेट्स, लेख आणि कोर्सबद्दल माहिती whatsapp वर मिळविण्यासाठी आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा .
==================

5. जास्तीत जास्त संभाव्य ग्राहकांशी कनेक्ट करा -
लक्षात ठेवा प्रत्येक अनोळखी माणूस हा आपला संभाव्य ग्राहक असू शकतो. तुम्ही आपल्या ब्रँड बद्दल आणि उद्त्पादनाबद्दल लिहा, बोला, भाषण द्या, शिकवा, सादरीकरण करा.... या कोणत्याही मार्गाने जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला लोगो, टॅगलाईन, आणि आपल्या बिझनेस चे उद्दिष्ट पोहोचवा.
त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करा. जास्तीत जास्त लोक जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरत आहेत त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा आपल्या ब्रँड बद्दल "आवाज" करण्यासाठी वापर करा. त्यासोबत जुने प्रभावी उपाय देखील वापरा जसे की नेटवर्किंग, रेफरल इत्यादी.

6. ब्लॉग आणि कन्टेन्ट मार्केटिंग चा भरपूर वापर करा -
जास्तीत जास्त ग्राहक व्यवसायाबद्दल किंवा उत्पादनाबद्दल त्यांचे प्रश्न गुगलमध्ये शोधत आहेत. उदाहरणार्थ हे प्रॉडक्ट कसं निवडावं ? कसं खरेदी करावं? खरेदी करताना काय काळजी घ्यावी? वापरताना काय काळजी घ्यावी? सर्व स्पर्धकांच्या उत्पादनांमध्ये तुलना कशी करावी? कमीत कमी किमतीत उत्पादन कुठे मिळेल? उत्पादन विकत घेण्याचा खर्च आणि उत्पादन वापरण्याचा खर्च नेमका किती येतो? माझ्या गरजांसाठी योग्य उत्पादन कोणतं? अशा हजारो प्रश्नांबद्दल लोक गुगल मध्ये सर्च करत असतात.
अशा जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही देऊ शकलात तर गुगल त्या संभाव्य ग्राहकांना तुमच्या वेबसाईट किंवा ब्लॉग पर्यंत घेऊन येऊ शकते.
( नेटभेटच्या सोशल मीडिया मार्केटिंग या कोर्समध्ये ब्लोगिंग आणि कन्टेन्ट मार्केटिंग कसं करावं ? हे आम्ही सोप्या मराठीतून शिकवत असतो, त्याबद्दल अधिक माहितीसाठी netbhet.com या वेबसाईटला भेट द्या किंवा 908 220 5254 या क्रमांकावर व्हाट्सअप करा)

7. ग्राहकांच्या संपर्कात राहा -
ज्या ग्राहकांनी यापूर्वी आपले उत्पादन किंवा सेवा घेतली आहे त्यांच्या सतत संपर्कात राहा. त्यासाठी व्हाट्सअप ग्रुप, ब्रॉडकास्ट लिस्ट, फेसबूक ग्रुप, ई-मेल मार्केटिंग अशा साधनांचा वापर करा. तुमच्या ब्रँड ची संकल्पना ग्राहकांच्या मनात रुजेल अशा प्रकारचं कम्युनिकेशन ग्राहकांसोबत करत रहा. जर संपर्कात राहिलात तरच लक्षात राहणार आणि जर लक्षात राहिलात तरच भविष्यातील खरेदीसाठी तुमचा विचार केला जाईल हे ध्यानात घ्या !

8. सर्व ठिकाणी सुसंगत रहा -
लोगो, आणि टॅगलाईन , रंगसंगती, डिझाईन्स, फॉन्ट, फॉन्ट आकार, बॅकग्राऊंड आणि सर्व मार्केटिंग मटेरियल प्रत्येक ठिकाणी एक सारखं दिसलं पाहिजे. सुसंगतता (Consistency and standardazation) हा चांगल्या ब्रँडिंगचा आत्मा आहे.

9. व्यावसायिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा-
व्यावसायिक कार्यक्रम (Business Events ), सेमिनार, कॉन्फरन्सेस आणि प्रॉडक्ट लॉन्च इव्हेंटस मध्ये सहभागी व्हा. अशा ठिकाणी बोललं गेलेलं एक वाक्य देखील शेकडो लोकांपर्यंत आपला ब्रँड पोहोचवू शकत. उदाहणार्थ एखाद्या सभेमध्ये समजा तुम्ही प्रेक्षकांमध्ये बसला आहात तिथे जेव्हा स्टेज वरील व्यक्तींना प्रश्न विचारण्याची संधी मिळते तेव्हा अवश्य प्रश्न विचारा. प्रश्न विचारण्यापूर्वी सुरुवातीला आपल्याबद्दल, आणि आपल्या बिझनेस बद्दल माहिती करून द्या. ऐकणाऱ्या इतर शेकडो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक चांगली युक्ती आहे.

10. दिलेला शब्द पाळा -
ब्रँडिंग म्हणजे ग्राहकांचा आपल्यावरील विश्वास. तुम्ही जे काही वचन आपल्या उत्पादनांमधून किंवा सेवेमधून ग्राहकांना देत आहात ते पुरेपूर पाळलं जाईल याची काळजी घ्या. ग्राहकांच्या मनात काही अपेक्षा असतात. त्या अपेक्षांमध्ये एक टक्का जरी तुम्ही कमी पडलात तरी ग्राहक पुन्हा आपल्याकडे येणार नाही हे लक्षात घ्या. जर ग्राहकाचा मोठा अपेक्षाभंग झाला तर तो आणखीन काही "शे" लोकांना आपल्यापर्यंत येण्यापासून थांबवू शकतो. म्हणून कधीही अवास्तव वचन ग्राहकाला देऊ नका जे तुम्हाला कधीच पूर्ण करता येणार नाही. आणि जे वचन दिले आहे ते काही करून पूर्ण कराच. ग्राहकांना आपल्या बरोबर अपेक्षेपेक्षा चांगला अनुभव आला तर तो इतरांना आपल्या बद्दल सांगू लागेल.

मित्रानो, मार्केटिंग आणि बिझनेस या विषयांवरील , नेटभेटचे मराठी भाषेतून शिकविलेले विविध ऑनलाईन कोर्सेस आणि आणि कार्यशाळा तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी खूप उपयोगी ठरतील. www.netbhet.com या वेबसाईटवर सर्व कोर्सेसची माहिती जरूर पहा.
==================
नेटभेटचे नवीन अपडेट्स, लेख आणि कोर्सबद्दल माहिती whatsapp वर मिळविण्यासाठी आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा .
==================
​

यशस्वी भव !
धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
Comments
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet E-learning Solutions LLP
602, Shivdarshan CHS, Sector 20D, Airoli, Navi Mumbai
​400708, Maharashtra, India

contact - [email protected]
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect