• Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect

Blogs, Thoughts & Updates

क्रिकेटच्या खेळातून शिका गुंतवणुकीचे दहा महत्त्वाचे धडे

5/11/2019

Comments

 
Picture
आय पी एल फिवर सध्या अंतिम टप्प्यात पोहोचलाय.फायनल मॅच पण जवळ आलीय.त्यातच वल्डकप सामने पण जवळ येत आहेत.आज या जंटलमन गेमचा संबंध आपल्या आयुष्यातल्या पैशासंबधित गोष्टींशी कसा जवळचा आहे हे पाहू.तुम्हाला आश्चर्य वाटेल असे नियम आणि वैशिष्ट्ये या खेळामध्ये आहेत जी आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या आर्थिक नियोजन व्यवस्थेशी मिळतीजुळती आहेत.तसेच हे नियम आपली आर्थिक गणिते सोडवण्यासाठीहि वापरली जाऊ शकतात. 

1. संरक्षक सामग्रीशीवाय फील्डमध्ये पाऊल टाकू नका
खेळाडूसाठी मैदानात येण्यापूर्वी जसे हेल्मेट, knee पॅड अशा गोष्टी आवश्यक असतात अन्यथा खेळाडूंना दुखापत होऊ शकते तसेच जर आपल्या आर्थिक नियोजनात संरक्षणाचा घटक नसेल तर आपल्याला बऱ्याच जोखमींना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते.

टीप: गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी, वित्त, जीवन आणि आरोग्याच्या जोखीमांपासून स्वतःस सुरक्षित करा. संकट समयी आवश्यक इतकी रोख रक्कम, आरोग्य विमा,जीवनविमा यासारख्या गोष्टींची तरतूद सर्वात आधी करा.

2. लांबच्या पल्ल्याचा विचार करुनच प्रत्येक कृती करा
कधी कधी अति उत्साहात तर कधी दबावाखाली खेळणे हे नेहमी बऱ्याच फलंदाजांना महागात पडू शकते. गुंतवणूकदारांचे देखील सारखेच आहे, जे लवकर पैसे कमविण्याच्या नादात किंवा अति काळजीपोटी घाबरल्यामुळे नुकसान सहन करतात आणि निराश होऊन मार्केटमधून बाहेर पडतात.

टीप: सुरुवातीच्या टप्प्यांत संयम आणि धैर्य असणे आवश्यक आहे. इक्विटी गुंतवणूकदारांनी दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करावी.

3. एका प्लेअरवर अवलंबून न राहणे

एक स्टार खेळाडू कदाचित काही चांगल्या कामगिरीसह चर्चेचा विषय असू शकेल, परंतु दीर्घकाळासाठी एका खेळाडूवर अवलंबून राहणे हे शहाणपणाचे ठरणार नाही. गुंतवणूकदारांनी फक्त नावाजलेल्या हमखास नफा देणाऱ्या कंपन्यांवर विसंबून राहू नये.

टीप: तज्ञ एकाच क्षेत्रावर अवलंबून न राहण्याचा सल्ला देतात. आपली गुंतवणुक विविध क्षेत्रात आणि विविध प्रकारांत विखुरलेली (Balanced Portfolio) असेल तर मार्केटमधील बदलांचा फारसा फरक पडणार नाही.

4.चांगला संवाद साधणे अत्यंत महत्त्वाचे
जसे क्रिकेट मध्ये खेळाडूंचा एकमेकांशी योग्य रीतीने संवाद साधला नाही तर फलंदाजी करणाऱ्या भागीदारांकडून खराब कॉलमुळे आऊट होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते तसेच गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणूकीची,आर्थिक नियोजनाची आणि विमा याबद्दल कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधने गरजेचे आहे.

टीप: आपल्या कुटुंबातील सदस्यांना, विशेषतः आपल्या जोडीदाराला, गुंतवणूकीबद्दल आणि विमाबद्दल माहिती द्या. जे नॉमिनी आहेत त्यांना काय करायचे आहे ते नीट समजावून द्या. यामुळे आपण भविष्यात उपलब्ध नसतानाही कुटुंबाला आपल्या गुंतवणुकींचा फायदा मिळेल. .

5. धावफलकाकडे सतत लक्ष देणे
स्लॉग ओव्हर्सलाच मोठी खेळी करणे ही विचारसरणी चुकीची आहे.सुरुवातीपासूनच रन्स बनवणे आणि योग्य वेळेपासून गुंतवणूकीचा प्रारंभ करणे केव्हाही चांगले.

टीप: उशीरा प्रारंभ म्हणजे समान उद्दिष्ट मिळवण्यासाठी बरीच गुंतवणूक करणे. करिअरच्या सुरूवातीपासूनची बचत मुलांचे उच्च शिक्षण,सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य यासाठी उपयोगी पडू शकते. पहिला पगार/उत्पन्न सुरु झाल्यापासून लगेचच योग्य गुंतवणुक सुरु करा.
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
6. खेळाच्या नियमांचे योग्य रीतीने पालन करणे
गैरवर्तन किंवा आक्षेपार्ह वर्तन यामुळे होणारे निलंबन हे टीमसाठी अडचणीचे ठरू शकते तसेच गुंतवणूकदाराचे अयोग्य वर्तन, अनाठायी खर्च यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते.

टीप: खराब क्रेडिट स्कोअर टाळण्यासाठी आपले क्रेडिट कार्ड बिले आणि कर्जाचे हप्ते नियमितपणे भरा. दंड टाळण्यासाठी वेळेवर कर परतावा करावे.

7.गुगली बॉल काळजीपूर्वक खेळणे
बॅट्समन जेव्हा गुगली बॉल समजण्यास अपयशी ठरतात तेव्हा विकेट गमावतात. त्याचप्रकारे, एजंट्सकडून गुंतवणुकीचे सल्ले,टिप्स मिळवणे हे दिशाभूल करणारे असू शकते आणि यामुळे खराब गुंतवणूकचे पर्याय निवडले जाऊ शकतात.

टीप: चतुर विक्रेते आपल्याला वाईट गुंतवणूक पर्याय निवडण्यासाठी गोड बोलून भाग पाडू शकतात. आर्थिक उत्पादनाच्या अंतर्गत दराची ( IRR - Internal Rate of Return) विचारणा करणे ही चुकीची गुंतवणूक टाळण्याचा एक चांगला मार्ग आहे.

8.आपली खेळी सावधपणे आणि सातत्य राखून खेळणे
नियमितपणे एकेरी आणि दोन धावा घेत राहणे,मध्येच चौकार अशा पद्धतीची खेळी एक छानशी धावसंख्या उभी करण्यात मदत करतात त्याचप्रमाणे,म्युचलफंड्स मध्ये लहान पण पद्धतशीरपणे आणि नियमित गुंतवणूक (SIP)हे अत्यंत देखील फायद्याचे ठरू शकते.

टीप: अल्प प्रमाणातील पण नियोजनबद्ध गुंतवणुकीसाठी प्रारंभ करू शकता आणि पुढे परिस्थिती हातात आली कि आपली गुंतवणूक वाढवू शकता. ..

9. अति सावधगिरी बाळगणे
सावधगिरी म्हणून फक्त एकरी धावेवरच अवलंबून राहणे हे धोरण चांगली गुणसंख्या निर्माण करण्यास मदत करणार नाही. त्याचप्रमाणे, फक्त व्याजदराने सुरक्षित उत्पादनांमध्ये गुंतवणूक करणे ही आपली आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यास मदत करत नाही.

टीप:गुंतवणूकीचा योग्य रिटर्न मिळविण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे इक्विटीमध्ये गुंतवणूक करणे. इक्विटीपासून (शेअर्स, म्युट्युअल फंड्स इत्यादी) दूर जाऊ नका, विशेषत: जर आपण मुलांच्या शिक्षणासाठी, सेवानिवृत्ती इ. सारख्या दीर्घकालीन गोष्टी पूर्ण करण्यासाठी नियोजन करत असाल.

१0. असंतुलित संघामुळे होणारे नुकसान

खराब संघाची रचना संघाच्या एकत्रित कामगिरीवर परिणाम करू शकते किंवा हानी पोहोचवू शकते तशाच प्रकारे अनियमित मालमत्ता वाटप आपल्या पोर्टफोलिओवर परिणाम करू शकते.

टीप: अधिकाधिक परतावा मिळण्याच्या आशेमुळे फक्त इक्विटीमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करणे किंवा 'सुरक्षित' खेळणे आणि फक्त व्याजावर आधारित गुंतवणूक करणे यापेक्षा आपल्या वयाचा विचार करून,जोखीम घेण्याची मानसिक तयारी आणि आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचे योग्य नियोजन आपल्याला नेहमीच विजय मिळवून देऊ शकतात.   
​================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
 धन्यवाद,

टीम नेटभेट 
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
Netbhet.com
Comments
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet E-learning Solutions LLP
602, Shivdarshan CHS, Sector 20D, Airoli, Navi Mumbai
​400708, Maharashtra, India

contact - [email protected]
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect