नमस्कार मित्रांनो, गेल्या काही लेखांमधून आपण फेसबुकच्या बिझिनेस पेज, एम्बेड सुविधा, कव्हर फोटो बद्दल माहिती घेतलीत. आज आपण अशाच एका उपयुक्त सुविधेबाबत माहिती पाहुयात. फेसबुक इव्हेंट्स म्हणजेच आपले कार्यक्रम. फेसबुक इव्हेंट्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचे कार्यक्रम तुम्ही तुमच्या मित्रपरिवारातील सदस्यांपर्यंत अगदी सहज पोहोचवू शकता.आपल्याकडे लग्नसोहळे, वाढदिवस, बारसे यांसारख्या कार्यक्रमांबरोबरच पुस्तक प्रकाशन सोहळे, सत्कार समारंभ, व्याख्याने, चर्चासत्रे, नाटकाचे प्रयोग यांसारखे कार्यक्रमही होत असतात. तुम्हाला फेसबुकवर अशा प्रकारच्या कार्यक्रमांसाठी निमंत्रणे निश्चितच येत असतील, फेसबुकच्या इव्हेंट्स सुविधा वापरून आपल्याला ही निमंत्रणे पाठवली जातात. या सुविधेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही अर्ध्या तासाच्या आत कोणत्याही आयोजित कार्यक्रमाबद्दल “इव्हेंट पेज” तयार करू शकता आणी तुमच्या मित्र-परिवारातील तुम्हाला हव्या त्या व्यक्तींना निमंत्रणे पाठवू शकता. तुम्ही तयार केलेले इव्हेंट पेज तुमच्या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती निमंत्रितांना देते. अधिक वेळ न दवडता आपण फेसबुक इव्हेंट्स बद्दल माहिती घेऊयात. तुम्हाला आलेली कार्यक्रमाची निमंत्रणे कशी पहाल ?तुमच्या मित्रांकडून तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमाचे निमंत्रण आले की ताबडतोब तुम्हाला ते ‘नोटीफिकेशन’ (notification) एरियात दाखवण्यात येते पण एकदा ते नोटीफिकेशन पाहून झाले की नंतर तुम्हाला त्या कार्यक्रमाबद्दल माहिती हवी असल्यास तुम्ही ती त्या कार्यक्रमाच्या इव्हेंट पेजवर पाहू शकाल.कॉम्प्युटर वरून फेसबुकवर लॉग इन केल्यावर डाव्या भागात तुमचा प्रोफाइल फोटो दिसतो त्याखाली Events हा तिसरा पर्याय दिला आहे पण जर तुम्ही FAVORITES मधील पर्याय बदललेले असतील तर तुम्हाला तुमच्या बदललेल्या पर्यायानुसार Events हा पर्याय दिसेल याशिवाय तुम्ही इथे क्लिक करून देखील थेट Events पाहू शकाल, पण यासाठी लॉगइन असणे आवश्यक आहे. एकदा या ठिकाणी आलात की तुम्ही तारखेनुसार आयोजित केलेले तुमच्या फेसबुकवरील मित्रपरिवाराचे कार्यक्रम पाहू शकता. तुम्हाला एरवी इथे येणाऱ्या आठवड्यात किंवा महिन्यात कोणकोणत्या मित्र-मंडळींचे वाढदिवस आहेत याची तारखेसह माहिती मिळेल जी फेसबुककडून मित्रपरिवारातील सदस्यांना एकमेकांना दाखण्यात येते याशिवाय ज्या कार्यक्रमांना तुम्हाला निमंत्रण आहे अशा कार्यक्रमांचीही संक्षिप्त माहिती तुम्ही या पानावर बघू शकाल, त्या कार्यक्रमाच्या नावावर क्लिक केल्यावर त्या कार्यक्रमाचे स्वतंत्र पान तुम्हाला दिसते. तुम्ही सर्व Events च्या पानावरून किंवा एखाद्या Event च्या पानावरून नीमंत्रण स्वीकारू किंवा नाकारू शकता. तुमच्या कार्यक्रमाचे पेज तयार करून निमंत्रणे कशी पाठवाल ?
Privacy – तुमचा कार्यक्रम सार्वजनिक आहे का वयक्तिक हे तुम्ही निवडू शकता, Privacy च्या पुढील Invite Only वर क्लिक केल्यावर तुम्हाला तीन पर्याय दिसतील त्यातील कोणता पर्याय कशासाठी आहे हे पहा.
टीप – जर तुम्हाला तुमच्या कार्यक्रमात सर्व मित्र-मंडळींना निमंत्रण पाठवायचे असेल तर ‘गुगल क्रोम’ साठीचे Invite All हे एक्स्टेंशन इथून डाऊनलोड करा , ज्यामुळे निमंत्रण पाठवताना मित्रांच्या लिस्ट खाली Send बटणाच्या बाजूला Select All हा पर्याय दिसेल. Select All हा पर्याय निवडण्याआधी तुम्ही स्क्रोल करून लिस्टच्या शेवटपर्यंत या आणी सर्व सिलेक्ट झाल्यावर Send वर क्लिक करा. अभिनंदन.. तुम्ही तुमच्या कार्यक्रमाचे निमंत्रण यशस्वीपणे पाठवले आहे यानंतर तुम्ही त्याच पानावर येणाऱ्या आणी न येणाऱ्या निमंत्रितांची माहिती पाहू शकाल. |