• Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect

Blogs, Thoughts & Updates

चालतं फिरतं सिनेमा थिएटर !

3/8/2019

Comments

 
Picture
मित्रांनो, बिझनेससाठी योग्य आयडीया आपल्या आजुबाजुलाच असतात, फक्त त्यासाठी नजर पाहिजे आसपासचे प्रॉब्लेम्स ओळखण्याची ! मनोरंजनाची आणि सिनेमाची प्रचंड आवड असलेल्या भारतीयांसाठी अशीच एक अनोखी आयडीया एका उद्योजकाने शोधून काढली आणि त्याचे यशस्वी व्यवसायात रुपांतरही केले.

मल्टीप्लेक्स क्रांतीमुळे शहरी भारतीयांचा चित्रपट-पाहण्याचा अनुभव बदलला असेल परंतु मोठ्या शहरांबाहेर राहणाऱ्या लोकांसाठी, सिनेमागृहमधील नवीनतम हॉलीवूड, बॉलीवूड किंवा प्रादेशिक चित्रपट पाहणे कठीण असते अथवा कधीकधी अशक्य असते.

2013 मध्ये, दक्षिण अमेरिकेत काम केल्यानंतर काही वर्षांनी भारतात परत आल्यावर सुशील चौधरी यांना भारतातील ग्रामीण भागात चित्रपटगृहांचा अभाव जाणवला.1.3 अब्जापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशामध्ये अजुनही लहान शहरे आणि गावे  सिनेमापासून दूर आहेत हे जाणवले, त्यातुनच ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी 'मोबाईल थिएटर' ही संकल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि म्हणूनच 2015 मध्ये त्यांनी 'पिक्चर टाइम' नावाची फर्म स्थापन केली.
Picture
================
नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा -  https://goo.gl/JtFkBR
================

त्यांची ही फर्म 10 ट्रक्स चालविते, प्रत्येक ट्रक मध्ये मूव्ही थिएटरसाठी लागणारे सारे साहित्य आहे जे कोणत्याही लहान शहरात अथवा गावात कुठेही सेट केले जाऊ शकते. ही थिएटर्स पूर्णपणे वातानुकूलित आणि उत्तम दर्जाच्या ध्वनी संयोजनेसहित सज्ज आहेत. आणि प्रत्येकात 150 लोक बसू शकतात. महत्वाचं म्हणजे हे ट्रक्स कर्नाटक, छत्तीसगढ, बिहार, झारखंड आणि महाराष्ट्रसारख्या राज्यांमधील लहान शहरे आणि गावातील प्रेक्षकांसाठी, बाहुबली ते पद्मावत पर्यंत नवीनतम हिट्स पडद्यावर दाखवण्यास सक्षम झाले आहेत. आतापर्यंत  कंपनीमध्ये 30 कर्मचा-यांची वाढ झाली आहे आणि 100 नवीन ट्रक्स वाढत आहेत.

चौधरी आणि त्यांचे सहकरी लोकसंख्येनुसार ठिकाण ठरवून दररोज स्क्रीनिंग आयोजित करतात. गावातील लोकांसाठी सिनेमाच्या सुरुवातीला  सामाजिक जागृती साठी विशेष संदेश देण्यात येतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तिकीटाची किमत 30 रुपये ते 50 रुपयांच्या दरम्यान असते जे मोठ्या शहरांच्या मल्टिप्लेक्सवरील किंमतीच्या तुलनेत अगदीच कमी आहे.सुशील चौधरी यांचे एका दिवसात कमीत कमी बारा लाख लोकांपर्यंत पोचण्याचं लक्ष्य आहे. जेणेकरून भारतातील जास्तीत जास्त लहान शहरे आणि ग्रामीण भागातील लोकांचं हा चालता फिरता सिनेमा नक्कीच मनोरंजन करेल.
ग्राहक आपल्यापर्यंत पोहोचू शकत नसेल तर आपण ग्राहकाकडे पोचलं पाहिजे आणि त्यासाठी चाकोरी बाहेर विचार करुन नविन कल्पना राबवल्या पाहिजेत हे सांगणारी "पिक्चर टाईम"ची गोष्ट नक्कीच आपल्यलाही विचार करयाला लावणारी आहे.

================
नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================

धन्यवाद,

टीम नेटभेट 
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
Comments
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet E-learning Solutions LLP
602, Shivdarshan CHS, Sector 20D, Airoli, Navi Mumbai
​400708, Maharashtra, India

contact - [email protected]
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect