निवडणुका जवळ आल्या की नेते मंडळी अनेक मोठ्या मोठ्या घोषणा करतात, वेगवेगळी वचने देतात. मतदारांच्या दाराशी जातात. पण एकदा का निवडणुका संपल्या की मग पुढील पाच वर्षे आपल्याला ही नेते मंडळी दिसतही नाहीत. त्यांनी दिलेल्या वचनांचा, त्यांनी केलेल्या कामाचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी, त्यावर आपला अभिप्राय नोंदवण्यासाठी सामान्य मतदाराकडे कोणतीच सुविधा उपलब्ध नाही.
तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या कामाबाबत तुम्ही असमाधानी असाल किंवा तुम्ही निवडलेले प्रतिनिधी त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करणे विसरले असतील तर तुम्ही नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना जाब विचारू शकता? हे कसं शक्य आहे याचे उत्तर 27 वर्षीय तरुण उद्योजक प्रथम मित्तल याने शोधले आहे. वाढत्या तंत्रज्ञानांच्या युगात आपण कार चालकांपासून ते रेस्टॉरंट्स पर्यंत सर्व काही इंटरनेटवर पाहून त्यांना रेटिंग देऊ शकतो,म्हणूनच 27 वर्षीय तरुण उद्योजक प्रथम मित्तल याने ‘नेता’ नावाचे मोबाईल अॅप विकसित केले आहे,ज्याद्वारे मतदार त्यांनी निवडलेल्या प्रतिनिधींना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर ‘रेटिंग’ देऊ शकतात.जर मतदार निवडलेल्या नेत्यांच्या कामाबाबत असमाधानी असतील तर ते त्यांचे मत काढून घेऊन दुसऱ्या कार्यक्षम नेत्याला देऊ शकतात.राजकीय नेत्यांसाठी हे अॅप एक अभिप्राय यंत्रणा म्हणून कार्य करेल जे दर दिवशी रोजच्या कामांविषयी आढावा घेण्यास उपयुक्त ठरेल. प्रत्येक विभागात कोणत्या नेत्याला किंवा पक्षाला सर्वाधिक रेटिंग आहे, कोणाची लोकप्रियता कमी किंवा जास्त होत आहे हे दररोज एकाच ठिकाणी जनतेला आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांना पाहता येईल. त्यामुळे प्रत्येक नेत्याला आपोआपच दररोजची स्पर्धा करावी लागेल आणि याचा अंतिम फायदा जनतेला होईल हा या अॅपचा मुख्य विचार आहे. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ मतदारांव्यतिरिक्त, राजकीय पक्षांना तिकीट देण्यासाठी योग्य उमेदवार निवडण्यास देखील मदत होते. मित्तल यांच्या टीमने संपूर्ण भारतातील मतदारसंघाचे डेटाबेस आणि राजकीय पक्षांची माहिती एकत्र केली आहे. प्रत्येक मतदारसंघातील टॉप पाच स्पर्धकांची यादी आहे आणि मतदार त्यांचे मतदानाच्या अभिप्रायाच्या आधारावर त्यांचे मत ऑनलाइन देऊ शकतात, यामुळे पक्षांना अधिक प्रभावीपणे तिकीटवाटपास मदत होते. आतापर्यंत नेता अॅप आणि त्याच्या संबंधित वेबसाइटने काही राज्यांमध्ये 15 दशलक्ष युजर्स एकत्र केले आहेत. 2019 च्या निवडणुकीपूर्वी आम्ही 100 दशलक्षांवर पोहोच असा मित्तल यांचा विश्वास आहे. यावर्षीच्या सर्वसाधारण निवडणुका होतील तेव्हा मित्तल यांचा मतदारांसाठी एकच संदेश असेल: "जातीच्या आधारावर मत देऊ नका किंवा जो चांगला बोलतो त्यालाही मत देउ नका, आपल्या नेत्यांचा अहवाल आणि रेटिंग पाहूनच मत द्या. नेता अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा - https://play.google.com/store/apps/details?id=in.netaapp&hl=en_IN ================ नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - SUBSCRIBE - https://goo.gl/JtFkBR =============== धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com |