• Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect

Blogs, Thoughts & Updates

अलिबाबा.कॉमच्या विक्री उच्चांकातून  आपण काय शिकू शकतो ?

11/13/2018

Comments

 
Picture
परवा ११ नोव्हेंबरला चीनच्या अलिबाबा.कॉमने एक नवा विक्रीचा उच्चांक गाठला. सिंगल्स डे म्हणून ओळखल्या जाणार्‍या या दिवसामध्ये अलिबाबा.कॉमने तब्बल ३० बिलियन डॉलर्स इतकी विक्री केली. जगामध्ये कोणत्याही कंपनीने एका दिवसात केलेल्या विक्रीचा हा जागतिक विक्रम होता. अलिबाबाने गेल्या वर्षी सिंगल्स डे मध्ये २५ बिलियन डॉलर्सचा सेल्स केला होता.
​
मित्रांनो, हा सेल्स किती मोठा होता ते समजावून घेण्यासाठी आपण आपल्या भारतातील इकॉमर्स कंपन्यांचं उदाहरण घेऊया. 
फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन या दोन मोठ्या इकॉमर्स कंपन्यांची भारतातील वार्षिक मिळकत अनुक्रमे ६.५ बिलियन आणि ५ बिलियन डॉलर्स आहे. म्हणजेच या दोनही कंपन्या मिळून पुर्ण वर्षभरात जेवढा बिझनेस करतात त्याच्या तिप्पट विक्री अलिबाबा.कॉम ने केवळ एका दिवसात केली.


सिंगल्स डे म्हणजे काय ?

११ नोव्हेंबर ही तारिख (11/11) चार वेळा एक आकडा दाखवते म्हणून या दिवसाला चीन मध्ये सिंगल्स डे म्हणजेच "एकट्या (अविवाहित) लोकांचा दिवस" म्हणून साजरा करतात. ज्याप्रमाणे जोडप्यांसाठी वॅलेंटाईन डे असतो , त्याच्याच विरुद्धार्थी म्हणून सिंगल्स डे साजरा केला जातो. परंतु मित्रांनो, दहा वर्षांपुर्वी हा दिवस काही एवढा मोठा नव्हता. कॉलेजमधील मुलांमध्ये हा दिवस काही प्रमाणात साजरा केला जायचा एवढंच !

अलिबाबाचे संस्थापक "जॅक मा" यांना अमेरीकेत होत असलेल्या "ब्लॅक फ्रायडे" या सेलला प्रत्युत्तर म्हणून चीन मध्ये काहितरी सुरु करायचे होते. आणि म्हणून त्यांनी सिंगल्स डे हा दिवस निवडला. पहिल्या वर्षी फक्त २७ विक्रेत्यांनी यात सहभाग घेतला, पुढील वर्षी ४००० विक्रेत्यांनी आणि आता चीनमधील जवळपास प्रत्येक ऑनलाईन विक्रेता यात भाग घेतो आहे. ब्लॅक फ्रायडेच्या विक्रीला अलिबाबाने केव्हाच मागे टाकले आहे.

उद्योजकांना यातून दोन गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.

पहिलं म्हणजे इतर ठिकाणी जे चालतंय ते आणि आपल्या ग्राहकांना काय पाहिजे याचा ताळमेळ गाठता आला पाहिजे. जसंच्या तसं परदेशाची 
कॉपी करुन चालत नाही !

दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या ग्राहकांच्या संस्कृतीकडे बघून आणि भावनिक गरजांना ओळखून आपली उत्पादने, मार्केटिंग, ऑफर्स इत्यादी बनविल्या पाहिजेत !
ग्राहकांच्या मनाला जोपर्यंत भिडत नाही 
तोपर्यंत काहीच विकलं जात नाही. 

"ग्लोबल आयडीया, लोकल बिझनेस !" हे जॅक मा चे ब्रीद लक्षात घेऊन प्रवास करा !

धन्यवाद !
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स 
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
www.netbhet.com
Comments
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet E-learning Solutions LLP
602, Shivdarshan CHS, Sector 20D, Airoli, Navi Mumbai
​400708, Maharashtra, India

contact - [email protected]
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect